Submitted by सत्यजित on 22 October, 2008 - 08:40
का सत्याची कास धरावी तरी भीती वाटते?
का न्यायाची आस धरावी तरी भीती वाटते?
का पट्टी डोळ्यांवरली कान देवीचे झाकते?
का अपराधी वाट धरावी तरी भीती वाटते
का श्रद्धेने मी धगधगती उदी भाळी लावली
आता विझली वात धरावी तरी भीती वाटते
त्या नात्यांचा पीळ जळाला तरी येती कावळे
का आप्तांची साथ धरावी तरी भीती वाटते?
का सौख्याचे भिंग तडकता असे उरले आरसे?
प्रतिबिंबावर मात करावी तरी भीती वाटते
खर का रंगाने कळते मी तुला कीती भावते?
का मेंदीची कात सरावी तरी भीती वाटते
-सत्यजित.
कार्यशाळेला गझल पाठवण जमल नाही, अभ्यास नव्हता झाला म्हणुन ड्रॉप घेतला. 
आता हा मागाहुन पेपर देतो आहे. पास झालो का ते सांगा रे आणि मार्क पण द्या...
गुलमोहर:
शेअर करा
मस्त आहे. ७
मस्त आहे.
७ मार्क.
~~~~~~~~~
दक्षिणा......
~~~~~~~~~
सत्या, बाल
सत्या, बाल कविता बंद करून गझलाकार झालास की रे. आहेस कुठे सध्या ???
छान कल्पना आहेत. बाकी जाणकार मार्क देतीलच.
अप्रतिम
अप्रतिम
सत्यजित
सत्यजित कल्पना चांगल्या आहेत..:)
मी काही जाणकार नाही पण जे वाटलं ते खालील प्रमाणे
थोडी व्याकरणात गल्लत झाल्याचं वाटतं..
मतल्यात
का सत्याची कास धरावी तरी भीती वाटते?
का न्यायाची आस धरावी तरी भीती वाटते?
इथे..
काफिया कास आणि आस ने तयार होतो..
त्यामुळे
बाकीच्या शेरांत
व्यास, त्रास वगैरे आले पाहिजे होते..
नाहीतर मतल्यातच स्वर काफिया घेतला असता तरी चाललं असतं
म्हणजे
उदा.
का सत्याची साथ धरावी तरी भीती वाटते?
का न्यायाची आस धरावी तरी भीती वाटते?
आणि
'चाहते' सारखा शब्द टाळता आला तर चांगलंच, सहसा अशी तडजोड टाळावी
पुढील गझलेसाठी शुभेच्छा..:)
देवा 'आस' हा
देवा 'आस' हा काफिया होतो आहे हे माझ्या अजिबात लक्षात नाही आलं. मी 'अ' हा स्वर काफिया धरुनच गझल लिहिली तो पण ध अक्षरातला कारण पुढे सरावी आणि करावी हे शब्द आले आहेत.
का सत्याची कास धरावी तरी भीती वाटते?
का न्यायाची आस धरावी तरी भीती वाटते?
पण तु म्हणतोस त्या प्रमाणे मतल्यात ते स्पष्ट होत नाही. पण जर पुढचे शेर जर ते स्पष्ट करत असतील तर ते अयोग्य होत का?
चाहते बद्दल तुझ मत मला मन्य आहे मी पण भावते आणि चाहते ह्या मध्ये अडकलो होतो, पण दोन्ही शब्दांमुळे कर्ता बदलतो आहे. लिहिताना चाहते योग्य वाटला होता पण मी आता परत कनफ्युस झालो आहे. त्यामुळे पुन्हा भावते वर येतो म्हणजे पुढच्या ऑळीला अपेक्षित तो अर्थ पण येईल.
गुरुवर्य कुठे आहेत की माझ्या पुढे हात टेकलेत?
सत्यजित..
सत्यजित.. माझ्या मते, मतल्यात गझलेचि जमिन तयार होत असल्याने खरंतर गझलेची अलामत 'आ' आहे. ती पुढच्या शेरांमध्ये भंग व्हायला नको. बाकी जाणकार सांगतील.
का
का सूर्याला सामोरे जाता नजर बंद होते
का नजरेला नजर देता पापणी ही झुकते?