जायके का सफर-औरंगाबाद

आता गुलमंडीवर फिरतोय आपण तर इथलीच सगळी ठिकाणं बघू या . स्मित
इथे अगदी २५ वर्षापेक्षाही? अं ss नाही त्याहून जुनी असलेली काही hotels आहेत त्यापैकी एक म्हणजे मेवाड. हे अजूनही गर्दीने वाहतं असलेलं hotel,याचं लोकेशन पण अगदी heart of the city (आता काही संकेत बदलले असले तरी गुलमंडी ती गुलमंडी ) स्पेश्यालीटी; दही मिसळ,एकदम फर्मास मला अजूनही जावं वाटत इथे पण इथे येणारा crowd बराच बदललाय आणि स्टेटस, हायजिन असे काही नवीन शब्द माहीत झालेत मला अरेरे. गुलमंडीच्या ऐन चौकात असलेलं शामलाल कोल्डड्रिंक्स अजूनही चालू आहे . (माझ्या लहानपणच आइसक्रीमचं एवढंच एकमेव दुकान आठवतं मला).
याच रस्त्याने जरा पुढे सिटीचौकाकडे निघालं की " गायत्री चाट भांडार "भरपूर प्रसिद्ध असलेलं चाट भांडार आहे हे, याच्याकडची कचोरी,समोसा,मुंगभजे (एकदम स्पेशल),आलुवडा . हे ही बरंच जुनं आहे आणि अजून दणदणा चालतं. इथेच गुलमंडीवर असणारं पण आम्हा मुलींना वा बायकांना जाता न येणारं एक हॉटेल म्हणजे न्यू मराठा हॉटेल. लाल तर्री पातळ रस्सा आणि झणझणिताच्याही पुढचं तिखट असे अस्सल गावठी मासांहारी पदार्थ मिळणारं ठिकाण (आम्हाला पार्सलवरच समाधान मानावं लागायचं )अजूनही चालू आहे बहुदा.

आता जरा गुलमंडीवरुन अंबा अप्सरा talkies कडे निघायचं आपल्याला, याच्या समोर असणा-या गाड्या म्हणजे साबुदाणा वडयासाठी गर्दी खेचणा-या.औरंगपु-यात आलं की आली आमची शाळा आणि collage. अर्थात एस बी colony. इथे असणारं पुर्णानंद या दुकानाबद्दल तर किती लिहावं तेवढं थोडं आहे. इथे आलुवडा आणि समोसा भन्नाट मिळायचा पब्लिक वेडं झालं होतं तेव्हा ;अक्षरशः: घरीसुद्धा पार्सल मागवले जायचे .

आता collage मधून टिपी साठी गाठायची ठिकाणं हाहा
निराला बाजार मधलं ५६ भोग तेव्हाच्या तरुण पिढीसाठी 'दिल की धडकन " वगैरे होतं.हे हॉटेल खायला विशेष काही प्रसिद्ध नव्हतं , पण माहौल एकूणच फार छान असायचा. याच्या समोरच असणारं आर्चिज पण याचंच भावंड इथे पावभाजी छान मिळायची, हे रिनोवेट केलं वाटत आणि अजूनही चालू आहे..........
५६ भोग मात्र बंद पडलं केव्हाच. अरेरे

पैठणगेटवरच लकी ज्यूस सेंटर भरपूर जुनं अजूनही तेवढंच चालणारं . मग गोमटेश मार्केटमधलं राधिका (उडुपी), वरद गणेश समोरच मेषा दोन्हीही स्वस्त मस्त आणि आपले वाट्णारे. कधीही गेलं तरी पडीक पब्लिक सापडणारच इथे. (आता दोन्ही नाहीये). तिथून जरा पुढे जुन्या हेडगेवार hospitalच्या बाजूला एका साउथ इंडियन माणसाने चालू केलेला stall . हा stall एवढा चालतो खरचच त्याच्याकडचा मेदूवडा,इडली, सांबार ,आणि सही ssss असणारी चटणी. क्रांती चौकातल्या पावभाजीच्या गाड्या , अजूनही आहेत, मस्त पावभाजी मिळायची. खास पावभाजीसाठी आम्ही एवढ्या लांब जायचो तेव्हाही.(नवीन जाणा-यांना क्रांती चौक आणि निराला बाजार छान option आहेत सटरफटर खाण्यासाठी).

क्रमश: