सदस्य प्रवेश |
मुंजखालील सर्व लिखाण श्री. कृ. म. बापटशास्त्री यांनी लिहिलेल्या व श्री गजानन बुक डेपो, पुणे ३०, यांनी प्रकाशित केलेल्या 'स्वयंपुरोहित' या पुस्तकातून घेतले आहे. प्रत्येक मनुष्य जन्मतः शूद्र असतो, परंतू द्विजपणा (ब्राह्मण) होण्यासाठी उपनयन संस्कार करतात. उपनयनानंतर गुरूकडे जाऊन शिक्षण मिळवायला प्रारंभ होतो. मुख्य विधी: संकल्पः वडील मुलाची मुंज करणाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी, मुलगा, आधी अज्ञानाने काही पापे झाली असतील तर त्यांचे निरसन करण्यासाठी, व वडील पुनः इतके दिवस मुलाच्या बाबतीत काही पातके झाली असतील तर त्यांचे निरसन करण्यासाठी गायत्री जप, प्रायाश्चित्त व दानधर्म करीन असे संकल्प करतात. त्यानंतर गणेश पूजन, महालक्ष्मी पूजन, मंडपदेवता प्रतिष्ठा, वस्त्रदान(आहेर), करुन घटिस्थापना(म्हणजे घड्याळ?) (पूर्वी वेळ सांगण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी, मधे छिद्र असलेला तांब्या तयार करावा लागे!) नंतर दुसर्या दिवशी मुंज सुरु होते. मुलाचा चप्पीगोटा (फक्त घेरा व शेंडी ठेवून) करायचा! मग मंगलाष्टके, (या वेळी तांदुळासोबत ताज्या ताज्या चप्पीगोट्यावर मुलाच्या (टारगट) मित्रांनी सउपार्या माराव्या असा पण नियम असतो, असे सांगून मला अनेक सुपार्या मारण्यात आल्या!) व बृहस्पतिसूक्त म्हणून, होम प्रज्वलित करून मुलास लंगोटी (कौपिन) लावणे. नंतर वस्त्रधारण म्हणजे मुलाला पांढरे व लाल वस्त्र पांघरण्यास द्यावे. नंतर अजिनधारण, म्हणजे हरणाचे कातडे पांघरायला द्यायचे. नंतर जानवे घालण्याचा विधी. नंतर आचमन, व प्रधानाज्य होम, म्हणजे होमातील अग्नीला तुपाच्या आहुति. नंतर अवक्षारण, म्हणजे वडील व मुलगा ओंजळीत पाणी घेतात व वडील मुलाच्या ओंजळीत ते पाणी टाकून मग मुलगा ते खाली सांडतो. असे तीनदा. मग्मुलाच्या हृदयाला स्पर्ष करून त्याला वडील व अग्नीच्या मधून नेऊन अग्नीच्या पश्चिमभागी, पूर्वेकडे तोंड करून बसवावे. मग विभूति ग्रहण म्हणजे भस्मधारण. मग ओणव्याने (मुलाने)काही मंत्र म्हणून वडिलांना नमस्कार. मग वडिल मुलाच्या कानात गायत्री मंत्र सांगतात. मग वडिल मुलास उपदेश करतात. मग मुलगा ओम् भवति भिक्षांदेहि असे म्हणून आईकडून तीनदा भिक्षा मागतो (पुरोहितांच्या जेवणासाठी) ऐतखाऊ भटाभिक्षुकांना भोजन वगैरे मुळीच घालू नये. असा मुंजीचा मुख्य कार्यक्रम. इथे कुठेतरी मातॄभोजन नावाचा प्रकार अस्तो, पण या पुस्तकात तसा उल्लेख सापडला नाही. असेल तरी बहुधा मंगलाष्टकांपूर्वी असावा. यानंतर आईने मुलाला आयुष्यात कधीहि भरवायचे नाही. आईने या सगळ्या विधींपासून दूर रहायचे, कारण आपला लाडका बाळ आता घर सोडून जाणार या दु:खाने तिला वाईट वातत असणर (जसे मुलीच्या लग्नात आई मंगलाष्टके वगैरे म्हणायला येत नाही, कारण तिला वाईट वाटायला पाहिजे , टळली एकदाची सटवी घरातून, असे मोठ्याने बोलायचे नसते). |
|
धन्यवाद. बर्याच नवीन गोष्टी कळल्या.
ई मंगलाष्टके वगैरे म्हणायला येत नाही, कारण तिला वाईट वाटायला पाहिजे , टळली एकदाची सटवी घरातून, असे मोठ्याने बोलायचे नसते) >>>>>>>> khi khi khi khi :0)
परागकण