गुपित

Submitted by pulasti on 6 November, 2008 - 07:32

पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही
बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही

कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!

मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!

गुलमोहर: 

क्षणिक दिवाळ्या! सहीच..

कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही>>मस्त

>>> लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
>>> हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

Happy

>>>कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
>>>ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

वाह पुलस्ति !

लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!
>> मस्त!!!

व्वा मस्त

जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही.... अप्रतीम

सुधीर

मस्तच. सगळेच.

पुलस्ति,
मस्त गझल! सारेच शेर छान आहेत. पण मतला, दिवाळी आणि गुपित हे फारच छान!
सुधीर ने म्हटल्याप्रमाणे "जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही"
हे अप्रतिम. यातली कल्पना आणि मांडणी दोन्ही सुंदर!
आणि वृत्तही मोठं आहे Happy
-सतीश

व्वा ! क्या बात है... मस्त जमलीये.. एकासर एक आहेत सगळेच शेर..

अहा क्या बात है रे...!!
लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!..... सही !!!!!!!!!

एक्दम झकास!!
आवडली!
..प्रज्ञा

वाह वा! मस्तच! सर्व शेर आवडले.. शेवटचा तर खासच!
-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..

अहाहा ! सुरेख. सगळेच आवडले, त्यातही दुसरा आणि शेवटचा तर खासच.

    ***
    comfortably numb

    व्वा!!! मस्त आहे गझल... सर्वच चांगले आहेत पण त्यातही लिहीत नाही आणि दिवाळ्या मस्त

      ================
      जरी आंधळा तरी जगाची
      नेत्रपल्लवी कळू लागली

        प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!

        मस्तच आहे. Happy
        मी आधीच वाचली होती आणि दुसरा शेर आवडला होता. सिग्नेचर म्हणून लावू का? Happy

        अहाहा! मन:पूर्वक.

        <<<पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही
        बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही

        रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
        अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!>>>
        आवडले शेर.
        मस्त ग़ज़ल!

        शरद
        .............................
        "तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
        बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
        ............................

        लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
        हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!

        रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
        अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!

        व्वा..!

        पुलस्ती, आपल्या गझलेचा रंग आणि ढंग काही औरच..!
        लिहीत रहा..!

        लिहीत नाही जेव्हा माझे चार दिवस ते सुखात जाती
        हाय पुन्हा मग दिसते काही, स्मरते काही... सुचते काही!>>>>> क्या बात है!!!!!!!!!!

        कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
        ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही>>>जबरी!!!

        -Impossible is often untried.

        मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
        जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!

        मस्तच.. खुप आवडली गजल...

        *****&&&*****
        Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

        आवडली गझल.. फारच छान.
        -----------------------------------------------
        स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

        कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
        ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

        रोज साजर्‍या करतो माझ्या मनातल्या या क्षणिक दिवाळ्या
        अंधारावर जळते, क्षणभर लखलखते अन... विझते काही!

        सुरेख!

        अप्रतिम!!!

        >>>>>कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
        ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

        लाजवाब!!

        >>>>मरणाची कोणाला चिंता? गुपित समजले अमरपणाचे
        जगले जे नाहीच मुळी ते सांग कधी का मरते काही!

        क्या बात है!!
        ---------------------------------
        देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

        Pages