Champak
| |
| Tuesday, March 14, 2006 - 7:06 pm: |
| 
|
नेपोलियन बोनापार्ट, ज्युलियस सिझर, बिल क्लिंटन, लिएंडर पेस,अमिताभ, अन चंपक ह्यात एक साम्य आहे.... कुठले बरे!...... ते सगळे डावखुरे आहेत!!! इथे मायबोलीवर अजुण कोणी डावखुरे / डावरे आहेत का? http://www.anythingleft-handed.co.uk/fam_history.html#leaders
|
चंपक मी दोन्ही आहे थोडा थोडा... म्हणजे, सगळे खेळ, badminton, tennis आणि cricket डावखुरा, स्वयंपाकाचा मुख्य हात डावा आणि जेवण लिखाण उजव्यानी... अश्यांसाठी वेगळा BB करू की इकडे चालेल?
|
चम्पुमामा, म्या ल्हानपणी डावखुरा होतो पर समद्यानी बोलुन बोलुन मला उजवाखुरा केला! पर आजबी, कवा हाणामारीचा वखत आलाना तर डावा हात जास्त चालतो!
|
Kandapohe
| |
| Wednesday, March 15, 2006 - 6:40 am: |
| 
|
माझे एक ऑब्सेर्व्हेशन आहे. डावखुर्या बर्याच लोकांचे अक्षर चांगले असते. आणि जनसामन्यामधे हे लोक्स वेगळे असतात. लहानपणीच ज्यांना दावा हात वापरावासा वाटतो ते वेगळेच असणार ना? अपवाद असतीलच. 
|
मी आहे डावखूरा! पण लिखाण मात्र उजव्या हातानी करतो त्याला कारणीभूत माझे शाळेतील शिक्षक आणि आई वडील.
|
Saanjya
| |
| Wednesday, March 15, 2006 - 9:37 pm: |
| 
|
मी पण आहे डावखूरा! मात्र जेवण, लिखाण उजव्या हातानी करतो..
|
Sahilshah
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:46 pm: |
| 
|
माझा मुलगा डावखुरा आहे. जेवण पण डाव्या हातानी करतो. फक्त mouse उजव्या हातानी चालवतो
|
माझी बहीण डावखुरी आहे आणि अगदी पक्की खाणं, लिहिणं, खेळणं सगळच आणि आई बाबांनी ही कधी तिला force केलं नाही... पण लहानपणी तिचं पाहून पाहून मी अर्धा डावरा झालो आणखी एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी... माझा एक मित्र डावरा आहे तर तो देवाचा प्रसाद पण डाव्या हातानी घेतो आणि ह्या गोष्टीबद्दल त्याचे बाबा एकदम logical विचारांचे आहेत त्यांनी कायम त्या गोष्टीला पाठींबा दिला आहे...आता जर निसर्गानीच त्याला डावरा केलयं तर मग देव तरी माझा प्रसाद उजव्या हातानी घे का म्हणेल... ही प्रसादाची गोष्ट बर्याच जणांना सुरुवातीला पटत नाही. त्यांचा हा विचार unconventional तर आहेच पण त्यांच्या पिढीला खूप कौतुकास्पद ही आहे.
|
Champak
| |
| Thursday, March 16, 2006 - 4:22 pm: |
| 
|
अरे वा! बरेच जमले कि मी पक्क डावरा हे. आई सोबत देवळात गेलो कि प्रसाद घेताना तिथल्या बाबा बरोबर हुज्जत नेहामी च होते! अनेक जण forcefully उजवे बनवले जातात. माझा एक पुतण्या पण डावरा आहे. माझी मोठी वहीनी ही डावखुरी आहे. संगणका ला मात्र उजव्या च हाताने माउस वापरावा लागतो...... बिल गेटस ला सांगितले पाहिजे हे डावरे पणा ला कारण काय आहे हे माहिती आहे का?
|
चंपक भो, माउस डाव्या हाताने वापरायचं असेल तर Control Panel - Mouse Properties मध्ये जा, तिथे तुला तसा option दिसेल. नंतर माउस डावीकडे ठेव नाहीतर अडचणीचे होईल! मी फ़ेकण्यात डावखुरा आहे. आपले वसंत डावखरे पण डावखुरेच असतील बहुतेक! 
|
Moodi
| |
| Thursday, March 16, 2006 - 5:17 pm: |
| 
|
चंपक मी अर्धी डावखुरी आहे रे. 
|
खाली दिलेली link पहा http://www.indiana.edu/~primate/brain.html
|
Champak
| |
| Friday, March 17, 2006 - 3:45 pm: |
| 
|
Thanks धाकले साहेब! आता पक्का डावरा! शंकासुर, ह्यावर मी नंतर लिहिल.
|
Naatyaa
| |
| Friday, March 17, 2006 - 3:55 pm: |
| 
|
मी पण जन्माने डावखुरा आहे. पण मला लहानपणी जेवण आणी लिखाण या गोष्टी उजव्या हाताने करायला लावल्या.. त्यामुळे मी पण आता अर्धा डावखुरा
|
जिमी हेंड्रीक्स हा एक अतिशय प्रतिभावान गिटारवादक डावराच होता..त्या काळात (म्हणजे १९६०-७० मध्ये) डाव्या हाताने वाजवता येण्यार्या गिटार बनवल्या जात नसत म्हणून त्याने regular गिटारच उलटी धरून वाजवायला सुरुवात केली thus came his unique style and sound!!
|
९० च्या दशकातला डावखुरा गिटारवादक म्हणजे कर्ट कोबेन ('निर्वाणा' या ग्रुप मधील) दुर्दैवाने आजच्या घडीला जिमी हेन्ड्रीक्स किंवा कर्ट कोबेन हे दोन्ही आज आपल्यात नाहीत
|
Shyamli
| |
| Saturday, March 18, 2006 - 2:46 pm: |
| 
|
माझी मुलगी पण डावरी आहे... अगदी हातात वस्तु धरायला शीकतात तेंव्हापासुन.... लगेचच माझ्या लक्षात आल.....काही समोर धरल की ती डावाच हात पुढे करते.... शाळेत घातल्यावर १ल्यांदा पेंन्सिल हातात दिली तर तीला उजव्या हातात धरताच येईना.... मग मात्र नोट लिहुन पाठवावी लागली........
|
Manuswini
| |
| Saturday, March 18, 2006 - 9:23 pm: |
| 
|
मला वाटते जवळपास सर्वच जण अर्धे डावखुरे असतात ना काही बाबतीत
|
Bhagya
| |
| Sunday, March 19, 2006 - 4:09 am: |
| 
|
चंपक माझी आई डावखुरी आहे रे! लहानपणी आम्ही मस्ती केली की दोन्ही हाताने फ़टके मारायची. मस्ती आणी वेड्यावाकड्या गोष्टी बंदच केल्या आम्ही मग.
|
Milindaa
| |
| Sunday, March 19, 2006 - 10:23 am: |
| 
|
आपण इथे कसल्या अनुभवांविषयी लिहीतोय ?
|
Champak
| |
| Sunday, March 19, 2006 - 10:43 am: |
| 
|
मिलिंदा, अरे हे सदर कुठे सुरु करावे हे समजेना म्हणुन मी इथे सुरु केले. डावर्या लोकांना येणारे अनुभव इथे लिहावे त असा माझा माणस आहे. मला वेळ झाल कि मी लिहील च. आता ईतरांना लिहु दे! गुरुदास कुठे गेले? ते ही डावरे आहेत असे म्हणाले होते मागे! आदित्य, माहितीबद्दल आभार! भाग्या....... डाव्या हाताचा धपाटा लै जोरदार असतो शामली, तुम्ही मुलीला मारुण मुटकुण उजवे बनवु नका. डावरे लोक लै उनिक असतात असे वर अनेकांनी लिहिले आहेच!
|
Vaatsaru
| |
| Sunday, March 19, 2006 - 11:27 pm: |
| 
|
ह्याच्यावरची एक ओळ आठवली म्हणून It's our right to be left
|
Mrinish
| |
| Wednesday, March 22, 2006 - 12:43 pm: |
| 
|
मी पण पक्की डावखुरी आहे......पण एथे अनुभवान्बद्दल बोलायचे आहे ना... मला सान्ग्गा तुम्हा कोणाला कात्री वापरण्यात कधी काहि अडचण आली नाही का? मला अजुनहि कात्रीने कापडकागद निट कापता येत नाही.....
|
Champak
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:24 pm: |
| 
|
अहो ते च त लिहा कि! तुम्हाला काय काय अडचणी येतात ते! सगळ्यात सुरुवात म्हंजे shake hand ला कशी गंमत होते पहा! डावा हात पुढे जातो अन match-mismatch होते
|
Jaaaswand
| |
| Wednesday, March 22, 2006 - 2:30 pm: |
| 
|
नमस्कार मित्रांनो.. प्रथम हे स्पष्ट करतो कि.. मी डावरा नाही.. तरी चंपक ने म्हटल्याप्रमाणे.. डावर्या लोकांना काय काय प्राॅब्लेम येत असतील.. ह्याचे एक उदाहरण कुठल्याही company च camcorder घ्या तो फ़क्त righ hand grip च देतो.... डावर्यांचे खूप हाल होत असतील त्याने काही अनुभव.. आपल्या पैकी काही लोकांचे... ??
|