सदस्य प्रवेश |
आठवे पुस्तक, (भाग १ )!'तुम्हाला नाथबाबु माहीताय का हो ?' नाथबाबु म्हणजे एक भारदस्त वगैरे वाटणारं असं व्यक्तीमत्व नव्हतच मुळी, उंचीने ठेंगणेच म्हणायला हवेत इतपत कमी, चेहरा सर्वसाधारण उच्चमध्यमवर्गीय माणसाचा असावा तसा, डोक्यावरचे केस आता वयोमानापरत्वे आपली जागा सोडुन गेलेले आणि जे उरले होते त्यांच्यात चंदेरी झाक आलेली होती. एकुणच सर्वसामान्य माणसात ते वेगळे असे उठुन दिसणारे असे नव्हतेच. कदाचीत याचाच फ़ायदा धेउन ते सर्वसामान्य माणसात मिसळत असावेत, असावेत हं कारण मी तरी त्यांना त्यांच्या बंगल्यातच पाहीले आहे अर्थात जेंव्हा पाहीले तेंव्हा. नाथबाबुची आर्थीक परीस्थीती तशी दांडगीच म्हणायला हवी. कारण केवळ लिखाणा व्यतीरिक्त मी त्यांना काही करताना पाहीले नाही ज्याला उपजिवीकेचे साधन म्हणता येईल असे तरी. त्यांचा बंगला बाकी आगदी ऐसपैस होता, पण त्यात रहाणारे असे ते एकटेच कारण त्यांना कुणी नातेवाईक असल्याचे कधी कुणाला माहीत नव्हते. लग्नही न केल्याने त्यांच्या आयुष्याचा असा कुणीही वाटेकरी नव्हता. तसा एक नोकर कायम असे तिथे पण तो बहुधा फ़क्त दिवसाच असावा. आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की मी नाथबाबुंचा उल्लेख असा भुतकाळात का करतोय? तर त्याचे उत्तर माझ्यासाठी फ़ारच वेदनादायक आहे. ते म्हणजे आत्ता नाथबाबु आपल्यात नाहीत. अर्थात मृत्यु या संकल्पनेबद्दल माझ्या मनात काही अचाट कल्पना नाहीत. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यु हा येणारच. पण मला जास्त धक्का बसला तो नाथबाबुंच्या मृत्युच्या प्रकाराने. नाथबाबुंसारखा माणुस आत्महत्या करु शकतो? यावर माझा विश्वास बसायला आजही तयार नाही. जो माणुस इतकी वर्षे एकटा जगला, प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगाना एकटाच सामोरा झाला त्या माणसाच्या आत्महत्या करण्याच्या बातमीवर तुम्ही तरी विशवास ठेवाल का? पण हेच सत्य आहे कारण आत्महत्येपुर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलीसांना त्यांच्या खोलीत सापडली होती, त्यात काय लिहीले होते ते आजुन तरी मला कळु शकलेले नाही पण काहीतरी खास कारण असावे हे नक्की. म्हणजेच नाथबाबु माझे अत्यंतिक आवडते लेखक आता या जगात नाहीत हे धक्कादायक असले तरी मी आता मान्य करुन टाकले आहे त्याखेरीज दुसरा पर्याय नाहीच, नाही का? पण मला सगळ्यात जास्त छळणारा प्रश्न हा की माझ्या माहीती प्रमाणे नाथबाबु सध्या त्यांच्या आठव्या कादंबरीच्या लेखनात गर्क होते. आणि त्याचमुळे गेल्या सहा किंवा त्याहीपेक्षा जास्त महीन्यात माझी आणी त्यांची भेट झालेली नव्हती. पोलीस तपासानंतर मी त्यांची लिखाणाची खोली, टेबल पाहीले पण त्यात कोठेही त्यांचे हस्तलिखीत सापडले नाही. याचा अर्थ ते कदाचीत त्यांनी पुर्ण करुन संपादकांकडे सोपवलेले असावे. म्हणुन मी तिकडे धाव घेतली पण तिथेही निराशाच पदरी आली. बरं संपादक खोटे बोलत आहेत असे म्हणता येणे शक्यच नाही कारण त्यांनी कुणाच्याही नावावर त्यांची कादंबरी छापण्याचा प्रयत्न केला तरी नाथबाबुंचे वाचक क्षणात ओळखतील याची त्यांनाही जाण आहे. मग मी शोध सुरु केला इंटरनेटवर कारण आपले साहीत्य तुकड्या तुकड्याने एखाद्या संकेतस्थळावर प्रसिध्द करुन त्याच्या प्रतिक्रीयांच्या आधारे आपल्या लिखाणात ते वास्तवता आणत हे मला माहीत होते, त्यातच मला ह्या संकेत स्थळाचा शोध लागला मी आगदी पिसाटासारखा इथे ओळ न ओळ वाचत शोध घेत राहीलो. पण दुर्देव इथेही त्यांच्या लिखाणाचा मागमुस नाही. पण जे काही ईथे मला मिळाले त्यामुळेच मी माझ्या भावना आणि नाथबाबुंबद्दल इथे लिहीण्याचा प्रयास करत आहे. हो केवळ या ठीकाणी मला जे काही वाचायला अनुभवायला मीळाले त्यामुळेच मी हे सर्व लिहीत राहीलो कारण नाथबाबुंच्या ज्या आठव्या कादंबरीच्या हस्तलिखिताच्या शोधात मी होतो ते तर मला आता मिळालेले आहे, त्यांनी ते माझ्याच नावे पोष्टाने पाठवलेले होते आणि पोष्टखात्याच्या विलंबामुळे ते आजच माझ्या हातात पडले आहे. आता ते हस्तलिखीत वाचल्याशीवाय मला एक अक्षरही लिहीणे शक्य होईल असे वाटत नाही त्यामुळे आता ते वाचुन झाल्यावरच मी माझे हे लिखाण पुर्ण करेन त्यामुळे तुमची क्षमा मागुन मी आता हे लिखाण थांबवत आहे. नाथबाबुंची आठवी कादंबरी वाचल्यावरच मी आता पुढे लिहू शकेन. क्रमशः |
|
लिहा लिहा राव, आम्हि वाचक आहोतच मनमुराद वाचायला.
है चाफ्या येऊ दे भरभर आता
झाली का आठवी कांदबरी वाचुन? आता पुढ काय?
फारच विदारक ---आम्ही आपल्या आठ्व्या कादम्बरीच्या प्रती़क्शेत.
--जीवन एक प्रवास, मी एक वाटसरु ,ट्प्याट्प्याने प्रवास करणारा.
ह्म्म! आता पुढील भाग टाका राव लवकर!
हे चाफ्फ्या, आयला आम्हीच सापडलो होय रे
आणि तो क्रमशः शब्द फसवा आहे की नाही
बाकी लिहीलंय जबरी रे