|
Mbhure
| |
| Thursday, September 28, 2006 - 7:15 pm: |
| 
|
मला आईला आणताना आणि नेताना एअर इंदिया शिवाय पर्याच नसतो कारण ते Non-Stop (Technical Stop @ Frankfurt) असते. पुर्वी मी एअर इंडियाने यायचो पण आताश्या विमान फारच गलिच्छ असते. सीट समोरचे ट्रेही काळे डागाळलेले असतात. तुटलेले पॅनेलस्, काही भागातील सेंट्रल लाईटिंग नसणे, अर्ध्या फ्लाईटला करमणुक (?) बंद ठेवणे; एक ना दोन. संपदा तुझी आई २ सप्टेंबरला आली का? त्या फ्लाईटला मी होतो. चेकिंगपासुन कहर होता. न्युयॉर्क आणि शिकागो फ्लाईट अर्ध्या तासाच्या अंतराने सुटणार होत्या. परत युनिव्हर्सिटीची फॉल सेशन चालू होणार होती (हे भारतात बसलेल्या एजंटला पण माहित असते पण एअर इंडिया...) त्यामुळे तोबा गर्दी होती. पण सर्वांसाठी फक्त तीन ते चार काऊण्टर उघडले होते. हीऽऽऽ लाईन. त्यातच आपले भारतिय लोडरला पैसे देऊन पुढे जाऊन चेकिंग करत होते. तीन तास आधी चेकिंग केरुन आम्हाला तीन वेगळ्या सीट. मुलगी असल्याने Request केल्यावर दोन एकत्र दिल्या. सातच्या फ्लाईटला चार वाजता चेकिंग केले तेंव्हा तीनशे सीट आधीच भरल्याचे ऐकवले गेले. कश्या एअर इण्डियावालेच जाणॉ. सिक्युरीटी चेक नंतर वाट बघत बसलो तोच एअर इंडियाने सातचे विमान, टेकनिकल फॉल्टमुळे, २ तास लेट म्हणजे ९ वा सुटेल म्हणुन सांगितले. डोळ्यावर झोप होती त्यामुळे जरा डुलकी लागली. जाग आली तेंव्हा ऐकू आले की विमान १० वा सुटणार आहे. ते दहा रात्रीचे आहे हे कळल्यावर झोपच उडाली. मग नेहमीचा गोंधळ. तरी त्यातल्या त्यात एका Lady Ground Staaff ने सर्वाना बर्यापैकी गाईड केले. तेथील काऊंटरवर सांगण्यात आले की प्रवाश्यांना ब्रेकफास्ट (काय हे सौजन्य) देण्यात येईल आणि नंतर त्यांची हॉटेलमध्ये सोय केली जाईल. सर्वाना पासपोर्ट काऊंटरवर जमा कराण्यास सांगितल्यावर प्रवाशांनी ते सांभाळून ठेवण्याची हमी मागितली तर गुळमुळीत उत्तरे देणे चालू. मी आणि बर्याचश्या मुंबईकरांनी घरी जाण्याचे नक्की केले. शेवटी एअर इण्डियाच्या स्टाफने घरी जाणार्यांचा, तसेच हॉटेलप्रमाणे ग्रुप केले. पासपोर्टला आणि Corrospondin Baording Pass ला एक अल्फा न्युमरिक नंबर दिला. घरी जाणार्यांचा ग्रुप घेऊन एक स्टाफ मेंबर टॅक्सीचे पैसे देण्यासाठी एका काऊंटरवर घेऊन गेला. कॅशियरचा पत्त नव्हता, त्यामुळे आणखी वाट न बघता आम्ही घरी गेलो. गौरी विसर्जनचा दिवस असल्याने, सं. ५ वा. फोन केला. बराच वेळ समजावल्यावर (सर्व ईतिहास सांगितल्यावर) विमान रविवारी पहाटे २वा सुटेल असे कळले. चेकिंग करायचे नसल्याने दोन तास आधी विमानतळावर हजर रहाण्यास सांगितले. एअर इंडियाचा अनुभव लक्षात घेऊन तीन तास आधीच गेलो. इमिग्रेशनला मोऽऽठ्ठी लाईन होती. आपल्याला हा त्रास नाही ह्या नादात डायरेक्ट इमिग्रेशनला जाताना सहप्रवासी त्याच रांगेत दिसले. चौकशी केल्यावर (आपली आपणच No Grond Staff for Info )कळले की ही फक्त AI 127 ची लाईन आहे. " कालपासून सर्व ठिकाणी रांगा लावून कंटाळा आला आहे आणि आता परत लाईन कशाला? चेकिंग सारखे काऊंटर उघडा " अशी ग्राऊंड स्टाफला विनंती केली तर तोच अंगावर आला. जायचे असेल तर ह्याच रांगेतून जावे लागेल, NRI शहाणे समजतात वगैरे मुक्ताफळे... एक काऊंटर आणि साडे तीनशे पासपोर्ट, स्टाफने बनवलेल्या लिस्टमध्ये प्रत्येक पास्स्पोर्ट तपासुन खात्री करुन द्यायचा आणि प्रवाशाला इमिग्रेशन थ्रु करायचे म्हणजे विमान त्यादिवशी सुटणे शक्यच नव्हते. आम्ही दोघातिघानी एअर इण्डियाच्या स्टाफला Alpha logical Group करुन Distribute करायला साम्गितले; मदतीचा हातही देऊ केला पण (काहीच कारण देता येत नसल्याने)"हे काम आता राष्त्रीय सिक्युरीटीचे आहे. त्यात आम्ही ढवळाढवळ करु शकत नाही. जादा काऊंटरही उघडणे एअरपोर्ट सिक्युरिटीकडे आहे ..." असे एअर इण्डियाने सांगून हात वर केले तर "आम्ही फक्त इमिग्रेशन पहातो काही तक्रार असेल तर एअर इंडियाला सांगा" हे इमिग्रेशनवाल्यांचे उत्तर. थोड्यावेळाने त्या सर्वांच्या लक्षात आल्यावर आणि ओरडाआरडा वाढू लागल्यावर आमची request मान्य झाली. मग एकजण A, B... ओरडत जायचा आणि एक झाला की दुसरा मग तिसरा असे ग्रुप येऊन शिस्तीत पासपोर्ट घेऊन इमिग्रेशन क्लियर करुन सिक्युरीटीला गेले. आम्ही तिघाचौघानी सर्वात शेवटी पासपोर्ट घेतले. हे सर्व अक्शरशः एका दिद तासात संपले.(पहाटेचे २ः३० वा. होते) सिक्युरिटीई चेक तर म्हणजे गोंधळ होता. AI 127 ची वेगळी लाईन आणि ४ - ५ वगळ्या एअर लाईल्सची वगळी पण गेट एकच. परत ग्राऊंड स्टाफला विनंत्या, परत तेच वसकन आंगावर येणे (We are trying to help you(?) don't shout हे प्रवाश्यांच्या अंगावर ओरडून सांगणे), तोबा गर्दी आणि गोंधळ, वेगळा सिक्युरिटी काऊंटर उघडायला विरोध (जो शेवटपर्यंत उघडला नाही, ८ पैकी ३ चालू होते)आणि परत स्वयंसेवा. शेवटी २वा. चे विमान ५ वा. सुटले. कुठेही पुढाकार घेऊन एअर इंडियाच्या स्टाफने मदत केली आहे, किंवा टेंशन Ease कर्तायचा पयत्न... असे कुठीही नाही. कदाचित विमानही आपल्यालाच उडवायला लागेल की काय असे वाटत होते. दुःखात सुख म्हणजे त्यातील एक दोन प्रवासी हे सुहानीच्या Catagory मधील होते.त्यामुळे ते तीन दिवस विमानतळावर होते त्यामानाने आम्ही घरी आराम तरी केला होता आणि अहो आश्चर्यम् म्हणजे विमान नवेकोरे होते. स्वच्छ सीट, ट्रे आणि Persoanl TV पण त्याची मजा अनुभवण्याची शक्तीच नव्हती. जेवणतर अतिशय कंडम होते. येता जाता स्वीट म्हणुन फिरणी होती. Stop Over ला ब्लँकेटही बदलत नाहीत. माझ्या सहप्रवाश्याने मागितले तर आहे तेच वापरण्याची आज्ञा झाली. कोणीतरी वरती चौकशी केली आहेः BEST IS १. Swiss पण सध्या USA वरुन फर महाग पडते. उत्तम जेवण, सौहदार्यपुर्ण सेवा, कुठलाही भेदभाव नाही. झुरिक ते मुंबई प्रवासात शेवटी छन गरम गरम (बाकी सर्व एअर लाईन्स थंड)सँडविध देतात + Icecream (हे थंडच चांगले). २. Singapore Airlines इंग्लडवाल्यांसाठी आता जेटचीही सेवा चालो झाली आहे आणि ती खुपच छन आहे असे ऐकिवात आहे.
|
Sunidhee
| |
| Thursday, September 28, 2006 - 8:45 pm: |
| 
|
एयर इन्डिया चांगले नाही हे ऐकले होते पन सुहानि आणि mbhure आणि इतरांचा अनुभव वाचुन इतके भयानक असेल असे वाटले नव्हते. वाईट वाटले.. कधी केला नाही पण आता तर मी अजिबात अगदी दुसरे तिकिट मिळत नसले तरी air india नि प्रवास करणार नाही बुवा.
|
Milindaa
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:21 pm: |
| 
|
जेट चा पहिला अनुभव चांगला होता, पण माझी तान्ही मुलगी आणि बायको आले तेव्हा फारसा चांगला अनुभव आला नही. ती जी हवाई सुंदरी होती तिला जन्माचा कंटाळा आल्यासारखी कामं करत होती आणि तिला १ - २ वेळा काहीतरी मागितले तर ते पण उपकार केल्यासारखे आणि खूप वेळाने मिळाले... त्यामुळे पुढच्या वेळी Virgin ने ज़ावं म्हणतोय.. swiss ने मी केलाय प्रवास, business आणि economy मधून. दोन्ही वेळा सर्व्हिस चांगली होती. तसा मला गल्फ एअर चा पण एकदम चांगला अनुभव आहे.
|
Suhani
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:33 pm: |
| 
|
mbhure अरे ही तू जी गोष्ट सांगता आहात, त्याच्याच दूसर्या दिवशी आमचे फ़्लाइट होते. ३ सप्टें ला. ते जे काही तुम्ही म्हणता आहात, ते तुम्हाला दिलेले बोर्डिंग पासेस आमच्या फ़्लाइटचे दिले असतील आणि आम्हाला थांबवलें.आणि आम्हला दूसर्या दिवशीच्या लोकांचे दिले. किती नालायक लोकं आहेत हे एअर इंडिया वाले. काय म्हणावं तरी काय यांना? कारण आपली झाली तीच गत ४ सप्टें लोकांची झालि असणार
|
Moodi
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:36 pm: |
| 
|
अगं सुहानी ते भुषण आहेत गं, त्यांचे प्रोफाईल बघ गं. त्यांना अगं नको म्हणुस, एडिट कर ते.
|
Suhani
| |
| Thursday, September 28, 2006 - 9:58 pm: |
| 
|
are sorry chookun zaala te
|
Mrinmayee
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:00 pm: |
| 
|
मिलिंदा, तुझ्या बायकोसारखाच अनुभव मला आला माझ्या पहिल्या (आणि बहुतेक) शेवटच्या AI प्रवासाचा. तशीही एअर होस्टेस पूर्ण वेळ एरंडेल प्यायल्यासारखा चेहेरा करून खाणं पिणं आदळत होती. म्हातार्यांना मदत (?) करताना 'मरत का नाहीत लवकर' असा भाव. बाकीच्यांवर खेकसणं सुरुच. मी माझ्या अडीच वर्षाच्या मुलाला सारखं पाणी लागंत होतं म्हणून त्या बयेला पाण्याची "एक बाटली मला देऊन जा" असं म्हंटलं तर तिचं उत्तर, "काळजी करु नकोस, तहानेनं जीव जात नाही. हवं तेव्हाच पाणी माग"!! येव्हड्याच करता मी माझ्या आधिच्या पोस्टमधे "त्या एअर होस्टेसला थोबाडित द्यावीशी वाटली" असं लिहिलय! Virgin मला तरी आवडली. सर्विस छान! विमान अतिशय स्वच्छ! स्टाफ पोलाईट! जेवणही बरं होतं! लहान मुलांना पुस्तकं, पझल्स आणि खाऊनी भरलेल्या ब्यागा देतात. तेव्हा तमाम बच्चे कंपनी पण खूश!
|
Moodi
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:04 pm: |
| 
|
Yess !! याकरताच यावेळी virgin चे तिकीट काढलय. बर्याच जणांकडुन चांगले रीपोर्ट आलेत.
|
Sahilshah
| |
| Thursday, September 28, 2006 - 10:55 pm: |
| 
|
या वेळी मी jet star या बजेट airlines नी गेले होतो. (सिगापुर ते बेगलोर) service खुपच छान होती. बेल वाजवताच हवाई सुदरी हजर. पण प्रत्येक गोष्टीला pay करवे लागयचे. blanket ला १०० रुपये, headphone ला १०० रुपये. (ह्या दोन्ही वस्तु आपण घरी घेउन जाउ शकतो), DVD on depmand movie ला ३०० रुपये. जवणाला २०० रुपये वगैरे......
|
Sami
| |
| Thursday, September 28, 2006 - 11:45 pm: |
| 
|
कोणी emirates ने कधी प्रवास केला नाही का? अप्रतिम जेवण आणि flight आणि ह.सु. सुद्धा छान. मी US ला कधी आले नाहिये पण दुसरीकडे गेलेय त्याने. NY ला हल्लीच सुरु केलंय म्हणजे झाली असतील २ - ३ वर्षं. आम्हाला solid आवडतं. बरेचदा शाही तुकडा असायचा जेवणात.
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 3:44 am: |
| 
|
मी तर खूप पुर्वी असं ऐकल की हवाई सुंदरी फ़्लर्ट करतात आणि करू देतात. इतक्यांदा मी प्रवास केला पण करायला जर जाऊ दे कुणी करताना देखील मी कधी बघितलेले नाही. म्हणजे मी ऐकलेल्या सगळ्या गप्पा होत्या तर.. :-( Singapore Airlines च्या हवाई सुंदरी सुंदर असतात. खास करुन त्यांचे कपडे खूपच आवडतात मला. Malaysian Air lines च्या सुंदरी पण सुंदर असतात. Air France, Quantas, American Air Lines च्या हवाई सुंदरी खूप प्रौढ वाटल्या. अजून कुठल्या कुठल्या flights मध्ये सुंदर हवाई सुंदर असतात :-) चिंचेचा कोळ घालून केलेल्या गोळ्या देणारी ती फ़्लाईट कुठली आहे. मला बाहेरून त्या गोळ्या मिळाल्या मित्राकडून आणि मग एक नाही दोन नाही करता करता अख्खे पाकीट मी त्वरीत संपविले होते आणि मग अशी तंद्री लागली :-) मी Changi Air Port, Singapore मधून माझ्या भाचीसाठी Air Hostess चा एक ड्रेस विकत घेतला तो तिला इतका सुंदर दिसतो... लय झ्याक!
|
Lajo
| |
| Friday, September 29, 2006 - 6:14 am: |
| 
|
अरे बी Jet Airways मधे देतात त्या चिंचेच्या गोळ्या. मला पण खूप आवडतात. Singapore Airlines सगळ्यात 'the Best'!!! सर्व्हिस उत्तम, जेवण उत्तम, inflight entertainment उत्तम. आम्ही नेहेमीच sing. नेच प्रवास करतो. मागच्या वर्षी आम्हाला फारच सुखद अनुभव आला. जेव्हा counter वरच्या सुंदरीला कळले की आमची wedding anniversery आहे. तीने आमच्या सीट्स business class ला अपग्रेड केल्याच शिवाय flight crew ला देखिल सांगीतले आणि मग विमानात गेल्यावर आम्हाला गिफ़्ट म्हणुन शॅंपेन ची बाटली आणि चोॅकलेट्स पण... भारतात Jet Airways सुद्धा खूप चांगले आहे. त्यांची सर्व्हिस चांगली आहेच आणि flights पण वेळेवर असतात.
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 6:59 am: |
| 
|
बापरे लाजो नावरुन अंदाज आला नाही तू शाम्पेन वगैरे घेत असेल म्हणून :-) त्या चिंचेच्या गोळीचे नाव काय आहे मात्र? मी Jet Airways नीच हल्ली भारतात जातो.
|
बापरे लाजो नावरुन अंदाज आला नाही तू शाम्पेन वगैरे घेत असेल म्हणून :-) <<<<<शॅंपेन घेणे आणि नावाचा काय संबंध आता ? 
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 7:39 am: |
| 
|
लाजो नाव वाचून डोक्यावर घागरीवर घागर घेऊन चालणार्या बाईचे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले म्हणून मी तसे म्हंटले.. :-) तू नक्की घेत असशील दीपांजली शॅंपेन :-)
|
तू नक्की घेत असशील दीपांजली शॅंपेन :-) <<<बी अरे बाबा , तुला आज काल फ़ार पंचायती पडतात वाटतं ! पडत असतील तर त्या सगळ्या इथे कशाला लिहितोस public forum वर ?? कुठे काय विचारावे याचं जरा भान ठेवत जा please!
|
Bee
| |
| Friday, September 29, 2006 - 8:03 am: |
| 
|
बापरे दीपांजली ऐवढा राग का गं!!! माहिती नव्हतं की तुही रागवू शकतेस म्हणून.. बरं बरं तुला आवडल नाही तेंव्हा क्षमस्व!
|
Chioo
| |
| Friday, September 29, 2006 - 8:04 am: |
| 
|
आम्ही जेव्हा पहिल्यांदा स्टॉकहोमला आलो तेव्हा स्वीस एअरचा थोडा वाईट अनुभव आला. मुंबई ते झुरिच ठीक होतं. पण नंतरच्या प्रवासात विमानात बसल्यावर कळाले की, त्यांची पॉलिसी बदलली आहे आणि विमानात खाणे-पिणे सगळे विकत घ्यावे लागेल. त्यालाही आमची हरकत नव्हती पण आमच्याकडे डॉलर होते. भारतात युरो पुरेसे मिळाले नाहीत म्हणून. तर त्यानी ते घेऊन पाणीपण दिले नाही. नंतर आम्ही स्वीसने कधी गेलो नाही. आता काय पॉलिसी आहे माहित नाही.
|
Milindaa
| |
| Friday, September 29, 2006 - 8:41 am: |
| 
|
Chioo, सर्व युरोपीअन एअरलाईन्स ना इथे खूप स्पर्धेला तोंड द्यावं लागतं budget airlines कडून, त्यामुळे त्यांनी पण त्या airlines सारखे युरोप मध्ये फुकट खाणे देणे बंद केले आहे. अपवाद ब्रिटीश एअरवेज च्या काही उड्डाणांचा..
|
Chioo
| |
| Friday, September 29, 2006 - 9:23 am: |
| 
|
मिलिंदा, त्यानी खाणे-पिणे फ़ुकटच द्यावे असा आमचा आग्रह नाही, पण आम्हाला ते विकतपण नाही दिले. तेपण युरो नाही तर डॉलर होते म्हणून. मला तरी वाटते की, पाऊंड, डॉलर, युरो ही चलने युरोपमधे चालायला काही हरकत नसावी. आणि जर तसे चालत नसेल तर त्यानी ही गोष्ट आधीच चेकिनच्या वेळी सांगायला हवी होती. कारण पॉलिसी आदल्याच दिवशी बदललेली होती. त्यानी हे काहिही क्लिअर केले नाही आणि नंतर वेगळे चलन स्विकारले नाही म्हणून आम्हाला ते नाही आवडले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|