|
श्यामली अग Thanks ग माहेर ची छान सैर करवुन दिलिस आ हा हा.. आता लगेच A'bad जाउन गुलमण्डी वर चक्कर माराविशी वाटत आहे, गायत्री चाट जोथपुर चाट भांडार.. वा वा मजा आ गया. कधी जातेस तिकडे आता? Dec मधे असेल चक्कर तर नक्की भेटुया
|
Runi
| |
| Wednesday, August 22, 2007 - 3:13 pm: |
|
|
श्यामली, अभिनंदन. मायबोलीच्या मुख्य पानावर आलय बघ तुझे जायके का सफर.
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 3:54 am: |
|
|
अरेच्चा खरच की धन्यवाद रुपाली , माधुरी, लक्ष्मीकांत दिनेशदा, मी इथे उल्लेख केलेली हॉटेल्स अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच आहेत. अजून कित्येक छान छान हॉटेल्स आहेत औरंगाबादमधे जी राहून गेली आणि आता माझं जाणं काहिच दिवसांसाठी असतं त्यामुळे नवीन ठिकाणांची मला माहिती सुद्धा नाही
|
Bee
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:13 am: |
|
|
श्यामली, मस्त झाली आहे ही खानपानगृहांची सफ़ारी..
|
Shyamli
| |
| Thursday, August 23, 2007 - 11:47 am: |
|
|
धन्यवाद बी .. .. .. .. ..
|
Lampan
| |
| Friday, September 14, 2007 - 8:18 am: |
|
|
झक्कास !!! मला आताच्या आता उठुन तिकडे जावं वाटतंय ... इथे इडली सांबार भात खाउन कन्टाळा आलाय ... आता वडा पाव , भुर्जी पाव आणि इमरती असलं काय दिसायला लागलय ..
|
Itgirl
| |
| Wednesday, October 10, 2007 - 3:03 am: |
|
|
हाय श्यामली आतापर्यंत तुझे इथले लिखाण वाचले होते, पण प्रतिसाद द्यायला इथे कसे यायचे ते कळले आत्ताच पुढचे कधी लिहिणार? छानच लिहिल आहेस
|
Shyamli
| |
| Saturday, October 13, 2007 - 11:00 am: |
|
|
धन्यवाद शैलजा तू पण लिहायला सुरवात कर बरं. अद्वैत, किती दिवसात गेला नाहीस औरंगाबादला?
|
श्यामली, खूपच छान जमले आहे. मी मूळचा पुणेकर असूनही पुढच्या भारत भेटीत औरंगाबादला नक्की चक्कर मारेन म्हणतो. बायकोही खूष होईल कारण तिचा आतेभाऊ असतो तिथे ...संदीप न्यू जर्सी. } www.atakmatak.blogspot.com
|
Shyamli
| |
| Saturday, October 20, 2007 - 5:42 pm: |
|
|
संदीप चित्रे, आपण आवर्जून अभिप्राय दिलात त्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद
|
Mrdmahesh
| |
| Friday, November 02, 2007 - 2:11 pm: |
|
|
श्यामली, आज तुमचं औरंगाबादच्या खाद्ययात्रेचं लिखाण वाचलं आणि माझ्या १० वी झाल्यानंतरच्या सुट्टीतल्या आठवणी ताज्या झाल्या... तुम्ही सांगितलेल्या मेवाड हॉटेल मध्ये लग्नानिमित्ताने राहून गेलोय.. ती गुलमंडी, ते चाट सेंटर, ते अंजली थिएटर ("हीरो" सिनेमा तिथंच पाहिला ), ते तारा पान शॉप... सगळं सगळं भर्रकन डोळ्यासमोरून गेलं... औरंगाबादला माझी सख्खी बहिण रहात असे. सुट्टीत तिच्याकडे यायचो.. एकदा तर उस्मानपुर्या हून स्टेशन जवळच्या एका थिएटरात (बहुतेक सत्यम - बंद पडलं का हे??) एकाच दिवशी दोन सिनेमे पायी जाऊन पाहिले होते. आता औरंगाबाद चा संबंध म्हणजे पुणे ते परभणी व्हाया औरंगाबाद एवढाच.. आणि प्रत्येकवेळी जाताना कित्ती बदललंय औरंगाबाद? हे उद्गार... (पुण्यातल्या घरांच्या किमती पाहून कधी कधी पुणं सोडून औरंगाबादला स्थायिक व्हावं का असा विचार येतो पण... ) एक काळ असा होता की सगळ्या औरंगाबादभर आमचे नातेवाईक / मित्र होते (वडील गमतीने म्हणायचे "औरंगाबादेतल्या कुठल्याही घराचा दरवाजा वाजवा, तो आपला नातेवाईक नाहीतर माझा मित्र निघेल" ).. आता कुणीच नाही... गेले ते दिन गेले.. असंच म्हणावसं वाटतं.. बाय द वे माझ्या एवढ्या आठवणी ताज्या झाल्या याचाच अर्थ "आपलं लिखाण सुंदर" हे वेगळं सांगायला नकोच
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|