Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 09, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through August 09, 2006 « Previous Next »

Mepunekar
Saturday, August 05, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milya..sahi lihilayes..
HHPV...
Lage raho..


Giriraj
Saturday, August 05, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,कोपरखळ्या,गुदगुल्या आणि चिमटे मजेदारच रे... सही लिहिलेस अगदी... आता शेपटाचं लवकर बघ!
:-)
'शेपटात' काय आभारप्रदर्शन वगैरे आहे की काय? एक टी.प्र. :-)


Limbutimbu
Saturday, August 05, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> 'शेपटात' काय आभारप्रदर्शन वगैरे आहे की काय
सम्मेलनाचे सूप वाजले, कवित्व उरले!
मिल्या, थोडक्यात पण अप्रतिम लिहिल हेस! :-)


Upas
Saturday, August 05, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या जबरीच.. I missed it :-(

Bhramar_vihar
Monday, August 07, 2006 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या छान रे! मुंबईकराना मागच्या २६ जुलै ची आठवण झाल्याने, त्या आठवणि ताज्या करण्यासाठी डुंबायला गेलो होतो!

Neel_ved
Monday, August 07, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, you are great

Moodi
Monday, August 07, 2006 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मिल्या शेपूट सूईतच अडकले रे, काढ की ओढुन त्याला बाहेर. लवकर लवकर!!!

Milya
Monday, August 07, 2006 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स मंडळी

आता जयविजय उर्फ वाकड्या यांना कळेल की बाथरुम मध्ये भेटलेला तूच. >>> अग मूडी तो मी नव्हेच.. असे माझ्या वृत्तांतातले प्रत्येक वाक्य खरे मानलेस [कधी खरे बोलतो का हा? ] तर problem ह्यायचा.. उ. दा. आता राकु विषयी लिहिले आहे ते लोक उगाच खरे मानुन बसायचे ना...
खर्‍याला जरा [जरा?] अतिशयोक्तीचा मालमसाला लावुन लिहिलेय बाकी काही नाही
:-)



Shyamli
Monday, August 07, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chalaa mhnaje bakalaavaa vishayii paN tu khare aapale khote lhihilay mhnaje



Milya
Tuesday, August 08, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाविहार वृत्तांत .... वाचाल तर वाचाल ... अंतिम चरण


^चहा प्यायला मंडळी परत एकत्र जमली. पावसामध्ये लोक जितके भिजले नव्हते तेवढे ते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वर्षावामध्ये चिंब भिजले होते... (वा! वा! काय उपमा आहे? काहीच्या काही posts चा परिणाम दुसरे काय?) त्यामुळे थकल्या भागल्या जीवांना तो चहा अगदी अमृतासमान लागला... (त्यांना माहीत नव्हते की भगवान श्रीकृष्ण ... (अहो श्रीकृष्ण अमृततुल्य वाले नाही हो... कुठे न्यायची म्हणुन सोय नाही) स्वत: जातीने तेथे येउन गेल्याने चहाला असा स्वाद प्राप्त झाला आहे.. पण तरी तिथे lemon Tea ही असता तर बरे झाले असते.)

असो... चहा पिउन सर्व मंडळी तृप्त मनाने बाहेर पडली. सर्वांनाच आता परतीचे वेध लागले होते... बस पण तयार होतीच.. driver साहेबांचा ही आखाड आणि बुधवार एव्हाना उतरला असावा असे त्यांच्या चेहर्‍यावरुन वाटत होते... मग एक group phoTo झाला. नंतर फ़कस्त मायबोलीचे टीशर्ट घातलेल्यांचा फोटो झाला. आणि सर्वजण बसमध्ये आसनस्थ झाले..(मुंबईकर उभेच होते) सकाळी ३५ जणांची capacity असलेल्या बस मध्ये ६० कोंबली (१ km अंतरासाठी) म्हणुन driver साहेबांनी बोंब ठोकली होती म्हणे त्यामुळे मुंबईकरांना वाटेतल्या चौकात सोडायचे असे ठरले होते आणि तिथुन ते चालत कर्जत ठेसनाला जाणार होते... त्यांच्याबरोबर कर्जतच्या ठेसनातुन वडा-पाव आणायला काही संयोजकही उतरले. इतक्या वेळ शांत बसलेला दीपही श्यामलीला मदत करतो ह्या हेतुने त्यांच्याबरोबर गेला... पण त्याचा # अंतस्थ हेतु हा वेगळाच होता हे नंतर कळले.. संयोजक वडे आणायला गेले होते ते तासभर झाले तरी त्यांचा पत्त नव्हता. सगळ्यांच्या वाटचे वडे खाउनच येतात की काय अशी शंका काहींनी बोलुन दाखविली.. आणि दीप किती # द्रष्टा ( Visionary हो नतद्रष्ट मधला नव्हे) आहे हे ही कळले...

पाय मोकळे करयला म्हणुन जरा बस मधुन उतरलो तर चौकात पाट्याच पाट्या... एक से एक पाट्या अश्या की पुणेरी पाट्याही फ़िक्या पडाव्यात.. आणि एकाच चौकात पाट्यांचि संख्या तरी किती.. एवढी posts तर 8000 ची # मनसबदारी मिळालेल्या सरदाराची पण एखाद्या बीबीवर नसतील.. ह्या सर्व पाट्या उभारायला 50000 दिवस तरी नक्की लागले असतील असा एक विचारही मनात येउन गेला.
ही पहा एक झलक
vichitra paaTyaa
तेवढ्यात चौकाच्या मध्यभागी लक्ष गेले आणि सकाळी आमचे driver साहेब आम्हाला एवढे गरागरा का फ़िरवत होते ह्याचा उलगडा झाला. चौकात एक फ़िरता फ़लक लावला होता ज्याच्या चारही दिशांना modi resort चे दिशा(भूल)दर्शक लागले होते... आणि भरीस भर म्हणुन तो फ़लक फ़िरत होता. म्हणजे आपण बुवा फ़िरता रंगमंच, फ़िरता करंडक (ह्याला तर अलीकडेच बोट पण लावले होते), फ़िरते हॉटेल असे प्रकार ऐकले वा पाहिले होते पण फ़िरती पाटी?... वा मोदींची लीला आघाद होती ह्यात शंकाच नाही..(आता ही लीला कोण डॉक. मोदींची बायको का अशी फ़ा. को. कुणी करु नये) no wonder त्या # जगंनियंत्यालाही मोदी resort ला भेट द्यायची हुक्की झाली ते.

हीच ती कर्जतमध्ये जगप्रसिद्ध असलेली फ़िरती पाटी जिने आमच्या driver साहेबांचे डोके फ़िरविले
firatI paaTI

शेवटी एकदाचे संयोजक वड्यांसकट आले आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. संयोजक उशिर होण्याचा दोष वडेवाल्यावर ढकलुन मोकळे झाले (ह्यालाच वड्याचे तेल वडेवाल्यावर वांग्यावर म्हणतात का?)

पब्लिक वडे खायला लागले आणि बस पुण्याच्या दिशेने सुसाट धावु लागली. सांस्कृतिक शिस्तीचा शीण हळुहळु सर्वांच्याच चेहर्‍यावर जाणवु लागला होताच त्यामुळे मंडळी पेंगु लागली.. एकटे घारुअण्णाच काय ते driver साहेबांना झोप येऊ नये म्हणुन कंपनी देण्यासाठी सर्वात मागच्या सीटवर बसुन गप्पा मारत होते... त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता पुणे कधी आले हे कळलेच नाही (मध्येच घारुअण्णा तळेगावलाच उतरले हेही कळले नाही).

किमयाला आम्ही बस मधुन उतरलो आणि एकमेकांचा निरोप घेत सगळेच हळुहळु पांगले. मीही हमालाचे कर्तव्य सोडुन driver चे कर्तव्य पार पाडत गाडी सुसाट घराकडे सोडली.

अश्या रितीने उल्हासपूर्ण, जल्लोशपूर्ण, खेळीमेळीच्या वातावरणात व. वि संपन्न झाला आणि एक अविस्मरणीय अनुभव कायमचा मनात कोरला गेला
(व.वि व्यवस्थित संपन्न झालेला पाहुन तिकडे संयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि इकडे माझा वृत्तांत एकदाचा पुरा झाला म्हणुन तुम्हीही तेच करु शकता..)

समाप्त .... हुश ऽ ऽ श ऽ ऽ...गंगेत घोडे नाहले


तळटीपा
वृत्तांतामध्ये व. वि ला आलेल्या किंवा येऊ शकले असते पण न आलेल्या अश्यांपेकी कुणाला जर नजरचुकीने टोमणे मारायचे राहिले असतील तर दिवे घ्यावेत ही विनंती

^ - आधीच्या भागातील तळटिपा ह्या भागालाही लागु :-)

^^ सुज्ञ मायबोलीकरांना लक्षात आले असेलच की मी कायम driver ला उद्देशुन साहेब असा शब्द वापरला आहे.. आपली ती पद्धतच आहे ज्याला त्याला त्याचा मान द्यायचा.. आम्ही असेच बोलतो बुवा.. गवंडी साहेब, सुतार साहेब, कंडक्टर साहेब, रामु(शिपाइ आमचा) साहेब... अहो नाहीतर कधी ही लोकं काम सोडुन जातील ह्याचा पत्ता नाही लागत


------

काही हितगुज

वरिल वृतांतातले सगळेच लिखाण तुम्ही खेळीमेळीने घेतलेत ह्याबद्दल आगावु धन्यवाद.. कुणालाच दुखवायचा हेतु नव्हता पण तरी कुणी दुखावले गेले असतील तर माफ़ करावे [घ्या म्हणजे आधी थोबाडीत मारायची आणि नंतर विचारायचे फ़ार लागले नाही ना?]..
संयोजकांनी वेळत वेळ काढुन, प्रसंगी पदरचे पैसे खर्च करुन केलेल्या मेहनतीमुळे आणि planning मुळे व. वि कमालीचे यशस्वी झले तेव्हा त्यांचे मन:पूर्वक आभार... तसेच ववी ला उपस्थित राहुन त्यांना भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थितांचे पण आभार.. व.वि. लाच T-Shirt समितिने T-Shirt चे वाटप ही केले.. . T-Shirt चे डिझाईन खासच आहे त्याबद्दल गंधारचे खास अभार. आणि त्याला मदत केल्याबद्दल दीप, अरुण आणि आरतीचे पण आभार.

एक मात्र राहुन राहुन वाटते की गेल्यावेळेला जेवढे लोक आले होते त्यापेक्षा ह्यावेळी जास्त लोक येतील असे मला वाटले होते (कारण दरवर्षी आकडा वाढतच जातोय असा आत्तापर्यंतचा अनुभव) पण तसे न होता संख्या तेवढीच कायम राहिली.. बरेच नविन लोक आले पण बरेच जुने लोक बर्‍याच (वेगवेगळ्या) अपरिहार्य कारणामुळे येउ शकले नाहीत.. ते आले असते तर अजुन धमाल आली असती असे वाटते.. शेवटी हितगुज गणेशोत्सवा सारखाच व.वि हा देखील मायबोलीकरांनी, मायबोलीकरांसाठी आयोजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे. तिथे नविन,जुने, कवी, साहित्यिक असलेले, नसलेले असा काहीही भेद नाही. तेव्हा त्यात सर्वच जण असा गटातटाचा बाउ न करता सामिल झाले असते तर खुप बरे वाटले असते.. आनंद हा वाटल्याने वाढतो असे म्हणतात तसेच काहीसे किंवा The More The Merrier .. असो पुढच्या वेळी नक्कीच ह्यापेक्षा जास्त लोक व.विला हजेरी लावतील ह्याची खात्री आहेच.. तेव्हा फ़ार न लिहिता (फ़ार न लिहिता?... ऐकावे ते नवलच ) मी रजा घेतो.


Kandapohe
Wednesday, August 09, 2006 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या छानच लिहीले आहेस रे! पुढच्या वर्षी (जमले तर) मी नक्की हजेरी लावीन. :-)

Giriraj
Wednesday, August 09, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


* शेरलोक (की शेक्सपियार कोण जाने) मोड ऑन
तेव्हा फ़ार न लिहिता (फ़ार न लिहिता?... ऐकावे ते नवलच ) मी रजा घेतो.>>> LT आणि मिल्या एकच तर नव्हेत?

* शेरलोक (की शेक्सपियार कोण जाने) मोड ऑफ़


Arun
Wednesday, August 09, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या : छान लिहिलं आहेस रे. :-)

Devdattag
Wednesday, August 09, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या मस्तच लिहिलं आहेस

Psg
Wednesday, August 09, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, नेहेमीप्रमाणेच छान लिहिलयस :-)

Rahulphatak
Wednesday, August 09, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, वृतांताचे तिन्ही भाग छान ! :-) ('आजून जास्त समीक्षा क्रून मी आपला # कालविपर्यास क्रू इच्छीत नाही.') :-)

Limbutimbu
Wednesday, August 09, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> गंगेत घोडे नाहले ????
ना हले? अरे आधी बाहेर काढ त्या घोड्याला गन्गेतून! पाण्यात कुडकुडेल की!
घोड्याला गन्गेत नहायला उतरवित जा रे भो!
ना हलायला उतरवलेस तर मग कस व्हायच?

गिर्‍याऽऽऽ बघुन घेईन!


Gs1
Wednesday, August 09, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मिल्या, उत्तम वृत्तांतलेखन.
अरूण, जे वविला आले नव्हते त्यांच्यासाठी बालगंधर्वला वा इतर कुठे टीशर्ट वाटपाचे ठरवा.



Raina
Wednesday, August 09, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milya.मस्तं. हसून हसून जेरबंद !}


Gandhar
Wednesday, August 09, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या नेहमीप्रमाणेच छान!!!      




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators