|
Mrinmayee
| |
| Monday, February 19, 2007 - 8:57 pm: |
| 
|
प्रिय.. , नेहमीप्रमाणे आजही, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही मायन्याशी अडखळतेय मी. अशी कित्येक पत्र पाठवलीत. दरवेळी तुमच्याकडून तत्परतेनी उत्तर आलं. यावेळी ती अपेक्षा नाही. आज सकाळपासून आपल्या एकत्र आयुष्याचा सारिपाट डोळ्यांपुढे उलगडलाय. चुकलेल्या चाली, सावरून घेतलेले डाव सारं काही. नवं नवरीपण जाऊन, पुरती गृहिणी होऊन फुललेल्या संसारात तुमच्याबरोबर कधी रमले ते कळलं नाही. माझ्या भित्र्या, संकोची स्वभावाला तुमच्या निर्भिड, रोकठोकपणाचं balance out , हो हा देखील तुम्हीच शिकवलेला शब्द, करणारं व्यक्तिमत्व सावरून घेत गेलं. 'घरात कुठली भाजी करायची' पासून ते 'नवं घर घेण्यापर्यंत' प्रत्येक निर्णयात तुमची गरज लागली मला. स्वत:चं वेगळेपण असावं असं वाटलंच नाही. त्यावाचून काही अडलंदेखील नाही. ही अशीच साथ जन्मभर पुरावी ही त्या जगन्नीयत्याला मनोमन प्रार्थना केली, अगदी रोज! पण सगळ्याच प्रार्थना कुठे सुफळ होतात? गेल्या कित्तेक महीन्यांपासून तुम्हाला गलीतगात्र बघतेय. एकेका दिवसागणिक धीर खचत जातोय. थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांनी येऊन सांगीतलंय, आता फक्त काही तास फार तर एखाद दिवस मोजा. अनुज पाठीवरून हात फिरवत माझी समजूत घालतोय, "आई, धीर धर! बाबांना आपण आणखी एखाद्या डॉक्टरना दाखवु". आणि काय सांगु, जन्मभर केवळ तुमच्या तोंडाकडे बघत निर्णयासाठी वाट बघत थांबलेली मी त्याला म्हणतेय, "डॉक्टरना विचार, वेंटीलेटर कधी काढायचं म्हणताहेत ते!" जागे असता, तर तुम्हाला खूप अभिमान वाटला असता माझा! मी लेचीपेची बाई हो, कणखर कशी होईन? पण ती चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली रेशीमगाढ खूप पक्की आहे, हे तुम्हीच सांगीतलय ना पदोपदी? आज कसली आठवण होतेय माहीती आहे? आपलं नवं घर घेताना मी माहेरी होते. तुम्हाला मुक्कामी पोचून घर घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मी पूर्ण विश्वासानं तो निर्णय तुमच्या हातात दिला होता. असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. ती रेशीमगाठ अगदी पक्की आहे यावर खूप विश्वास आहे माझा! माझी काळजी करु नका. जीव गुंतवु नका. तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्या हातांची वाट बघंत!.. --- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..!
|
Supermom
| |
| Monday, February 19, 2007 - 9:17 pm: |
| 
|
मृ, किती ह्रदयस्पर्शी लिहिलंस ग. डोळे कधी पाणावले ते कळलंच नाही.
|
Arch
| |
| Monday, February 19, 2007 - 9:25 pm: |
| 
|
मृ, नेहेमीसारखच छान. सत्य मांडण्याची कला अवगत केली आहेस.
|
Jayavi
| |
| Monday, February 19, 2007 - 11:34 pm: |
| 
|
मृ..... रडवलंस गं....! इतकं सहज लिहिलं आहेस ना.......!! असं शब्दातून व्यक्त होणं कठीण असतं गं....!
|
मृ, अप्रतिम लिहलयस. डोळ्यात पाणि आल वाचुन.
|
Psg
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:12 am: |
| 
|
मृण.. ह्म्म्म्म.. हे असं लिहिणं सोपं नाही.. छानच लिहिलयस.. (पण अजून थोडं विस्तारानी लिहायला हवं होतस..)
|
Srk
| |
| Tuesday, February 20, 2007 - 1:10 am: |
| 
|
मृण्मयी मन हलवुन टाकलंस.
|
खूपच भावस्पर्शी... आणि मनस्वी..
|
Jhuluuk
| |
| Tuesday, February 20, 2007 - 4:48 am: |
| 
|
मृण्मयी, किती सुंदर लिहिलेस.. अगदी भावुन गेले मनाला...
|
Mrinmayee
| |
| Tuesday, February 20, 2007 - 10:58 am: |
| 
|
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार! हे जे लिहिलंय ते सध्या माझ्या कुटुंबात घडतंय. याखेरीज जास्त काय लिहु? (माझे आई-वडील अगदी सुखरूप आहेत.)
|
Sas
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:50 pm: |
| 
|
सुंदर आणि डोळे पाणावणार
|
Paragkan
| |
| Tuesday, February 20, 2007 - 2:37 pm: |
| 
|
!!! !! !! !!
|
Princess
| |
| Tuesday, February 20, 2007 - 2:44 pm: |
| 
|
मृण, हृदयस्पर्शी... सत्य आहे हे वाचुन तर अजुनच वाईट वाटले मला... माझ्यातर्फे त्याना शुभेच्छा दे- पुढच्या आयुष्यासाठी.
|
hmmmm छान लिहिल आहेस.. थोडक्यात बरच काही..
|
Meghdhara
| |
| Tuesday, February 20, 2007 - 10:03 pm: |
| 
|
आम्हा सगळ्यांची positive energy तुझ्यासोबत...........
|
Jo_s
| |
| Tuesday, February 20, 2007 - 10:57 pm: |
| 
|
मृणमयी, मोजक्या शब्दात अनंत भावना मांडल्यास... अप्रतीम
|
अतिशय सुंदर आणि डोळे पाणावणारं लिहलंस!
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 21, 2007 - 4:22 am: |
| 
|
म्रू.. खुप छान.. (अजुन विस्ताराने लिहिल असत तरी चाललं असत)..
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 21, 2007 - 10:55 am: |
| 
|
मृण्मयी, ईतक्या वर्षाची साथसंगत अशी सहजासहजी सुटत नाही. साथ असतेच, राहतेच.
|
>>>> असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. ती रेशीमगाठ अगदी पक्की आहे यावर खूप विश्वास आहे माझा! माझी काळजी करु नका. जीव गुंतवु नका. व्वा मृण!! इथे हा ' संवाद' जवळपास स्वगतात्मक होतो.. आणि एकदम भिडतो बघ. आता तिचाही मार्ग असाच कंठायचा आहे तिला.. त्याच्या आठवणी जिथे दिसतील तिथे क्षणमात्र विसावा घेत.. खूप सुंदर लिहीलंयस.
|
|
|