आकार नाही!

Submitted by गणेश कुलकर्णी on 3 November, 2008 - 08:07

जगातून इतक्यात माघार नाही
मनाला कशाचाच आजार नाही!

उगा वाचतो रोज पोथ्या पुराणे
प्रभू एवढ्याने गवसणार नाही!

लढाया जुन्या काल बोलून गेल्या
नव्या ह्या जमान्यास आभार नाही!

असा ये जशी की झळाळी नभाला
अजुनही कपाळी अंलकार नाही!

कसे दाखवू दु:ख माझे जगाला
तयाच्या नशीबात आकार नाही!

: गणेश कुलकर्णी (समीप)
९७६४७७३२५७

गुलमोहर: 

लढाया जुन्या काल बोलून गेल्या
नव्या ह्या जमान्यास आभार नाही!

कसे दाखवू दु:ख माझे जगाला
तयाच्या नशीबात आकार नाही!

मस्त.

का वृथा अशी माघार घ्यावी
दु:खाविना सुखाला अर्थच नाही !