भारताबद्दल चांगले काहीतरी

अमेरिकेपेक्षा भारतात काय चांगले आहे? माणूसकी.

याचा प्रत्यय माझ्या भावाला नुकताच आला. तो भारतात बंगलोरहून मुंबईला विमानाने गेला. दुपारची वेळ. विमानातून उतरतानाच त्याला भोवळ आली, नि उलटी झाली. ताबडतोब त्याला ढकलखुर्चीवर बसवले. एक डॉक्टर तिथे धावत आला. त्याने त्याला नीट तपासले. पाणी दिले, बाटलीतलेच. जरा वेळ थांबले. इस्पितळात नेऊ का विचारले. तो नको म्हणाला. त्याच्या बॅगा जिथे येतात तिथे त्याला ढकलखुर्चीवरून नेले. मग तो म्हणाला आता मी ठीक आहे. तुम्ही जा. धन्यवाद. तुम्हाला हे घ्या म्हणून शंभरची नोट दिली. त्याने राहू दे साहेब म्हणाला नि ते परत केले.

मग तो मुंबईहून न्यू यॉर्क नि तिथून Atlanta गेला. विमान दोन तास उशीरा पोचले, रात्री साडेदहाला. पुनः विमानातून उतरल्यावर चक्कर नि उलटी. तिथे खुर्चीवर बसवण्या आधीच विमान कं चे लोक disclaimer forms घेऊन हजर. आधी सही करा की विमन कं विमान्तळ यांची काही जबाबदारी नाही!! मग म्हणे चला इस्पितळात. तर माझा भाऊ म्हणाला नको, पण मला माझ्या बॅग्स तुम्ही घरी पाठवाल का? मी माझ्या भावाबरोबर लवकर घरी जातो. त्यावर उत्तर नाही. तुम्हाला जाऊन सांगावे लागेल की बॅगा उद्या नेईन. तुम्हाला वाटल्यास बॅगांच्या ठिकाणी पोचवतो. तो म्हणाला. वैतागून माझा भाउ म्हणाला नको, तुम्ही आता जा!!!

मान्य आहे, मुंबई विमानतळावर माझा अस्सल को ब्रा भाऊ, नि अंगावरचे कपडे पाहून कुणि चांगला माणूस दिसतो, नि इथे तो ब्राऊन रंगी दिसतो. पण तरी खरी भारतीय संस्कृती लपत नाही नि खरा अमेरिकन माणूसकीचा खोटारडेपणा लपत नाही!!

जय भारत!!


ह्म्मं. बरोबर.



झक्की, हे कधी झाले आहे ते तुम्ही लिहीले नाही म्हणून अनाहूतासारखा सल्ला देत आहे, माफ करा. हे जर काल झाले असेल तर त्यांना कृपया तातडीने चेक अप करून घ्यायला सांगा. विमानप्रवासात dehydration होते त्याकडे दुर्लक्ष केले असता ते गंभीर रूप धारण करू शकते. त्रास होतो, थोड्या वेळात बरे वाटते, आपण दुर्लक्ष करतो, पण नंतर (काही तासांनी) प्रकरण गंभीर होऊ शकते... यापुढेही त्यांना कृपया dehydration होऊ नये म्हणून व्यवस्थित काळजी घ्यायला सांगा. या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने माझ्या रूममेटचे काय हाल झाले ते माहिती आहेत म्हणून सांगावेसे वाटले.
ता.क. मी आताच तुमच्या पोस्टाची तारीख पाहिली स्मित असो. तरी हे वरचे पोस्ट राहू देतो.

    ***
    The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.