प्रिय रंजूस,
काय ग रंजू..कशी आहेस अं?
फोन करत जा की अधूनमधून..किंवा निदान ईमेल तरी
का इतकी बिझी झालीस की बालवाडीपासूनच्या मैत्रिणीला विसरूनच गेलीस अं?
आणि नवरा काय म्हणतो तुझा? हं..आता काय तुम्ही फॉरेनरच झालायत म्हणायचं,
तरी नशीब तू आपला मराठी मुलगाच पाहिलास हो..अग्ग आता
मराठी बाण्याचा पक्ष अमेरिकेत देखील मराठी पाट्यांची सक्ती करणार आहे म्हणे ..नाही नाही दुकानांच्या पाट्या
नाही गं..म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांच्या घरावर ज्या पाट्या असतात ना त्या ..म्हणजे कळलं पाहिजे अमेरिकेतही
की हे मराठी माणसाचं घर आहे..चळवळ जोरातच आहे म्हणायचं!
आणि भारतात या की ग कधीतरी..का अमेरिकाच आवडायला लागली आहे अं?
आम्हाला ओळख दाखव आणि आलीस की नाहीकर म्हणायचीस who r u? म्हणजे झाली
का पंचाईत..
आणि काळजी घेत जा ग..काय ग तिकडे म्हणे बायकादेखील पब-बिबमध्ये जातात म्हणे..
तू जाऊ नकोस हो..म्हणजे तू आहेसच तशी गुणाची ..पण काळजी वाटते हो!
अग्ग आज दहीहंडी ना..म्हणून सक्काळपासून आठवण येत होती तुझी
पानात दही वाढलं आणि आपल्या दहीहंडीची आठवण आली..
दर दहीहंडीला आपण आपल्या गच्चीवर..आणि एकदा तर तू कम्मालच केली होतीस..चक्क हंडीला
दगड मारला होतास..आणि गोविंदा आपला वरती पोहोचायच्या आधीच हंडी फुटली..तो गोरामोराच झाला.
आणि त्यानंतर आपण गच्चीतून जी काही धूम ठोकली..बापरे..मज्जा नुसती!
काय ग अमेरिकेत नाही का आपल्या लोकांची दहीहंडी..सॉरी curdmatka ..इइइ..काही मज्जाच नाही या नावात नाही का?
तिकडे नको मारूस हो दगड-बिगड..अर्थात दगड सापडणार तरी कसा मेला तिकडे
पण तुझा काही नेम नाही..घेतलंस एखादं पेपरवेट आणि फोडलीस हंडी तरररर!
तुझा खोडकर स्वभाव मी चांगलाच ओळखून आहे हो!
अग्ग हो..अज्जून एक मज्जा..
आत्ता टीव्हीवर बातम्या बघत होते..तर काय बातमी असेल ..ओळख पाहू..
मनोरा कोसळला आणि गोविंदा लटकला..
दादरला एका दहीहंडीचा मनोराच कोसळला आणि गोविंदा आपला लटकतोय हंडीच्या दोरीला
अश्शी धम्माल असते बघ दहीहंडीला..
अग्ग ..चल मी जाते आता..अग्ग आपल्या चाळीत वैशाली सामंत येतेय आत्ता ..
ऐका दाजीबा ऐकायला जाते आता..
पण तू मेलमधून तुझी खबरबात ऐकवायला विसरू नकोस हो..
टाटा
तुझीच
सरला सरसरे
छान
छान प्रयत्न आहे, प्रतिसाद नाही मिळाले म्हणुन नाउमेद न होता प्रयत्न करत रहा आणखी चांगले लिहू शकता.
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
वा,दहीहंडी
वा,दहीहंडीचं पत्र!! कल्पना छान आहे बाकी अमेरिकेत दहीहंडी विरळाच त्यामुळे रंजू नक्की खुश झाली असेल

"curdmataka"
निल्मे..
निल्मे.. कुछ खास जम्या नही..
३ रंगांचा मेकप झालाय.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
खुप सुन्दर
खुप सुन्दर .........