आपल्या तब्येतीसाठी सोयाबीन खरंच चांगलं आहे का?

बर्‍याचदा मायबोलीवर "सोयाबीन खावं" अशा अर्थाचं अनेकांनी लिहिलेलं वाचलं.

माझ्या एका रुममेट मुळे मलाही 'सोयामिल्क' ची चटक लागलेली मागे. त्यातुनही सोया हे तब्येती करता एकदमच 'बेश्ट' अशा समजात मी त्याआधी पासूनही वावरत होते. टोफु, कणकेमध्ये सोयाबीन्ची पूड मिसळणे, सोयामिल्क - म्हणजे एकदम 'भारी काम' असं वाटायचं.
पण पुढे हायपोथायरॉईड माणसानं 'काय खावं- काय खाऊ नये' ह्यावर माहिती मिळवताना सोयाबीन च्या वादविवादात पडले. मग सोयाच्या बाजूनं असणार्‍यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्‍यांचं पण.
जेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)

मला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे
अ. थायरॉईडची गडबड
ब. इस्ट्रोजिन जास्त होतं
क. वरच्या ब ह्या कारणामुळे तर विरुद्ध असणारे म्हणतात की लहान बाळांना सोया फॉर्म्युला देणं म्हणजे लहानपणीच 'बर्थ कंट्रोल पिल' देण्यासारखं आहे!
ड. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.
ई. सोया खाल्यावर, काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अ‍ॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून .

विरुद्ध असणारे म्हणतात की ही बिलियन डॉलर्सची इन्डस्ट्री आहे त्यामुळे ह्याचा भरपूर प्रसार केला जातो 'हेल्दी' म्हणून.

खाली मी रेफर केलेल्यातल्या (सोयाच्या विरुद्ध असणार्‍या) काही लिंक्स आहेत.
http://www.healingdaily.com/detoxification-diet/soy.htm
http://www.skrewtips.com/2009/08/27/soy-good-bad/
http://www.sunherb.com/is_soy_good_for_you.htm
http://planetgreen.discovery.com/food-health/soybean-good-fact-fiction.html
http://www.soyonlineservice.co.nz/

तुमचं काय मत आहे? कुणाला डायरेक्ट अनुभव आहे का? नक्की लिहा!

Submit to kanokani.com

ह्याच्यावर बरेच काहि लिहिता येइल.
पण सोयाबीन खूप चांगले खूप चांगले हे खूप काही बरोबर नाहीच आहे. बर्‍याचश्या उलट सुलट थिअरीज आहेत.

सोया बेस इंफंट फॉर्म्युला जर खरच त्या साईटवर म्हटल्यासारखा आहे का? मी तर आज हे पहिल्यांदाच ऐकलं. माहितीत किती मुलं हा फॉर्म्युला पीत आहेत आणि प्यायली आहेत. ह्यात बरीच डॉक्टर्सची मुलंपण आहेत. काही कळत नाही बुवा. आता कोणावर किती विश्वास ठेवायचा कोण जाणे!

सोयाबिन पचायला जड असते असे ऐकले आहे. पण त्याचबरोबर सोया मुळे menopause चा त्रासही कमी होतो असेही ऐकले आहे. माझी माहिती फक्त ऐकीव आहे. स्मित

नानबा

तुझा थायरॉईडवरचा लेख वाचला आणि हा पण... तुझे आभार मानावेत तितके कमी आहेत. खरंच विचार करायला लावणारा लेख आहे. सध्या वाचतोय...

जाणकारानी खरच यावर आपले मत नोन्दवावे.

आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो.
कणिक छान होते, आणि पोळ्या तुपकट, वरून तेल लावण्याची अजिबात गरज पडत नाही. मला सोयाबिनचा इतकाच काय तो उपयोग माहित आहे. स्मित

आमच्या कडे पण सेम दक्षिणा! स्मित पण जाणकारांनी खरच यावर प्रकाश टाकावा.

नानबा गुड पॉइंट.

जाणकारांची वाट पहाते आहे.

तरीपण ( सायन्सशी दहावीत काडीमोड घेतलेली अडाणी व्यक्ति म्हणून) आहारशास्त्रीय पुस्तकं आणि सर्व शेकडो फॅडस बद्द्ल वाचून मला आता संयत चौरस आहाराचे महत्व पटलेले आहे. काहीही खूप प्रमाणात खायचे नाही आणि काहीही घटकपदार्थ वर्ज्य करायचे नाही.
वैताग आलाय राव उलट सुलट थियरीज वाचून. वेगवेगळ्या प्रकाराची तेलं इंन्डेक्स प्रमाणे मिक्सकरायला जावीत की लगेच तुपाचे गुणगान असलेला लेख येतो. करायचं काय नक्की सामान्य माणसानी या सर्व परस्परविरोधी लेखांच्या आणि परस्परविरोधी डॉक्टरांच्या मतांच्या मा-यात ?

दिखावे पे मत जाओ. अपनी अकल लगाओ फिदीफिदी

हो आम्हीही कणकेत सोयाबीन पीठ मिक्स करतो.

आणि हो जपानमध्ये भयानक प्रमाणात सोयाबीन खातात. त्याच्या पुष्ट्यर्थ वाढलेलं आयुमान, आणि अँटी एजिंग चे गुणगान पासून ते विरुद्धार्थ "वाढती इनफर्टिलिटी" इथपर्यंत सर्व लेख, रिसर्च पेपर्स वाचलेले आहेत.

आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस असतात ज्याची भाजी करतात, ते नक्की काय असतं? अ ओ, आता काय करायचं

आणि ते असे स्पाँजी बॉक्सेस असतात ज्याची भाजी करतात, ते नक्की काय असतं? >> बघुन ख हो, नायतर "समुद्रातली भाजी" असायची!!

न्युट्रेला म्हणते आहेस का दक्षिणा ? ते सोया नगेटस असतात.
ते चिकन सोडायच्या निश्चयाला बळकटी देतात असं ऐकुन आहे. भाजी चांगली लागते त्याची. वेज बिर्यानी वगैरे मध्ये ही टाकता येतात.

आणि हो विषय निघालाय म्हणुन.
दुधाची अ‍ॅलर्जी असणा-या मुलांना सोयामिल्कचाच पर्याय उरतो. डॉक्टरी सल्ल्यानुसार वागावे . स्मित

नानबा कुठुन कुठून महिती काढतोस? आयोडीन युक्त मीठ वापरले असते तर ही वेळ आली नस्ती.

मी ३ वर्षांपूर्वी सकाळमध्ये 'तुमचे तेल वेळीच बदला' हा लेख लिहिला होता. त्यावेळी एका खाद्यतेल तज्ज्ञाशी चर्चा केली होती. त्यात मला माहिती मिळाली, की रजोनिवृत्ती (मेनॉपॉज) काळात जगातील बहुतेक महिलांना चीडचीड, रात्री अचानक दचकून जाग येणे, अंग घामेजणे आणि मानसिक थकवा अशी लक्षणे जाणवतात, पण जपानमधील महिलांना हा त्रास फार कमी जाणवतो. म्हणून शास्त्रज्ञांनी पाहाणी केली तेव्हा त्या महिलांच्या आहारातील सोयाबीनमुळे आरोग्य चांगले राहात असल्याचे दिसून आले म्हणून स्त्रियांनी चाळीशीनंतर आहारात सोयाबीन व सोयाबीन तेल ठेवावे, असे सांगितले जाते.

आमच्या भागात गहू दळायला देताना त्यात सोयाबीन मिसळून देतात म्हणजे त्या पिठाच्या पोळ्या पौष्टिक होतात आणि मुलांना आहारातूनच सत्त्व मिळते. पण हे सोयाबीन चक्कीच्या टाकीला चिकटून बसते म्हणून गिरणीवाला असे पीठ दळून द्यायला नाखूश असतो. सोयाबीनच्या तेलाला काहीसा माशासारखा वास येतो म्हणून अनेकांना त्याची चव आवडत नाही. विशेषतः महाराष्ट्र व गुजरातमध्ये शेंगदाणा तेलाचा वापर होतो. त्याची चव इतकी जिभेवर रुळलेली असते, की सोया तेल नको वाटते, पण याच तेलात ओमेगा ६ ही उपयुक्त मेदाम्ले (फॅटी अ‍ॅसिड्स) असतात जी मांसाहारी लोकांना मासे खाण्यातून मिळतात आणि शाकाहारींना सोया तेलातून. म्हणून आरोग्याच्या दृष्टीकोनातून मधून मधून सोया तेल खाणे हितावह आहे.

सोयाबीनचा वापर मांसाहाराला पर्याय म्हणून होत असला तरी चवीत आणि चावण्यात खूपच फरक पडतो. सोयाबीन रबरासारखे दाताखाली रगडत बसावे लागते. चांगल्या शिजलेल्या मांसाचे चर्वण दाताखाली लगेच होते. सोयाबीनची भजी मस्त लागतात.
बाकी सोया मिल्क किंवा सोया पनीर (टोफू) मी कधी खाऊन बघितलेले नाही.

@ऑलः चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्स!

करायचं काय नक्की सामान्य माणसानी या सर्व परस्परविरोधी लेखांच्या आणि परस्परविरोधी डॉक्टरांच्या मतांच्या मा-यात
>> अगदी खरं.आपल्या कडे दोनच पर्याय उरतात - १. प्रयोग करून बघायचा २. weigh करायचं की काय केल्यानं आपल्याला जास्त त्रास होऊ शकतो - आणि मग ज्यानं कमी त्रास होईल तो पर्याय निवडायचा. (म्हणून मी सोयाला दररोजच्या आहारातून कट केलं - एखादेवेळेस खाते)

काहीही खूप प्रमाणात खायचे नाही आणि काहीही घटकपदार्थ वर्ज्य करायचे नाही.
>> खरं आहे - ह्या सगळ्या नादात जगायचं विसरून जायचो नाहितर!

प्रयोग, ते खाद्यतेल वाले डॉ ओळखीचे असतील तर त्यांना विचार की पुन्हा एकदा - की अजून मत कायम आहे का आणि आम्हाला कळव ते काय म्हणतात ते..

शिरीष,
मला वाटते, की हे थोडेसे मुलांना पालेभाज्या खायला शिकवण्यासारखे आहे. माझी आई सांगायची की हंगामात पिकणार्‍या भाज्या आणि फळे निदान एकदा तरी पोटात जायला हवीत. सोयाबीनचेही तसेच आहे. ते अगदी रोजच्या आहारात नको, पण अधून मधून खायला काय हरकत आहे? तेवढाच चेंज आणि शरीरालाही उपयुक्त घटक मिळतील. स्मित

१. प्रयोग करून बघायचा >> नको त्यापेक्षा literature search करुन बघितलेले बरे... स्मित

आम्ही ५ किलो गव्हात १०० किंव २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो. >>>
दक्षिणा , हे मी असं वाचलं " आम्ही ५ किलो गव्हात १०० किलो २०० ग्रॅम सोयाबिन मिक्स करूनच दळून घेतो. " फिदीफिदी

श्री!!!

सोया नगेट्स चे मार्केटिंग पहिल्यांदा व्होल्टास ने केले होते. त्यावेळी ते चंक स्वरुपातच होते. जाहिरातीत मटणाची क्वांटिटी वाढवणारे काहीतरी जादुई प्रकरण, असे वर्णन केलेले असायचे. (ते सोयाबीनपासून केलेले आहे, याचा उल्लेख नसायचा ) तो काळ सोयाबीनच्या जादूचा होता. कमलाबाई ओगल्यांनी सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. फिल्म्स डिव्हीजनचा एक माहीतीपट त्यावेळी दूरदर्शनवर वारंवार दाखवत असत. व्होल्टासनेच पुढे ते खिमा स्वरुपात बाजारात आणले. सोयाबीनचे उत्पादन भारतात होऊ लागल्यावर, वाण्याकडे पण ते कडधान्य म्हणून मिळू लागले.
पण सोयाबीनला येणारा वास आणि नूसते खाल्यास पचनास होणारा त्रास म्हणून ते तितके लोकप्रिय झाले नाही. (गव्हात ते मिसळून दळायची पद्धत त्याच काळातली ) सोयाबीन मधला हा नेमका घटक वगळून सोया चंक्स केलेले असतात. व्होल्टास ने त्याचे मार्केटींग बंद केले पण ते सुट्या स्वरुपात वाण्याकडे मिळू लागले. (खरे तर असा न पचणारा घटक चण्याच्या डाळीत पण असतो. गुढीपाडव्याला आंबाडाळ खाल्यावर पोट जड झाल्याचा अनुभव आपण घेतलाच असेल )
सोया मिल्कचे व्यापारी उत्पादन पहिल्यांदा टाटा ऑईल मिल्स ने केले होते, पण त्यामूळे लोकाना त्रास होतो, हे बघून ते बंद करण्यात आले.
टोफू मात्र खूप नंतर आले बाजारात. ( त्याचे अनेक प्रकार कसे करतात याची एक फिल्म नॅशनल जिऑग्राफिक वर दाखवतात, ती बघून तूम्ही नक्कीच तो खाणे सोडाल !!! )
शेवटी, त्यातल्या प्रथिनांचे प्रमाण कागदोपत्री जरी दिसत असले, तरी जिभेला तो आवडत नाही हेच खरे.

नानबा हो बहुतेक मी त्या सोया नगेटस बद्दलच बोलत असेन. मला आवडते त्याची भाजी. एकदा माझ्या घरी शाळेत असताना खाल्ली होती, नंतर ऑफिसच्या कँन्टीनमध्ये. पण बर्‍याच लोकांना ते नगेटस आवडत नाहीत बहुधा..
त्याचा एक फायदा आहे की कोणत्याही भाजीत मिक्स करता येतात...

>>म्हणून स्त्रियांनी चाळीशीनंतर आहारात सोयाबीन व सोयाबीन तेल ठेवावे, असे सांगितले जाते. >> थोडं विषयांतर होईल, पण आम्ही आत्तासुद्धा (४०च्या बरंच आधी फिदीफिदी) कोणतंही एकच तेल नाही वापरत. सोयाबिन तेल हे अजिबात वेगळं लागत नाही... आजकाल बाजारात तर वेगवेगळ्या कंपन्या तेल उत्पादन करतात. मी नेहमी कॉम्बिनेशन घेते, म्हणजे महिन्याला जर २ किलो तेल लागत असेल तर या महिन्यात सनफ्लॉवर आणि सोया, पुढच्या महिन्यात शेंगदाणा, करडई... खरंतर मी कुठे तरी वाचलं होतं की सगळी तेलं मिक्स करून वापरणं जास्ती चांगलं असतं.
करडईचं तेल ही हृदयाला चांगलं असतं... पण ते नीट तापवून मगंच फोडणी करावी लागते, अन्यथा त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो.

विषयांतरासाठी माफ करा.... बाकी सोयाबिन महिमा... सुरू होऊ दे... स्मित

दक्षिणा,
तू आता करते आहेस (कॉम्बिनेशन) ते अगदी योग्य आहे. पंधरवड्याला वेगळे तेल आणून खाणे नेहमीच हितावह, पण याचा अर्थ तेलांचे मिश्रण करावे असा होत नाही. प्रत्येक तेलाच्या प्रॉपर्टीज निराळ्या असतात आणि काही ठराविक तेलांचे मिश्रणच चवदार लागते (उदा : शेंगदाणा आणि करडई). वेगवेगळी तेले एकत्र केल्यास आणि खाण्यात आल्यास त्यांचे काय परिणाम होतात, हे आहार शास्त्रज्ञांना विचारून घेतलेले चांगले. वाचले म्हणून प्रयोग केला, असे करू नये.
चाळीशीच्याच महिलांनी सोयाबीन तेल वापरावे असे नाही, पण मेनॉपॉजची लक्षणे कमी करण्यासाठी तेव्हापासून सुरवात करायला सांगतात कारण मेनॉपॉजच्याही प्री-मेनॉपॉज, अ‍ॅक्चुअल आणि पोस्ट मेनॉपॉज अशा तीन अवस्था आहेत. प्री ही स्टेज साधारणपणे ४३ नंतर येते म्हणून त्याआधी पाच वर्षे सोयाबीन खाणे सुरू केले तरी चालते. जर एखाद्याच्या खाण्यात लहान वयापासून सोयाबीन असेल तर चांगलेच की.

कंपन्या उत्पादित करत असलेली तेले ही प्रक्रिया करून (रिफाईंड) बनवली जातात. तेलाचा उग्र वास कमी होत असला तरी अशा तेलांमधील चविष्टपणा व पौष्टिकता कमी झालेली असते. त्यापेक्षा ट्रिपल फिल्टर्ड तेले वापरलेली चांगली (असे आपले माझे मत आणि अनुभव). स्मित

>>कोणतंही एकच तेल नाही वापरत
>>पंधरवड्याला वेगळे तेल आणून खाणे नेहमीच हितावह

हे थोड अजून स्पष्ट करणार का? म्हण्जे कश्याप्रकारे फायद्याचे ते? कारण मला मागे एका आयुर्वेदिक डॉ ने सांगितले होते की जे तेल तुम्ही लहानपणापासून वापरत असाल तेच नेहेमी वापरावे, सारखा बदल करू नये, म्हणून विचारले.

कालच डॉक्टरकडे गेले होते- हाय प्रोटीनसाठी सोयाबीन खा असं आवर्जून सांगितले तिने मुलाला.. तिला गव्हाच्या दळणात सोयाबीन मिसळत असल्याचे सांगितले- त्यावर ती म्हणाली, सोयाबीन गरम झाले की त्यातले सगळे सत्त्व निघून जाते- पोळी, फुलका ह्यांना थेट वाफ लागते- त्यामुळे गव्हात सोयाबीन घाला वा घालू नका, फरक नाही पडत फारसा स्मित सोया चन्क्स मात्र तिने रेकमेन्ड केले. टोफूही.

वर रैनाने म्हटलेय त्याला अनुमोदन- कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको वाटतो मलाही. अधूनमधून सगळं प्रमाणात खावं.

सोया स्टीक्स म्हणुन एक प्रकार मिळतो,, लहान मुले आवडीने खातात.
डॉ. अभय बंगानी तीन प्रकरची तेले मिसळुन ती जेवणात वापरावी असं सांगितलय. आता आठवत नाहिये, वाचुन टाकेन किंवा कोणाच्या लक्षात असेल तर लिहा.

सोया चंक्स चांगले लागतात,
प्रयोग ला अनुमोदन ,माझ्या ही वाचनात आलय, की सोयाबीनच्या आहारात योग्यवापराने मेनॉपॉज चा त्रास बरच अंशी कमी होतो. शेवटी कुठल्या ही गोष्टीचा अतिरेकी वापर अयोग्यच. अजुन असही वाचनात आलय की गव्हात सोयाबीन वापर्ल्याने कलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.
@पूनम सोयाचंक्स प्रमाणे गव्हाच्या लाह्या पण मिळतात त्या पण लाहान मुलांना प्रोटीन साठी चांगल्या, दुधात घालून तर उत्तमच स्मित नुसत्या ही छान लागतात .

रेशिम,
लहानपणापासून जे तेल वापरत असू तेच खाणे चांगले, हे डॉक्टरांचे म्हणणे बरोबरच आहे. भौगोलिक रचनेनुसार त्या त्या प्रदेशातील लोक विशिष्ट खाद्यतेल आहारात वापरत असतात आणि तेलातील बदल प्रत्येकालाच मानवेल असे नाही. पण गेल्या काही दशकांत आपल्या आहाराच्या सवयीसुद्धा बदललेल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्राच्या हवामानाचा विचार करता रोजच्या आहारातील सर्वोत्तम पौष्टिक घटक आहे, पण आजकाल ती कधीतरी चेंज म्हणून खाल्ली जाते. रोजच्या जेवणातील भाकरीचे स्थान पोळीने पटकवले आहे. तेलाबाबत बोलायचे तर तिळाचे तेल खाण्यात आणि अभ्यंगासाठी सर्वोत्तम मानले जाते. आज आपण तिळाचे तेल न वापरता शेंगदाणा तेल वापरतो. उत्तर भारतात मोहरीचे तेल वापरतात. त्याने अंगात उष्णता निर्माण होते. आपण मोहरीचे तेल केवळ लोणची टिकवण्यासाठी वापरतो. दक्षिणेकडे खोबरेल तेल खाण्यात वापरतात. आपण ते केसांना लावायला वापरतो.
आपल्या स्वयंपाकातील वापरानुसार तेलही वेगळे वापरणे चांगले असते. शेंगदाणा तेल आपण फोडणीसाठी, डीप फ्राईंगसाठी (दिवाळी फराळ, पक्वान्ने) वापरतो कारण त्यात तळलेले पदार्थ जास्त काळ टिकतात. पामतेलात तळलेल्या पदार्थांना दहा दिवसांत वास यायला लागतो. पापड, कुरडया अशा शॅलो फ्राईंगसाठी राईसब्रान ऑईल (तांदळाच्या कोंड्याचे तेल) चांगले असते कारण पदार्थ तळून झाल्यावर त्यात तेलाचा अंश उरत नाही. आजकाल लोक कॅलरी कॉन्शस झाले आहेत. त्यामुळे एकच एक तेल खाण्यात असले (विशेषतः शेंगदाणा तेल) आणि त्याचा वापर मुबलक होत असला (भाज्या, बटाटेवडे, इतर चमचमीत कालवणांसाठी) तर मग कुटूंबात चरबी वाढण्याचे प्रमाण अधिक असते.
म्हणून तुझा मुद्दा बरोबर असला तरी इतरही तेलांमधले आवश्यक घटक शरीराला मिळण्यासाठी अधून मधून वेगळी तेले (आपल्याला मानवणारी) खाण्यात असावीत. मी वर म्हटल्याप्रमाणे ओमेगा ६ हे उपयुक्त मेदाम्ल सोयाबीन तेलात आढळते आणि माशांमध्ये. जे लोक मासे खात नाहीत त्यांनी काय करावे? साधे आहे. सोयाबीन तेलातून मिळवावे.
मी घरी काय करतो, की पंधरवड्याला तेल आणून संपवतो. हेसुद्धा महत्त्वाचे आहे कारण तेल जितके ताजे खाल तेवढे चांगले. अनेक लोक एकदम तीन महिन्यांसाठी तेलाचा मोठा डबा आणतात. पण तो फोडल्यावर तिसर्‍या महिन्यात शिल्लक तेलाचा स्वाद ताजेपणा कमी झाल्याने बदलतो. मी माझ्यापुरती एक व्यूहरचना आखली आहे. प्रत्येक पंधरवड्याला मी वेगळे तेल आणतो आणि वापरून संपवतो, पण तेले मात्र शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन हीच तीन असतात. सणांचे पदार्थ आम्ही शेंगदाणा तेलात तळतो. पापड कुरडयांसाठी राईसब्रान तेल वापरतो. रोजच्या फोडण्यांना त्या वेळी ज्या तेलाचा नंबर असेल ते वापरतो.
आता हे सगळे उपद्व्याप कशासाठी? बदलत्या काळाचे बदलते व्यवस्थापन म्हणून. आम्हाला वरील तीन तेलांचा कधीच त्रास होत नाही.
सवयीचे तेल खाण्यात कायम असावे, हे योग्यच आहे पण त्याहीआधी तेल, तूप, लोणी, मीठ, साखर या पदार्थांचा वापर बेतानेच करावा, हे कधीही विसरू नये. स्मित

सोयबीन हे पुरुष वन्धत्वचा १० कारणा पैकी एक आहे !!!

मनापासून धन्यवाद प्रयोग.
यावर जरूर विचार करेन आता. तेलाचा वापर जरी कमी असला तरी मी शेंगदाणा तेलच नेहमी वापरते डॉ ने सांगितल्यापासून.

नानबा, विषयांतराबद्दल क्षमस्व.

मी सध्या रोस्टेड सोयाबीन आणलेत बिग बझार मधुन खारे आणि तिखट. आणि ते नुसते खातो खारे तिखट दाणे खातो तसे. पण त्याने त्रास काही होत नाहीये. टोफुची भाजी मी खाल्ली आहे ती चांगली लागत होती. सोयाबीन नगेटसची भाजी आमच्याकडे बनते चांगली लागते.

गुड्स!!!

माझा एक मित्र, जो नॉन वेज खात नाही, तो जपान मधे आल्यावर तोफु वर तुटुन पडायचा..
मग त्याला कॉस्टको दुकान सापडलं जिथं स्वस्तात मिळतात गोष्टी.
त्यानं तिथुन ५-६ लिटर सॉय मिल्क आणलं...
दरम्यान तो भारतात जाऊन आला.

त्याच्या लग्नाचं चालु होतं... त्यानिमित्त शिक्षण मिळालं वाटतं त्याला, आल्यापासुन तोफु बंद! स्मित
तो देशात परत गेला आता ... पण त्याचं सॉय मिल्क अजुन आमच्या घरातच आहे...
आम्हाला ते टाकवत नाही आणि पिववत पण नाही...

पण जर खरंच ते इतकं वाईट असेल तर जपानमधे छोटी पोरं दिसलीच नसती...
कारण इथे रोज, न चुकता तोफु खातात...
सोयाबीन स्नॅक्स असतात.. "सॉय जॉय"
आणि इथे दोन-दोन, तीन-तीन पोरं असणं फारही रेअर नाही आहे..

समजत नाही नक्की काय खरं...