|
Imtushar
| |
| Tuesday, April 03, 2007 - 10:53 am: |
|
|
>> अशा वेळेस खरोखरच घरात लिम्बु मिरची टान्गुन ठेवावि लिम्ब्या, मिरचीला घेउन जा मनुस्विनीच्या घरी... आणि घे टांगून :-)
|
सुपर मॉम, पहिल्यांदा माझ्या अशा गोश्टींवर विश्वास नव्हता. पण काही असे अनुभव आले त्यामुळे मी पण या गोष्टींवर विश्वास ठेवु लागलए आहे... आमच्या बाजुला(माहेरि) एक काकु आहेत,त्यांनी जर का तुम्हाला ,"कुठे जाताय?" म्हणुन विचारले तर तुमच काम कधीच होणार नाहि. त्यांना खुप वाईट सवय आहे सगळ्या गोष्टीत नाक खुपसायची आणि त्यांनी टोकलेल्या प्रत्येक गोष्टींत काहितरि बिनसणारच...
|
Saee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:51 am: |
|
|
त्या चांभार चौकशा करतात तर त्यांना प्रश्न विचारू नका असं स्पष्टपणे सांगता येत नाही का? नाहीतरी त्यांच्याशी चांगले संबंध असतील असं दिसत नाहीच, मग दुखावले जाण्याचा प्रश्नही येत नाही. म्हणजे आपल्यालाही टोचणी लागणार नाही. कुणीतरी बोलल्याशिवाय ही वाईट खोड जाणार नाही आणि एकाच्या सांगण्याने आजुबाजूच्या सगळ्यांचीच अडचण संपेल. की हे इतकं सोप्पं नाही?
|
Mrinmayee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:05 pm: |
|
|
'अजून एक लगीन करून टाका. व्हईल पोरगं....' आईने आतमधे गाळणी खाड खाड वाजवून आपला राग व्यक्त केला. छान लिहिलंयस! भोचक-खोचकपणावर हमखास इलाज.. दुर्लक्ष??
|
Milindaa
| |
| Thursday, April 05, 2007 - 9:39 am: |
|
|
Swasti, LOL अशक्य उत्तरं देते आहे ती
|
Supermom
| |
| Thursday, April 05, 2007 - 2:23 pm: |
|
|
खोचक लोक हे भोचकपेक्षाही वाईट असे माझे मत आहे. भोचक लोक हे कधीकधी निरागसपणे प्रश्न विचारून जातात. त्यांच्या डोक्यात दुसर्याला दुखावण्याचा हेतू असेलच असे नाही. पण खोचक लोकांचा हेतूच मुळी लोकांच्या मनाला त्रास देणे हा असतो. खवचट हे या लोकांचे दुसरे नामाभिधान.दुसर्याला बारीक चिमटे काढणारे शब्द वापरणे यात या प्रकारच्या लोकांना कसला आनंद मिळतो तेच जाणे. आमच्या बाजूला रहाणार्या एका काकूंना आमच्या घरात कुठलीही नवी वस्तू आली की 'सेलमधे घेतली वाटतं?' असे विचारायची वाईट्ट खोड होती. अन हा प्रश्न विचारताना त्यांच्या चेहर्यावर इतका आढ्यतेचा भाव असे की मला त्यांच्याची बोलावसेही वाटत नसे. खोचकपणाचा एक विलक्षण नमुना मी लहानपणी बघितलेला आहे. नागपूरला असताना आम्ही आईबाबांबरोबर एकदा बाजारात गेलो होतो. तिथे आम्हाला एक मामा नावाचे गृहस्थ भेटले. हे मामा बोलायला अतिशय भोचक, खोचक सारेकाही. या कीर्तीमुळे त्यांच्याशी कोणी विशेष बोलतही नसे. बाबा जवळच दुकानात गेलेले. आई आम्हाला घेऊन उभी होती. तेवढ्यात मामांचे आगमन झाले. वय सत्तरीच्या पुढे, हातात काठी अन तोंडात तंबाखूचा तोबरा. 'काय, सार्या मुलीच वाटतं?' मामांचा भोचक प्रश्न. आईने नुसतेच स्मित केले. 'काही कामाच्या नाहीत म्हणजे. विकून टाका चार पैशात...' कमालीच्या खवचट आवाजात मामा म्हणाले. हे अत्यंत मूर्खपणाचे उद्गार काढायची मामांना मुळीच गरज नव्हती. पण मामाच ते. मी लहान असल्याने मला या संवादाचा अर्थ कळण्याचे माझे वय नव्हतेच. पण आईचा लाल झालेला चेहरा अन त्यावर तिने शांतपणे विचारलेला प्रश्न अजूनही आठवतो, 'मामा, तुमची आई केवढ्याला विकली होती हो?' यानंतर आईबाबा दिसले तरी मामा रस्ता बदलत असे.
|
सुमॉ, तुमची आई म्हणजे ग्रेटच हं! बरोबर आहे, अश्या माणसांना अशीच उत्तरं द्यायला हवीत. त्याच्याशिवाय समाजातली "ही कीड" बाहेर निघणार नाही. थोडे विषयांतर होईल, पण राहवत नाही म्हणून सांगते माझ्या आई-वडीलांना पण आम्ही दोघीच मुली. आम्ही दर गणपतीला गावी जायचो, तेव्हा आरती झाल्यानंतर आईला, बाबांच्या एक मामी होत्या, हमखास आशिर्वाद द्यायच्या "पुढल्या वर्षी येताना मुलाला घेऊन या बरोबर" त्यांना स्वत:ला दोन मुली आणि एक मुलगा होता. नंतर थोड्या वर्षांनी कळले, की त्यांच्या मुलाने त्यांना खूप त्रास दिला. अक्षरश्: त्याने त्याच्या आई- वडीलांना "चप्पल" फ़ेकुन मारलेली म्हणे........
|
Disha013
| |
| Thursday, April 05, 2007 - 4:40 pm: |
|
|
सुमाॅ, चांगला ठोसा लगावला की तुमच्या आईने! अशा लोकांना की नै अशीच भाषा समजते. ऐन वेळी सुचले पण पाहीजे बिनतोड जवाब.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:29 pm: |
|
|
सुपरमॉम, आईना सलाम. त्याना लिहायचा आग्रह करा, अशी विनंति मी त्यांच्याच एका कर्तृत्ववान लेकीला केली होती.
|
Zakasrao
| |
| Friday, April 06, 2007 - 4:17 am: |
|
|
सुमॉ. ही अशी जिरवायला लागते अशा लोकांची. असे अनेक लोक असतात आपल्या आयुष्यात नाही म्हणले तरी थोडाफ़ार मनस्ताप देवुन जातात. उत्तर मात्र सुचायला पाहिजे.
|
Meghdhara
| |
| Saturday, April 07, 2007 - 4:35 pm: |
|
|
व्वा! सुपरमॉम आईने मस्तच विचारले.. अशांना हीच भाषा कळते. भोचकपणात, भोचकपणाच असतो भाबडेपणापेक्षा. जाम राग येतो अशांचा. बरेचदा तेव्हाच्या तेव्हा काही बोलता येत नाही. नी नंतर आपली चिडचिड होत रहाते. खोचकपणा करून तर आनंद मिळतो कित्येकांना. आणि जितके लागेल असं बोललं तितकं त्यांना जिंकल्यासारखं वाटतं. प्रथमेश, माझा मोठा मुलगा, लहान असताना म्हणजे अगदी काही महिन्याचा असताना.. बर्याचदा त्याला घेऊनच इस्त्रीचे कपडे द्यायला, कचरा टाकायला.. छोटी मोठी वस्तू आणायला जाताना त्याला घेऊन जात असे.. बिल्डिंगच्या खालीच एक वयस्कं बाई रहायच्या. दरवेळी भेटल्या की म्हणायच्या 'कशाला त्याचे हाल करतेस'. त्यांचं वय पाहून काही दिवस अगदी सहज सांगायचे "हो हो! घरी नाहीयेना कोणी.. वैगेरे.." एक दिवशी त्यांनी कहरच केला अशीच कुठेतरी चालले होते.. म्हणाल्या..'काय गं.. पडेल पिडेल एखाद दिवशी..' माझा इतका संताप झाला. म्हणाले 'काकू तुमच्याकडे ठेवून जात जाऊ का? रोज बघत जा दोन तास.' पुन्हा कधी काही बोलल्या नाहीत कधी. आणि भाबडेपणा असेल ना तर कळतो चेहर्यावरून.. असो. खोचकपणाचे तर इतके तीर खाल्लेत की आता वाटतं त्याने थोडसं फटकळ व्हायला झालय की काय? मेघा
|
Zakki
| |
| Sunday, April 08, 2007 - 1:27 pm: |
|
|
थोडसं फटकळ व्हायला झालय दुर्दैवाने जे असा भोचक, खोचकपणा करण्यात आनंद मानतात, हुषारी समजतात, तेच लोक त्यांच्याबद्दल काही भोचक, खोचक किंवा फटकळ म्हंटले तर त्यांना जाम राग येतो, त्यांना दुसर्याची हुषारी दिसत नाही. ते सर्वांना सांगत सुटतात, तो ना जाम उद्धट, वेडेवाकडे बोलणारा, अपमान करणारा आहे, त्याला कुठे काय बोलायचे कळत नाही! दुसर्याची खरी खोटी टिंगल करणारे लोकहि तसेच. त्यांना पण आपण त्यांची टिंगल केलेली आवडत नाही. असे हे जग!
|
बाप रे! झक्की काय संबंध? मेघा
|
Mahesh
| |
| Monday, April 09, 2007 - 8:05 am: |
|
|
अशा लोकांना जर त्यांच्यासारखे उलट काही बोलायला गेले तर लगेच सगळीकडे बदनामी करत फिरतात. एक तर सरळ स्वभावाच्या लोकांना असे उलट उत्तर देणे सुचत नाही, सुचले तरी असे फटकन बोललो तर समोरच्याला काय वाटेल ही भीड असते. यावर होता होईल तो अशा लोकांना टाळणे हाच उपाय असावा. या बोर्डची जागा चुकली असे वाटत आहे.
|
Srk
| |
| Monday, April 09, 2007 - 9:27 am: |
|
|
मला वाटतं हे 'माझा अनुभव' मध्ये टाकावं. सुपरमॉम, स्वस्ति तुमच्या अनुक्रमे आईचं, मैत्रिणीचं उत्तर जबरदस्त! अश्या तापदायक लोकाना अशीच उत्तरं द्यायला हवीत. सहज बोलता बोलता समोरच्याला दुखवावं असं या लोकाना का वाटतं? दुसरा दुखावला गेला की यांच्या मनाला बोचत नाही? काही वेळा स्वतचा राग येतो कि ऐनवळी काही उलट उत्तर का सुचत नाही? पण सुचलं तरी 'मी उगीच असं बोलले' असं ४ दिवस वाटत रहाण्यापेक्षा 'स्वभावच तसा आहे. गेली ले ला उडत' म्हणणं बरं. काहीवेळा मात्र नेहमीच्या आगाऊ लोकांच्या प्रतिक्रियेचा आगाऊ अंदाज घेउन खमंग उत्तर तयार ठेवते.
|
स्वस्ति >> अशा लोकांना जर त्यांच्यासारखे उलट काही बोलायला गेले तर लगेच सगळीकडे बदनामी करत फिरतात. महेश यावर उत्तम उपाय म्हणजे आपण असं त्याला बोललोय असं आपणच सांगत सुटायचं. बहुतेक लोकांना स्वतःला अशा माणसांचा त्रास झालेला असतोच. त्यामुळे तेही खूष होतात आणि इतर भो.खो.बा पण ही कीर्ती ऐकून आपल्यापासून लांब रहातात. दोस्तोंका दोस्त दुश्मनोका दुश्मन सारखं भोचकांसाठी भोचक खो. साठी खो. आणि वेचकांसाठी वेचक
|
|
|