प्रीत माझी.....

प्रीत माझी ग तुझ्यावरी, अव्यक्त जरी पण अमोल खरी
आठवता तुज भरती लोचन, काळीज होय हे खालीवरी

दीस घालवले जे तुझ्यासावे, काढीती नयनातुनी आसवे
एक तू अन दुजा तो श्रावण, ह्रदयावर पडती प्रेमसरी

प्रभुने नीर्मिली फुलास काटे, जाच प्रीतिचा का तुज वाटे,
समीपे नसता जगेन एकवेळ, पण जाउ नको तू अशी दुरी

सर्वस्व तू, अस्तीत्व तू, शरीरच्या कणाकणात तू,
असेल म्हणतात असो तो स्वामी, ठाउक नाही मला हरी

-- वैनतेय.


झक्कास! लई भारी!!



दिल से राव !!!