रमणी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

ते प्रहर नक्की कुठले होते, हे त्यालाही आता स्मरत नाही
उषा म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या किलबिलणार्‍या पाखरांचा'
संध्या म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या कुसुंबी प्रकाशाचा'
रजनी म्हणाली, 'तुला नाद होता माझ्या लखलखणार्‍या नक्षत्रांचा'

चषकात उरलेला शेवटचा घोट घशात रिचवत
स्वतःला कसाबसा सावरत तो म्हणाला,
'मला नाद आहे.. मला नाद आहे.. मला नाद आहे
ह्या दाट जांभळ्या पारदर्शी मदीरेचा,
नसानसात भिनलेल्या तिच्या स्पर्शाचा,
तिच्या अतृप्त अशा चवीचा,
तिच्या कैफात बुडून जाण्याचा..'

त्याचे हे उत्तर ऐकून
उषा, संध्या, रजनी
निघून गेल्यात अन
त्यांच्या पाठोपाठ गेली
त्याची आपली रमणीही..

टिप - रमणी म्हणजे सुंदर स्त्री, पण मी इथे तिला हक्काची बायको ह्या अर्थी वापरलेली आहे.

- बी

विषय: 
प्रकार: 

अर्रे, पण मी नवर्‍याला सोडुन कुठेही गेलेले नाहीय. आणि त्याला भलता नाद पण नाही हो बी!! Wink

चांगली आहे कविता!!