|
Mrinmayee
| |
| Saturday, December 02, 2006 - 12:08 pm: |
| 
|
"ही 'आमची' मृदुला बघा, वाटते नं हुशार चेहेर्यावरुनच? फार कर्तुत्ववान बरं का! अन नुसतीच करणसार नाही, पण प्रेमळ आणि जीव लावणारी..." ऐकणार्याला वाटावं एखाद्या उपवर मुलीचा पिता आपली मुलगी देऊ केलेल्या व्यक्तीला हे सगळं सांगतोय. पण प्रत्यक्षात ह्या वक्त्यव्याचा श्रोता होते मी. सांगणारे कोण तर माझे आजेसासरे उर्फ 'आबु'. आणि फोटोतली 'मृदुला' म्हणजे माझ्या सासुबाई माझ्या लग्नापूर्वीच पाच सहा वर्षं आधी सगळ्यांना चटका लावून या जगातून निघून गेलेली आबुंची अत्यंत लाडकी सुन!! 'मुलाला आई नाही' येव्हड्याच 'आईच्या' परीचयानंतर माझा आणि 'आईंचा' हा आबुंनी घडवलेला पहीला परिचय! त्यानंतरचा सगळा काळ त्या मला सतत भेटत राहील्या.. कुणा ना कुणाच्या शब्दातून, कौतुकातून. लग्न होऊन बंगलोरला आले ते आईंनी कधीकाळी अत्यंत हौसेनं बांधलेल्या आणि सजवलेल्या घरात. गेल्या ५-६ वर्षात त्या घराला बाईचा हात लागलेला नाही हे जाणवत होतं आणि काही काळापूर्वी हे घर अत्यंत कलात्मक रित्या ठेवलं गेल्याच्या खुणा देखील! बागेत झाडं आहेत म्हणून पाणी घालायचं, घर आहे म्हणून झाडलोट करायची हे असं चाललं होतं. जुने फोटो बघताना आईंच्या करणसारपणाचा पुन:प्रत्यय आला. आता त्यांचं कौतुक ऐकु येत होतं शेजार्यापाजार्यांकडून, तिथल्या मित्र मंडळींकडून. तिथल्या वास्तव्यातल्या दोन महीन्यातच त्यांच्या मोठेपणाचा साक्षात्कार मला घडला. त्यांच्या आठवणीत बाबांनी 'मृदुला वैद्य स्मृती करंडक' ठेवलाय बंगलोरातल्या केंद्रीय विद्यालयातल्या विज्ञान प्रष्णमंजुषेसाठी, त्याला जायचा योग आला. आई गेल्या त्यावेळी त्यांचं वय होतं जेमतेम ४४ वर्षांचं. बंगलोरच्या केंद्रीय विद्यालयाच्या त्या मुख्याध्यापिका होत्या आणि तेव्हड्यातच त्या 'दक्षिण विभागाच्या कमिश्नर' म्हनून निवडल्या गेल्या होत्या. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'मृदुला वैद्य' परत एकदा नव्यानं भेटल्या. इतक्या मोठ्या व्यक्तीची सुन म्हणून खूप अभिमान वाटला. स्पर्धा संपल्यावर शाळेतल्या इतर शिक्षकांशी बोलत असताना सहज कुणीतरी म्हणालं, "वैद्य मॅडम म्हणजे एक जबरजस्त व्यकतीमत्व. त्यांचे पती, मुलं सगळीच हुषार. आता सुनबाई बघु कश्या आहेत"? हे वाक्य गमतीत होतं की गंभीरपणे ते काही कळलं नाही. पण जरा विचित्र वाटलं. म्हणजे माझ्याकडून काय अपेक्षा आहे यांची? काय संबंध या लोकांचा अन माझा? नातेवाइक देखील अशीच काहीशी तुलना करंत असणार का? मी खूप खूप सामन्य आहे. माला नाही पेलवणार आईंच्या वाटा. जरा हिरमुसली होऊन घरी आले. त्याच संध्याकाळी वैद्यांच्या खूप वर्षांपासूनच्या फॅमिली फ्रेन्ड्स कडे जाण्याचा योग आला. नेहमी सगळीकडे वटवटणारी मी त्या दिवशी संध्याकाळी जरा गप्प होते. परत तीच कंपॅरिजन होइल का? आज अचानक काय झालय? मला आईंविषयी काही ऐकायचा पहिल्यांदाच कंटाळा आला. हे योग्य नाही समजून सुध्दा! २३ वर्षात अक्कलहि तेव्हडीच असावी. त्या गोतावळ्यात आईंच्या भरपूर मैत्रीणी भेटल्या. सगळ्यांकडून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हड्यात त्यातल्या एकीचं लक्ष माझ्या हातातल्या तोड्यांकडे गेलं. "अगं बाई मृदुलाचे तोडे घातलेस वाटतं" "हो, लग्नात दिलेत मला". "माहिती आहे गं. पण एक सांगु का".. त्या दबक्या आवाजात माझा नवरा आजुबाजुला नाही याची खात्री करंत म्हणाल्या, "नको घालत जाउस हे तोडे". "का हो? देताना मला सांगीतलं होतं की वैद्यांच्या प्रत्येक पिढीतल्या पहील्या सुनेला हे मिळतात. माझी चौथी पिढी हे घालणारी" "ते खरं ग. पण असं बघ, मला वाटतं, हे घालणार्या वैद्यांच्या बायका कर्तुत्ववान पण अल्पायुषी ठरल्यात बघ. तुझी सासु, आजेसासु सगळ्या अकाली गेल्या." बाईंच्या शब्दात पोटतिडिक होती की नुसताच निर्बुध्दपणा ते कळलं नाही पण जरा वेळानी मी हळूच ते तोडे पर्समधे टाकले. पुढले काही महीने अधुन मधून त्या तोड्यांची आणि 'कर्तुत्ववान असतील पण अल्पायुषी.." या शब्दांची आठवण व्हायची. २ महीन्यांवर दिवाळी आली. लग्नानंतरची पहीलीच म्हणून माहेरी जायचं ठरलं. बाबा तेव्हा दिल्लीला असंत आणि धाकटा दीर देखील तिथेच कुठेसं होता. जायचे दिवस जवळ आले म्हणून मी बॅकेच्या लॉकरमधून दागीने घरी आणले. अगदी हो नाही करता करता ते तोडे देखील. आणि त्याच रात्री दीराचा फोन आला, "माझी सुट्टी आत्ता कुठे मंजुर झाली. मी दिवाळीला बंगलोरला येउ शकतोय." अनिरुध्दनी माझ्याकडे बघीतलं. मी लग्नानंतर बरेच महीन्यांनी काढून आणलेले दागीने परत एकदा अंगावर चढवून बघण्यात दंग होते. "निखिल येतो म्हणतोय दिवाळीला. पण आपलं नागपुरला जाण्याचं.." कसा कुठून ते ठाउक नाही पण माझ्या मनात विचार आला, 'नागपुरला दिवाळी पुन्हा करता येईल. पण या घरात गेल्या सहा वर्षात दिवाळीचा दिवा लागलेला नाही. निखिल आवर्जून घरी आलेला नाही सणासाठी. यांची दिवाळी म्हणजे आजुबाजुच्यांनी दीलेला फराळ छे छे यावर्षीची दिवाळी इथेच करायची. "निखिल ये तु. बाबांना सुट्टी मिळते का पाहु." मी म्हणाले. "पण तुम्ही नागपुरला जाणार असं कळलं आत्ताच." "ते पोस्टपोन करु आम्ही. तु आणि बाबा या लवकर" "यावर्षी घरी यावसं वाटतंय" निखील म्हणाला. "मला पण इथेच रहावसं वाटतय दिवाळीला. तुम्ही दोघं या. खूप मजा करु". मी यापुढे काय काय तयारी करायची हा विचार करायला लागले. घराला नवा रंग द्यायला हवा, इतकी वर्ष ज्यांनी या सगळ्यांना घरी बोलवलं त्यांना दिवाळीचं घरी जेवायला बोलवायला हवं. फराळाची तयारी देखील करायचीय. आम्माला सांगायला हवं इतकी सुट्टी नाही देऊ शकत म्हणून... विचारांच्या नादात हाताकडे बघीतलं, मी 'ते' तोडे नकळत हातात कधी चढवले होते कळलं देखील नाही.
|
Asmaani
| |
| Saturday, December 02, 2006 - 6:18 pm: |
| 
|
हं sss ! interesting... ... ...
|
Maitreyee
| |
| Sunday, December 03, 2006 - 7:57 am: |
| 
|
मस्त गं मृण्मयी, तोड्यांचं प्रतीक छान वाटलं!
|
Psg
| |
| Monday, December 04, 2006 - 12:49 am: |
| 
|
मृण, मस्त लिहिलं आहेस.. पण अजून विस्तारानी लिहू शकली असतीस असं वाटलं.. अजूनही शक्य आहे का बघ
|
Princess
| |
| Monday, December 04, 2006 - 2:04 am: |
| 
|
छान लिहिलय मृण्मयी...सासुबाइं प्रमाणेच त्यांची सुनही करणसार निघाली तर...
|
Nalini
| |
| Monday, December 04, 2006 - 6:33 am: |
| 
|
मृ. खूप छान लिहिलस. पूनम म्हणते तसं आणखी विस्ताराने लिहू शकली असतीस. अल्पायुषी असलं तरी हरकत नाही पण कर्तुत्ववान असणं जास्त महत्वाचं, नाही का? आपलं आयुष्य आपण नेहमीच जगतो, अगदी मरेपर्यंत जगतो. खरच, असं आयुष्य जगता यायला हव.. आपल्यासोबत ईतरांसाठी ते जगणं आणि देहाने जग सोडलं तरीही जिवंत रहाणं, अगदी पिढ्यानपिढ्या... सासुबाइं प्रमाणेच त्यांची सुनही करणसार निघाली तर... >> हे मात्र अगदी खरं. म्हणून तर आम्हाला स. न. मध्ये दररोज मेजवानी असते.
|
Mrinmayee
| |
| Monday, December 04, 2006 - 9:10 am: |
| 
|
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! पण आईंच्या पासंगालाही पुरणारी मी नाही! आता जवळपास १३ वर्शांच्या संसारात त्यांच्याबद्दल जाणून घेताना वाटतंय की त्या खरंच खूप जबरजस्त व्यक्तिमत्व असाव्यात. पूनम, नलु विस्तारानं ल्याहायचं म्हंटलं तर इतकं लिहिण्यासारखं आहे की माझ्या आवाक्याबाहेर जाईल. एकच सांगावसं वाटतं, आज त्या असत्या तर कदाचित सासु-सुनेत उडणारे खटके आमच्यातही उडले असते. पण वैद्यांच्या घरात आल्यापासून प्रत्येकानी इतकं समजून घेतलंय आणि भरभरून प्रेम दिलंय की मला सासरही खूप जवळचं वाटतं. सुनेबाबतचा आईंचा विचार असा होता: 'भारतीय समाजरचनेप्रमाणे मुलगी आपलं प्रेमाचं घर सोडून सासरी येते. तेव्हा तिला आपलसं करणं ही प्रथम सासरच्यांचीच जबाबदारी! तिला सून म्हणूनच वागवाल, माझं घर माझा संसार्-माझा मुलगा करत रहाल तर तीच्याकडून कशी अपेक्षा करायची सद्वर्तणुकीची?'
|
Paragkan
| |
| Monday, December 04, 2006 - 3:11 pm: |
| 
|
wah Mrinmayee ... chhaan lihila aahes !
|
Ashwini
| |
| Tuesday, December 05, 2006 - 1:15 pm: |
| 
|
मृण्मयी, छान लिहिलं आहेस.
|
Disha013
| |
| Tuesday, December 05, 2006 - 4:22 pm: |
| 
|
छान आणि अगदी खरं बोललिस मृ..माझ्या सासूला जावुन सांग ना. just kidding !
|
मृण्मयी, छान लिहिले आहे!
|
Mrinmayee
| |
| Wednesday, December 06, 2006 - 9:28 am: |
| 
|
परागकण, अश्विनी, दिशा आणि KD Thank you! हे ललित लिहिताना लिहु की नको असा बराच विचार केला. अखेरीस लिहुनच काढलं. दिशा, आईंचा सुनेबाबतचा हा विचार त्यांच्या अगदी जीवश्च कंठश्च मैत्रीणीकडून कळला. आणि त्या मैत्रीणीच्या सुनेलाही मी भेटलेय. ती देखील जाम खूश आहे सासुवर. ऐ. ते न. म्हणून वाटलं की आई देखील अश्याच वागल्या असत्या कदाचित. आणखी एक ललीतात न लिहिलेली बाब्: आईंना कॉमनवेल्थची कुठलीशी स्कॉलरशिप मिळून त्या बरेच दिवस लंडनला होत्या. तिथून येताना भावी सुनांसाठी पण खरेदी करून आल्या. तेव्हा माझ्या नवर्याचं वय १७ वर्शं आणि दीर १५चा.
|
Supermom
| |
| Wednesday, December 06, 2006 - 9:38 am: |
| 
|
मृ, खूपच मस्त लिहिलयस ग. अगदी काळजाला हात घालणारं. तुझ्या सासूबाईंना एकप्रकारे ही सुरेख श्रद्धांजलीच म्हटली पाहिजे.
|
Sunidhee
| |
| Thursday, December 07, 2006 - 3:14 pm: |
| 
|
म्रुण्मयी सुरेख तर लिहिले आहेसच पण मला तुझ्या सासुबाइंची वरची 'ललितात न लिहिलेली बात' तर मनाला फ़ारच भावली.. आणि अगदी वाईट वाटले कि अश्या हौशी व्यक्तीला अकाली जावे लागले.
|
Lalu
| |
| Friday, December 08, 2006 - 3:22 pm: |
| 
|
मृण्मयी, छान लिहिलं आहेस. मी खरं तर हे एक स्वतंत्र लेखन म्हणूनच वाचलं. म्हणजे हा एक स्वानुभव आहे आणि तू किंवा बाकीच्या व्यक्ती या प्रत्यक्षात आहेत / होत्या या गोष्टीकडं दुर्लक्षच झालं. लक्षात राहिले ते तोडे आणि त्यामागची भावना. ही मी तुझ्या लेखनाला दिलेली दाद आहे! तू हे त्यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलं असशील तर त्याबद्दलही आदर आहेच.
|
Chinnu
| |
| Friday, December 08, 2006 - 5:31 pm: |
| 
|
मृण, खुप छान वाटलं वाचुन.
|
mrinmayee , सुंदर लिहिले आहेस. खूप आवडले. शेवटचा paragraph तर अप्रतिम थोडक्या शब्दात अन सहजपणे सांगितले आहेस.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 09, 2006 - 11:43 am: |
| 
|
मृण्मयी, माझे हि लालुसारखेच झाले. अशी व्यक्तीमत्वे, प्रत्यक्षात असतात, हे पटायला कठीणच जातं. पण वास्तव कल्पनेपेक्षाहि कधी कधी सुंदर असते ते असे.
|
Mrinmayee
| |
| Saturday, December 09, 2006 - 12:50 pm: |
| 
|
सुपरमॉम, सुनिधी, लालु, चिन्नु, राधा आणि दिनेशदा, Thank you all ! आयुष्यात अशी न पाहीलेली व्यक्तीमत्व भारुन टाकतात यावर माझा एरवी विश्वास बसला नसता. ही त्यांना आदरांजली तर आहेच. पण एक कृतज्ञता म्हणूनपण.. त्यांच्या उत्तम संस्कारांमुळेच मला बायकोवर नितांत प्रेम करणारा आणि तिचा आदर करणारा नवरा लाभलाय. शेवटचा तोड्यांचा प्रसंग हा ललिताला कुठलाही नाटकीय शेवट देण्याच्या हेतुनं लिहीला नाही. तो खरंच प्रत्यक्षात घडलाय आणि माझ्या मानाच्या कोपर्यात कायमचं घर करून गेलाय. on a lighter note , इथे वाढलेल्या माझ्या लेकानं जर ज्यु मुलिशी लग्न केलं तर मात्र हे तोडे घालणारी मी शेवटची सुन असेन. कारण त्यावर फक्त स्वस्तीकाचं डीजाइन आहे.
|
|
|