सदस्य प्रवेश |
अनकॉमन'जॉन'.......जॉन.., किती कॉमन नाव! कोणाही सर्वसामान्य व्यक्तीचं असू शकतं. अगदी 'क्ष' सारखं. हे नाव ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर कोणीच उभं रहायचं नाही.त्याला भेटण्यापूर्वी. प्रत्यक्ष गाठ पडण्याआधी तशी मला त्याच्याबद्दल बर्यापैकी माहिती कळली होती. तो माझा कलिग होणार होता म्हणूनच मी जरा जास्त माहिती काढली असावी. आम्हाला एकत्र काम करायचं होतं. माझी कम्पनी तशी लहानच म्हणायची. सगळे एकमेकाना ओळखणारे. कामाच्या स्वरुपा व्यतिरिक्त कोणात भेदाभेद नाहीत. एक कुटुम्बच जणू.मी सोडल्यास बाकी सगळे देशावन्शाने सारखे पण कधी वेगळेपणा जाणवला नाही, जाणवून दिला गेला नाही. त्यामुळं नवीन येणारी व्यक्ती 'attitude' घेऊन आली तर जरा खळबळ माजायची काळजी. जॉन बाबत ती काळजी लगेचच दूर झाली. त्याच्य मनमोकळ्या स्वभावामुळे लगेच सामावून गेला. लोकानी तो 'fit in' झाल्याची पावती दिलीसुद्धा! आम्ही दोघे ही एकाच college मधून ग्रॅजुएट झालो होतो. त्यामुळं चर्चेसाठी काहीतरी विषय होता. मग समजलं की जगाच्या दोन टोकाना, पण आम्ही एकाच दिवशी जन्मलो होतो! त्याला खेळान्चीही माझ्यासारखीच खूप आवड होती. एकदा बोलता बोलता तोच विनोदानं म्हणाला होता मला मोठा खेळाडू व्हायला आवडलं असतं पण काय करणार मी हा असा "Short, Fat and White!" हे त्यानेच केलेलं स्वतःच वर्णन त्याचं बाह्यरूप आणि काहिसं आतलं रूपही सान्गायला पुरेसं आहे. एका मध्यमवर्गीय अमेरिकन सुदृढ मिलिटरी फमिलितून आलेला, आई - वडील दोघेही नौदलात होते. त्यान्च्याबरोबर याचही जगभर फिरणं झालं होतं. त्याच्या वडलान्चे posting दिएगो गार्सिआला होते तेव्हा तो त्यान्च्या बरोबर तिथे होता. तेवढाच काय तो भारतभूमीच्या जवळ गेला असेल. तो रहायचा दूर, contryside ला. traffic चुकवण्यासाठी पहाटे ६ ला पोचायचा ऑफिसमधे आणि निघायचा सन्ध्याकाळी ७ ला! पण मग एखादा दिवस घरून काम करी किन्वा सुट्टी घेई. कामा व्यतिरिक्त अर्थातच इतर social events ही व्ह्यायचे. तो भारतीय जेवण जेवण्यात अगदी सराईत होता. त्याला तिखट, मसालेदार पदार्थ खूप आवडत. एका 'थाई' lunch ची आठवण अजूनही माझ्या 'डोळ्यात पाणी' आणते. त्याच्यासारखीच मी ही 'extra spicy' डिश मागावली, वरून 'spice rack' मधले दिसेल ते आणाखी ऍड केले. तो ही तेच करत होता, मग मी कशी मागे रहाणार? त्यात मी तर भारतीय, मला सवय आहे अशी फुशारकी मारलेली. तो मजेत खात होता. माझ्या नाका डोळ्यातून धारा लागायची वेळ आली होती, कपाळावरचे घर्मबिन्दू हळूच पुसत पाण्याबरोबर मी घास ढकलले. spicy खाणारे म्हणून प्रसिद्ध असलेल्या तमाम भारतियान्ची इज्जत मी धुळीला मिळवणार आहे असे उगाचच तेव्हा मला वाटले. त्याचे माझ्या अवस्थेकडे लक्ष नक्कीच गेले असणार, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले असावे. या बाबतीत पुढे मी त्याच्याशी बरोबरी करणं सोडून दिलं. माझ्या भारत वारीनन्तर मी आणलेली मिठाई इतर काही लोक 'खाऊन आपण आजारी तर पडणार नाही ना' म्हणून घाबरतच तोन्डात टाकत तेव्हा आवडली म्हणून निम्मा अधिक बॉक्स जॉन ला फ़स्त करताना मी पाहिले होते. त्याला माझ्या trip चे फोटो पहायचे असत. तो म्हणे 'इथे दाखवल्या जाणार्या चित्रांशिवाय तिथे वेगळे, चान्गले बरेच असणार हे मला माहित आहे, तू फोटो काढून आण'. धर्म आणि राजकारण हे तसे इथले नाजूक विषय, कोणाशीही जाऊन गप्प मारण्यासारखे नाहीत. जॉन शी यावर बिनदिक्कत चर्चा करता यायची. य विषयावर कोणशी, कधी आणि कितपत बोलावे हे मी त्याच्याकडूनच शिकले म्हणायला हरकत नाही. पाश्cयात्याना भारतीयान्शी दोन विषयावर बोलायला आवडतं, ते म्हणजे जातीव्यवस्था आणि arranged marriages . तो ही बोलला, भारतातली जातीभेद दूर होणे हे कसे 'just matter of compliance' आहे आणि वर्णभेद कमी होण्यासाठी सुद्धा कशा बर्याच पिढ्या जाव्या लागल्या हे मला सान्गितले. ' arranged marriage चे काही फायदेही असतात...' अशी सुरुवात करून त्याने दिलेले लेक्चर मी थक्क होऊन ऐकत राहिले होते. असे फायदे सान्गणारा पाश्चिमात्य माणूस मी प्रथमच पाहत होते. त्याला एकदा एक आन्तरराष्ट्रीय स्तरावर बर्यापैकी गाजणारा हिन्दी चित्रपट पहायचा होता. लाम्बलचक चित्रपट पहायची सवय नसतानाही त्याने तो एका बैठकीत पाहिला. माझ्याकडे आणखी काही असतील तर पाहण्याची इच्छाही दर्शवली. मी इतर काही चित्रपट देतानाच बजावून सान्गितले होते, 'डोके बाजूला काढून ठेऊन बघ, आणि मला नन्तर काही प्रश्न विचारू नकोस.' त्याने ते ही पाहिले. He enjoyed the big dance numbers! पण तरीही त्याला काही प्रश्न पडले असावेत, खास करून कथानकाबद्दल. त्याने एक दोन वेळा विचारायचा प्रयत्न केला पण पुन्हा "Never mind" म्हणून गेला. त्याला काही पात्रान्च एकमेकान्शी नातं कोणतं होतं तेच कळलं नव्हतं. अर्थात सगळ दोष त्याचाही नव्हता पण मला त्यावेळी हसू आवरले नाही. एका हिरॉईनच्या तो इतका प्रेमात पडला की मला हिचे असतील तेवढे सगळे movies आणून दे अशी order दिली. मी म्हटलं, " ती काही एवढी चान्गली actreess..." त्याच्या घरीही बरेचदा जाणं झालं. गावाबाहेर फार्महाउस आणि भरपूर मोकळी जागा. अमेरिकन विहीरीच्या पाण्याची चव पहिल्यान्दा त्याच्या घरी चाखली. त्याने २ लामाही पाळले होते. मूळचा दक्षिण अमेरिकेतला हा उन्टासारखा प्राणी. त्याची लोकर काढून तो आपल्या आजीला पाठवायचा विणकामासाठी. त्यातल्या लेडी लामाचे बाळन्तपण आणि जन्मतः काही problem असलेल्या बेबी लामाला वाचवण्यासाठी स्वतःचे हजारभर डॉलर्स खर्च केले जॉनने. त्याची धडपड सार्थ ठरली मग त्याच्याकडे ३ लामा झाले. अजूनही दरवर्षी 'फॉल' सिझन मधे न चुकता एक फेरी होते त्याच्या घरी. एखाद्याला आपल्यात सामावून घेणारे बरेच जण भेटतात, पण एखाद्याच्या वेगळेपणात स्वारस्य दाखवणारे कमीच. जॉन ने नेमके ते माझ्या बाबतीत केले. तो अमेरिकन फुट्बॉल वर जशी माझ्याशी चर्चा करी तशीच क्रिकेटवरही. माझ्या डब्यातले पदार्थ ' try' करणारा, स्पष्टवक्ता, दुसर्याच्या culture मधे इंटरेस्ट घेणारा, मी कागदोपत्री अमेरिकन झाले तेव्हा ऑफिसमधे सरप्राईज पार्टी देणारा वर 'I can now influence you with my political views' म्हणणारा, '9/11' दिवशी मी लवकर घरी निघून गेल्यानन्तर भारतातली माझी माणसं काळजीने फोन करतील म्हणून माझ्या desk वर येणारा प्रत्येक फोन उचलणारा जॉन मला जगावेगळा वाटतो. त्याच्या नावाच्या अगदी विरुद्ध! कधीकधी उगाचच मनात विचार येतो....जगातले सगळे जॉन याच्यासारखे असते तर..........? |
|
मस्त लिहीले आहेस. गंमत म्हणजे आज लन्च ला आमची चर्चा भारतीय ऐरेन्ज मॅरेज, येथील लग्न व डिव्होर्स चे प्रमान यावर झाली होती.