स्वातंत्र्य म्हणजे गोळ्या बिस्किटं अन खूप खूप चॉकलेटं
पण ... आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणं
स्वातंत्र्य म्हणजे हुंदडणं बागडणं धम्माल करणं
पण ... पूर्ण प्रयत्नांनी जास्तीत जास्त मार्क मिळवणं
स्वातंत्र्य म्हणजे रडणं धडपडणं चुका करणं
पण ... त्याच त्याच चुका परत न करणं
कोणत्याही अपयशानं खचून न जाणं
आणि मोठ्यांच्या आधारानं स्वत:ला सावरणं
स्वातंत्र्य म्हणजे बेभान बेधुंद वागणं
पण ... कर्तृत्वाची शि़खरं विनयानं सर करणं
- श्रीनिवास भिडे