Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सेवाभावी संस्थेचा एक अनुभव ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » सेवाभावी संस्था /NGO » सेवाभावी संस्थेचा एक अनुभव « Previous Next »

Dakshina
Friday, May 05, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा B.B. especially NGOs बद्दल चांगलं सांगणारा आहे हे एकूण वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं basically मी सामाजिक क्षेत्रात काम करत नाही पण उत्सुकतेपोटी कधी कधी अशा संस्थांना भेट देते आणि शक्यं असेल तर त्यांची शिबीरं attend करते.

२आठवड्यांपुर्वी अशाच एका संस्थेत जाण्याचा योग आला जिथे सगळी मुलं HIV + आहेत. पन्नास एक मुलं असतील. सगळ्या वयोगटातली... अगदी दोन अडीच वर्षापासून ते बारा, पंधरा... अशी.

मला त्यात बर्‍याच गोष्टी जाणवल्या..(अत्यंत सामान्य दृष्टीकोन असूनही)या मुलांचं आयुष्य आनंदात कसं जाईल यापेक्षा निव्वळ एका ओझ्यापोटी हे काम तिथले लोक करतात असं जाणवलं. कारण तिथे काम करणार्‍या स्त्रिया या सुद्धा positive आहेत. ज्यांना कोणी नाही. त्या स्त्रियांना पगार दिला जात नाही. खाणं, पिणं, औषधपाणी आणि वरती फ़क्त १०० रुपये.

ही संस्था पुण्यापासून अत्यंत लांब आहे. म्हणजे तिथल्या मुलांना आणि त्या स्त्रियांना कोणतंही exposer नाही. आम्हाला असं कळलं की त्यांना कधी कधी नाटक, सिनेमा, सर्कस वगैरे दखवलं जातं. पण इतर social activities काही नाहीत. संस्थेचा परीसर अत्यंत रुक्ष, कोरडा आणि रखरखीत आहे. तिथे कोणतीही सोय नाही. म्हणजे थोडक्यात अज्ञातवासात गेल्यासारखंच वाटलं मला.. मुलांना चित्रं काढायला रंग आहेत, खेळणी आहेत, पण मायेचा ओलावा नाही. तिथे त्यांना शिकवायला अर्धवेळ जी बाई आहे ती नीट बोलूच शकत नाही सतत आवाज फ़क्त चढलेला, हात उगारलेला...

या मुलांना तपासायला तिथे जवळ जवळ पुर्णवेळ एक lady Doctor आहे ही एक गोष्टं अत्यंत चांगली आहे. पण स्वच्छता जितकी असायला हवी तितकी नाही. ८०% मुलांचे कान फ़ुटलेले, हातापायावर जखमा....शिवाय इतरही बरेच शारीरीक त्रास असावेत असं वाटलं.

मुलांचं routine काय? तर उठणे, योगासने करणे, नाश्ता, चहा, जेवण, अंघोळ इत्यादी मग शाळा... पहिल्या इयत्तेपासून जी काही इयत्ता आहे त्या सर्वांना शिकवायला एकच बाई ती पण अशी...

मी जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा किमान २० / २२ मुलं माझ्याभोवती गोळा झाली, माझा हात, dress , ओढणी पकडली आणि मला बरोबर घेऊन गेली. बिनधास्त माझ्या मांडीवर बसली.. खूप खुष वाटली मला... आणि प्रश्नं पडला की यांना कोणी मांडीवर घेत असेल का? एखाद्या मुलाला झोप येत नसेल तर तिथली care taker त्या मुलाला जवळ घेत असतील का?

फ़क्त, २ वेळा जेवण, औषध, कपडे इतकीच त्या मुलांची गरज आहे का? त्या मुलांबरोबरच तिथल्या स्त्रियांच्या पण खूप गरजा आहेत. एकूण ५५ मुलांच्या मागे फ़क्त ५ की ६ बायका आहेत.(मला नक्की आकडा माहीती नाही.) स्वयंपाकपाणी, स्वच्छता सगळं त्याच करतात. त्या बायका पण कमी वयाच्याच आहेत फ़ार तर पस्तीशीच्या असतील. त्यांच्याही बर्‍याच गरजा असतील, शारीरीक, मानसीक, आर्थिक त्या दृष्टीने त्यांनी काही हालचाल केली तर त्यांना सरळ बाहेरचा रस्ता.....
मी ऐकून अतिशय सुन्न झाले.

त्या बायकांना कोणतही Training दिलं जात नाही, त्यांना Motivate केलं जात नाही. ती सगळी निष्पाप मुलं ज्यांना माहीती पण नाही की ती अजुन किती वर्षं, दिवस जगणार आहेत. जाताना सोबत कोणत्या आठवणी घेऊन जाणार? ते रुक्ष वातावरण? ती मारकुटी बाई? शरीरावरच्या जखमा? वेदना? काय? काय?

ह्या संस्थेच्या सांचालिका होत्या त्यांचं नुकतंच निधन झलंय. या संस्थेसाठी त्यांनी पुर्वी खूप काम केलेलं असल्यामुळे Funding खूप आहे.
खूप मोठ्या मोठ्या रक्कमा Fund म्हणून देणारे लोक हे लक्षात घेतात का की ते जो पैसा देतात त्याचा विनियोग कसा केला जातो? जेव्हा संस्थेचं registration होतं तेव्हा अमेरिका, लंडन यासारख्या देशातले लोक शोधून अशा संस्थांना Funds देतात. पण प्रत्यक्षात येऊन कधीच बघत नाहीत की हे काम योग्यं प्रकारे सुरु आहे की नाही?

मी पुर्णपणे संस्थाच वाईट आहे असं म्हणत नाहीए. may be system चुकीची असेल. सगळ्याच संस्था वाईट आहेत आणि चुकिच्या पद्धतीनं काम करतात असं मला मुळीच म्हणायचं नाहीए. त्यांचे ही internal बरेच problems असतील, जे आपल्यापर्यंत कधी पोचले नसतील.

माझ्या मते त्या मुलांआधी तिथल्या स्त्रियांबरोबर कम करणं जास्त गरजेचं आहे कारण त्या स्वतः खचलेल्या आणि आयुष्याचा रस गेल्याप्रमाणे आहेत. मुलांना पण जास्तीत जास्त आनंद कशातून प्राप्त होईल हे पाहीलं पाहीजे.

काही Software कंपनीतली लोकं (ज्यांच्याकडे खूप पैसा असतो असे) चला काहीतरी समाजकार्यं करू म्हणून या संस्थेला भेट देऊन गेले, पण त्यात Consistancy खूप कमी होती.

मला माहीत आहे की मी पण त्यांच्यापैकीच एक होते. पण काही करू शकत नाही ही खंत आहेच.


Rachana_barve
Friday, May 05, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thats so sad दक्षिणा. खरच काहीतरी करावस वाटत पण नेमका मार्ग समजत नाही. I am sure की माझ्यासारखी कित्तीतरी जण असतील की ज्यांना मनातून खुप काही करावस वाटत पण नक्की काय आणि कस करायच ते न कळल्याने त्यातल्या त्यात सोप्पा मार्ग निवडला जातो तो म्हणजे डोनेशन. पण खरच आवडेल अस काहीतरी करायला. निदान अशा संस्थांची माहिती मिळते हे खूप झाले.. Thanks

Ashwini
Saturday, May 06, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या संस्थेची आणखी माहिती देऊ शकशील दक्षिणा? नाव, पत्ता इ. म्हणजे ज्यांना कुणाला भारतात गेल्यावर तिथे भेट द्यावीशी वाटेल त्यांना जाता येईल.

रचना, तू म्हणतेस ते अगदी पटतय. काहीतरी करायला हवय हे बर्‍याच जणांना वाटत असतं पण मार्गच सापडत नाही. डोनेशन हा अतिशय आवश्यक तरीही अतिशय बेसिक उपाय झाला. आणि मला नेहमी भेडसावणारा प्रश्न म्हणजे त्यातल्या किती पैशाचा विनियोग त्या पिल्लांसाठी खरच होत असेल? मग आपण काय करू शकतो?

मला वाटतं care givers वर लक्ष केंद्रीत करणं महत्वाचं आहे. त्यांना ट्रेन करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. आपण जेंव्हा भारतात जातो तेंव्हा अश्या संस्थांना वरचेवर भेटी देणे, एखाद्या विश्वासू व्यक्तीला पैसे देवून रोज, आठवड्यातून, महीन्यातून(आपल्याला परवडेल तसं) अश्या संस्थांमध्ये जाऊन पडेल ती कामे करण्याची, मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी द्यावी. यात नुसत्या डोनेशनपेक्षा जास्त गोष्टी involve होतात. अशी विश्वासार्ह व्यक्ती शोधून काढून तिची या कामावर नेमणूक करणे. तिचे references स्वतः चेक करणे. तिला routine reports पाठवायला सांगणे. संस्थेचे लोक पण ही माहिती पाठवू शकतात. पण ती कितपत खरी असेल ते पडताळून पाहाता येणे थोडे कठिण आहे. आपण नेमलेली व्यक्ती पण प्रामाणिक असेल अशी खात्री नाहीच पण आपल्यापरीने आपण सर्व चौकशी करावी.

जगात एकही ठिकाण असे नाही की जिथे लहान मुले दुःखी नाहीत. संपन्न म्हणवणार्‍या अमेरिकेतसुद्धा लाखो मुलं foster care मध्ये राहातात आणि त्यापैकी ३० % पेक्षा जास्त mentally, physically किंवा emotionally disabled असतात. माणसं एव्हढी क्रूर का वागतात? आणि त्यापेक्षा असहनीय प्रश्न म्हणजे त्यांना विरोध कुणीच कसा करत नाही? ज्यांची काळजी घ्यायला कुणी नाही, ज्यांची काळजी त्यांना स्वतःलासुद्धा घेता येत नाही अश्या निष्पाप कोवळ्या जीवांचं संरक्षण कसं करायचं? खूप कठिण प्रश्न आहे.

हा फक्त एक विचार झाला. कितपत workout होईल माहीत नाही. अश्या कल्पना कुणाला असतील तर please इथे लिहा. कदाचित यातूनच काहीतरी मार्ग निघेल.


Dineshvs
Saturday, May 06, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे एकदा असे सुचवले होते, कि आपल्याकडे अश्या काहि मायबोलिकरिणी आहेत, ज्यांचे बोलणे ऐकत रहावे असे असते. क्षिप्रा, भाग्यश्री, सई हि काहि नावे.
या मैत्रीणीनी आपल्या आवाजात, कथा, पुस्तकातले ऊतारे, कविता अश्या रेकॉर्ड केल्या तर खुप छान होईल.
या सगळ्याजणींच्या आवाजात एक आश्वासकता आहे. असा माझा तरी अनुभव आहे. आणि त्या मुलाना पण तसाच अनुभव येईल.


Dakshina
Monday, May 08, 2006 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना..

त्या संस्थेचं नाव लिहीणं मला योग्या वाटलं नाही गं, म्हणून मी लिहीलं नाही.
आपण त्यांच्यासाठी करावं ही भावना जरी चांगली असली तरीही त्यासाठी त्या संस्थेचे ट्रस्टी आपल्याला कितपत सहकार्य करतील याबद्दल शंकाच आहे.
थोडक्यात मला अस Feeling आलं होतं की जसं एखादा मुलगा आपला वडीलोपार्जित धंदा जसा मनाविरुद्ध चालवतो.. तसंच थोडसं.

भेट देणं, Donetion हा त्यांना Problem नाहीए. त्यांच्यासाठी Consistently काम करणारं, त्यांना प्रेम देणारं कुणीतरी हवं.

कशावरून त्या मुलांच शोषण होत नसेल? ह प्रश्नं तर मला सगळ्यात पहिल्यांदा पडला होता.

एक तर त्यांना इतक्या दूर जंगलात नेवून टाकलं आहे. की असं वाटतं आपण जर २ दिवस जरी तिथे रहू शकलो तरी बक्षिस मिळवू.. किंवा वेडं तरी होवू.

दिनेश,

मी सईशी पण याविषयी बोलले, ती पण ऐकून सुन्न झाली. तिने ही मला तुमचे, गिरीराज, GS , आरती आणि इतर अनेक नावं सुचवली आणि आपण काहीतरी करू शकतो हे ही सांगितलं. हे सगळं गेलेल्या २ दिवसात झालं त्यामुळे आज लिहीतेय.

माझ्या डोक्यात एक विचार आला की समजा आपण एक आपला Group form केला आणि संबंधितांची परवानगी घेऊन आठवड्यातून एकदा किंवा २ आठवड्यातून एकदा म्हणा जर तिथे भेट दिली आणि आपल्या परीने त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न केला तर?

म्हणजे आपण आपल्या खर्चाने तिथे जायचं, थोडा खाऊ न्यायचा, खेळणी न्यायची, चित्रं काढायला कागद, रंग... may be त्यातून त्या मुलांची assessment पण होऊ शकेल.

एखाद्या आठवड्यात रोपं न्यायची, आणि प्रत्येक मुलाला एकेका रोपाची जबाबदारी द्यायची.. आणि रोज पाणी घालून काळजी घ्यायला सांगायची... हळू हळू तिथल्या बायकांशी संवाद साधायचा... त्यांचे प्रश्नं जाणून घ्यायचे आणि जमेल तसं आणि जमेल तितकी सुधारणा करायचा प्रयत्न करायचा...

तुमच्याकडे काही चांगल्या कल्पना असतील तर सांगा...


Kandapohe
Monday, May 08, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, प्रयत्न स्तुत्य आहे. मला असे वाटते की काही लोक्स इच्छा असुन सुद्धा यात सहभागी होउ शकणार नाहीत. त्यामुळे आधी ज्यांना यात इंटरेस्ट असेल त्यांची नावे गोळा कर. तसेच दर महिन्यातील एक दिवस ठरवुन त्या दिवशी ज्यांना जमणार असेल ते नक्कीच मदत करु शकतील. माझे नाव ऍड कर.

मला वाटते त्याची माहीती तु इथेच मायबोलीवर देवु शकशील.


Dakshina
Monday, May 08, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद विनायक,
अजुन तरी ही कल्पना डोक्यातच आहे.. कितपत Workout होईल माहीती नाही....
त्यामुळे मी तुला वेळोवेळी update करीन.
तु इथे कधी येणार आहेस?


Rachana_barve
Monday, May 08, 2006 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा छान कल्पना, मला पण आवडेल ह्यात सहभागि व्हायला. सध्या भारतात नसल्याने मी अर्थिक सोडून बाकी कसली मदत करु शकत नाही. ईथे US मधल्या big sister/brother मध्ये मी पुर्वी भाग घेतला होता.
पण सध्या काहीच जमत नाहीये.
असो, पण तिकडे आल्यावर नक्कीच भेट द्यायला आवडेल. आपल्याला अशा संस्थांचे कामकाज बदलून टाकणे जमणार नाही पण atleast आठवडा दोन आठवड्याने कोणीतरी ग्रुपमधल्याने भेट देऊन त्या मुलांच्याबरोबर एखादा / अर्धा दिवस घालवणे, त्यांना गोष्टी कविता वाचून दाखवणे, गाणी म्हणणे...जमल तर छोटी छोटी पुस्तके, खेळणी अथवा थोडा खाऊ भेट देणे etc किंवा ती मुल बाहेर हिंडू फ़िरू शकत असतील तर एखादी transport ची व्यवस्था करून लहानशी सहल. ज्यांचे वाढदिवस असतील त्यांचे वाढदिवस केक कापून, फ़ुगे नेऊन साजरे करणे etc etc आवडली तुझी कल्पना.. मला खरच आवडेल ह्यात सहभागी व्हायला :-(


Sapna
Monday, May 08, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा मीहि जानेवारी पासुन पुण्यात असेन मलाही तुमच्या ग्रुप्मधे सहभागी व्हायला आवडेल.

Ashwini
Tuesday, May 09, 2006 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, दक्षिणा,
अतिशय सुरेख कल्पना आहे. एव्हढं केलं तरी त्या अजाण मुलांच्या चेहर्‍यावर किती हास्य फुलेल.
दक्षिणा, खरच असा उपक्रम सुरू केला तर यासाठी आर्थिक सहकार्य करायला खूप जण पुढे येतील. भारतात गेल्यावर प्रत्यक्ष सहभागीपण होता येईल.

सुरूवात याने करता येईल. मग जमेल तसे वाढवू या.


Manmouji
Tuesday, May 09, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा माझे पण नाव घे. काही ठरले तर कळव.

Shonoo
Tuesday, May 09, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा
अमेरिकेत Big Brothers Big Sisters नावाची एक संस्था आहे. त्यान्ची पद्धत पण बघण्यासारखी आहे.
www.bbbsa.org या साइटवर अधिक माहिती मिळू शकते.

Nalini
Tuesday, May 09, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, सुरेख कल्पना आहे. शिवाय तु एकटी नाहिस. तु सुरुवात कर. ह्या वाटेवर तुला आमच्यासारखे बरेचजण भेटणार आहेत. मीही भारतात परतले कि खारीचा वाटा घेईल.



Dakshina
Wednesday, May 10, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. मी पण माझ्या जवळच्या मित्र - मैत्रिणिंना विचारलं तर ते ही तयार आहेत.

माझ्यामते आत्ता भारतात Available असलेल्या लोकांने एक छोटीशी meeting घेऊन पहिल्यांदा agenda ठरवला पाहिजे.

माझी एक मैत्रिण Child Psychologist आहे आणि तिने बरिचशी शिबिरं स्वतः एकटीने Handle केलेली आहेत. ती पण यात आपल्याला मदत करायला तयार आहे.

तुमच्या काही अजुन चांगल्या कल्पना असतील तर pleas मल मेल करा.


Storvi
Friday, May 12, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा. माझी एक मैत्रीण भारतात परत गेली. इथे येण्यापुर्वी तिने अश्या प्रकारचे काम केलेले आहे आणि आता परत तसे काम सुरु करायची इच्छा आहे तिची. तुला हवे तर मी तिची माहिती पाठवेन.

Dakshina
Monday, May 15, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्तोरवी,

नेकी और पुछ पुछ!
लवकर पठव...


Hasri
Tuesday, September 26, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dakshina,
tuzya anubhavabaddal vaachale
mala pan ashi madat karaayalaa avadel maaze pan naav add kar.
maza pan anubhav lihite.
mi mumbaimadhe saadhaaran 15 varshanpurvi "vaasalya" mhanun anaathaalayaata gele hote.
tehva ti santashaa agadich prathamiik swarupaat hoti.
kanjurmaarg laa ekaa flat madhe tya santhechi survaat zhaali. tya veli tya "flathmadhe mi jaun aale .
tehvhaachaa anubhav pan khupach manala klesh denaaraach tharlaa hotaa.

tu mhnaalis tya pramaane mee gele tar lagech ti mul dhaavat yeun mazayaa maanadivar basli.
adgi 1 1/2/ varhsnpasun 5 varshanparyant hoti. mi gelyaa gelyaaa mazha "taabaa" gheun malaa panla lagech kahi naa kahi saangailaa laagli. tyaannaa pan khup boliche aste pan tyanche ikanare kon aste?. tithlyaa baikaa kaamaat magna astat.
pan thilaya dekhabhaal karnarya bayaakaa matra khup changalyaa hotyaa.
agadi lahan lahan 1 divasacha balaan pasun 10-11 mahinyanparyant
jyanna chalta yet nahi ashi baala pan hoti.

mi sakaali glele hote lahaan baalaancha angholi chaalalyaa hotya.

mag tithalyaa santha chaalakaanni saangitale. ki tumhi jashi aaaattaa paishachi madat deu karataa tashi aamhaalaa kaamaachi pan madat paahije ahe.
mhanje tumhi suttichaa divashi yeun tyaa mulaanna goshti gaani shikau sahkta.parat vastu swarupat madat karu shakta. lahaan mulaansathi khaahu, khelani, dudha etc.

tya veli mi paishanchi madat keli.
ajunahi dar varshi mi paishaanchich madat karte
pan mala "santhemade" jaun kamachi madat karne kahi jamle naahi.

aple gharguthi problems asatat+office karun aaplyalaa shakya hotech ase nahi.
aatta tyaa vatsalya "santhechi" snaaanpaadyaala mothi building zaali aahe.

thodkyaat kai aaplyalaa khup kaahi karaayache aste pan ekatyaane jamata naahi.
tyaa mulech ashaa padhatine "group" jar form kela tar "madata karne khuupa "anandadayi" tharel yevadhe matra nakki.

tehvaa mi pan tayaar aahe.
devnagri madhe lihit hote pan kahi tari problem ala aso

Ashwini
Wednesday, September 27, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, पुढचे updates काही असतील तर दे ना.

Sunidhee
Tuesday, November 21, 2006 - 10:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा आणि हसरी तुम्ही दोघींनी छान उपक्रम सांगितलेत. पण पुढचे पण लिहा. थांबु नका. हसरी तु त्यांच्या नविन इमारतीत भेट देऊन आलीस का? आता त्याना मदतीला जास्त माणसे मिळाली का? मूलांची परिस्थिति काय आहे आता?
दक्षिणा, तु लिहिलेस कि त्या संस्था चालकाना उत्साह नसावा. तर तुम्ही मन्डळी त्यांच्याशी बोलुन पाहिलेत का? नसेल तर बोलुन पहा. काय माहित त्याना पटेलही तुमचे. नाही तर शबाना आझमी सारख्या (तिच असे नाही) HIV+ लोकांसाठी काम करणार्‍या कोणत्या तरी प्रसिध्ध व्यक्तीच्या कानावर घालावे (खरं तर कोणत्याही क्षेत्रातली प्रसिद्ध व्यक्ती) आणि ती व्यक्ती तयार असेल तर तिला-त्याला मदतीस घ्यावे निदान बोलणी करण्यासाठी तरी. इतक्यासाठीच की, कदाचित चालक लवकर विचार करतील, कोणी famous व्यक्तीने विचारले की कामं जरा लवकर पुढे पळतात तसे.. तुम्ही कोणी बोलायला लायक नाही अश्या अर्थानी नाही. पण काही करुन चालकांना पटवता आले तर खुप सोपे होईल (की एव्हाना त्याना पटले आहे?)
सध्या काय चालू आहे लिही ना. तुम्ही पुढे काय केलेत?
मी कायमसाठी भारतात परतले की मी पण येइन. सध्या फक्त आर्थिक मदत करु शकते. कोणाला काही माहिती असेल तर बोला.. पण एक विचार मात्र असं काम करणार्‍या सर्वानी करायला हवा, कि ह्याने आपण स्वत: depress होण्याचा पण चान्स असतो, तर आपले मन पण खंबीर ठेवायचा प्रयत्न केलाच पाहीजे.


Saee
Thursday, December 28, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तुला पुरेशी नावं मिळालेली दिसत नाहीत अजुन...

Neo_anderson
Wednesday, February 07, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सईनंतर कोणाकदून कहिच बातमी नही! असो

ही संस्था कोणती याचा अंदाज अला आहे मला. गेले बरेच महिने आम्ही य मुलंच्या सहवासात अहोत.

ही मुले फ़ार लांब राहतात पण त्याना कोणी शहरात घेतलेही नाही!! याना एकाच वर्गात बसून शिकावे लागते अणि तेही खराब शिक्षिकेकडून... पण चांगले शिक्षक ईथे येत पण नहीत.

तिथे कही प्रॉब्लेम्स अहेत कुठे नसतात? पण बरेच लोक त्याना मदत करायला पुढे येताहेत! अणि हे सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही!

आमच्याकडे कल्पना अहेत, पण माणसे नहीत... पण कदाचीत ईथे बरेच लोक ईच्छुक आहेत. :-)

अशाच सगळ्याना एकत्र आणण्यसाठी याच ठिकणी एक लहानसा कार्यक्रम करत अहोत तुम्हापैकी कोणि येऊ शकले तर उत्तम होइल.

९८८१२४१०८० येथे मला फोन करा मी बाकीची महिती देईन.





Sameerdesh
Saturday, February 10, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, सई, तुम्हाला मेल पाठवली आहे. please reply

Aaspaas
Saturday, February 24, 2007 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ करा, मधेच बोलतोय आणि अधिचा संवादही पूर्ण वाचलेला नाही. पण तुमच्या प्रयत्नांना यश येवो हीच इछा. मला वाटते, तुम्ही जी गोष्ट सर्वात चांगली करु शकता आणि तुम्हाला ज्यामधे रस आहे त्याच गोष्टीत त्यांना मदत केल्यास योग्य होईल. गरजेचे नाही सगळ्यांच्या रस असलेल्या गोष्टी एकच असाव्यात. ज्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचे योगदान देऊ शकाल, तुमच्या वेळेनुसार. तुमची निराशा ही होणार नाही.



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators