Submitted by जो_एस on 12 October, 2007 - 23:58
खरंच, तू आजवर
सतत सोबत होतास
अगदी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर
काहीही झालं तरी
कधीही, कुठेही, कशामुळेही
अगदी कोणत्याही क्षणी
तू मला
अजिबात अंतर दिलं नाहीस
म्हणूनच
म्हणूनच आता मी पक्कं ठरवलंय
की तुझ्याशीच
फक्त तुझ्याशीच मैत्री करायची
तुझ्या आठवणी मनातून
घालवणार तरी कशा?
अपयशा . . . . .
-Jo_s
विशेषांक लेखन:
शेअर करा