कधी?

माझे हे डोळे
किती अतृप्त,
जसे हे आकाश
अथांग अन रिक्त

स्वप्नांची फुलपाखरे
कधी होतील मुक्त,
उघडता पापणी
सांडतील रंग फक्त?

- बी


छान, छोटी परंतु सुचक.