Wall E

Wall E - चांगला आहे. 'ग्रेट' नाही आहे. ऍनिमेशन सुंदर आहे, प्रश्नच नाही. पण ते सुरवातीला जेव्हा वॉल ई पृथ्वीवर असतो तेव्हा आणि काही स्पेस मधले सीन्स आहेत त्यात. वॉल ई आणि ई sss व्हा ss च्या बॉडी लॅन्गवेज आणि डोळ्यांमधून भावना छान दाखवल्या आहेत. नंतरच्या भागात ऍनिमेशन काही खास नाही, नेहमीसारखे. वॉल ई कडे बघून थोडी 'शॉर्ट सर्किट' मधल्या रोबोची आठवण येते. मुख्य दोन्ही पात्रे क्यूट आहेत आणि पाळलेले झुरळ पण. संवाद फारसे नाहीत तरीही काही प्रसंग छान, निखळ विनोदी आहेत.
लांबी तशी कमी आहे, आणि अचानक संपतो. सगळे पृथ्वीवर परत येतात त्यानंतर पुढे अजून काही घडावं अशी लोकांची अपेक्षा असते पण तिथेच संपतो. थिएटरमध्ये पाहिल्यामुळे ते जाणवले.. 'ह्म्म, ओके' अशी सगळ्यांची प्रतिक्रिया. मुलांना आवडतो.
आधी एक 'प्रेस्टो ऍन्ड द बनी' नावाची पिक्सारचीच शॉर्ट फिल्म दाखवतात, ती मस्त आहे.


ह्म्म... असंय होय !

***
Insane : When you're crazy and it bothers you.
Crazy : When you're insane and you like it.



लालु, तुम्ही अंतिम श्रेयनामावली नाही पाहिली का? त्यामध्ये सर्वजण मिळुन सिव्हीलायझेशन पुन्हा उभी करतात असे दाखवले आहे. मला व्यक्तिशः वाल्-ई आवडला.आणि माझ्याबरोबर आलेल्या सर्वानाच आवडला.



श्रेयनामावली पाहिली हो. पण तोच भाग मूळ चित्रपटात का नाही घेतला? चित्रपट फार मोठा नाही, मग अजून १० मिनिटं वाढला असता तर चाललं असतं, पुन्हा चांगलं ऍनिमेशन दाखवायची संधी होती. आणि नामावली वाचायची की त्यातून स्टोरी घ्यायची? चित्रपट वाईट मुळीच नाही, पण रिव्ह्यूज मध्ये त्याचं जेवढं कौतुक केलं होतं, तसा तो नाही.



WALL-E बघितला. ओके वाटला खुप ग्रेट नाही. तुकड्या तुकड्याने आवडला. त्यामुळे या मोसमातल्या (उन्हाळ्यातल्या) बेस्ट animation चा मान कुंग फु पांडा लाच स्मित २ वेळा बघुन पण परत बघावासा वाटतो. स्मित