नाटक कसे वाटले?

नुकतंच एखादं नाटक पाहिलंत का? ते कसं वाटलं याचं परिक्षण इथे लिहा.

याआधीचे अनुभव ईथे वाचा.


हिन्दी नाटक "बेड के नीचे रहनेवाली.." मोहित टाकळकरचे direction .
सुदर्शनला प्रयोग होत आहेत.जमले तर नक्कि बघा.जाहिरात जरी लहान मुलान्साठी अशी केले असली तरी परी,चेटकीण,असे काही नाही आहे. ९ or १०+ (ह्यात मोठेही आले) वयोगटासठी जास्त योग्य आहे,अर्थात त्याहुन लहान मुलेही enjoy करू शकतील, कारण अधुनमधुन गाणी नाच सगळे आहे.
पुर्ण कथा सान्गणे टाळते (कारण मला नीट सान्गता येइल की नाही ह्याबद्दल शन्का आहे), बघण्यात मजा आहे.
अगदीच वरवर सान्गायचे झाले तर teenage मधे entry करणार्‍या मुलीचे भावविश्व असेच कहीतरी सान्गता येइल



अजिबात काही सांगू नकोस.. पहाणंच मस्ट आहे. मस्त नाटक आहे



कुणी मन्नो मरजानी हे हिमानीचे नाटक पाहिले आहे का?



अरे वा, बेड के नीचे रहने वाली ची चर्चा चालूय! सही! त्यात माझ्या मैत्रीणीचा भाऊ काम करतो.. आलोक राजवाडे.. स्मित



वर गमभनची चर्चा चालु होती!! मी अभिमानाने सान्गु इच्छिते की, हे सगळे कलाकार आमच्या रुईयाचे विद्यार्थी आहेत. आणि त्यातिल २-३ पात्रे माझे विद्यार्थी आहेत. :अभिमानी बाहुली:



दिनेश, स्मित

    काल मस्त पावसाळी वातावरणात सकाळी पेपर उघडून पाहीला आणि 'गमभन' ची जाहीरात दिसली. लगेच कोथरूडच्या मैत्रिणीला तिकिटं काढायला सांगितली...
    नाटक खरोखरी खूप सुंदर वठवलं आहे, अभिनय सर्वांचाच उत्तम आहे. पण जोश्यापेक्षाही सुर्‍या मला सर्वात जास्त भावला, पाठोपाठ शिरोडकर. ती म्हणजे अक्षरश: शाळकरी मुलगी दिसते, वेणीला हात लावत, मागेपुढे पहात संवाद म्हणणं, मनातली चलबिचल चेहर्‍यावर दाखवणं तिला झकास जमून गेलंय... जोश्याची भूमिका करणारा मुलगा स्टेजवर काही सहजगत्या वावरत नव्हता... एखाद्या adult नाटकात भूमिका करतोय असंच वाटलं. फावड्या प्रत्येक एंट्रीला मला सिद्धार्थ जाधवची आठवण देऊन गेला... जर या ४ मेजर पात्रांचा सिक्वेन्स लावायचा ठरवला तर अभिनय क्र. १, सुर्‍या, २ शिरोडकर, ३ फावड्या, ४ चित्र्या, ५ बेंद्रे बाई, ६ मुकुंदाचे वडील.... बाकी सर्व मागेपुढे, आणि मामाची भुमिका करणारा... शेवट.... बाकिच्या पात्रांचे संवाद सहज आणि स्वाभाविक तर याचे मुद्दम पाठ करून आल्यासारखे... अरेरे
    हेमंत महाजन यांनी घटनाक्रम, त्यांची मांडणी, त्यानुसार संवादांची रचना... सगळं अगदी चपखल बसवलंय... तरिही नाटक संपल्यावर.. ३/४ टाळकी, "नाटकाला काही पुस्तकाची सर नाही बुवा..." असं म्हणताना आढळली.. मला त्यांना जोरात ओरडून सांगावसं वाटलं अहो ते नाटक आहे, ३ तासात काय काय दाखवणार? शेवटी नाटक आणि पुस्तक यात काहीतरी फरक असतोच की. आणि तसंही पुस्तकातल्या सर्वच गोष्टी नाटकात दाखवणं तसं मुश्किल आहे. पुस्तकाची आणि नाटकाची मजा ज्या त्या ठिकाणी... नाही म्हटलं तरिही लिखाणावरून सादरीकरण करताना काही बंधनं पाळावीच लागतात. जसं की दिनेशनी वर लिहीलंय की नाटकात बर्‍याच गाळलेल्या जागा आहेत, ज्यांनी पुस्तक वाचलंय तेच सुजाण प्रेक्षक फक्त त्या भरू शकतात. जर का सगळ्या गोष्टींचा समावेश नाटकात केला तर लोक पुस्तकं वाचणारच नाहीत..... असो.....
    वेशभूषा तशी मला ठिक वाटली, पण मंदिराचं एक दृश्य सोडलं तर... बाकी सगळी ठिकाणं स्टेजवर वठवणं जमलं नाहीए. पण एकूण जे लोक या पुस्तकाच्या प्रेमात आहेत, त्यांना याचा काहीही फरक पडणार नाही... ते या नाटकाच्या प्रेमात पण निशंक पडतीलच. स्मित



'बेड के नीचे' चं परीक्षण मीही सकाळमध्ये वाचलं; त्यावरून त्याबद्दल कुतूहल वाटतंय.
'संगीत नवा बकरा' कोणी पाहिलं का? 'इ-सकाळ'मध्ये मी त्याबद्दल माहिती आणि त्याची संक्षिप्त व्हिडिओ क्लिपदेखील पाहिली. कोणी ते नाटक पाहिलं तर परीक्षण लिहा.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश



'संगीत नवा बकरा' ,MIT ने (बाहेरच्या लोकाना पैसे देउन)पुरुषोत्तमला बसवलेले नाटक आहे.(आणि हे म्हणे विद्यार्थ्यान्चे गुण दर्शन!!!) दुसरा क्रमान्क मिळाला होता त्याना.आता कलाकार वेगळे असतील कदाचीत.
तेव्हा पाहिले होते.बरे वाटले होते.पण खुप महान असे काही नाही आहे.
ठकास महाठक भेटल्यावर काय घडते ते गाणी ऐकत बघायला मिळते.
सगळे नाटक पद्यात आहे.नाटकाचे सादरीकरण छान आहे. म्हणजे सर्व पात्रान्च्या अभिनयाबरोबर , लयबध्द आणि वेगवान हालचाली आणि सगळ्यान्चे co-ordination बघायला मजा येते.
वेगळा प्रयोग म्हणुन बघायला हरकत नाही.
सन्गीत नाटक अशी जाहिरात अशी असली तरी जुन्या काळच्या सन्गीत नाटकासारखे नाही.



रमणी
जर त्या कलाकारांशी अजून संपर्क असेल तर त्याना आमची पसंती अवश्य कळवा.
तसेच हि मूले, याच वयाची असताना या नाटकाचे चित्रीकरण व्हायला हवे हे पण सांगा.
दक्षिणा, शिरोडकर ला यापुढेही चांगल्या भुमिका मिळायला हव्यात, नाही ?
ती त्या भुमिकेपेक्षा वेगळी कुणी वाटतच नाही. आणि पुस्तकातल्या शिरोडकरशी खुपच मिळतीजुळती आहे ती.



दिनेश, एकदम मनातलं बोललात. पण ती मुलगी शिरोडकर म्हणून मनात इतकी फिट्ट बसलीए, की
तिला इतर भूमिकांत पाहणं कदाचित आपल्याला आवडणारंच नाही.
त्याचबरोबर सुर्‍याला ही अधिकाधिक भूमिका मिळायला हव्यात. स्मित



प्रशान्त दामले चे नविन नाटक "ओळख ना पाळख" बददल काहि प्रतिक्रिया आहेत का ?