|
Psg
| |
| Monday, April 23, 2007 - 7:11 am: |
|
|
Mental block लॅच उघडून शमा आत आली.. अभि छानपैकी सोफ़्यावर लोळत टीव्ही बघत होता.. तीही त्याच्याशेजारी जाऊन धपकन बसली.. "काय, बराच वेळ लागला.." "हो रे.. नंतर तर मला कंटाळाच आला होता.. किती वेळ लागला माहिते नुसत्या सीलेक्शनलाच. किती हिंडलो बापरे.. मग तिथेच food court मधे खाणं.. वरूण तर नंतर पुन्हा रडायला लागला होता! किती किरकिर करतो रे तो सारखा.. पण Macy's मधे खुश होता.. याला हात लाव, त्याला हात लाव, इकडून तिकडे पळ.. अनिताला झेपत नव्हतं काही.. कपडे पाहू की वरूणला आवरू.." "वरूण फ़ारच वांड आहे.." "नुस्ता वांड नाही, हट्टी पण आहे. कसं काय manage करते अनिता तिचं तिलाच माहित! बरं आम्ही chinese खाल्लं आणि तुलाही तेच आणलय.. गरम करून घे.. मी जरा फ़्रेश होऊन येते.." "मी करू का काही मदत?" अभिनी शमाला जवळ ओढलं.. "ए, लाडात येऊ नकोस.." शमा हसली.. "तर काय! मस्त शनिवार आहे, आणि तू सकाळपासून shopping ला.. बोर झालं मला एकट्याला.. आता जरा boredom घालवूया ना.." "ते नंतर.. आत्ता सोड ना.. आणि तू खा पण.. किती कामं पडली आहेत. vaccuum केलेलं दिसतय पण.. कसा good boy आहे माझा.." "मग काय.. राणीसाहेबांनी ऑर्डर दिली आणि सेवकानी पाळली नाही असं झालय का?" "मग, आता तू दमला असशील ना.. जेव हं, मी आलेच ५ मिनिटात.." शमा पळाली.. ती फ़्रेश होऊन आली तेव्हा अभि जेवतच होता.. मगाचचा विषय तिच्या डोक्यातून गेला नव्हता अजून.. "आवडलं का रे? नवीनच पाहिलं हे restaurant .." "हो, बरंय" "अनितानी मोठाच घाट घातलाय ना वरूणच्या birthday party चा? बघ ना, आज त्याला तिने ३ पीस सूट घेतला- it cost 95 bucks माहित्ये.. Macy's म्हणल्यावर काय.. आणि जवळजवळ ६०-७० लोक आहेत पार्टीला.. Masala Mix मधे जेवण!" "अगं करूदे की.. असेल त्यांना हौस.. तू कशाला इतके हिशोब करत आहेस?" "तसं नाही रे.. is it worth it? तो ड्रेस आत्ता ६ महिन्यात त्याला होणार नाही.. इतकी उगाच लोकं बोलावली आहेत तिने.. its his 3rd birthday, not 1st म्हणून आश्चर्य वाटलं, बाकी काही नाही.. ते वरूणचे जरा जास्तच लाड करतात माझ्या मते. अजिबात काहीच शिस्त नाही रे त्याला.. अनिताचं तर नाहीच, पण संदीपचं पण ऐकत नाही तो.. जरा काही मनाविरुद्ध झालं की रडायला लागतो.. असा आकांत करतो की त्याच्या मनाप्रमाणेच करावं लागतं अनिताला..त्यामुळेच फ़ार शेफ़ारलाय तो" "मला वाटतं त्याला काहीतरी कारण असेल, आपल्याला माहित नाही.. मुलं उगाच इतका आकांत करत नाहीत कारण.." "हो, पण हे जरा जास्तच आहे हं यांचं! त्याला almost घाबरून असते अनिता.. 'बाबा, रडू नकोस, पण तुझ्या मनासारख होऊदे!' बापरे! I am so glad अभि की आपल्याला मूल नाहिये.. ही असली मुलांची तंत्रं काही झेपली नसती मला.. चांगले दोन रट्टे दिले असते मी.." "आणि कॉप्सनी पकडून नेले असते.." अभिनी वाक्य पूर्णं केलं! "म्हणजे माझ्या डोक्याला ताप.. तुझ्याकडे पाहू की मुलाकडे!" दोघेही हसले, पण अभि विचारमग्न झाला.. "शमा, आपल्याला अजून मूल नाहिये, कारण आपण होऊ देत नाहीये. पण हे अजून किती दिवस? मलाही कधीकधी वाटतं की its time now! " "प्लीज, या विषयावर पुन्हा चर्चा करायलाच हवी का? मूल प्रत्येक जोडप्याला व्हावं असा नियम आहे का? नाही झालं एखाद्या जोडप्याला मूल तर त्यांनी काही गुन्हा केला का?" "हे बघ शमा, तडकू नकोस. आपण शांतपणे बोलू शकतो ना? हा विषय काढला की टाळातेस तू, लगेच hyper होतेस. आपण कधी मोकळेपणी याबद्दल बोललओच नाहीयोत.. cool down my dear ." अभिनी शमाला शांत करायचा प्रयत्न केला.. शमाही निवळली थोडी.. "ठीके, नाही चिडत मी. पण मला हा विषयच नको वाटतो रे. काय वाईट चालू आहे आपलं मूल नाही तर? दोघांनाही चांगल्या नोकर्या आहेत, इथे US मधे सुखाचं आयुष्य जगतोय, भरपूर मित्र-मैत्रिणी आहेत, हिंडतोय्- फ़िरतोय.. खरंतर मूल नाहीये म्हणूनच इतकं फ़्री जगू शकतोय. नाहीतर बघ की आपल्या काही मित्रांचे हाल.. आज याला बरे नाही, उद्या त्याला ताप आहे, इतक्या लांब नाही येऊ शकणार, तिथे बेबी फ़ूड मिळतं का, डॉक्टरकडे जायचय.. एक ना हजार प्रश्न! आपण मनात येईल तेव्हा कुठेही जाऊ शकतो, खाऊ शकतो, जागू शकतो, उठू शकतो.. adjustment तरी किती करायची? career मधे halt , सुखाची झोप गेली, स्वातंत्र्य गेलं..!" "शमा, हे सगळं माहित आहे, बघतोय आपण आपल्या आजूबाजूला.. मग या सगळ्या मित्रांना आपल्यासारखे प्रश्न नाही पडले का? त्यांच्याही स्वातंत्र्यावर गदा आलीच ना? even they knew what they would have to face, once the baby has come.. लग्न झालं, काही वर्ष आरामसे गेली की मूल होणं हे natural extension नाही का?" "तेच तर म्हणते मी.. असलच पाहिजे का? आता एखाद्या जोडप्याला medical कारणामुळे होत नसेल मूल, तर मान्य करतातच ना ते आणि बाकीचेही?" "पण ती जोडपी कशी कायम काहीतरी miss करत आहेत असं वागतात.. दत्तक मूल घ्यायचा विचार करतात, दुसर्यांची मुलं खेळवतात, पण they try to bring a baby in their life . त्या छोट्या मुलाचा innocence , आपण कोणालातरी मोठं करतोय ही भावना, आपल्या नंतर आपलं नाव सांगणारं कोणी असेल म्हणून.. त्या साठी मग काहीही सोसायची तयारी असणे.. its so amazing , नाही? तुला नाही वाटत?" "हो, तसं आहे खरं! कसली गोडुली दिसतात ना बाळं छोटी? मऊमऊ, गुलाबी, गुबगुबीत.. एकदम उचलून घ्यावसं वाटतं.. कसलं मस्त हसतं, हात हलवतं, आणि बोबडं बोलणं तर अशक्य गोड! they are too sweet ! पण एकदा बिनसलं की बिनसलं रे बाबा.. ते handle करणं म्हणजे तारेवरची कसरतच! आणि तिथे काही लॉजिक चालत नाही रे.. मला खरं सांगू का तर भितीच वाटते मग, नकोच वाटतं रडणारी मुलं पाहून. कारण बाळं गोड थोडाच वेळ असतात आणि रडकीच जास्त वेळ असतात.. finally , मूल म्हणजे adjustment ! एक वेळ लग्नानंतरची तडजोड ठीक म्हणते मी, तिथे एक adult असतो. हे बाळ प्रकरण म्हणजे 'माझंच खरं!' असतं.. समजतं काय त्याला? एवढासा जीव आणि त्याच्या तालावर आपण मोठ्यांनी नाचायचं! बापरे!" "अगं पण ते काय कायमच रडतं का? काहीही शमा तुझं.. त्या जीवाला काय कळतय की आपल्याला काय होतय ते? काहीही वेगळं झालं, नुसती आई दिसली नाही तरी रडणं हेच माहित ना त्याला.. आणि तसं म्हणलं तर काहीकाही बाळं कायमच त्रास देतात.. तू तर अजूनही आहेस की, तुझ्या आईबाबांना त्रास देणारी! आपण इथे इतक्या लांब आहोत तरी दर आठवड्याला आई-बाबांची अशी आशा असते की आपण ' news ' देऊ त्यांना. माझेही आणि तुझेही आईवडील! इथले friends ही म्हणतात आता.. 'अभि, किती दिवस सुटे राहणार?'" "तेच तर.. जळतात सगळे आपल्या freedom वर! आणि आपण इथे आहोत तेच बरय! माझं तर आईबाबांनी जगणं मुश्किल केलं असतं! अरे माझ्या दोन्ही बहिणींना २-२ मुलं आहेत, तसंच तुझ्याही भावाला आहे की मोनु.. नातवंडं आहेत त्यांना.. आपल्याला मूल व्हावं की नाही, कधी व्हावं, किती व्हावीत हे सर्वस्वी आपले प्रश्न आहेत ना? whats the big deal हेच समजत नाही मला.. मला तरी मी काही मिस करतेय मूल नाहिये म्हणून असं वाटत नाहीये. जाऊदे, किती वेळ चर्चा करणारोत आपण अशी? चल, झोप काढते थोडी, बोर झालं!" विषय तेवढ्यापुरता तरी शमाने मिटवला होता. या नंतर दोन-तीन आठवडे तसेच गेले. रूटीन मधे काही फ़रक नाही पडला.. एक दिवस अनिताचा शमाला फोन आला.. भेटायला ये. अनिता नोकरी करायची नाही. पण शमाच्या कामामुळे तिला वीकेंडलाच शक्य होणार होतं. लगेचच्याच शनिवारी दुपारी गेली ती अनिताकडे.. मनात विचार.. आता काय सांगत्ये ही? का शॉपींगला जायचेय पुन्हा? ती गेली तेव्हा संदीप वरूणला घेऊन बाहेर गेला होता.. अनिता वाटच पहात होती तिची.. "काय गं, काय काम काढलस आज?" "काम काही नाही.. असंच.. वरूणच्या पार्टी नंतर भेटलोच नाही ना निवांत.. म्हणलं बोलावल्याशिवाय यायची नाहीस तू.." "असं काही नाही गं, वीकेंड निवांत असतात की.. पण तुमचच रूटीन बांधलेलं असतं ना.. वरूणवर.." "हं, तेही आहेच. वरूण बर्थडेपासून एकदम शहाणा मुलगा झालाय गं! तुला माहितच आहे कसा रडायचा तो सारखा.. पण आता हट्टीपणा पुष्कळ कमी झालाय. touchwood ! डॉक्टर म्हणाले की त्याची तब्येत सुधारेल तसा कमीच होईल त्याचा हट्टीपणा.. इथल्या थंडीमुळे लगेच त्याला ear infection होतं गं सारखं आणि पचन पण weak आहे. त्यामुळे बिचारा सतत त्रासलेला असतो तो. जसा healthy होईल, तसा crankiness कमी होईल.. दंगा केला तरी चालतो गं, रडणं नको वाटतं! आणि तो लहान आहे ना, त्यामुळे सांगूही शकत नाही की नक्की काय होतय? रडायचं, आणि मग हट्ट करून जे मिळेल त्याच्याशी खेळायचं ते झालं की परत सुरु.. इथली औषधं पण किती mild असतात.. परिणाम व्हायलाही फ़ार वेळ लागतो.. पण सगळंच होईल आता हळूहळू कमी.." " great! what a relief to you then! touchwood! आत्ता छान सुटी होशील मग तूही.." "सुटी नाही गं" अनिता लाजली.. "आमच्याकडे परत news आहे!" शमा एक मिनिट blank च झाली. काय??? काहीही काय???? खरच???? "काय सांगतेस काय अनिता! My God! are you serious? का खेचत्येस माझी?" "चल, खेचू कशाला? हा काय चेष्टेचा विषय आहे का? अगं खरच! २ महिने झालेत.. confirm आहे!" "बापरे! माझा तर विश्वासच बसत नाही.. अगं कसं काय अचानक पण? म्हणजे आता वरूण मोठा होतोय, शहाणाही होतोय.. तू सुटी झाली असतीस.. तुला स्वत:साठी वेळ मिळाला असता थोडा.. आणि हे सगळं सोडून.... पुन्हा??? सॉरी, खरं तर मी तुला congratulate करायला हवे, पण मला शॉकच बसला!" अनिता शांत होती.. शमाची अशी प्रतिक्रिया अपेक्षितच होती तिला.. "तू म्हणतेस ते सगळं मान्य आहे गं.. पण सुटी काय मी आज नाही तर अजून २-३ वर्षांनी होईनच की.. ही काय कायमची फेज थोडीच आहे? आणि आपल्या स्वत:च्या मुलांसाठी कष्ट घेतले तर त्यात काय इतकं? वरूणसाठी पण चांगलच उलट लहान भावंडं असणं.. थोडे दिवस सुरुवातीचे होईल त्रास.. पण एकदा रूटीन सेट झालं की झालं!" "पण तुला बोर नाही होत का गं, सारखं तेच ते.. नॅपी, बेबी फ़ूड, मुलांचे आजार, त्यांच्या उचापती, त्यांचे tantrums .. आपणही काही करावं, नोकरी करावी, शॉपिंग करावं, मनाला येईल तेव्हा हिंडावं, फ़िरावं, काहीही खावं-प्यावं.. मुलं असल्यावर हे काहीच शक्य नाही होत.." "शॉपिंग, नोकरी, हिंडणं हेच आयुष्य आहे का शमा? या सगळ्याचा family नसेल तर काय उपयोग? आणि असही नाही की काहीच पाहिलं नाही.. अगं चिकार हिंडून झालं की आल्या आल्या इथे. आणि पुन्हा जाताही येईल. शॉपिंग, खाणं-पीणं चालू असतच.. ते काही जात नाही कुठे. एक मात्र आहे की मी नोकरी नाही करू शकणार.. सुदैवानी अशी परिस्थितीही नाही की मला नोकरी केलीच पाहिजे.. तसं असतं तर बाहेर पडलेच असते.. आणि नोकरी काय सुखाची असते का गं? त्या डेडलाईन्स, ते बॉसेसचे टोमणे ऐकणं चुकतं का कोणाला? बाहेर बोलणी खाण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या घरासाठी करणं कधीही prefer करीन मी.. त्या छोट्या बाळाचे आवाज, त्याच्या activities , त्याचं हळुहळू मोठं होणं, संदीप, वरूण यांना होणारा आनंद.. तुला माहिते, पुरुष जरा घाबरतात आधी बाळांना, पण नंतर ते इतके involve होतात सगळ्यात की बास.. तीही एक वेगळीच गम्मत असते गं.. संदीप तर वरूणचं सगळं करायचा वरूण तान्हा असताना.. हे bonding जसं होतं ना, याचं मोल कशालाच नाही.. आम्हाला नेहेमीच चौकोनी कुटुंब हवं होतं.. वरूणच्या तब्येतीची चिंता आहे, पण तेही होईलच कमी आता.. असं वाटतय की everything is falling in place !" शमा अनिताचं ऐकून एकदम विचारमग्न झाली.. ती जे बोलत होती त्यात तथ्य वाटायला लागलं तिला.. खरच मूल असणं, त्याला मोठं करणं इतका गहन प्रश्न होता का? निदान तिला वाटत होता तितका गहन? "शमा, अर्थातच प्रत्येक जोडप्याचा फ़ारच वैयक्तिक निर्णय आहे हा.. पण अगदी seriously विचारते.. तुला काही प्रॉब्लेम का? कारण तुम्ही मुलाचा विषय टाळता हे जाणवलं आहे. तुला याबद्दल काही mental block असेल तर काढून टाक प्लीज.. तू अभिशी, माझ्याशी, अजून कोणा मैत्रिणीशी, किंवा चक्क therapist शी बोल.. मूल झालं की सगळं संपलं, स्वातंत्र्य गेलं, career ची वाट लागली.. असे काही विचार मनात आणू नकोस.. अभिची भक्कम साथ आहे, day care आहेत, work from home आहे.. सगळ्या सोयी आहेत, वाटलंच तर तुझे-त्याचे आई-बाबा मदत करतील.. पण ही नैसर्गिक उर्मी कोणत्याही भितीमुळे, गैरसमजुतीमुळे दाबू नकोस.. मूल हे 'बंधन' नाही गं, 'बंध' आहे family चा.. you really don't know what you are missing! " "बघ, पुन्हा नाही म्हणता म्हणता तुला उपदेश केलाच मी. सॉरी.. पण राहवले नाही गं. थांब मी काहीतरी खायला आणते.. हं, strawberries आहेत, मिल्कशेक करते पटकन" "अं? नाही, अगं सॉरी काय म्हणतेस? तू काय मुद्दाम म्हणाली नाहीस. असूदे. तू बस, आराम कर, मी करते मिल्कशेक.." "चालेल.." बाकी गप्पा मारून शमा ३-४ तासानीच घरी परतली.. अभि काहीतरी वाचत होता. संध्याकाळी थोडं शॉपींग, बाहेरच जेवण आणि नाईट शो असा भरगच्च प्रोग्राम ठरला होता त्यांचा.. "काय गं, बर्याच गप्पा झालेल्या दिसतात.. माझी एक अख्खी झोप झाली, चहा झाला आणि हे पुस्तकही बरच झालं तरी तू अनिताकडेच! काय गप्पा मारत होतात इतक्या?" अभिनी चिडवलं.. "अभि, अनिता-संदीप are expecting again! " "काय? सहीच. आहे का घरी दीप्या? फोन लावतो, पार्टी मागीतलीस की नाही?" "तुला धक्का नाही बसला?" "त्यात धक्का बसण्यासारखं काय आहे? आपण मुलाशिवाय आहोत म्हणजे लोकांना मुलं होऊ नयेत की काय?" अभि अजूनही मस्करीच्याच मूड मधे होता.. यावर अभिला अपेक्षित होतं की शमा चिडेल, पुन्हा 'तोच विषय काढलास का' म्हणेल.. पण तसं काहीच झालं नाही.. "अभि, मी एकदम पळपुटी, आलेला प्रॉब्लेम फ़ेस करू न शकणारी आहे का रे?" "अं? हे काय अचानक? तुला कोण पळपुटी म्हणलं? म्हणावं घरी या, नवर्याला कशी सळो की पळो करून सोडते पहा!" "अभि प्लीज! जरा serious होशील?" "बरंबरं, बोल.." अभिनी शमाच्या समोर बसला.. "अनितानी डोस पाजलेला दिसतोय" "हं! डोस खरा.. मला विचारात तरी नक्कीच पाडलं तिने!" "काय झालं? नीट सांगशील का सगळं?" "तेच रे. तिने मुलांकडे पहायाचा तिचा viewpoint सांगितला.. अभि खरच जबाबदारी टाळतीये का मी? का घाबरतीये कोणास ठाऊक? ते मूल इतकं छोटं.. त्याचं जमेल ना आपल्याला नीट, ते अव्यंग असेल ना? तुला माहित आहे ना ताईला पहिला मुलगा झाला होता, त्याच्या heart मधे जन्मत:च problem होता.. मी खूप लहान होते तेव्हा नक्की कशानी ते झालं समजायला, पण ते बाळ बिचारं गेलं रे १० दिवसाताच! खूप औषधपाणी केलं, incubator मधे ठेवलं, तरीपण कशाचाच फ़रक नाही पडला.. मी तर ते विसरूच नाही शकणार कधी.. मग तो एक mental block आल्यासारखा झालाय.. आपल्या बाळाचं असंच काही झालं तर? ते आजारी पडलं आणि आपण नीट व्यवस्थित औषधपाणी करू शकू शकलो नाही त्याचं तर? आणि ते मूल मोठं झाल्यावर काय करेल कोणास ठाऊक? आपणही आईवडील म्हणून आपण आपली कर्तव्य पार पाडू शकू ना? त्याला शिकवू शकू ना नीट, मोठं झाल्यावर त्याने काही भलतंसलतं केलं तर.. ती शैलाकाकूच्या शेजारी राहणारी निशा पळून गेली होती, माहिते? बापरे! किंवा तो वाईट संगतीला लागला तर? नीट शिकलाच नाही तर? किती मोठी हार असेल ती आपली? सगळंच किती अनिश्चित आहे.. मग practical विचार केला तर वाटतं कशाला त्यात पडायचं? नसेलच तर हे सगळे प्रश्नच नाहित! आपण दोघं एकमेकांना आहोत.. पण हा पळपुटेपणा आहे का? आपण काही गमावतोय का? तो लहान मुलाचा निरागसपणा, तो आपलं करत असलेलं अनुकरण, त्याला मोठ होताना बघणं, ते आईपण, ते बाबापण.. हे खरच miss करतोय आपण? त्याचं महत्त्व आहे का इतकं? बापरे, I am so confused! " "ओ! आता समजलं! confused is the word! या छोट्या डोक्यात किती प्रश्न! आणि तेही किती गहन, जड वगैरे! बापरे! शमा, तू इतक्या ठाम विचारांची, खंबीर मुलगी आणि इतके negative विचार तुझ्या मनात? आधी बाहेर काढ ते! राणी कशावरून हे असच मूल होईल आपलं? तू, तुझी पूर्ण family चांगली आहे, आमच्याकडेही आम्ही सगळे नॉर्मलच आहोत, मग आपल्यला छान, नॉर्मल, चारचौघांसारखं मूल नाही होणार का? आणि आपण USA त आहोत. medical science किती पुढे गेलय..एखादा अपवाद असायचाच.. तो असतोही सगळीकडेच.. आणि दुर्दैवानी, अगदी दुर्दैवानी काही ठीक नसेल ते, तर आपण त्याला सोडून, टाकून देणारोत का लगेच? comeon , ते आपल्या रक्तामासाचं असेल, आपलं असेल.. कसही असलं तरी.. आपण त्याला शिकवणार, मोठं करणार, संस्कार करणार, मग ते वाईट मार्गाला कसं लागेल? think positive my dear! आपण दोघे एकमेकांसोबत असूच ना कायम, आणि आपलं बाळही मस्त मोठं होईल, आपल्याला त्याचा अभिमान वाटेल असं!" " God knows शमा.. इतका विचार सर्व आई-बाप करत असते तर कसले फ़ंडू झालो असतो आपण सगळे!! बरं, jokes apart , माझं मत अगदी simple आहे. मूल ही प्रत्येक सुखी जोडप्याची मानसिक आणि भावनिक गरज आहे. तो त्या 'दोघांचाही' आहे. त्याला मोठं करणं ही जबाबदारी आहे, adjustment तर नक्कीच आहे, पण एक अशी adjustment जी हवीहवीशी आहे. आता तो मोठा होऊन काय करेल या विचारानी आत्ता डोकं शिणवणं बरोबर आहे का राणी? खरच वेडी म्हणू की खुळी तुला?" अभि थांबला बोलायचा. शमाही. थोडा वेळ दोघेही शांत राहिले. अभि वाट पहात होता शमाच्या प्रतिक्रियेची.. तिच्या मनातली भिती तिने बोलून दाखवली होती. ओह! किती अनाठायी भिती बाळगून होती ती.. ह्यावर ते आधीच बोलले असते तर.. पण तशी वेळच आली नव्हती.. अनिताचे आभारच मानले पाहिजेत असा विचार आला अभिच्या मनात.. "अभि, मी जसा जसा विचार करत आहे तसं मला वाटतय की 'हो की. इतका बाऊ करण्याइतकं काय आहे?' कदाचित मी उगाचच घाबरत आहे." "तेच तर darling ! हुश्श्श. चला, थोडा तरी प्रकाश पडला म्हणायचा.. so, you are convinced now, right? तुला माहिते ना 'अतिविचार कार्यनाशक असतो'! चलाऽऽऽ, आपण शॉपिंगला टांग मारू! वीकेंड सत्कारणी लावू, काय?" अभिने डोळे मिचकावले.. "अभिऽऽऽऽ! तू ना.. तुला कारणच पुरतं! मी विचार करीन म्हणले कळलं? शॉपिंग कॅन्सल वगैरे करत नाहियोत आपण, ओके? जा आवर तुझं!" "ए नको ना! काय बोर ते शॉपींग! त्यापेक्षा मी काय म्हणतो.." बोलता बोलता अभि शमाच्या जवळ आला.. "अभि! अशक्य आहेस तू! you are too sweet! I am lucky , मला तू मिळालास!" शमाला मनापासून हसू आलं. ती अभिच्या मिठीत शिरली होती.. मनातली भिती थोऽऽऽडीशी लांब गेली होती आणि positive thinking सुरू झालं होतं!.. समाप्त.
|
Daad
| |
| Monday, April 23, 2007 - 8:08 am: |
|
|
पूनम एकटाकी मस्त मस्त लिहिलियेस. (माझा आवडता विषय आहे हा.) नोकरी करणारी, तरूण जोडपी, त्यांच्या priorities , confusions सगळं किती सुंदर शब्दात मांडलयस. व्वा! "मूल ही प्रत्येक सुखी जोडप्याची मानसिक आणि भावनिक गरज आहे." किती खरय. माझ्या ओळखीचा एक अतिशय प्रतिथयश कलाकार आहे. त्याला विचारलं तुझी सगळ्यात आवडती मैफिल कोणती रे? तर "लेकाबरोबर attend केलेला त्याच्या शाळेचा कार्यक्रम"! एक मूल "उत्तम माणूस" बनवण्यासाठी काय काय करावं लागेल ह्याचा मागमूसही नसतो नव्या आईवडिलांना तरीही किती छान छान माणसं दिसतात नाही अवतीभवती! त्यांच्या आई-वडीलांना hats off !! मस्तच लिहिलयस!
|
Rajya
| |
| Monday, April 23, 2007 - 8:39 am: |
|
|
पूनम, छान विषय निवडलास, त्याला न्यायपण चांगला दिलास. दाद, "लेकाबरोबर अटेंड केलेला त्याच्या शाळेचा कार्यक्रम"! तुझी प्रतिक्रिया आवडली गं. डोळ्याच्या कडा ओलावल्या.
|
Meggi
| |
| Monday, April 23, 2007 - 9:23 am: |
|
|
मूल हे 'बंधन' नाही गं, 'बंध' आहे family चा >>एकदम उच्च...
|
R_joshi
| |
| Monday, April 23, 2007 - 10:18 am: |
|
|
पुनम नेहमीप्रमाणेच छान कथा लिहिलिस. विषयही छान निवडलास
|
Maasture
| |
| Monday, April 23, 2007 - 11:40 am: |
|
|
लांबीमुळे रटाळ झाली. फार वचावचा संवादामुळे शब्दबंबाळ किंवा संवादबंबाळ वाटली. एकंदर विषय व परिणामकारकता या दोन्ही दृष्टीने एकदम सपक वाटली ही गोष्ट. जनरली भसाभसा खूप लिहिण्यापेक्षा क्वालिटीवर लक्ष देण्याचा जास्त फायदा होतो असा अनुभव आहे. चु. भु. दे. घे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
|
पूनम, विषय छान आहे. मला आवडला..
|
Rajankul
| |
| Monday, April 23, 2007 - 12:32 pm: |
|
|
जनरली भसाभसा खूप लिहिण्यापेक्षा क्वालिटीवर लक्ष देण्याचा जास्त फायदा होतो असा अनुभव आहे. चु. भु. दे. घे
|
Abhi_
| |
| Monday, April 23, 2007 - 5:01 pm: |
|
|
पूनम, नेहमीप्रमाणेच सुंदर!! ..
|
Supermom
| |
| Monday, April 23, 2007 - 5:51 pm: |
|
|
पूनम, खूपच मस्त ग. एकदम आवडली.
|
Chaffa
| |
| Monday, April 23, 2007 - 6:08 pm: |
|
|
पुनम, बरेच दिवसांनी लिहिलेस आणी ते ही खुप छान.
|
Disha013
| |
| Monday, April 23, 2007 - 6:55 pm: |
|
|
पूनम नेहमीसारखी छान! समर्पक नाव आणि happy ending !
|
Disha013
| |
| Monday, April 23, 2007 - 6:55 pm: |
|
|
पूनम नेहमीसारखी छान! समर्पक नाव आणि happy ending !
|
Antara
| |
| Monday, April 23, 2007 - 7:13 pm: |
|
|
मूल ही प्रत्येक सुखी जोडप्याची मानसिक आणि भावनिक गरज आहे.>>म्हनजे प्रत्येक जोडप्याला मूल होणे हेच कसे योग्य, 'मला मूल नकोय' हा निरणय चूकच असाच संदेश जातोय या गोश्टीतून, हाच एक Mental block नाही का वाटत!
|
Yog
| |
| Tuesday, April 24, 2007 - 3:29 am: |
|
|
मस्त लिहीली आहे, अगदी सरळ साधी घडते तशी, प्रामाणिक. म्हणून अधिक आवडली. उगाच ढसाढसा रडवणार्या किव्वा twist बम्बाळ कथान्पेक्षा खूपच चान्गली..
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 24, 2007 - 9:37 am: |
|
|
psg , ही कथा तुमच्या इतर कथांसारखीच अगदी साधारण, शब्दबंबाळ, उत्तम कथाबीज, पण अतिसामान्य हाताळणी असलेली वाटली. हा अतिशय संवेदनशील विषय फारच वरवर हातळाला आहे (असे मला वाटते). दर कथेगणिक दर्जा वाढावा (किमान एका ठराविक पातळीपर्यंत पोचेपर्यंत) अशी साधारण अपेक्षा असते. पण आपली ही कथा मागच्या कथेपेक्षाही सुमार वाटली...
|
Devdattag
| |
| Tuesday, April 24, 2007 - 10:06 am: |
|
|
आक्च्छी.. पूनम हे तुझ्यासाठी नाही.. तुझी कथा उत्तमच आहे..
|
मला वर अंतरने लिहीलेला मुद्दा पटला. >> मूल ही प्रत्येक सुखी जोडप्याची मानसिक आणि भावनिक गरज आहे वैयक्तिकरित्या माझी होती. पण प्रत्येक जोडप्याची वा व्यक्तीची असेलच ( नव्हे, असायलाच हवी, नसण्यात काहीतरी अनैसर्गिक आहे-) असं म्हणणं मला धाडसाचं वाटतं. " मनाविरुद्ध किंवा फारसं उत्सुक नसताना लग्न वा मूल झाल्यामुळे त्याकडे कळत नकळत दुर्लक्ष केलं गेलं" यापेक्षा " तो माझा cup of tea नव्हता हे ओळखून त्या वाटेलाच गेलं नाही" हे जास्त समजूतदारपणाचं असू शकतं एखाद्याच्या बाबतीत. या कथेतल्या शमासारखी त्यामागे केवळ commitment ची भीतीच असेल असं नाही. अर्थात, पूनमच्या कथा सहसा कुठलाही ' संदेश' वगैरे देण्याइतक्या judgemental नसतात, जे मला आवडतं. ' एका घरात ना, हे असं असं घडलं' इतकं सांगून ती ( वेळीच) थांबते. पुढे वाचक विचारात पडतो हे कथेचं यश.
|
Milindaa
| |
| Tuesday, April 24, 2007 - 2:43 pm: |
|
|
मला वर अंतरने लिहीलेला मुद्दा पटला. <<< यात 'तो' अंतर नसून 'ती' अंतरा आहे असं तुला सांगायला लागावं? तुझं बारसं करु का?
|
नीट बघ. ती ' अंतरा' नाहीये. अंतरकर आहे. आणि मी ' तो' अंतर कुठे म्हटलंय? आणि आता तुझ्या अंतर-आत्म्याला स्मरून सांग बारसं कोणाचं करायला हवं आहे.
|
|
|