सदस्य प्रवेश |
पंडितजी गायले .......'ती' बातमी वाचल्यापासून गेल्या दोन दिवसांत मनात जे जे काही आलं ते शब्दांत सांगणं म्हणजे अक्षरश: गगनाला गवसणी घालण्यासारखं आहे. तसा प्रयत्न करायचा म्हणजे मला आधी वाल्मीकी किंवा गदिमांच्या प्रतिभेची उसनवारी करावी लागेल. ती बातमी म्हणजे ... 'पंडितजी गायले'. खरंतर मला शास्त्रीय संगीतातलं ओ की ठो कळत नाही. तानसेन काय कानसेनही नाहिये मी. दूरदर्शनवरच्या त्या 'बजे सरगम गूंज बनके देस राग' गाण्यामुळे 'देस' राग कधितरी ओळखता येतो ... आणि कधीतरी चुकून 'भैरवी'चा साक्षात्कार होतो. पण ऐकायचा शौक मात्र आहे. पुण्यनगरीतल्या काही वर्षांच्या वास्तव्यात हा शौक उत्तरोत्तर वाढत गेला. अर्थातच 'सवाई' हा गणपती-दसरा-दिवाळी प्रमाणेच वार्षिक सण बनून गेला होता. आणि सवाईच्या तमाम चाहत्यांप्रमाणेच पं. भीमसेन जोशी हे माझंही कधी दैवत बनलं हे कळलंच नाही. जाणकारां पासून संगीताच्या क्षेत्रात 'औरंगजेब' असणार्या माणसापर्यंत सगळेच लोक मान्य करतील की 'सवाई' मध्ये भीमसेनना ऐकणं हा एक अद्वितीय सोहळा असतो. मी पुण्यात इतरत्रही त्यांचे कार्यक्रम ऐकले आहेत पण 'सवाई' मधलं त्यांचं गाणं आगळंच! त्यात काय वेगळं असतं मला सांगता येणार नाही पण वेगळं असतं हे खरं. |
|
लिहिलेला शब्द अन शब्द पटला.. पंडितजींना 'सवाई' मध्ये एकणे हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो.. माझ्या सुदैवाने आठ वर्षे तो अनुभव मला पुन्हा पुन्हा घेता आला.. पण यंदा मात्र नाही जमले अन त्याची हुरहुर ही कायमच जाणवत राहिल..
'सवाईच्या' असंख्य आठवणी आहेत.. बघू जमेल तसे लिहायचा प्रयत्न करेन..
खरंच खरंच,
मला मात्र नेट स्पीड कमि असल्यामुळे अजूनही नीट ऐकायला मिळालेलं नाहिये
खरंच,मलादेखिल ऐकताना डोळ्यांत नकळत पाणी आलं रे!!कलाकारांना वयाचं बन्धन नको होतं देवानी ठेवायला.अजून भरपूर वर्ष गाउ दे ह्यांनी आपल्या आयुष्यातली काहि वर्ष घेऊन ,असं वाटलं.थकलेत पण आता खूपः-(
पराग! मध्ये पंडितजींचा त्यावेळचा एक फोटो वर्तमानपत्रात आला होता. त्यांची प्रकृती एवढी नाजूक होती की (मला शास्त्रीय संगीतातलं कळतं असं नाही, तर एक चाहता म्हणून) तो फोटो बघून मनात ज्या भावना आल्या त्या शब्दांत सांगता येत नाहीत. खरं म्हणजे असा विचार करायलाही मनाला त्रास होतो, पण त्यानंतर पंडितजी गातील असं वाटलं नव्हतं. त्यानंतर साधारण एप्रिल मध्ये त्यांनी गायलेल्या एका प्रोग्राममधल्या देसकाराची क्लिप पाहण्यात आली. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. या वयात अशा अवस्थेत ते त्याच आवेशात गात होते, ते पाहताना बघणार्याच्या काळजाचा ठोका चुकावा. आणि आता परत 'सवाई' मध्ये ते गायले हे ऐकून तर मी नि:शब्दच झालो. खरंच वृषाली म्हणते तसं वयाचं बंधन नको होतं कलाकारांना..