ती एकटीच सांभाळे क्षण रमलेला तो जीव पोटात उगवलेला अंकुर कंठात भुकेला सूर
नियतीचा नर थिजलेला हरवला मेघ अतिदूर डोळ्यात शुष्क अवसेचा थर ओसंडुन गेला पूर
चोचीस मिळे दाणा पण मन घर उधाणलेले काहूर एक मोकळा मुजोर दूज्या नशिबी का हुरहूर
कोण चूक सरसही कोण हे फिरते चाक फितूर जे आले जगणे जगण्यातच ती फिरते भेसूर
...............अज्ञात १२६८,नाशिक