- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
चित्रपट
सदस्य प्रवेश |
नेटफ्लिक्स वर मराठी चित्रपटमी नुकतीच नेटफ्लिक्स ची सभासद झाले आणि तिथे मराठी चित्रपट उपलब्ध नाहीत असं लक्षात आलं. त्यांना विचारलं असता, पुष्कळ सभासदांनी विनंती केली तर तुमच्या भाषेतले चित्रपट आणू शकू, असं उत्तर मिळालं. तसंच त्यांना मराठीतल्या डी व्ही डी कोणत्या आहेत ही माहिती सुध्दा द्यावी लागेल. मला फार डी व्ही डी ची नावं माहीत नाहीत म्हणून इथे लिहायचं ठरवलं. आपल्यातले जे कोणी नेटफ्लिक्स चे सभासद असतील आणि डी व्ही डी ची माहिती असेल त्यांनी अशा प्रकारची विनंती केली तर कदाचित मराठी चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध होतीलही. अशी चित्रपटांची नावं इथे लिहिली तर माझ्यासारख्या अनेकांना ही विनंती पाठवता येईल. नेटफ्लिक्स वर सध्या हिंदी, पंजाबी, गुजराती इत्यादि भारतीय भाषांतले चित्रपट आहेत..आपण मराठीही सुरु करू शकू! |
|
मराठी DVDs किती उपलब्ध आहेत याची माहिती नाही, व्हीसीडीज बर्याच असतील. Neelam.com आणि मायबोली खरेदी विक्री मध्ये लिस्ट आहे. मी नेटफ्लिक्स वरुन हिन्दी मागवते कधी कधी. नवीन त्यांच्याकडे उशीरा येतात कारण त्या पायरेटेड नसतात.
मराठी बद्दल मी पण विचारुन बघते त्यांना.
मराठी मध्ये खालील चित्रपटांच्या डी. व्ही. डीज् आल्या आहेत (नविन)
१. वळू
२. साडेमाडे तीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
smk, "...अशी चित्रपटांची नावं इथे लिहिली तर माझ्यासारख्या अनेकांना ही विनंती पाठवता येईल. "
कुठे आणि कशी विनंती पाठवायची ?
Can you please give url ?
अरुण, धन्यवाद. आणखी माहीत असतील तर लिहा.
के पी जे ( हे मध्येच इंग्रजी कसं लिहायचं ते विसरले )
विनंती इथे पाठवायची.
धन्यवाद.
अनाहत हा एकमेव मराठी चित्रपट नेटफ्लिक्स वर आहे. अधिक माहिती
SMK : नक्की. मी साधारण आठवड्यातून एकदा तरी crossword मध्ये जातो, त्यामुळे नविन कुठल्या DVDs आलेलं लगेच कळतं. यापुढे इथे मेसेज टाकत जाइन.
मराठी चित्रपटांप्रमाणेच जर का तुम्हाला मराठी नाटकांमध्ये interest असेल, तर त्यांच्याही बर्याच VCDs आल्या आहेत मार्केटमध्ये. संगीत नाटकांच्या पण आहेत. मात्र unfortunately या VCDs च्या Quality बद्दल प्रश्नचिन्ह आहे. (अगदी crossword सारख्या दुकानातून घेतल्या तरी).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
लालू, आभार. तू सुचवलेल्या लिस्ट्स बघीन लवकरच आणि इथेही लिहीन सापडल्या तर.
के पी जी, धन्यवाद. आजच मागवते.
अरूण, मी वळू आणि साडे माडे तीन ची विनंती केलीसुध्दा. हो, नाटकंसुध्दा खूप आवडतील बघायला. पण नेटफ्लिक्स वर फक्त डी व्ही डी च मिळतात. मी विचारलं होतं व्ही सी डीज बद्दल, पण त्या आम्ही ठेवत नाही असं उत्तर मिळालं. नाटकांच्याही डी व्ही डीज असल्या तर जरूर लिहा. आणि जुनी, नवीन जी माहीत असतील ती सर्व नावं चालतील बरं का! अनेक आभार.
प्रभात ने 'दहावी फ' ची VCD काढलीये, तसेच प्रभातच्या जुन्या पण काही सिनेमाच्या VCDs काढल्यात त्यांनी. याच्या DVD काढल्यात असे वाटत नाही
'अशी ही बनवाबनवी' ची Original DVD आहे माझ्याकडे. खुप प्रयत्न करुनही मला हव्या असलेल्या अनेक मराठी चित्रपटांपैकी फक्त येवढी एकच DVD मिळू शकली. बाकी अनेक VCDs मिळाल्या, पण त्यांची quality खराब आहे.
मंदार , अरुण आणि SMK मला असे वाटतेकि मराठी DVD पुण्यात किती मिळतात यापेक्शा त्या अमेरिकेत किती मिळतात त्याला महत्व आहे .
कारण त्या rigion 1 च्या असल्या पाहिजेत. तरच Netflix विकत घेईल. मराठी DVDs rigion 1 च्या बनतात का हा मोठा प्रश्न आहे.
- कीर्ति
सगळ्या मराठी आणी हिंदी DVDs या Region free असतात. त्यामुळे त्या जगातल्या कोणत्याही DVD Player वर चालतात.
माझ्याकडे पुण्यातून घेतलेली अशी ही बनवाबनवी ची original DVD आहे, आणी माझा DVD Player अमेरिकेतला Region 1 आहे. पण त्यावर ती DVD चालते.
मंदार म्हणतो आहे ते खरं आहे. सध्या region free DVDs च मिळतात. त्यामुळे त्या अमेरिकेत सुद्धा चालतील. Net Flex वाल्यांना विचारून पहा.
रुनी : दहावी फ ची DVD सुद्धा आहे मार्केट मध्ये.
मंदार : तुला बनवाबनवी ची DVD कुठे मिळाली ?????
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
मला बनवाबनवी ची DVD लक्ष्मी रोड वर 'पंकज Electronics' मधे मिळाली. (Electronics मधला 'tro' कसा काढायचा?)
मला हीच DVD ओक Tree (परत एकदा TR!) रोड वर दिसली होती $१० ला. पण मी भारतात चाललोच होतो म्हणून म्हणलं बघाव तिकडे मिळतीय का, नाहीतर परत आल्यावर घेउ इकडून.
अरुण मला माहित नव्हतं दहावी फ ची ओरीजनल DVD पण आहे म्हणुन, मी पुण्यात प्रभात टॉकीजच्या ऑफीस मधुन VCD घेतली तिथे त्यांनी याची DVD काढली नाहीये फक्त VCD च आहे असे मला सांगीतले होते.
पंकज इलेक्ट्रॉनिक्स आणि अलूरकरांकडे शक्यतो सगळ्या DVDs मिळतात. मध्ये videopalaceचा एक ब्लॉग बघितला होता. त्यावर सगळे नवीन मराठी चित्रपट होते, आणि प्रिंट अप्रतिम. ही piracy आहे, पण DVD quality प्रिंट तिथे कशी हे कळलं नाही.
ओह, मला हे रीजन वगैरे बारकावे ठाऊक नव्हते. आपण आपला विनंत्यांचा भडिमार करावा म्हणजे कदाचित काही चित्रपट बघायला मिळतील इतकाच विचार होता
मंदार, रूनी, आभार.
वर सुचवलेली नावं मी नेटफ्लिक्सला पाठवणारच आहे. तुम्हीही पाठवा.
'श्वास' ची देखील डी व्ही डी च आहे ना?
मंदार : ट्रॉ (TrO) असा काढायचा .......
मी बरेचदा क्रॉसवर्ड मध्ये जातो आणि DVDs / VCDs घेतो. एकदा पन्कज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जाऊन यायला पाहिजे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
नेटफ्लिक्स वर कैरी हा चित्रपट आहे. तो हिन्दी आहे का? बाकी इथे अजुन DVD ची नावे टाका लोकहो. मी ही विनंति पठवली आहे नेटफ्लिक्स ला.
नेटफ्लिक्स वर येतील तेव्हा मागवूच, पण सध्या rajshri.com वर बरेच चकटफु मराठी सिनेमे, नाटकं, पुलंचे एकपात्री वगैरे आलय.
उमा,
कैरी सिनेमा मराठी आहे, अमोल पालेकरने काढलाय. मला वाटते तो एकाच वेळी मराठी आणि हिंदी मध्ये (बहुदा) प्रदर्शित झाला होता, नक्की आठवत नाहीये.
उमा, रूनी, म्रुण्मयी (सॉरी तुझं नाव लिहायला जमत नाहीये)
आभार. राजश्री ची साईट बघते आता.
ही काही नावं मला सापडलेली:
सावली
ती फुलराणी
वार्यावरची वरात
डोंबिवली फास्ट
वर्हाड निघालंय लंडनला
मी नथुराम बोलतोय
घाशीराम कोतवाल
देवता
रायगडाला जेव्हा जाग येते
एक गाव बारा भानगडी
केला इशारा जाता जाता
रामशास्त्री
सांगते ऐका
सवाल माझा ऐका
गोष्ट जन्मांतरीची
पिंजरा
सामना
ध्यासपर्व
स्मिता,
मृण्मयी mRuNmayee असे लिहायच
रूनी, धन्यवाद. आता लक्षात ठेवीन.
आणि हो, नेटफ्लिक्स चे सभासद नसाल तरीही विनंती पाठवता येते वर दिलेल्या लिंक वरून.
श्वास , श्यामची आई, देवराई हे पण आहेत डीव्हीडी वर.
चेकमेट
वैजयंती
सुदाम्याचे पोहे
गनिमीकावा
आम्ही जातो आमच्या गावा
निवडुंग
पहिली शेर दुसरी सव्वाशेर
वीर सावरकर
आराम हराम है
यंदा कर्तव्य आहे
शुभमंगल सावधान
मातीच्या चुली
मंथन
नवरा माझा नवसाचा
जीडी : अरे पण या सगळ्यांच्या डी. व्ही. डी. ज् नाहियेत ना? फक्त व्ही. सी. डी. ज् आहेत मार्केटमध्ये ..........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
अरुण, अरे दादरला मिळतील या डी. व्ही. डी. ज्.
महाराष्ट्र वॉच ऍन्ड ग्रामोफोन कंपनीमध्ये वरच्या यादीतल्या बहुतेक मिळाव्यात.
I think Gajanandesai aapan Manthan che nav lihale aahe.
Mi far diwasapasun ha chitrapat shodate aahe jyat padmini kolhapure aahe right?
Mi ameriket rahate, konitari please sangu shakate ka ki where I can order it online.
Searching in Google I found one where I have to order set of 4 dvds along with Manthan. And i have seen those other three dvds. So wanted to order Manthan only.
Any help is appreciated as I am so eager to see that Manthan movie, anyhow.......
Thanks in advance
sorry mala marathi lihata yet nahiye.........
jyana marathi chitrapat far aavadat aasatil tyani apalimarathi.com var jave excellant site for marathi movies...............
अहो बडगुजर,
मराठी लिहीता येण्यासाठी हे बघा. थोडाफार प्रयत्न केला तर नक्कीच जमेल.
http://www.maayboli.com/node/1554
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs