सदस्य प्रवेश |
चित्रकजंगलात चालताना नजर पायाखाली ठेवावीच लागते आणि अश्यावेळी खुपदा पायवाटेच्या शेजारी आपल्याला चित्रकाची साधीशी फुले दिसु शकतात. हा फोटो जरा जास्तच डिटेलमधे घेतलाय, कारण हे फुल जेमेतेम १ सेमी व्यासाचे असते, आणि यासारखी दिसणारी अनेक फुले असु शकतात. पण पुष्पकोषावरच्या लहान लहान ग्रंथी या, चित्रकाची खासियत, यामूळे हे झुडुप सहज ओळखता येते. वरचा फोतो बघुन अनेकजणाना जे झुडुप ओळखीचे वाटले असणारच. पण वाटते तितके हे झुडुप साधे नाही बरं का. पण तरिही चित्रक खुप औषधी आहे. ( परत एकदा सूचना, कुठलेही आयुर्वेदिक औषध जाणकार वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचे असते. आयुर्वेदिक औषधे करण्याची प्रक्रिया हि खुपदा गुंतागुंतीची असते. या प्रक्रियेनंतर वनस्पतिंचा विखार नष्ट होतो, व केवळ उपयोगी सत्व शिल्लक राहते. ) पण आपण मात्र या फुलांचे सौंदर्य नजरेने टिपून घेऊ या. यात मात्र कुठलाच धोका नाही. |
|
छान आहे चित्रक,
दिनेश, गेल्या आठवड्यात रायगडावर गेलो होतो आम्ही तेव्हा अर्जुनासारखाच दिसणारा वृक्ष दिसला पण त्याच्या हिरव्या फळांच्या मध्ये एक काटेरी गोल होता हिरवाच. मी सरळ हा अर्जुन म्हणुन सांगितले सगळ्यांना पण तरिपण मनात शंका आली कि नक्कि अर्जुन कि त्याच्यासारखाच कुणितरी दुसरा??
बाय द वे, माहिमची सहल ठरत असेल तर मी पण आहे. तुमच्यासारखा झाडाड्या (वाट दाखवणारा वाटाड्या, मग झाडे दाखवणारा?) नवसाने पण सापडणार नाही कुठे....
साधना
दिनेश
छान आहे माहीती आणि फोटोही चित्रक चे.