|
Nalini
| |
| Tuesday, April 11, 2006 - 2:53 pm: |
|
|
'आशा'.... एक नवी दिशा! गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराः | गुरुः साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः ||
मायबोलीवर, सहकारनगरात भटकताना सानिकाशी (माधवी) भेट झाली. औपचारीकता संपुन तिच्याशी मैत्रीही झाली. मग याहु आडीची देवाणघेवाण. त्यानंतरच्या होणार्या गप्पा ओघाणे आल्याच. एक दिवस चॅटिंग करताना, असाच माझ्या सासरच्या शाळेबद्दल विषय निघाला. जी शाळा, जिला मी अजुनही भेट दिलेली नाही. शाळेबद्दल ऐकीव माहीती होती. शाळेला मदतीची गरज आहे, पण कोणत्या स्वरुपाची तेही माहित नाही. असच बोलता बोलता तिला म्हणाले की मला शाळेसाठी काहितरी करायचय. शाळेसाठी आर्थिक मदत उपलब्ध करायचीय. माझ्यापरीने होईल तेवढी रक्कम शाळेला द्यायचीय. माधवीने म्हटलं मीही तुला काही मदत करु शकेन. मी तुमच्या गावच्या शाळेबद्दल अहोंशी बोलुन 'आशा' कडुन शाळेला काही मदत मिळू शकते का ते विचारते. मी फक्त एक ईच्छा तिला बोलुन दाखवली तिने तर आशेचा नविन किरणच दाखवला. किती बरे होईल ना जर काही आर्थिक मदत मिळाली तर? पण ही आशा कोण? संस्था आहे मग कुठे आहे? ती कोण चालवते? संस्थेचा हेतु काय? हे तुम्हाला पडलेले सगळेच प्रश्न मला त्यावेळी पडले. तर मंडळी Asha Eindhoven ही एक मान्यताप्राप्त समाजसेवी संस्था आहे. (Dutch Chamber of Commerce, Reg. No. 17153540). Eindhoven, The Netherland मधील काही स्वयंसेवी लोकांनी मिळुण हा एक उपक्रम चालवला आहे. Asha Eindhoven च्या जगभरातील विविध देशात पसरलेल्या ४० शाखा Asha for Education ह्या संस्थे शी संबंधीत आहे. तुमच्या ईतर प्रश्नांची उत्तरे http://www.ashanet.org/eindhoven/aboutus.html ह्या संकेतस्थळी नक्की मिळतील. माधवीने तिच्या अहोंशी, श्री. संदिपशी बोलुन सांगितले की आपण शाळेच्या मदतीसाठी आशाकडे एक रितसर अर्ज करुयात. त्यात शाळेची माहीती, शाळेची सद्य स्थिती, मदतीचे स्वरुप ही माहिती पुरवू. मग गावाकडे अनेक दा फ़ोन वर संपर्क करुन शाळेबद्दल माहीती मिळविली. गावात दोन शाळा आहेत. एक 'जिल्हा परीषदेची'. पहिली ते सातवी पर्यंत. दुसरी शाळा 'बेलापुर शिक्षण संस्थेची'. आठवी ते दहावी. श्री. भागडे सरांशी बोलुन बाकिची माहीती मिळाली ती अशी, आठवी ते दहावी असे तिन वर्ग आहेत. प्रत्येक वर्गासाठी प्रत्येकी एक खोली आहे. विध्यार्थी संख्या २२५, पैकी १४५ मुले आणि ८० मुली. शाळेला वाचनालय नाही. प्रयोगशाळा नाही. पिण्याच्या पाण्याची टाकी नाही. संडास्-मुतारीची व्यवस्था नाही. शाळेत येणारी बरिचशी मुले २ ते ५ कि.मी. अंतर पायी चालुन येतात. शाळेसाठी ज्या खोल्या आहेत त्या पत्र्याच्या आहेत, हो छत पत्र्याचे आहेच पण भिंतीही पत्र्याच्याच आहेत. संदिपने पाठवुन दिलेला फॉर्म भागडे सरांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे चंपक ( मायबोलीकर ) आणि जय ( माझे यजमान ) , यांच्या मदतीने भरुन पाठवुन दिला. तो फॉर्म रविवारच्या मिटिंगमध्ये सादर केला जाईल असे आश्वासन मिळाले. मिटिंगमध्ये ह्या अर्जावर रितसर चर्चा झाली. मदत देता येईल की नाही ह्यावर विचार करायला थोडा अवधी होता. त्याच दरम्यान माधवी आणि संदिप कायमस्वरुपी भारतात परतले. जाताना संदिपने विशाल चौधरींशी ओळख करुन दिली, जे आशा, नेदरलॅंड चे समन्वयक आहेत. संदिप भारतात पोहचला. नविन नोकरी, घरच्यांच्या भेटी ईतर कामे ह्यातुन वेळाते वेळ काढुन संदिप आणि माधवी, दोघेही २४ डिसेंबर २००५ रोजी ते सकाळीच औरंगाबादहुन श्रीरामपुरला पोहचले. तेथुन गोंडेगावला आमच्या घरी गेले. तेथुन माझे सासरे आणि भाया यांच्या सोबत त्यांनी शाळेला भेट दिली. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. शाळेतील शिक्षकांची, मुख्यध्यापकांची भेट घेतली. शाळेची सद्य स्थिती पाहिली. बर्याच गोष्टिंची शाळेला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. मात्र विद्यार्थ्यांमधली शिस्त, निटनेटकेपणा, विनयशीलता, शिकण्याची जिद्द, तसेच वडिलधार्यांच्या प्रती आदर ह्या गोष्टी त्यांच्या मनाला भावुन गेल्या. त्यांच्या भेटीचा वृत्तांत फोटोसह त्यांनी आशाकडे पाठवुन दिला. त्यावर चर्चा होऊन शाळेसाठी मदत करणे गरजेचे आहे हा एकमताने निर्णय घेण्यात आला. शाळेकडुन शाळेला लागणार्या मदतीचे अंदाजपत्रक मागविण्यात आले. शाळेला पक्की ईमारत असणे गरजेचे आहे. एक वाचनालय असावे. एक सुसज्य प्रयोगशाळा असवी. क्रिडांगण हवे आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी टॉयलेटची गरज आहे. त्यांना बसायला पुरेसे बाकडे असायला हवे. शिक्षकांना एक स्टाफ रुम असावे.
ह्या सर्व खर्चाचा आढावा घेतला तर आकडा ७-८ लाखाच्या घरात जातोय. काळ्या मातीत बांधकाम म्हणजे ते पक्के असायला हवे. त्या दृष्टिकोनातुन बांधकामालाच पाच ते साडेपाच लाख रुपये हवे आहेत. एवढी रक्कम आशाला एकटीला पेलवणारी नाही. तिन लाखांपर्यंत त्यांनी तयारी दाखवली. जयने गावात ग्रामसभा आयोजित करुन गावकर्यांपुढे मदतीचे आवाहान केले. त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला. प्रत्येक गावकर्याने ऐपतीप्रमाणे वर्गणी जमा करायचे कबुल केलेय. आबांनी ( माझे सासरे), सांगितलेय सर्वात जास्त वर्गणी ज्याची असेल त्याहुन हजार रुपये मी जास्त देणार आहे. अशाप्रकारे ५० ते ६० हजार रुपये गावातुन उभे रहाणे शक्य आहे. शिक्षण संस्थेचीही काही मदत असणार आहे. शाळेला छत संस्था देणार आहे. बांधकामासाठी ट्रॅक्टर आणि पाणी देण्याचे दादांनी ( माझे भाया) कबुल केलेय. शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तके आपण देऊ हे आश्वासन जयने दिलेय. एक लाखाची रक्कम काम सुरु करण्यासाठी आशाकडुन मिळालिय. पाडव्याच्या मुहुर्तावर कुदळ पडलिय. बांधकाम सुरु झालेय. शाळेच्या पुढच्या शैक्षणिक वर्षी विद्यार्थी नविन ईमारतीत बसणार आहेत. आता त्यांना ऊन्हाच्या झळाया लागणार नाहीत. माझ्या सासुबाई ज्या चौथी पास आहेत त्या आठवड्यातुन एक दिवस शाळेत जाऊन श्लोक शिकवणार आहेत. मुलांना वृक्षरोपनाचे महत्व पटवुन देणार आहेत.
हा लेख ईथे लिहिण्याचे कारण म्हणजे, ह्याच निमित्ताने मला सगळ्यांचे आभार मानायचेत. सौ. माधवी बक्षी. श्री. संदिप बक्षी. श्री. विशाल चौधरी. श्री. बाबासाहेब फोपसे. (सासरे) श्री. सर्जेराव फोपसे. (भाया) श्री. भागडे सर. समस्त ग्रामस्थ,गोंडेगाव. श्री. जयवंत फोपसे. चंपक. सर्वात मोलाचा वाटा उचलणारा: आशा एंथोवन चा प्रत्येक सभासद, जो आपल्या पगारातला एक ठराविक हिस्सा आशाला अर्पण करतो. फंड उभारण्यासाठी विविध उपक्रम राबवतो. तसेच माझ्या लाडक्या मायबोलीचे, जिने माझी आणि माधवीची मैत्री घडवली. मी आपणा सर्वांचे मनापासुन आभार मानते.
सरतेशेवटी, मला मायबोलीकरांना विचारायचेय की तुमच्या माहितीत एखादी संस्था आहे का जी अपुरे पडणार्या मदतनिधीस हातभार लावु शकेन. खेडोपाडी अशा अजुन खुप शाळा आहेत ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे. सर्वांचे शतशः आभार. - नलिनी
|
Chinnu
| |
| Tuesday, April 11, 2006 - 4:25 pm: |
|
|
एका सत्कार्याबद्दल नलु तुझं आणि इतर सर्व लोकं, ज्यांचे पण इथे हात लागले, त्या सर्वांचे किती कौतुक केले तरी कमीच पडेल! just great! keep it up.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:16 am: |
|
|
नलिनी, प्रत्येक सुजाण नागरिकाने, आपला खारीचा वाटा ऊचलला तर काहिहि अशक्य नाही.
|
Suniti_in
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:56 am: |
|
|
अशा प्रयत्नातूनच शाळेचा उत्कर्ष साधावा अणि तेथून अनेक गुणी विद्यार्थी बाहेर पडावे अशी इच्छा व्यक्त करते. काही माहिती मिळाल्यास किंवा मदत करण्याचा प्रयत्न जरूर करेल. आशा, सानिका, गावकरी, इच्छुक मदतनीस या सर्वांच्या कार्यातून नक्कीच नवी दिशा मिळेल.
|
Moodi
| |
| Wednesday, April 12, 2006 - 8:19 am: |
|
|
नलिनी तुझे अन सानिका तसेच इतरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खारीचा वाटा तर सर्वजण उचलण्याचा प्रयत्न करतीलच.
|
Chafa
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:20 pm: |
|
|
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! Asha for Education च्या मदतीने साकारलेले हे सत्कार्य वाचून आनंद झाला.
|
Shyamli
| |
| Wednesday, April 12, 2006 - 1:28 pm: |
|
|
मन:पुर्वक अभिनन्दन आणि शुभेच्छा
|
Seema_
| |
| Wednesday, April 12, 2006 - 4:48 pm: |
|
|
नलिनी अभिनंदन आणि असंख्य शुभेच्छा . आम्हीही असाच काहीसा प्रयत्न आमच्या गावासाठी करित आहोत . पण नेमकी दिशा मिळत नव्हती . बघु , आता त्या site वर जावुन पहाते आम्हाला काही मदत घेता येते का ते . धन्यवाद माहिती बद्दल .
|
Megha16
| |
| Thursday, April 13, 2006 - 6:59 pm: |
|
|
नलीनी,सानीका,जय,संदीप,चंपक तुमच जितक कोतुक कराव तितक कमीच आहे. तुमच्या या परिश्रमा मुळे गावातल्या लोकांना आणी शाळेत शिकणारया मुलांना एक नवीन दिशा मिळाली.
|
Nalini
| |
| Friday, May 05, 2006 - 3:47 pm: |
|
|
चिनु, दिनेशदादा, सुनिती, मुडी, चाफा, श्यामली, सिमा, मेघा तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार. मला सांगायला अत्यंत आंनद होतोय की शाळेचे बांधकाम अगदी जोरात सुरु आहे. कमी पडत होती तिही रक्कम आशाच्या मदतीने उभी राहिलीय. नेमस्तकांनी परवानगी दिली तर मी बांधकाम पुर्ण झाल्यावर जुन्या तसेच नविन शाळेचे फोटोही ईथे टाकेन.
|
Moodi
| |
| Friday, May 05, 2006 - 4:43 pm: |
|
|
नलिनी तू, जयवंत, तुझे नातेवाईक तसेच माधवी, संदिप यांचे पण हार्दीक अभिनंदन. तपश्चर्या फळाला आली. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 06, 2006 - 4:10 pm: |
|
|
नलिनी, फोटो तु अवश्य प्रसिद्ध कर. असेच आम्हाला अभिमान वाटेल, असे कार्य तुझ्याहातुन कायम घडो.
|
Hems
| |
| Monday, May 08, 2006 - 6:54 am: |
|
|
नलिनी आणि सानिका .. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !
|
Arch
| |
| Monday, May 08, 2006 - 12:47 pm: |
|
|
अरे वा! नलिनी आणि सानिका केवढा मोठ्ठा प्रकल्प तडीला नेलात. तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन. आणि आशाला त्यांच्या प्रत्येक कामात शुभेच्छा
|
Nalini
| |
| Monday, May 08, 2006 - 1:05 pm: |
|
|
आर्च, हेम्स धन्यवाद. आर्च, अगं तडीला कसले नेले. ही तर अजुन सुरुवातच आहे. अजुन खुप शाळा आहेत ज्यांना आपली गरज आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, मार्गदर्शन आणि साथ असेल तर नक्कीच ध्येय गाठता येईल.
|
नलिनी, अभिनंदन, आणि खरच खूप शुभेच्छा.. नक्कीच फ़ोटो बघायला आवडतील
|
Ashwini
| |
| Tuesday, May 09, 2006 - 2:42 am: |
|
|
नलिनी, अभिनंदन, शुभेच्छा आणि... धन्यवाद. मुळात हा विचार तुझ्या मनात आला आणि तो तू तितक्याच समर्थपणे तडीस नेलास याबद्दल. नाहीतर अशी स्वप्ने पाहाणारे अनेक जण असतात. ती स्वप्नं वार्यावर विरून जाण्याच्या आत त्यांना मूर्त रूप दिल्याबद्दल लाखो धन्यवाद.
|
Nalini
| |
| Tuesday, May 09, 2006 - 12:31 pm: |
|
|
रचना, अश्विनी धन्यवाद.
|
Savani
| |
| Tuesday, May 09, 2006 - 12:44 pm: |
|
|
नलिनी, माधवी, संदीप, जय, आणि इतर सगळ्यान्चे हार्दीक अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा!! नलू, फोटो पहायला नक्कीच आवडतील.
|
Nalini
| |
| Tuesday, May 09, 2006 - 2:58 pm: |
|
|
सगळे फोटो ईथे टाकण्यापेक्षा फोटोची लिंक देत आहे. http://pg.photos.yahoo.com/ph/nalinijay2001/album?.dir=6845re2&.src=ph&store=&prodid=&.done=http%3a//pg.photos.yahoo.com/ph/nalinijay2001/my_photos फोटो पाठविल्याबद्दल संदिपचे आणि माधवीचे खास अभार. सावनी, धन्यवाद.
|
|
|