ADCET, आष्टा

ADCET, आष्टा ईथले मायबोलीकर


मंडळी, टी-शर्ट घ्यायचे का? एकाची किंमत २२०/- रु. आहे.

- अभिजीत.



image001.jpg

image002.jpg

कृपया प्रतिक्रिया द्या. - अभिजीत.



अभिजीत......... जबरदस्त रे......... माझ्या मते आयुष्य जास्त जाणले पैसे टाकाणार्‍या लोकांनी.



का बरे? वडाच्या झाडासारखा वाटतो.



कारण इथे बसून गप्पा मारता येतात.



विन्या, तु लहानपणी वडाच्या झाडावर बसून गप्पा मरायचास काय?



हो, दिवसा पारावर बसून गप्पा मारायचो आणि रात्री झाडावर!



हे वडाचे झाड कुठे आहे? गावात कि माळावर?



मसनात



मला वाटत त्या भिकार्‍याने जास्त जाणलं.......

सुन्दर कथा........



हि नवीन दोन माणसे कोण आली आहेत आपल्या ब्लॉगवर? स्वागत !!!
अभ्या, लेका फोड. मस्तच चालू आहे. अजून येऊ दे. अजून भरपूर येऊ दे.
अभ्या, पण अमेरिकेत जवळपास २ वर्षे राहून सुद्धा माझ्यात काहीही फरक पडला नाही रे..अजूनही तसाच काळा दगड आहे मी. अमेरिकेतले लोक मात्र काळे झाले आहेत माझ्यामूळे.



नम्स्कार..
अभ्या तुझे मत काय? कुणी जास्त जाणले?
बाकी कुणी मत टाकले नाही?...........

बाळ्या तु पुण्यात येणार होतास असे कळले...... ?



माझ्या मते आयुष्य त्या सर्वांनी जाणले.

१. लेखकाने शब्दांच्या माध्यमातून त्याला समजलेली आयुष्याची किंमत दाखवुन दिली. (अनुभूती)
२. पैसे टाकून त्या संवेदनशील दात्यांनी एक प्रकारे स्वतःजवळ दृष्टी आहे आणि ते ही बहरलेली सृष्टी पाहु शकतात याबद्दल कृतज्ञता आणि त्या भिकार्‍याबद्दल सहानूभुती व्यक्त केली. त्यांनी आयुष्याची किंमत ओळखली. (अनुभूती)
३. लेखकाने उघडून दाखवलेली आयुष्याची किंमत पैसे टाकणार्‍या लोकांनी जाणली आणि आपण मात्र हे सुंदर आयुष्य जगू शकत नाही या जाणिवेने तो भिकारी रडू लागला. (यालाच सह अनुभूती असे म्हणायचे).

यांच्या बरोबरच हे आयुष्यं आपनही जाणतोय.... कारण आपण त्यावर संवेदनशील चर्चा करतोय!! स्मित



बाळ्या तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं!! चालू ठेव..

मित्रांनो आणि मैत्रीणींनो, जरा नियमितपणे प्रतिसाद टाकत जा ही नम्र इ-नंती!

तसेच सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!



नमस्कार,
अरे अभिजित काहीतरी विषय काढुया..... म्हणजे लोक रिसपॉन्स टाकतील.....
विषय सुचवा..... जस की
अणु करारावर सरकारचा पाठिंबा काढला हे योग्य की नाही........?



अतिशय छान विषय काढलासं योगा. डाव्या पक्षांनी पाठिंबा काढला हे मला तरी अयोग्य वाटटंय.. ज्यांच्या आधारावर हे सरकार उभे आहे, त्यांना "तांत्रिक'कारणामुळे कराराचा मसुदा न दाखविणे, ही चूक होती, तसेच फक्त तेवढ्या कारणावरून घाईघाईने पाठिंबा काढणे, हीदेखील मोठी चूक ठरली......

या संदर्भात रविवारच्या 'सप्तरंग'मधे भारताचे माजी पंतप्रधान श्री. इंद्रकुमार गुजराल यांचा लेख आला आहे. मला त्यांचे मत पटले. जरुर वाचा -
http://www.esakal.com/esakal/07182008/Saptarang1114EB60CD.htm

- अभिजीत.



नमस्कार,
हो निदान निवड्णकीला एक वर्ष राहीलेल असताना ही घाई करायला नको होती.........

विषय दुसरा: सध्याची अस्थिरता पहाता आय टी चे भवितव्य काय?
(निष्पक्ष मताची अपेक्षा आहे.......)



कारण हा जिव्हाळ्याचा व आवश्यक विषय आहे......



काही सांगता येत नाही ....



अरे अभ्या टी शर्ट ची काय भानगड आहे ???



मसनातले वडाचे झाड जिवंत आहे कि त्याचे भुत आहे?



अभ्या, अगदी छान विषय काढलास. डाव्यानी पाठिंबा काढला यात विशेष काही नाही. ते तर खूप साधे राजकारण आहे. पण विशेष म्हणजे त्यामध्ये एकही विरोध करण्यालायक गोष्ट नाही. आणि हा विषय एवढा चघळत ठेवला यात विशेष आणि आपणसुद्धा चवीने चघळत ठेवला. कमाल आहे आपलीसुद्धा. पंतप्रधानांचे सुद्धा कौतुक आहे. ते एकटे यासाठी लढत होते. वास्तविक तो अणू करार आहे काय, त्याचे फायदे काय, कोण सहभागी आहे, त्याचा फायदा, देशावर होणारे परिणाम हे कोणी पाहतच नाही. बस एकतर विरोध करायचा आहे किंवा सपोर्ट एवढेच माहित. खरे खोटे कोण पाहतो. चांगले म्हणजे आपले माजी राष्ट्रपती कलाम यांनीही याला पाठिंबा दिला. आणि हा करार तडीस जाईल असे आता तरी वाटते आहे त्यामागे राजकारण काहीही असो. निव्वळ राजकारण्यांमूळेच आपला देश मागे तर राहतोय हेच खरे वाटते. आता लोकसभेत काय घोळ घातला आहे त्यावर तर भाष्य न करणेच बरे.



अरे कोणी आहे की नाही. अभ्या, योगा.......कुठे आहात सगळे?



वंदे मात्रम ज य हिं द



वंदे मातरम रे भावा. जय हिंद-जय महाराष्ट्र. पण इथे येत का नाही रे?



माझे आजोळ आष्टा.डॉ.दिनेश मालगावे माझे मामा होते. लहानपणी बर्‍याचवेळा आम्ही आष्ट्याला यायचो.आता लंडनला असते. हा बी बी वाचुन लहानपण आठवले.