Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 09, 2006

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Mumbai » वर्षा विहार - २३ जुलै २००६ - कर्जत » Archive through July 09, 2006 « Previous Next »

Phdixit
Sunday, June 25, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या,
मला
phdixit@yahoo.com वर मेल करा.
आजुन कोणाची बाईकवर येण्यार असेल तरी कळवा सगळे एकत्र जाउ शकतो.
१.५ तासाचे अंतर असेल तर काही अडचण नाही.


Arun
Monday, June 26, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनी आपापली T-shirts ची order नोंदवली आहे ना ????????
मुदत संपण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत .............. :-)


Rahulphatak
Monday, June 26, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट २ :

नमस्कार मंडळी !
ह्या पोस्टमधे खेळ व कार्यक्रमांमधे सहभागी होण्याविषयी काही महत्वाच्या सूचना :

१) कृपया सांस्कृतिक कार्यक्रमासंबधीचे आपले इमेल्स
vavi_sasa@yahoo.co.in ह्या इमेल आयडीवर पाठवावेत.

२) इमेल पाठवायची शेवटची तारीख : १४ जुलै २००६.

३) कार्यक्रम व खेळांचे codes खालीलप्रमाणे :
Dumb Charades : DC
शब्दशोध : SS
Mad-Ads : MA
वैयक्तिक गुणदर्शन - Individual Performance : IP
(कविता वाचन उस्फूर्त असणार आहे. entry ची गरज नाही)

४) तुमची सहभागी होण्याची इच्छा कळवण्यासाठी कृपया खालीलप्रमाणे मधे माहिती द्या :

इमेलच्या subject मधे ‘vavi saka participation’ असे लिहा.

मेलमधे खालील माहिती द्या:
  • नाव:
  • मायबोली आयडी :
  • सहभागी व्ह्यायला आवडेल असे खेळ/कार्यक्रम (comma seperated codes उदा. “DC, IP”) :
individual performance करणार असल्यास त्याविषयी माहिती :
  • कलाप्रकार (नकला, गाणे वगैरे) :
  • सादरीकरणास लागणारा वेळ :
  • अधिक माहिती :
सूचना:
  • individual performance साठी रंगीत (आणि black & white सुद्धा) तालीम करुन वेळ मोजा आणि मग आम्हाला कळवा (थोडक्यात, अंदाजे ठोकून देऊ नका). साधारण ३ ते ५ मिनिटे असावी. जास्तीत जास्त ७ मिनिटे !
  • तुम्ही ज्या खेळांमधे सहभागी होऊ इच्छीता त्या प्रत्येक खेळाच्या चिठ्ठ्यांच्या डब्यामधे तुमच्या नावाचीही चिठ्ठी असेल. व. वि. च्या दिवशी randomly चिठ्ठ्या निवडल्या जातील व गट (teams) पाडले जातील. जर खेळांना प्रतिसाद खूपच जास्त असेल तर एका व्यक्तीला एकाच खेळात भाग घेता येईल.
  • तुमचा व्यक्तिगत गुणदर्शनाचा कार्यक्रम खरोखरच अप्रतिम असेल तरीही सहभागी होऊ शकला नाही तर आधीच माफी असावी. जास्तीत जास्त कार्यक्रम सामावून घेण्याचाच प्रयत्न राहील...
  • तुमच्या शंका, सल्ले, शुभेच्छा वगैरे वेगळ्या इमेलने कळवा. ‘vavi saka participation’ असा subject असलेल्या इमेल मधे शक्यतो फक्त तुमच्या सहभागाविषयीच कळवा.

5)खेळांविषयी माहिती :

१. dumb charades :
ह्या खेळाचे बरेच versions आहेत व सवयीनुसार मूक संदेश पोचवण्याच्या पद्धती व खाणाखूणा ह्यातही फरक असतो. ढोबळ नियम व. वि.च्या दिवशी सांगण्यात येतील तोपर्यत :
  • तुमचा ‘संदेश’ मुकाभिनयाने तुमच्या गटसदस्यांपर्यंत (team members) पोचवायचा हा मुख्य उद्देश. अर्थातच कुठलाही आवाज किंवा ओठांची हालचाल करण्यास मनाई आहे.
  • एकाच अक्षराचा अभिनय करता येणार नाही
  • http://en.wikipedia.org/wiki/Charades ह्या संकेतस्थळावर जाऊन Standard Signals ह्यामधे खालील signals बऱ्यापैकी standard आहेत तेव्हा तुम्ही ते लक्षात ठेवू शकता:
    Number of words in the title, Which word you're working on, Number of syllables in the word, "The entire concept", "Sounds like" , "Longer version , of" , "Shorter version of" , "Plural" , "Close, keep guessing!" , "Not even close, I'll start over" , "Stop, work on something else"


२. शब्दशोध :
कसे खेळायचे ?:
शब्दशोध मधे खेळाचा उद्देश तुमच्या गटसदस्याने उचललेल्या चिठ्ठीतला शब्द ओळखणे हा आहे.
प्रत्येक गटात दोन सदस्य असतील. उदा. समजा गट क्र. १ मधे ‘अ’ व ‘ब’ आहेत.
  • ‘अ’ ने चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलायची व त्यावर लिहिलेला शब्द वाचायचा (‘ब’ ला न दाखवता)
  • तो शब्द ‘ब’ ने शोधायचा/ओळखायचा आहे. त्यासाठी ‘अ’ त्याला एक clue सांगेल (असे जास्तीत जास्त ५ clues देता येतील). एकेक clue म्हणजे एक (आणि फक्त एकच शब्द असेल) जो अर्थातच चिठ्ठीतल्या शब्दाशी संबधित असेल. (समानार्थी किंवा त्याच संदर्भ/वातावरण/प्रकियेशी/यंत्रणेशी संबधित.. उदा. मूळ शब्द ‘शीतपेय’ असेल तर ‘पिणे’, ‘तहान’, ‘थंड’, ह्यापैकी काहीही clue होऊ शकतात)
  • ‘अ’ ने सांगितलेल्या प्रत्येक शब्दानंतर ‘ब’ ने चिठ्ठीतला शब्द ओळखण्यासाठी एक प्रयत्न करायचा. म्हणजेच ‘ब’ ने उत्तर म्हणून एक शब्द सांगायचा. उत्तर बरोबर असेल तर गुण मिळेल नाहीतर ‘अ’ पुढचा clue देईल. (जास्तीत जास्त ५)
उदाहरणार्थ :
एकदोनदा खेळूनच पाहूया ना म्हणजे अजून चांगले लक्षात येईल.
१. ‘अ’ ने चिठ्ठी उचलली. शब्द आहे ‘समुद्र’.
२. ‘अ’ ने पहिला clue दिला : ‘पाणी’
३. ‘ब’ ने उत्तर दिले : ‘नळ’ (आता इथे ‘ब’ चा संदर्भ/context चुकीचा आहे. पहिल्या clue नंतर हमखास असे होते. आता ‘अ’ ने त्याला योग्य वाटेवर न्यायचे आहे)
४. ‘अ’ दुसरा clue देतो : ‘वाळू’
५. ‘ब’ ची ट्यूब लखलखते (‘पाणी’ व ‘वाळू’ ह्या दोन्ही clues ची सांगड घालत) तो बरोबर उत्तर देतो : ‘समुद्र’. त्यांच्या गटाला गुण मिळाला !

आता अजून एक प्रकार पाहू :
१. ‘अ’ ने चिठ्ठी उचलली. शब्द आहे ‘मंडई’.
२. ‘अ’ ने पहिला clue दिला : ‘भाजी’
३. ‘ब’ ने उत्तर दिले : ‘बाजार’ (आता इथे ‘ब’ चा संदर्भ/context बरोबर आहे. पण सारख्याच अर्थाचा शब्द हवाय)
४. ‘अ’ दुसरा clue देतो : ‘बाजार’ ( ‘अ’ हा ‘ब’ नेच दिलेले उत्तर पुन्हा clue म्हणून देवू शकतो आणि त्यातून तो दोन गोष्टी सांगतोय. एक म्हणजे तुझा संदर्भ बरोबर आहे – थोडक्यात योग्य वाटेवर आहेस आणि दोन : आता ह्यालाच साधारण समानार्थी शब्द सांग - थोडक्यात संदर्भ बरोबर आहेच शिवाय ‘वजनकाटा’ वगैरे शब्द नसून तू मूळ शब्दाच्या अगदीच जवळ आहेस !)
वगैरे ...

नियम:
१. मूळ शब्दाचा भाग किंवा मूळ शब्द ज्या शब्दाचा भाग आहे असे clues देऊ शकत नाही (उदा. ‘उपहारगृह’ साठी ‘गृह’ हा, व ‘श्वसन’ साठी ‘श्वसननलिका’ हा clue देऊ शकत नाही)
२. एकच शब्द clue म्हणून देऊ शकता.


३. Mad – Ads (जाहिरातबाजी):
ह्या खेळात एक नियम असा की साधारण काहीच नियम नाहीत ! फूलटू कल्ला ! तुम्हाला बाकीच्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे ज्यासाठी जाहिरात करायची ती ‘उत्पादने’ व.वि. च्याच दिवशी सांगू पण तुम्हाला नक्की काय करायचे आहे तर ती जाहिरात साभिनय करुन दाखवायची आहे.
उदा. एक तरूण बसला आहे तिथून एक तरुणी येते आणि त्याला म्हणते ‘भला तुम्हारे बाल मेरे बालोंसे लंबे कैसे. हे कस काय जमवलस ! ’ मग तो तिला म्हणतो ‘ह्याच कारण लिंबाची शक्ती ! मी वापरतो लिंबाळकरांचे एन्जीन ओईल …’ आणि मग प्रेक्षकांना सांगतो ‘लिंबाळकरांचे एन्जीन ओईलच माझ्या केसाना तकाकी देते आणि पोषक द्रव्य पुरवते…’ वगैरे वगैरे.

एक किंवा अनेक प्रसंग/कल्पना तुम्ही मांडू शकता ठराविक वेळात (साधारण पाच मिनिटात). तुम्हाला विचार करायला / ड्वायलॊक लिहायला / तयारी करायला आम्ही भरपूर वेळ देऊ !


तेव्हा आता त्वरा करा !!! भराभर इमेल करा !!!
तुम्ही जितक्या लवकर आम्हाला कळवाल तसे no. of teams व इतर काही गोष्टी ठरवणे आम्हाला सोपे जाईल व खेळायला नि कार्यक्रम बघा/ऐकायला जास्त धमाल येईल !



*** पोस्ट क्र. २ समाप्त ***



Limbutimbu
Tuesday, June 27, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> ह्याच कारण लिंबाची शक्ती
अरेच्च्या? हे काय चाललय काय?
त्या टीव्हीवाल्यान्नी भान्डी घासायच्या साबणात "लिम्बाची" शक्ती वापरली, तेलकट पणा जायला!
अन हा राहुल केसाच्या तेलकट तेलात "लिम्बाची" शक्ती वापरतो? शीऽऽ याक याक थू थू, घासात लाम्बलचक गुन्तवळ आल्यागत वाटल मला!
DDD

Mruda
Wednesday, June 28, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.roadsofindia.com
कुणालाही कुठलेही रस्ते हवे असतील भारतातले तर ह्या site वर बघा...

Vavi_sanyojak
Thursday, June 29, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला उठा मंडळी वाट कसली पहाताय.. पटापट आपली इपत्रपेटी उघडा आणि व वि नावनोंदणीसाठी वर दिलेल्या माहितीनुसार मेल करा... थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत आता.. आणि केवळ नावनोंदणी करू नका तर सांस्कृतिक कार्यक्रमातही सक्रीय सहभाग घ्या... अधिक माहितीसाटी वरची सांस्कृतिक समितीची post वाचा.

Limbutimbu
Friday, June 30, 2006 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो सन्योजक, अजुन माझ्या डोळ्यासमोर ववि च चित्र इस्पष्ट होत नाही हे!
म्हन्जे काय हे ना की थित मोदि रिसॉर्ट मधे काय काय हे बघण्यासारख, चरण्यासारख, भिजण्यासारख ते ते समद लिहुन कळवा ना! थित धबधबे हेत का! स्मिमिन्ग टॅन्क हे का! ल्हान मुलान्साठी काय काय करमणुक हे! अभिरुची सारख गाडगी मडकी बनविणारा अन तो पोपटवाला अन उन्ट वगैरे हेत का! रेल्वे, घोडागादी अशी काय बाय खेळणी हेत का! अन अशा खेळण्यात मोठ्या लोकाना बसता यील का! थित गिळायची सोय काय काय हे! अभिरुचित कस मस्त पिठल भाकरी मिळती, मोदी मधे काय काय मिळत? अवो ते सान्गुन आधी लोकान्च्या तोन्डाला पाणी सुटुदे की! अन लोक पिशव्य थैल्या बॅगा घेवुन येणार, भिजणार तर मग ते ठेवायला अन कपडेबदलायला अन मेक अप करायला विन्गेत कपडे पट हे की नाही?
अन झालच तर आत्तापोतुर कितीक नामी आयडीन्नी नोन्दणी केली हे, कितीक आयडी काय काय करणार अन काय काय अपेक्षित हे अस समद समद लिवा ना! अन ते लिहिताना मागल्या वविला कन्च्या आयडीनी कन्चा कल्ला केला ते बी लिवा की! अन या बारीला कन्चा कल्ला कोण कोण करु शकेल त्याचा अदमास बी टाका की!
अन अस अजुन बरच सान्गता यील पण महत्वाच म्हन्जी, जर २३ ला पाऊस नसेल तर भीजायला शॉवरची सोय होउ शकेल का? झाली तर कशा प्रकारची असेल अस समद लिवा ना!
अन बसने जाताना कुठ कुठ फोटोजनिक दृष्य हमखास दिसतील, कुठ कुठ मिन्टा दोन मिन्टाचे स्टॉप घेणार की घेणार नाही अस समद लिवा की!
अहो उत्सुकता नुस्त्या "ववि" या शब्दाने नाही वाढत! त्याला जरा माल मसाला लावाकी! (तेवढेच मला चित्तर काढायला विषय मिळतील) :-)
काय हे ना की मीच लिवल असत पर मला "ववि" चा अनुभव अन अनुभुती नाही ना! अन अनुभव नि अनुभुती शिवाय हा लिम्ब्या एक सबुद पुढे लिहित नाही! :-)


Vinaydesai
Monday, July 03, 2006 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व. वि. संयोजक,

ICICI बँकेची परिस्थिती फारच वाईट आहे.. Acc. No घेतला तर Details Type करू देत नाही...
International Transfer ला खूप त्रास आहे..
तेव्हा आता चेकने कुणातरी मुंबईकराला पैसे पाठवतो, आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करतो...
(कोण्या गाढव IT वाल्याने System लिहिली कोण जाणे?) :-)


Moodi
Monday, July 03, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढे विचारण्या ऐवजी लिंब्या तुच का नाही जात रे वविला? दरवेळी तुझी काहीतरी कारणे असतात. जा फदीबरोबर डब्बल सिट.

वविवाल्यांना शुभेच्छा. Enjoy करा.


Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, मी आज भरीन तुझे पैसे, एकटाच येणार आहेस ना ?

Jayavi
Tuesday, July 04, 2006 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा...... धम्माल करणार म्हणजे मंडळी तुम्ही! आम्ही नाही येऊ शकणार :-( असू दे........पुढच्या वर्षी नक्की जमवायचा प्रयत्न करु. तुमच्या या वर्षा विहाराला शुभेच्छा! मस्त enjoy करा आणि भरपूर फोटो, वृत्तांत टाका.

Dineshvs
Tuesday, July 04, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय, आज तुझे आणि माझे असे दोघांचेहि पैसे भरलेत. आता यायलाच हवे तुला.

Vinaydesai
Tuesday, July 04, 2006 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks दिनेश, हा मी आलोच....
:-)

Vavi_sanyojak
Wednesday, July 05, 2006 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांनी मायबोली टीशर्ट्ची नोंदणी केली आहे, त्यांनीही त्याचे पैसे ९ जुलै रोजीच व वि संयोजकांकडे जमा करावेत.



Ajjuka
Wednesday, July 05, 2006 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे जरा जास्तच नियमबद्ध आणि हाय प्रोफाईल ववि दिसतंय.. या सगळ्यात दंगामस्ती आणि फालतू टीपी ला जागा नाही की हो संयोजक.. जाउदे.. मी आपल माझं एक मत सांगितलं.. सोडूनद्या.. तुम्ही मजा करा तसंही मी येऊ शकणार नाहीये..

Sonchafa
Saturday, July 08, 2006 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे इथे सगळे चौकोन अनि रेघा रेघा दिसताय :-(.. मला यायचे आहे ववि ला पण काही धड दिसत नाहीये

Bombayviking
Saturday, July 08, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण येणार आहे :-)

Dineshvs
Sunday, July 09, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BV ईथे येत नाहीस, तिथे तरी येतो आहेस, छान आहे.

Vavi_sanyojak
Monday, July 10, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bvk व विला येणार असाल तर वर दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या format मध्ये
varshaa_vihaar@yahoo.com ला मेल कर.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators