बर्याच दिवसानी लिहितेय. खरंतर विषय आधीपासून डोक्यात आहे. पण वेळ मिळेल की नाही ते माहीत नव्हतं.
यामधल्या बर्याच पात्राची नावं माझ्या आधीच्या कथेमधून आलेली आहेत. बाकी आधीच्या कथेचा आणि याचा काहीही संबंध नाही. कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध असल्यास तो योगायोग नसेल तरी तो योगायोगच आहे असे समजावे.
===============
नंदिनी२९११
===============
रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत. फोन वाजला.
"हेलो" माझा आवाज झोपेमधला.
"हाय, काय करतेस?" पलिकडचा आवाज एकदम फ्रेश.
"सलमान खान आलाय इथे. त्याच्याबरोबर डिस्को भांगडा करतेय. येणार?"
"व्हेरी फनी.. "
"का फोन केला होतास?"
"का मी तुला फोन पण नाही करू शकत?"
"कर ना. पण रात्री अपरात्री नको करूस.."
"प्रिया, तुला अजून माझा राग येतो ना?"
"रेहान, सात वर्षानंतर पण तू रोज मला हाच प्रश्न विचारणार आणि मी तुला तेच उत्तर देणार. हो, मला तुझा खूप राग येतोय."
मी फोन ठेवून दिला. झोप तर उडालेलीच होती. उठून स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली. खिडकीमधे येऊन उभी राहिले तर अजुन जग झोपलं होतं. चांदण्या खेळत होत्या. थंड वारा वहात होता. सात वर्षं?? की आठ वर्षं?? नक्की किती वर्षं झाली? वर्षं झाली कि नाही. अगदी कालपरवा घड्ल्या सर्व घटना. कालपरवा तर प्रितम घरी आली होती. कॉलेजला चल म्हणत. कालपरवा तर रेहान माझं आयुष्य कुस्करून गेला. कालपरवा तर सरबानी इथे रडत होती.
कालपरवा कि सात वर्षं.. माझंच मला समजेना. डोळ्यासमोर धुकं साठून आलं. आणि त्या धुक्यातून समोर उभी राहिली. प्रिया कुलकर्णी. सात वर्षापूर्वीची.
=======================================================
"प्रिया, उशीर होतोय..." आई ओरडत होती. आज अकरावीचा पहिला दिवस. काल सुट्टीचा शेवटचा दिवस म्हणून उशीरापर्यंत टीव्ही पाहत बसले होते, सकाळी उठायला उशीर झाला.
"आवरलं गं आई, फक्त डबा दे. मग मी निघाले" मी डोळ्यावर चष्मा चढवत म्हटलं.
"ही काय? हा ड्रेस घालून जाणार?" आई ने मला विचारलं,
"का काय खराबी आहे?" मी आरशात बघत विचारलं.\
"इस्त्री नाही केलेली.. वर किती ढगळा आहे तो. परवा मे महिन्यत नवीन शिवलेला घाल."
"आई, कॉलेजात जातेय, नटायला नव्हे. समजलं ना?"
इतकं बोलून मी आमच्या घरबाहेर पडले सुद्धा, घर कसलं मोजून तीन खोल्या, त्यापण इवलाल्याशा. त्यामधे आम्ही पाच जण राहणारे.
गेटमधे आल्या आल्या प्रितम दिसली. ती बहुतेक माझ्याच घरी येत असावी.
"चल.. रिक्शा पकडून जाऊ. उशीर झालाय खूप."
प्रितम निळा टीशर्ट घालून आली होती, कॉलेजचा पहिला दिवस असल्याने तिने स्वतःवरती फार मेहनत घेतलेलं जाणवत होतं. इतकीच मेहनत अभ्यासातही घेतली असती तर परीक्षेच्या वेळेला माझी उत्त्तरं कॉपि करण्याची वेळ आली नसती तिच्यावर, मागच्याच वर्षी ती इथे आली होती, तशी मूळची मुंबाईची होती त्यामूळे इथाल्या वातावरणात मिक्स होणं तसं तिला कठीणच होतं. ती नवीन असल्यामुळे तिच्या फारशा ओळखी नव्हत्या. मी इथेच जन्मलेली असूनपण माझे काही फार मित्र मैत्रीणीचा ग्रूप होता असं काही नाही. प्रितम माझ्या घराजवळच रहायला होती. त्यामुळे आपण कॉलेजला एकत्र जाऊ असं आम्ही केव्हाच ठरवलं होतं.
कॉलेजमधे पोचल्यावर तिथलं वातावरण बघून मी सर्दच झाले. एखादी जत्रा भरल्यासारखं वाटत होतं. कुणीही अभ्यासासाठी आल्याचं दिसत नव्हतं
सग़ळे चक्क हसत खिदळत होते.
"हे... ज्युनिअर्स.. कम हीअर.." कुणीतरी पाठून आवाज दिला.
"पुढे चालत रहा, अजिबात पाठी वळून बघू नकोस." प्रितम ओठाच्या कोपर्यातून मला म्हणाली.
मी चालत राहिले,
"ऐकू येत नाही का? का कान बहिरे झालेत?" परत तोच आवाज आला.
मी सर्रकन मागे वळले. "तुझे ऐकून थांबायला तुझ्या बापाचे नोकर नाही आम्ही.." माझा आवाज किंचित चढलेला होता.
हे मी ज्याला बोलले तो मात्र एकदम आश्चर्याने माझ्याकडे बघत होता, जणू मी काही जादूचा खेळ करून दाखवत होते.
"चल." प्रितमने माझा हात पकडला आणि आम्ही दोघीजणी आमच्या वर्गाकडे चालायला लागलो. पण तिथेच लेडीज रूम असल्याने प्रितम मला ओढत आत घेऊन गेली,
"तुला असं बोलायची काही गरज होती का? सीनीअर्स आहेत ते," प्रितम माझ्यावर चिडली होती.
"मग?"
"अगं रॅगिंग करत होते ते,,"
"म्हण्जे,".. नंतर बराच वेळ प्रितम मला रॅगिंग म्हणजे काय ते समजावत होती, मी आरशासमोरची मुलगी स्वतःचे डोळे विविध रंगानी कसे रंगवत होती ते बघत होते. निळे जांभळे डोळे लोकाना कसे बघवत ते एक तो परमेश्वरच जाणे. प्रितमचं रॅगिंग प्रकरण एकंदरीत माझ्या डोक्यात काही घुसलं नाही.
"बरं बाई, परत नाही असं बोलणार." मी प्रितमला शांत केलं.
"शपथ?"
"क्काय?"
"माझी शपथ?"
आयला,, शपथ वगैरे पण? जाऊ दे आपल्या बाचं काय जातय?
"अगदी तुझी शपथ,, आता लेक्चरला जायचं? की इथेच बसायच आणि भांडायचं.." मी म्हटलं.
प्रितम खुदकन हसली. हसताना तिच्या गालाला मस्त खळी पडायची. च्यायला आम्ही हसलं तर दातच दिसायचे ते पण ओबड धोबड...
वर्गामधे पहिलं लेक्चर एका यडपट सराचं झालं. आता नाव आठवत नाही पण ते पोरानी त्याची बरीच बारशी केलेली असल्याने कुठलं ही नाव वापरलेलं चालायचं. त्यानी आम्हाला किती अभ्यास करावा लागेल. बारावी किती कठीण असते वगैरे सांगितलं. शंभर मुलाच्या वर्गात फक्त मीच एकटी ते काय बोलत होते. ते लिहून घेत होते. सर्व मुलाचं आणि मुलीचं पण लक्ष इकडे तिकडे बघण्यातच होते, सर इतकं महत्वाचं सांगत असताना कुणी लिहून क घेत नाही हेच मला समजेना.
प्रितम एकटक वर्गात एका मुलाकडे बघत होती, लेक्चर संपल्यावर तो मुलगा उठून वर्गाबाहेर गेला.
"काय छान मुलगा आहे... मस्तच आहे गं.. तो पण माझ्याकडे बघत होता,," ती मला सांगत होती. मी चष्मा पुसत होते. "तो बाहेर जाताना कुणीतरी हाक मारली त्याला... हान,, एशान,,, असं काहीसं नाव आहे." ती बोलतच होती.
मी चष्मा डोळ्यावर ठेवला.. "मलातरी चहा आण रे, असं ऐकू आलय.."
"प्रिया.. प्लीज.. फालतु जोक्स मारू नकोस.. छान,, हान,,, किसान,, काय नाव असेल बरं त्याचं.."
"रेहान... आणि तो एक नंबरचा नालायक मुलगा आहे," मी बायोच्या नवीन वहीवर नाव घालत प्रितमला माहिती पुरवली.
"वॉव.." ती इतक्या जोरात ओरडली की अख्खा वर्ग आमच्याकडे बघायला लागला. "तू ओळखते का त्याला? माझी ओळख करून दे ना.."'
चाळीस मिनिटाच्या लेक्च्रमधे बराच असर झालेला दिसत होता.
"च्क्क... पण त्याला हाक मारताना मी ऐकलेलं होतं. तो जो तिथे तिसर्या रांगेत बसलाय ना येलो शर्टमधे, त्याने त्याला आवाज दिला होता. "रेहान,, नालायक परत ये" म्हणून,"
मी हातातली वही प्रितमच्या डोक्यात हलकेच मारली.
"पण् मला नालायक मुलंच फार आवडतात," ती विचार करून बोलल्यासारखी बोलली. आणि आम्ही दोघी खळखळून हसलो.
एकंदरीत आमचं पहिलं लेक्चर अविस्मरणीय ठरलं.. त्यानंतरच्या कुठ्ल्याही लेक्चरला तो मुलगा वर्गात नव्हता. खरंतर माझं लक्ष नव्हतं पण प्रीतम वारंवार "तो अजून का नाही आला?" हे मला विचारत होती. मी काय त्याची सेक्रेटरी होते का???
शेवटचा तास संस्कृतचा होता. प्रीतमची भुणं भूण चालूच होती. आता रेहान नावाचा मुलगा संस्कृत विषय घेइल का? हा मला पडलेला प्रश्न होता. प्रीतमला म्हणुन दाखवलं तर म्हणे "कमीतकमी मला बघायला तरी तो परत येइल..." मी स्वतःच्याच कपाळावर हात आपटून घेतला. ती परत एकदा खुदकन हसली.
एकंदरीत अकरावीच्या त्या पहिल्याच दिवशी आमच्या आयुष्याची रांगोळी सजायला सुरूवात झाली होती. ते असते ना काहीतरी symbolic touch... तसंच काहीतरी. रेहान आमच्या दोघाकडेही न बघता निघून गेला होता. प्रीतम हसत होती. मी वैतागले होते. आमच्या आयुष्याच्या रांगोळीचा हा आराखडा. अजून एक बिंदू यामधे यायचा आहे. अख्खी रांगोळी विस्कटण्यासाठी.
=====================================================
"प्रीतम, मी फिजिक्सचे लेक्चर चुकवणार नाही. " मी जराशी ओरडूनच म्हणाले.
"अगं प्लीज ना... तू नाही आलीस तर मी कशी जाऊ??"
"कशीही जा... पण मी लेक्चर चुकवणार नाही.."
"प्लीज ना गं राणी."
"हे बघ, तू आणि रेहान पण लेक्चर चुकवणार नाही आहात.." मी भुवई उंचावत बोलले.
प्रीतम पुढे काही बोलायच्या आत मी वर्गाकडे निघाले. गेल्या आठ दिवसापासुन हे नवीन नाटक चालू झालं होतं. रेहान आणि प्रीतम एकमेकाना भेटायला म्हणून कुठेतरी जायचे. प्रीतम मी एकटी कशी जाऊ म्हणून मला ओढत न्यायची. आयला... ते म्हणतात ना नळाबरोबर कुणाची तरी यात्रा.. तसला प्रकार.
प्रीतम माझ्यावर रागावली होती. तशी ती हल्ली माझ्यावर चिडायचीच. काहीही गरज नसताना, तिला लेक्चरला बसायल आवडायचं नाही... म्हणून मी पण बसू नये हा तिचा आग्रह. अर्थात मी काही फारशी अभ्यासू वगैरे नव्हते पण सतत लेक्चर्स चुकवणं म्हणजे...... घरी समजलं असतं तर माझी खैर नव्हती.
त्यात मला तो रेहान बिल्कुल आवडला नव्हता. सावळा, उंच होता. कायम झिपरे केस. त्याचे डोळे प्रीतमला नशीले वाटायचे.. (मला रात्रभर त्याची झोप झाली नसवी असं वाटायचं...)
प्रीतम आणि तो तासभर गप्पा मारायचे. मी शांतपणे पुस्तक वाचत बसायचे. आठ दिवासात त्याच्याशी मी आठ वाक्य.न पण धड बोलले नव्हते. बोलावं असं वाटत पण नव्हतं...
==============================================
हे कॉलेजवाले पण ना एकदम भिकारी लोक असतात. १५ ऑगस्ट शाळेमधे सेलीब्रेट करतच होतो ना.. आता इथे अकरावीमधे येऊन साजरा करायची काही गरज आहे का? पण नाही. भल्या पहाटे सात वाजता बोलावून ठेवलय इथे. तेही कंपल्सरी. आलं नाही तर म्हणे चाचणी परीक्षेला बसू देणार नाहीत. म्हटलं ना भिकारी लोक आहेत.
खरंतर मी काहीतरी कारण देऊन टाळणारच होते. पण मग प्रीतम मागे लागली. तिने घरी आधी झेंडावंदन आणि मग दिवसभर लेक्चर्स आहेत असं कारण दिलं होतं. मी तर कारण द्यायची गरजच नव्हती. कॉलेजची बॅग उचलून मी निघाले की मला कुणी काही बोललं नसतं..
आता नेमका धो धो पाऊसपडावा म्हटलं की तो कधी पडतच नाही. चक्क ऊन पडलं होतं. सकाळच्या त्या कोवळ्या उन्हात आणि रात्री पडून गेलेल्या पावसाच्या वातावरणात एकदम मस्त वाटत होतं. प्रीतम अगदी मस्त पांढरा स्कर्ट आणि गुलाबी टॉप घालून आली होती. मी चिखल उडेल म्हणुन काळी जीन्स आणि करडा शर्ट. तोही बाबानी मुंबईत कुठेतरी रस्त्यावर घेतलेला...
अजून मुलं हळू हळू जमत होती. बहुतेकाचा उत्साह ओसंडल्यासारखा वाहत होता. मी मात्र वैतागलेली इकडे तिकडॅ बघत होते. प्रीतमचा अखंड चिवचिवाट चालू होता. तरी नशीब तो रेहान नामक प्राणी अजून आला नव्हता. आला नाही तर किती बरे होईल हाच एक विचार माझ्या मनात् येत होता. त्याला या जबरदस्त शिस्तभंगासाठी कॉलेजमधून हाकलले तर...
"प्रिया. लक्ष कुठाय?" प्रीतम माझ्या गाल ओढत म्हणाली. खरंतर मला असं कुणी अंगचटीला आलेलं बिल्कुल आवडत नाही. माझ्या अंगाला हात लावलेला सहन पण होत नाही. पण प्रीतमला सांगून एखादी गोष्ट पटली असती तर काय हवे होते.
आमच्या बाजूला एक मुलगे उभी होती. बुटकीशी. कापलेले केस. गळ्यामधे लाकडाच्या ओंडक्यासारखे काहीतरी घातलेले. कानामधे तसल्याच लाकडाचे काहीतरी. स्लीव्हलेस टॉप. आणि दंदावर कसलेअरी चांदीच्या जाड साखळ्या बांधलेल्या.
"हाय, सरबानी" प्रीतम तिला म्हणाली.
म्हणजे बहुतेक ही पोरगी माझ्याच वर्गातली.
"हाय प्रीतम, रेहान नही आया क्या?" ती हसत हसत म्हणाली. मी तोंडाचा आ केला... म्हणजे ही रेहानची भानगड वर्गात माहीत होती की...
प्रीतम आणि सरबानी एकमेकीशी बोलत होत्या. तितक्यात विशाखा तिथे आली. माझ्याच वर्गात होती. तिच्या लहान भावाला शिकवणी लावायची होती. अर्थात अख्ख्या गावात स्वस्त आणि मस्त अशी शिकवणी माझीच.
विशाखाला माहिती देइइपर्यंत अजुन एक चांगली गोष्ट घडली. प्रीतम येऊन म्हणाली..."प्रिया. तू घरी गेलीस तरी चालेल. रेहानला भेटायला जाताना मी सरबानीला घेऊन जाइन.."
आणि दुसरी चांगली गोष्ट.. धो धो पाऊस पडायला लागला..
==================================
सुरवात सही झालीए.....
Please finish it off fast.
waiting for next post.
खुप आकर्शक सुरुवात आहे. पुढ्च लवकर लिहि. उत्सुकता वाढली आहे.
सुरवात छान झाली आहे
पुधेचि गुन्तागुन्त कधि उकल्नार.
मी तुझ्झ्या कथा कादम्बर्या नेहेमी वाचते. छान असतात. लवकर पूर्ण कर.
गुड गोइग.
पुढे काय ह्याची उत्सुकता आहे.
हम्म्म नन्दु, खुप दिवसांनी वाचायला मिळालं तुझं.
वाट पहातेय.
परवा मे महिन्यात???
बाकी कादंबरीची सुरुवात चांगलि आहे.
खुप खुप वाट बघते आहे कथेची....
खरच लेखिका हरवलि बहुदा................
कुठे आहेस नंदिनी ?
सुंदर.
पुढे कधी लिहीणार?
खुप उत्सुकता लागुन राहिली आहे ... नन्दन लवकर पुर्न कर . मी तुझ्य लिखनाचा जबरद्स्त चाह्ता आहे .
हे दरवेळेस अस अर्धवट लिहिण्यामध्ये तुम्हाला काय आनंद मिळतो ? का तुम्ही कथा पूर्ण करत नाही. उत्सुकता ताणायची ही पद्धत कुठली ? माफ करा थोड रागात लिहीते आहे कारण कथा वाचण्याचा आनंद तुम्हीच हिरावून घेताय.
योगिनि
plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz lawakar poorn kara na.................
का लिहित नाहि आहात तुम्हि हि कथा पुढे ? लवकर हे पुर्न करण्याची देव तुम्हाला बुद्धी देवो ..
छान आहे.
जानेवारी नंतर तुम्हाला थोडा ही वेळ मिळाला नाही का हो ? ४ महीने झाले मोरपीस हरवुन ..
लवकर साप्डा की णंदीणी .
नन्दिनि ताई लव्कर करा ना सुरुवात लिहाय्ला.....
विकि
नंदिनीताई ना, हरवलेली मोरपिसं शोधायला गेली आहे, येईल हं कधीतरी परत...
आयती गर्ल .... तुमी मोठी मानश आम्च्या शाल्ख्या लहान मुलान्ना नेहमी अशच कलता... आमी नाई बोलत जा...
विकि
नंदिनि हरवलिस का ग परत? मोरपिस नाहि भेटलि तरि चालतिल.... लेखनाचा पिसारा तरि फुलव...लवकर पुर्ण कर कादंबरी....
अजुन एक शंका तुझ्या कादंबरितिल नायकाचे नाव रेहान का असते?
प्रिति
मोरपिसे काय? अख्खे मोरच हरवले आहेत...
बरं माझ्या कथेच्या नायकाचे नाव रेहान का असते? याचे खरेतर उत्तर खूपच वैयक्तिक आहे तरी मी तुम्हाला सांगते.
मला हे नाव खूप आवडतं.. म्हणुन..
यामागे कसलेही रोमँटिक इत्यादि कारण नाही.
पुढचा भाग लवकरच टाकेन.
र्_जोशी,

तुमचे हार्दिक अभिनन्दन!!!
तुमच्या एका प्रश्न्नाने नंदिनी परतली.... उत्तर द्यायला तरी नंदिनी इथे आली.
अरे पुढे काय होते?
कोण सांगणार आम्हाला?
नन्दिनी-- आतपर्यन्त च लिखाण छानच आहे. पण नन्तरच कधि बघायला---वाचायला मिळणार?
ए नंदु
पुढला भाग लवकर टाक यार !!
आशुतोष
जो श्यांनी जर मराठी लिखाणात अश्या चुका केल्या तर कसं व्हायच?
दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."
nandini2911, कधी मिळणार पढने को आम्हाला नेक्सट कथा??????????

पुढच्या भागाच वाट पहातेय मी.
अनघा
आता १०वीचा result लागून कॉलेज सुरूपण होतील नव्या वर्षाची,आहात कुठे?
पुढ्चे भाग केव्हा???
..प्रज्ञा