|
नंदिनी, तुझी कथाकथनाची शैली सुंदर आहे. पण शेवट वाचून मी जरा confuse झाले. एकीकडे सावरी म्हणते की पण स्त्रीला शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नसतात. आणि मग शरीराचं नातंच भावनिक होऊन जातं. आणि दुसरीकडे अभिजीतच्या हेतूविषयी शंका, नव्हे खात्रीच असतानासुद्धा ती त्याच्याशी संबंधही ठेवते? इतकी जर ती काटेकोर विचार करू शकत होती तर हे तिने त्याला आधीच का सांगितल नाही, की ' बाबा रे, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. तू केवळ माझी शारिरिक गरज भागवण्यापुरता आहेस. तूही माझ्याकडून त्याउप्पर काही अपेक्षा न ठेवल्यास तर बरं.' शिवाय कथेत आधी वारंवार पण माझं हे स्वरूप माझ्या सासरी किंवा माहेरी समजले तर काय होईल.. विचारानेच माझा थरकाप उडायचा. , तसंच अभिजीत तिच्या घरी ( तिच्या अपरोक्ष) भेटून आल्यावर तिच्या सासूबाईंचा तिला ' आम्हाला का गं सांगितलं नाहीस? चांगला आहे की मुलगा' असा फोन असे उल्लेख आले आहेत. आणि आता ती म्हणते की सासूबाईंना आधीच कल्पना दिली होती? माझी काही गफलत होत्ये का समजण्यात?
|
जम्या नही नंदु! अपनेको जो अपेक्षा था उसक भंग हुआ. लेखनशैली मात्र मस्तच आहे तुझी! keep it up
|
Yog
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:44 pm: |
| 
|
नन्दिनी, कथा सम्पवायची घाई केली बहुतेक.. सुरुवात चान्गली होती पण शेवटचे काही परिच्छेद हे मूळ कथाबीजाशी पूर्णपणे विसन्गत वाटले. सावरीची भूमिका पूर्णपणे confused वाटते. विशेषतः अशा विषयाच्या हाताळणीला matured treatment लागते जी इथे दिसत नाही, उरतात फ़क्त काही भावनिक हेलकावे तेही न भिडणारे, न पटणारे. असो. लेखनशैली चान्गली आहे, जरा बान्धणी, हाताळणी, content यावर अधिक लक्ष दिल तर अजून "सकस" कथा होईल यात शन्का नाही.
|
स्वाती आणि योग दोघांच्याही प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत पण त्या तशाच्या तशा स्वीकारल्या पाहिजेतच असे नाही. कदाचीत स्वाती यांना अपेक्षित आहे तशी विचारांची पारदर्शकता असेलच असे नाही. सध्या फक्त शारिरीक गरज पण जमलंच त्यातून प्रेम तर का नको असा पूर्णपणे स्वत:पुरता विचार सावरीने केला तर ते वास्तवाच्या जास्त जवळ जाणारे ठरू शकते. पण त्यानी दाखवलेल्या इतर तार्किक चुका योग्य आहेत. योग म्हणतात त्याप्रमाणे ती confused वाटते. पण तेही वास्तवाच्या जवळ जाणारे नाही का? प्रत्येक व्यक्तिरेखेने clairity दाखवलीच पाहिजे असे नाही. पण त्यांचा दुसरा मुद्दा मला जास्त योग्य वाटतो. अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा हाताळण्याचं धाडस केल्याबद्दल तुमन्चं अभिनंदन. पण ती हाताळणी जास्त योग्य रितीने करता आली असती. उदा. व्यक्तिरेखा confused असताना ती confused आहे हेच दाखवणे योग्य ठरले असते. तुमच्या हाताळणीतून मधूनच ती confused नाही असे सूचीत होते आहे.
|
Disha013
| |
| Wednesday, April 25, 2007 - 5:34 pm: |
| 
|
तुम्ही या सगळ्या क्रियेत अलिप्त राहू शकता. पण स्त्रीला शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नसतात. आणि मग शरीराचं नातंच भावनिक होऊन जातं>>>>> मग,सावरीला हे नातं भावनीक वाटत नसताना ती संबंध कशी ठेवु शकते? शेवट घाईतला वाटला. बाकी तुझी लिहिण्याची शैली मात्र जबरदस्त आहे!
|
Sakhi_d
| |
| Thursday, April 26, 2007 - 3:36 am: |
| 
|
नंदिनी तुझी लेखन शैली खुप छान आहे पण ही कथा तेवढी जमली नाही. शेवट खुप घाई घाईत केल्यासारखा वाटतो. स्वाती आणि योगला अनुमोदन...
|
Lampan
| |
| Thursday, April 26, 2007 - 6:54 am: |
| 
|
मला जे लिहायचं आहे ते आधीच सगळ्यानी लिहिलंय .. additionally त्यात ते मंगळी वगैरे अगदी " चार दिवस सासुचे " type वाटतंय ... शिकलेल्या लोकांना हे असं वाटतं हे अजिबात पटत नाही ... पण काय करणार कथा आहे , आता वाटलं त्या character ला मी कोण सांगणार ???
|
कथा आवडली. सुरुवातीचा भाग दोन तीन वेळा का लिहिला आहे? वर विचारलेल्या प्रश्नांबद्दल मला असे वाटले की आसावरी अभिजितशी शेवटी खोटे बोलली की तिने सासूबाईंना आधीच सांगितले आहे. अभिजित तिची शारिरीक गरज पूर्ण करतो आहे, पण मनाने ती त्याच्या प्रेमात नाही हे तिला माहित आहे. तिला न विचारता तो लग्नाची गडबड सुरू करतो त्यावरून शिवाय पिंकीच्या एखाद्या कॉमेंटवरून तिला त्याच्या खर्या उद्देश्याचा संशय येतो आणि ती निर्णय घेते अशी ही गोष्ट मला वाटली. एकातून दुसर्या प्रेमात पड्ण्याच्या कथा नेहमीच असतात. डोळसपणे आपल्या नात्याचे परीक्षण करणार्या व्यक्तिरेखेचे कौतुक वाटले.
|
Savani
| |
| Thursday, April 26, 2007 - 4:35 pm: |
| 
|
नंदिनी, कथा छानच लिहितेस तू. पण ह्या वेळचा शेवट थोडा संभ्रमात टाकणारा वाटला. कधीच मन अचानक उडी घ्यायचं... जर अभिजीतने मला लग्नासाठी विचारलं तर.. काय उत्तर देईन? त्याचा पत्रिकेवर विश्वास नव्हता. पण माझा होता. पुन्हा असं काही झालं तर.... कदाचित असे असेल का की सावरीचा सुद्धा अभिजितवर जीव जडला असेल पण तिच्या समजाप्रमाणे पत्रिकेतील मंगळामुळे तिने आधीचा अभिजित गमावला असल्याने तिला पुन्हा विषाची परिक्षा पाह्यची नसेल आणि म्हणुन तिने अभिजितला आपल्यापासुन दुर केले. लंपन, तुमचे म्हणणे बरोबर आहे की शिकलेल्या मुलिकडून मंगळ वगैरे पटत नाही. पण सावरीचे वय लहान आहे आणि त्या वयात कोसळलेल्या दु:खामुळे ती असा विचार करत असेल असं वाटतं.
|
भास्कर, तुमचं लॉजिक पटतंय. धन्यवाद.
|
Mansmi18
| |
| Wednesday, May 09, 2007 - 3:27 pm: |
| 
|
नमस्कार मला कथा वाचुन काही प्रश्न पडले आहेत. १. आसावरीने अभिजीतला काही सन्केत(सिग्नल) दिले होते.(काही सन्वादमधे ते आले आहे मन्गळी वगैरे वगैरे). मग जर त्या अभिजितने प्रपोज़ केले तर त्यात काय चुकले? २. जर तो तिला वापरत होता तर त्याने काही कारण काढुन पळ काढला असता. ज्याअर्थी त्याने प्रपोज़ केले त्याअर्थी तो सिरिअस होता. मग त्याचा मुखवटा कोणता? (कोणीतरी पोस्ट केल्याप्रमाणे जर तिने त्याच्या प्रेमापोटी त्याला झिडकारले असेल तर ते बरोबर पण जर ते कारण नसेल तर वरचे दोन मुद्दे मला कळलेपटले नाहीत) मला शेवट वाचुन "सेक्स आन्ड सिटी" मधल्या पात्रान्ची आठवण झाली. त्यात नायिका आधी जवळीक करतात आणि मग जेव्हा त्याना ती व्यक्ती जवळ येते(किन्वा प्राप्त होते) तेव्हा काही कारण काढुन पळ काढतात. मी एक सामान्य वाचक आहे हो. चु भु द्या घ्या.
|
|
|