आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी? ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता... त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था