|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through August 08, 2001 | 16 | 08-08-01 4:04 pm |
  | Archive through Jan 20, 2002 | 35 | 01-20-02 7:14 am |
  | Archive through March 29, 2002 | 35 | 03-29-02 11:42 pm |
  | Archive through September 04, 2002 | 35 | 09-04-02 2:02 pm |
  | Archive through March 28, 2003 | 35 | 03-28-03 6:55 pm |
  | Archive through August 14, 2003 | 35 | 08-14-03 9:38 am |
  | Archive through February 10, 2004 | 35 | 02-10-04 6:10 pm |
  | Archive through June 12, 2004 | 35 | 06-12-04 3:10 pm |
  | Archive through October 21, 2004 | 35 | 10-21-04 5:52 pm |
  | Archive through December 20, 2005 | 35 | 12-20-05 4:31 pm |
  | Archive through January 29, 2006 | 35 | 01-30-06 1:41 am |
  | Archive through August 22, 2006 | 20 | 08-22-06 5:31 pm |
Anilbhai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 6:04 pm: |
| 
|
तात्या, बसंताच लग्न अत्यंत सुरेख. 
|
आपल्याला बसंतचं लग्नं आवडलं हे वाचून आनंद झाला. धन्यवाद, अनीलभाई.. --तात्या.
|
तात्या. बंसतचे लग्न सही लिहिले आहे.
|
Supriyaj
| |
| Wednesday, August 23, 2006 - 5:58 pm: |
| 
|
आत्ताच मनोगत वरचा राहुल देशपांडे मैफिली चा 'एक रंगलेला मधुकंस' हा लेख वाचला. लेखक अर्थातच आपले तात्या.. www.manogat.com विशेष म्हणजे तात्या यापुढचे संगीतविषयक लिखाण आपल्या मायबोलीवर करणार हे वाचुन फार छान वाटले. तात्या तुम्हाला e-mail केलीय.
|
वसन्तराव देसपान्डे यान्च्या अमेरिकेतिल मैफ़िली कोणाकडे आहेत का?
|
Rakhalb
| |
| Wednesday, January 03, 2007 - 10:39 pm: |
| 
|
हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताचा उगम कुठे आणि कसा झाला? माझ्या वाचण्यात आलेल्यापैकी काही theories खालील प्रमाणे: Theory क्र. १) हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीत हे पर्शियन म्हणजे इराणी संगीतातून निघालयं. साधारण बाराव्या शतकात हे संगीत भारतात आलं आणि त्या नंतर काही महान विभूतिंनी (उदा. तानसेन इत्यादि) त्या संगीताला वेगवेगळी स्वरूपं दिली जसे खयाल, ध्रुपद, ठुमरी, कजरी, टप्पा इ. Theory क्र. २) ही theory आपल्याला पार पुरातन काळात घेऊन जाते. ब्रम्ह्ना, हनुमान, शिव आणि क्रुष्ण ह्या देवादिकांनी चार 'मत' स्थापन केले. इथे 'मत' चा अर्थं 'मती' किंवा 'बुद्धी' असा घ्यावा. ब्रम्हा-मत पासून खायाल गायन निघाले. हनुमान-मत पासून ध्रुपद गायकी उत्पन्न झाली. क्रुष्ण-मत पासून ठुमरी, कजरी इ. निघाले. शिव-मत ...??? [ sorry , मला ह्या बद्दल फ़ारसं माहीत नाही]. इथून पुढे ह्या सर्वं गायकी प्रचलित झाल्या. Theory क्र. ३) नारद मुनींनी गायन विद्या ही स्वर्गातून प्रुथ्विलोकांत आणली. अथर्वंवेदाचा पाठ हा हिन्दुस्तानी शास्त्रोक्तं संगीताच्या स्वरांमध्ये केल्या जातो. वेदांचं पठण होऊ लागल्यापासून हे संगीत प्रचलित झालं. हा झाला mythology चा भाग. परंतु ह्या मागील व्यावहारिक संदेश काय असेल? ह्यातली कुठली theory खरी मानायची, आणि कितपत खरी मानायची? ह्यावर कुणि प्रकाश टाकू शकेल काय? वरील माहिती दुरुस्तं करावयाची असल्यास जरूर करावी.
|
Gajanan1
| |
| Sunday, January 14, 2007 - 11:20 am: |
| 
|
आज जे सन्गीत कर्नाटकी किन्वा दक्षिणी म्हणून ओळखले जाते, तेच खरे भारतीय सन्गीत आहे, असे म्हणतात. आपण ज्याला उत्तर हिन्दुस्तानी शास्त्रीय सन्गीत म्हणून ओळखतो ते मुघल काळात सुरू झाले. दक्षिणी सन्गीतात म्रुदुन्ग वापरतात. तबला हा मुघल काळात आला आणि हिन्दुस्तानी सन्गीताचा घटक बनला. मुघल सत्ताधीशाना भारतातील प्रत्येक वस्तू मोडण्याचा नाद होता... त्यातूनच म्रुदुन्ग मोडला जाऊन तबला तयार झाला असेल का? जाणकारानी शोध घ्यावा. शास्त्रीय सन्गीताच्या परम्परेत लन्काधिपती रावणाचाही आदराने उल्लेख होतो... तो नेमका कशासाठी?
|
गजाननराव, १. मुस्लीम आक्रमणाच्या पूर्वी भारतात एकाच प्रकारचे संगीत प्रचलीत होते. पण मुस्लिमांनी ज्याप्रकारे भारतातील राजकीय जीवन उध्वस्त केले त्याचप्रमाणे भारतातील संस्क्रुती व संगीतातही जाणूनबुजून भेसळ केली. भारतीय संगीतात तुर्की व फार्सी संगीत घुसवून त्याचे संपूर्ण स्वरूपच बदलून टाकले. दक्षिण भारतात मुस्लिमाचा प्रभाव फारसा नसल्यामुळे ते संगीत बदलले नाही. फक्त त्यातील भाषा संस्क्रुताऐवजी तेलुगु, तमिळ, कन्नड व मल्याळम या झाल्या. उत्तर भारतातील परिवर्तित संगीतालाच आज आपण , 'हिन्दुस्थानी संगीत' म्हणून ओळखतो("हिन्दुस्थानी" हा शब्द देखील अमीर खुस्रोनेच प्रचलित केलेला). २. तबला या वाद्याला अत्यंत प्राचीन परंपरा आहे. वेदोत्तर काळात भारतात 'पुष्कर' नावाचे एक वाद्य प्रचारात होते. त्याला आजच्या तब्ल्याचे पितामह म्हणता येईल. म्रुदंगाला मोडून मुसलमान लोकान्नी तबला बनविला ह्या थिअरीला सबळ पुरावा उपलब्ध नाही. ३. असे म्हणतात की लन्काधिपती रावण हा उच्चकोतीचा संगीतज्ञ होता. शिव शंकराना त्याने शिव रंजन स्तोत्र गाउन प्रसन्न केले होते.
|
शास्त्रीय संगीताबद्दल माहिती देणार्या वेब साईट्स कुठल्या आहेत? क्रुपया माहिती कळवावी. इंटरनेट वर कुठे शास्त्रीय संगीताचे व्हिडिओ मिळतील? जुन्या काळात 'यंत्र' नावाचे कुठले वाद्य होते का??ते कुठल्या प्रकारचे वाद्य होते???
|
Hi Chinya1985, If you are looking for a real good website which has good and authentic clips of the old masters - It has to be only one www.parrikar.org I do not have to say anything about it. Just visit there and see for yourself. Also, under Ford Foundataion, Pandit Satyasheel Deshpande has created an amazing website - www.satyasheel.com There are many but Shri Rajan Parrikar's is absolutely fantastic. Regards, ~Mihir
|
hi!! mihir thanx for ur help.actually it is not for me.one of my foreigner friend is very interested in indian classical music.but many websites or music schools in india don't answer her questions for months.so she asked me 2 tell some good websites which will reply 2 queries.thanx 4 ur help.i will send her names of websites.do u know specific site for thumari???
|
शास्त्रिय संगिताचे व्हिडिओ कुठल्या वेबसाईटवरुन डाउनलोड करता येतात???
|
व्हिडीयो माहीत नाही पण तुला emusic वर अनेक शास्त्रीय गायकांचे गायन उतरवुन घेता येईल.
|
Dineshvs
| |
| Monday, September 10, 2007 - 1:55 pm: |
| 
|
खरे तर इथे हे अस्थानी आहे. लताने श्री गणेशाच्या संस्कृतमधील काहि श्लोकांची सीडी काढली आहे. लताचा आवाज आता पुर्वीसारखा राहिला नाही, पण मला हि सीडी ऐकुन धक्का बसला, कारण यात लताचा आवाज थेट हल्लीच्या आशाच्या आवाजासारखा लागला आहे. अनेकवेळा ऐकुनही मला असेच वाटतेय. कुणी ऐकलीय का ती सीडी ? खुप पुर्वी म्हणजे जवळ जवळ तीस वर्षांपुर्वी लताने गीतेचे दोन अध्याय वाचले होते. ( त्याला गायन म्हणता येणार नाही ) माझ्याकडे तिच्या आवाजातला आणखी एक अध्याय आहे. ते वाचन अभिजात म्हणावे असेच आहे.कुठलेही तालवाद्य वापरले नव्हते. केवळ तानपुरा आणि बासरी अशीच साथ होती. अध्याय संपताना घंटानाद आहे. ते वाचन आता उपलब्ध नाही बहुतेक. त्या नंतर लताने हे पहिलेच संस्कृत गायन केलेय. तिच्या आवाजातले अथर्वशीर्ष तर सुंदरच आहे. ( ते आधी आले होते ) त्या मानाने हे श्लोक जरा कमी वाटतात. नको तेवढी वाद्ये आहेत. आशाच्या ऋतु हिरवा चा दुसरा भाग येतोय. तिच्या वाढदिवसाला आशा मनमोकळी बोलली. अजुन काय सुरेख गाते ती. आधी मी दमलेय अजिबात गाणार नाही असे म्हणाली, मग गप्पांच्या ओघात अनेक गाण्यांचे मुखडे गायली. अगदी झलक दिखलाजा पण गाऊन दाखवले तिने.
|
Paragb
| |
| Wednesday, October 31, 2007 - 8:19 am: |
| 
|
.ram files kashy open karaychya
|
Tiu
| |
| Wednesday, October 31, 2007 - 3:03 pm: |
| 
|
पराग...त्यासाठी Real player इन्स्टॉल करावा लागेल. http://www.real.com
|
ek link detoy. yamadhye Bhimsen joshi, Pt Jasraj, Kumar Gandharva yanchya apratim clips ahet tyaach barobar lata, hrudaynaath, aasha yanchyahi shravan madhur clips ahet. rasikanni jaroor aikavya. www.youtube.com
|
Naatyaa
| |
| Tuesday, December 11, 2007 - 6:07 am: |
| 
|
३ वर्षाच्या अनुपस्थितीनंतर भीमसेन जोशी परत एकदा सवाई गंधर्व मध्ये गायले.. याची एक झलक तुम्हाला येथे पहायला मिळेल.. http://www.esakal.com/features/bhimsen/index.html
|
Dineshvs
| |
| Friday, February 15, 2008 - 3:10 am: |
| 
|
गेले महिनाभर, विविध भारतीवर सकाळी साडेसात वाजता, बालकृष्ण अय्यर, भारतीय तालवाद्य आणि फ़िल्मसंगीत, असा सुंदर कार्यक्रम सादर करत आहेत. तबला, पखवाज अश्या परिचीत वाद्यांपासून सुरवात करत, डफ़ली, चिपळ्या, मादन, तबला तरंग अश्या अनेक वाद्यांची ओळख करुन दिली गेली. त्या वाद्याचे बाह्यरुप, वाजवण्याची पद्धत, वाजवता येणारा ताल आणि ते वाद्य प्रामुख्याने वाजले आहे असे फ़िल्मी गाणे, असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. तेरे बिना जिया जाये ना, दिवाना हुवा बादल अश्यासारखी गाणी नव्याने ऐकताना खुपच मजा आली. आणि आजवर ज्या वाद्यांची चर्चा झाली, त्या बहुतेक सगळ्या वाद्यांचा उपयोग केलेले म्हणुन, होटोंपे ऐसी बात हे गाणे आज ऐकवले. कार्यक्रम सुंदर होताच पण तो दृकश्राव्य असता तर आणखी छान झाला असता. या दूरदर्शनला असले कार्यक्रम सादर करण्याची बुद्धी केव्हा होणार ?
|
Zakki
| |
| Friday, February 15, 2008 - 12:07 pm: |
| 
|
इ - प्रसारण.कॉम या इथेहि दर सोमवारी अशीच शास्त्रीय संगिताबरोबर लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी लावली जातात. आता पूर्वीसारखे ठराविक वेळीच ऐकायला पाहिजे असे नाही. कोणत्याहि दिवशी केंव्हाहि एक तास हा कार्यक्रम ऐकता येतो.
|
हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. /node/2302
|
|
|