सदस्य प्रवेश |
कैलासगडरविवार, १५ जून २००८. हरिश्चंद्रगड, जिवधन नाणेघाट वगैरे गेले दोन तीन ट्रेक म्हणजे मागे जाउन आलो त्याच स्थळांची उजळणी होते, पण या रविवारी कुठल्यातरी नव्या ठिकाणी जावे असे मनात होते. सकाळी साडेसहाला मी, विनय, फदि, आरती, भक्ती, निलाक्षी, राधिका, पाचवीतली पूर्वा आणि स्वतः ट्रेकला येऊ न शकणारर्या मायबोलीकर हेमंतने उत्साहाने आमच्यात आणून सोडलेला त्याचा मुलगा राहूल असे नऊ जण पौड रस्त्याने निघालो. ठिकाण होते मुळशी धरणाच्या पाण्याने वेढलेला कैलासगड. त्याबद्दल फारशी माहिती नेटवर वा पुस्तकात नव्हती, पण धुमकेतू उन्हाळ्यात जाऊन आला होता, त्याच्याकडून माहिती घेतली होती. शनिवारी तुफान पाउस झाला होता, त्याच्या खुणा रस्त्यावर दिसत होत्याच. हवेत मस्त गारठा होताच. पिरंगुट, पौड असे मुळशीला पोहोचलो, सरदारजीचे पॅराडाईस अजून उघडायचे होते, मग पुढे आशिर्वादमध्ये मिसळ चापून पुढचा प्रवास. जेमतेम दहा दिवसांचा पाउस झाला असेल, पण काय कायापालट होउन जातो आपल्या सर्व भागाचा. पंजाब किंवा केरळसारख्या सदा हिरव्या प्रदेशात जाणवत नाही, पण महाराष्ट्रात तर एवढा फरक की ह्याच का त्या पंधरा दिवसापूर्वीच्या उघड्या बोडक्या डोंगरदर्या असा प्रश्न पडतो. सकाळी लवकर निघाल्याने एक हरिण आणि काही पक्षीदर्शन घडलं. शिवाय कडेला करवंदाच्या जाळीत पिकलेली टपोरी करवंद. उजवीकडे मुळशी धरणाचा जलाशय ठेवत पुढे ताम्हिणी घाटाकडे जाउ लागलो, या जलाशयातच त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करणारा रत्नागिरी डोंगर घुसला आहे, या डोंगराच्या एका सोंडेवरच कैलासगड आहे. गाडीतून उतरून उजवीकडे चढाई सुरू केली, पहिल्याच टप्प्यावर मागे वळून पाहिले तर तिन्ही बाजूंना विस्तीर्ण मुळशी जलाशय पसरला होता. अजून एका टेकाडाचा टप्पा पार करून एका छोट्या माथ्यावर आलो, असे अजून दोन टप्पे पार केले की गड हाताशी येईल असे वाटत होते, पण पुढची वाट वर न जाता गड उजवीकडे ठेवून वळ्सा घालू लागते. असा मोठा वलसा असेल तर वाटेत वरून येणारे अनेक ओढे, धबधबे लागणार हे आलेच, पण अजून ते खूप जोरात सुरू झाले नसावेत. वळसा झाला की पुन्हा एकदा वळून गड डावीकडे ठेवत वर चढलो आणि गडावर दाखल झालो आता डावीकडे एक वाट पुन्हा थोडी खाली उतरते, त्या वाटेने गेलो की खोडीव गुहांमधील पाण्याची टाकी पहाता येतात, गुहेच्या तोंडाशी उभे राहिले की वरून पाण्याचा एक पडदाच पडत असतो. निघाल्यापासून दीड एक तासात आपण गडावर पोहोचतो. वर गडावर आता गवताचा हिरवा गालिचा तर विणायला सुरवात झाली आहेच, सह्याद्री स्पेशल अशी रानफुलांची झाडंही वर येत आहेत, पण एक 'शेलं' नावाची झाडही बरीच दिसली, त्यांची फळ चिकूसारखी लागतात असे सुनीलचे म्हणणे होते. गडावर एक दगडांचा माळ आहे, उघड्यावरची कोरीव शिवपिंड आहे, तुफान वारा आहे आणि बाकी मोठ्या खेकड्यांचे साम्राज्य आहे. सुनीलने बघता बघता त्यातले पाच सहा मोठे खेकडे पकडून पिशवीत टाकले तेंव्हा पुढच्या रुचकर शक्यता माझ्या डोळ्यासमोर तरळल्या होत्या, पण नंतर ते काही वेळेच्या गणितात बसले नाही. गडाच्या दक्षिणेला रत्नागिरी डोंगर आडवा पसरला असल्याने इतर काही दिसत नाही, पण बाकी तीन दिशांना खूप सुरेख देखावा आहे. मुळशीच्या पाण्यात सुसळे बेटही दिसते. तेही एक अवश्य जाण्यासारखे ठिकाण आहे. थोड्या वेळाने खाली उतरलो, तिथेच एका पाण्याच्या टाकीवर बसून जेवलो आणि परत फिरलो. मात्र मुळशीकडे न वळता लोणावळ्याकडे वळलो, पान्नास किमीच्या या रस्त्यात वाटेत अंधारबन नावाचे जिथे दिवसाही सूर्यकिरण पोहोचत नाहीत असे जंगल आहे, पुढे वर्हाड्याचे सुळके, घनगड, तेलबैला, सालतर खिंड, अँबी व्हॅली, कोराईगड, शिवलिंग, असा रम्य प्रवास करत मग लोणावळ्याच्या गर्दीत अडकलो. थोडे आडबाजूला गेले तर किती रुद्रभीषण निसर्गसौंदर्य वाढून ठेवले आहे याची जाण नसलेली टुरिस्ट मंडळी करंगळीभर पाण्यात दोन पाचशेच्या झुंडीने लोळत होती. पण त्यांच्या हातातल्या बाटल्या पाहिल्या की यांना बाकी ठिकाणे माहित नाहीत तेच बरे असेही वाटते. तिथे तासभर अडकून मग पुण्याला पोहोचलो. दिवसभरातले अल्हाददायक वातावरण, पावसाच्या हलक्याच सरी यांनी मन एकदम प्रसन्न होउन गेले. या पावसाळ्यात आता जरा आडवाटेचे चिम्ब भिजता येईल असे धबधबे, डुंबता येतील असे डोह, हिरव्या गवताचे मखमली गालिचे, रानफुलांचा बहर, वादळी पावसात थंडीने कुडकुडत असतांना एखाद्या झोपडीत मिळणारा गरम गरम वरण भात, तर बाहेर धो धो पाउस कोसळत असतांना चार हजार फुटांवर गुहेच्या उबदार आसर्याला बसून स्वतःच केलेले सूप, मॅगी, खिचडी, रस्सा असे काहीतरी चाखत निवांत आसमंत न्याहाळत राहणे असे बरेच काही करायचे आहे, त्याची सुरूवात तर झकास झाली आहे.... |
|
वा.. जीएस.. मस्त धमाल करुन आलात. घरच्या प्रॉब्लेममुळे यावेळी येता आले नाही. keeping fingers crossed for next time
साधना
शेलं नावाचे हेच ते फळ.










फुललेले ओर्कीड
बारमाही पाण्याचे टाके
उघड्यावरची कोरीव शिवपिंड
दगडांचा माळ
ट्रेक दरम्यान भेटलेले काही मित्र
.
.
.
आमचा वाटाड्या सुनिल
वांद्रे ते वडुस्ते या रस्त्यावर बरीच फळझाडे आहेत. आवळा, पेरु, जांभुळ, आंबा आणि करवंद. पाउसाला सुरुवात झाली तरी टपोरी करवंद अजुनही झाडावर आहेत. जाताना करवंद आणि येताना जांभळं, भरपुर खाल्ली.




जवळच गाव असुनही झाडांवर कैर्या अजुनही शाबुत आहेत, अगदी झाडं गच्च भरुन. शेताच्या बांधावर सगळीकडेच फुलझाडे लावलेली दिसत होती. एरवी काटेरी झुडपे असतात. एकुण गाव बरेच प्रामाणिक असावे.
-------------------------------------------------------------------------------------
कैलासगड - शेवटचा टप्पा
ढगांनी वेढलेला गडा भोवतीचा जलाशय
.
.
हे शेल अगदी खजुरासारखेच दिसताहेत. बराच धाडसी वाटाडया आहे. खेकड्यांना हातात पकडण्याच धाडस दाखवलय.
छान सफर घडवलीत आम्हालापण. मलापण ती खजूरासारखीच वाटली. दांडोरापण तसाच आहे, पाने मात्र वेगळी आहेत. सगळेच ओले फोटो मस्त आहेत.
अगोबाई...यंदा कैलासगड का ? कोणी बोलले नाही ते...एव्हढे तरि काय्...मी कै लगेच येणार नव्हते
कोण कुठले काउ बॉय...ते चालतात तुम्हाला 


.
मस्तच दौरा झाला कि....हे वर्णन वाचुन आणि फोटो बघुन अगदी तिथे जाउन आल्यासारखे वाटते आहे...
.
करवंद आणि येताना जांभळं, भरपुर खाल्ली >>> किती मज्जा. इथे ऑफीसमधे एकजण म्हणाला होता कि अमेरिकेत कसे Strawberry picking, apple picking करता येते, bbq करता येते...भारतात तसे काही नाही. त्याल म्हंटलं आमचा सगळा जन्म द्रा़क्षं, उस, चिंचा (पाल्यासगट), बोरे, कैर्या, शाखा, पेरु, जांभळं, मक्याची कणसं असे काय न काय "pick" करण्यात गेला...हुरडा पार्ट्या, गुर्हाळं आहेतच....तु कोणत्या भारतातुन आलास रे भाउ ?
.
त्याची सुरूवात तर झकास झाली आहे.... >>>> तुम्हा सगळ्यांना ह्या "भटकंती" पावसाळ्यासाठी अनेक शुभेच्छा
शेवटचा फोटो मस्तच!!
.
सिंडरेला
दिनेश,

शेलं आणि ओर्कीड चा फोटो खास तुमच्या साठी. ट्रेक दरम्यान झाडा पानां बद्दल विचारलेल्या प्रत्येक शंकेला एकच उत्तर मिळते, फोटो काढ आणि दिनेश ना पाठव
.
सुनिल च्या म्हणण्या प्रमाणे ती फळे पिकली की काळी पडतात, पण चव मात्र खजुराची नव्हती.
.
कोणी बोलले नाही ते...>>>
बोलणार कसे ? कोणी फोन पण तर नाही केला !
.
द्रा़क्षं, उस, चिंचा (पाल्यासगट), बोरे, कैर्या, शाखा, पेरु, जांभळं, मक्याची कणसं >>>
मोटरीच्या पंपाखाली धुन, बांधाच्या दगडावर आपटुन फोडुन खाल्लेली कलिंगड राहीली की
जीएस खुप मस्त सफर झाली,
तुमच्याबरोबर आमची सुध्दा, सगळेच फोटो सुंदर आले आहेत. अगदी तिथे जाऊन आल्यासारखे वाटले
पुढचा ट्रेक कधी ते मायबोलीवरच टाक जीएस म्हणजे आम्हिपण येऊ......... चालेल ना.
नक्की या. आवड असलेल्या वा एकदा अनुभव घ्यायची इच्छा असलेल्या सर्वांचे स्वागतच आहे. gadventure या yahoogroup ला join झालात तर आपोआपच दर गुरुवारी/शुक्रवारी माहिती मिळत जाईल.
सिंडरेला, ये म्हटलं होत तेंव्हा आली नाहीस, आता दुरूनच घ्या अनुभव.
मस्त वर्णन आणि फोटो.. मी पण येईन म्हणतो...
विनय
कलिंगड राहीली की >>> हो आणि हरबरा, गव्हाच्या ओंब्या, भुइमुगाच्या शेंगा...त्या मळमळ आणणार्या ओल्या चिंचा (काय नाव त्याचं ?)...गेला बाजार, कवठं....अशी न संपणारी यादी आहे

.
कोणी फोन पण तर नाही केला >>>> हे खरं तर मला एक खरी खुरी व्यथा मधे पोस्टायला हवं...फोन करा म्हणतात् पण फोन केला कि उचलत नाहीत नहीतर out of range असतात्...करावं तरि काय माणसाने...म्हणजे माणसाने नव्हे तर मनुष्याने
.
ये म्हटलं होत तेंव्हा आली नाहीस, आता दुरूनच घ्या अनुभव >>> काय करणार्...एक जण बेबी सिटींग करायला "एकमताने" नाही म्हणाल्या मग नाही येता आलं मला (एक गरिब बिचारी स्माइली)
आयला, कसली झकास ट्रीप केलीत लेको! मजा आली असेल!

अरे पण नऊ जण गेलात कसे? बाईक वरुन की गाडीने?
मस्त वर्णन, अगदी डोळ्यापुढे चित्र उभे रहाते
>>>>> याची जाण नसलेली टुरिस्ट मंडळी करंगळीभर पाण्यात दोन पाचशेच्या झुंडीने लोळत होती.
अगदी अगदी.......!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
चांगला झालेला दिसतोय ट्रेक. गुहा पाहिली की नाही?
देसाई, पुण्यात की काय ??
.
या ट्रेक चे एक वैशीष्ट्य असे की, चारच मुले आणि पाच मुली
सुरेख ! ट्रेक, वर्णन आणि फोटो सगळेच सुरेख...
चुक उमगली, आता मात्र दम धरवत नाही आता नाही बुडवुन चालणार एकही ट्रेक..
चला पुढच्या शनिवारी कोठे जायचे ठरवा लवकर
"स्त्रीसंस्कृती" !!! दुसरे काय
मस्त!!! ए, एखादा सोप्पा गड निवडा की पुढच्या वेळेला... म्हणजे बाळगोपाळांनाही काखेत अडकवून आणता येईल आणि वाढलेल्या वजनाचा त्रासही होणार नाही. लई वर्षं झाली तुमच्यासोबत येऊन! जीएस्, आरती, काहीच नाही तर निदान प्रत्यक्ष वृत्तांत कथनाचा तरी कार्यक्रम ठरवा एखादा.
सई, जरुर.
जीएस. मस्तच सफर घडवली फोटो आणि वर्णनाच्या माध्यमातुन.
पुढची भटकंती असेल तर जरूर कळ्वा. नक्की येण्याचा प्रयत्न करू.