|
Aparnas
| |
| Monday, June 19, 2006 - 11:48 pm: |
| 
|
निनावी, दिनेशदा, केदार, अभय, सगळ्यांना आधी मनापासून धन्यवाद. माझ्या कवितेवर इतकी छान चर्चा केलीत त्याबद्दल.... कवितेचा अर्थ मला वैभव ने लावला तसा अभिप्रेत होता, पण निनावी आणि दीम्डु, तुम्ही जो अर्थ लावला आहे तोही अप्रतिम आहे... निनावीचं रसग्रहणही केवळ उच्च...माझीच कविता जास्त छान कळली मला..... मला पहिल्या कडव्यामधे 'मरवा' हाच शब्द अपेक्षित होता. दिनेशदांचं म्हणणं एकदम बरोबर. अमेय, निनावी आणि दिनेशदांनी मस्तच उदाहरणं दिली आहेत मरव्याची. परत एकदा सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद -अपर्णा
|
व्यसन हं .... विचित्र होउन बसलंय सगळं ... म्हणजे ... मान्य आहे मला , रोज रोज असं भेटायला येणं जमणार नाही तुला ... पण मग आकर्षणाचं सवयीत आणि सवयीचं व्यसनात रुपांतर झालंय त्याला मी तरी काय करू ? तू जीवघेणं व्यसन झाली आहेस, कविते तू भेटेपर्यंत काही सुचत नाही अन जोवर काही सुचत नाही ........ तोवर तू भेटतच नाहीस
|
Shyamli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 1:21 am: |
| 
|
वा........!!! .. .. .. .. ..
|
Aparnas
| |
| Tuesday, June 20, 2006 - 1:38 am: |
| 
|
वैभव, ग्रेट!! झकास आहे कविता...सुमती, वैभु, देवा, अन्त्या तुमच्या पण कविता मस्त!!
|
Aavli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:22 am: |
| 
|
तुमी समदी मंडळी एकदम झ्याक लिवतायसा.... समद्यासनी आभार..... माह्या लेकराले येवा सब्द बहराचा जोर......... गुलमोहराच्या फ़ान्दीव नाच कवितेचा मोर......... र्हावी नजर लेकरावं माय सरसोतीची.......... जावी रन्गून ही काया माह्या मराठीमातीची....... सब्दायले त्यायचे फ़ुटवं प्रेमाचं अंकूर.............. जसं संतायचे संगतीनं रंगलं पंढरपूर............
|
अपर्णा कविता छनच आहे.. सुमतिजी आणि कर्पे नेहमीप्रमाणेच सुंदर वैभव.. खरं आहे रे पण आमच्या नशिबी रोज भेट नाहि रे.. पुन्हा मला तुझीही बघ आस अनावर आहे अदमास तुझा येता कसा मनास सावर राहे मी रोज चातकावानी पाहतो तुझीच वाट पर लाविले मनाला का ते आज धरेवर राहे येवो हात तुझा हाती ही एक कामना आहे मनात बांधले मी ते मान सरोवर आहे झाली भेट आपली ना कल्पना दुष्ट आहे स्वप्नात पाहिले मी माझे कलेवर आहे
|
Shyamli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 2:33 am: |
| 
|
हाय हाय देवा मस्त रे!!! वाढव की अजुन... अवली मस्तच..
|
Manasi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:20 am: |
| 
|
वा सगळ्यान्च्या कविता उत्तम. अपर्णा अप्रतिम कवित. आणि रसग्रहण पण सुन्दर. रोज न आल्याने फ़ारच गडबड होते. सगळे एकदम वाचावे लागते. वैभव, आवली, अभय, देवा छान.. (अनुस्वार कसा लिहायचा?)
|
Meenu
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:21 am: |
| 
|
आज पुन्हा मनावर उदासीची छाया आहे माहीत आहे मला हि सगळी माया आहे छायाप्रकाशाचा खेळ अनेकदा अनुभवते तरीही ह्या मायाबाजारात पुन्हा कशी मी फसते काय खरं काय खोटं सीमारेषा होतात पुसट मनाला व्यापुन उरते ती फक्त घुसमट
|
Manasi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:42 am: |
| 
|
मुक्तछन्द आधी क्षमस्व: . तुझ्या कवितेत बदल करावेसे वाटले. म्हणजे फ़क्त शब्दान्ची रचना बदलली आहे. बघ कसे वाटते. मूळ कविता ओंजळीतले आभाळ चिमुकल्या हातांकडे पाहून आभाळ हसून मला म्हणाले छोटी तुझी बोटे अन मोठे आहेत तारे! गगनभरारीचे स्वप्न पाहतेस... तुझ्या पंखाना सोसवेल का वेगाचे वारे? जा माघारी निघून जा आहेत विजेचे सपकारे.. नाही जमायचे तुला सारे!...... पण हे म्हणताना त्याला कळलेच नव्हते की त्याच छोट्या ओंजळीत आपण सामावलो आहोत ! शब्दरचना बदलून्: ओंजळीतले आभाळ चिमुकल्या हातांना पाहून आभाळ हसून म्हणाले छोटी तुझी बोटे अन मोठे आहेत तारे! पाहतेस स्वप्न गगनभरारीचे ... सोसवतील का पंखाना वेगाचे वारे? जा माघारी निघून आहेत विजेचे सपकारे.. जमायचे नाही तुला सारे!...... पण हे म्हणताना नव्हते त्याला कळले त्याच छोट्या ओंजळीत सामावलो आहोत पुरे! sorry again for changing your original poem.
|
Manasi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 3:44 am: |
| 
|
meenu nice one.......simple and good
|
Naadamay
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:09 am: |
| 
|
दुःख झालं की वाहायलाच लागतं सगळ्यात आधी हृदय पाझरतं आणि सरळ वाट डोळ्यांची धरतं डोळ्यांमधून सांडत मोकळं होतं मोकळं याचा अर्थ तरी काय होतं अश्रू संपतात सर्व कोरडं होतं बाहेर दुःख दिसायचं बंद होतं आतून सतत पोखरत राहतं दुःख वाटल्याने म्हणे हलकं होतं हलकं झालं तरी संपत नसतं अश्रू आटून मुद्दल बाकी उरतं आणि कायम घर करून राहतं रूक्षतेलाच कवटाळावं लागतं सुख म्हणून गोंजारावंही लागतं कोरडेपणानेच सुख सार्थ होतं आणि रडण्यानेच दुःख सिद्ध होतं
|
Shyamli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:29 am: |
| 
|
मोकळं याचा अर्थ तरी काय होतं अश्रू संपतात सर्व कोरडं होतं बाहेर दुःख दिसायचं बंद होतं आतून सतत पोखरत राहतं>>>> अहाहा नादमय... वेगळ्याच असतात रे तूझ्या कविता आवडल एकदम..
|
Zaad
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:32 am: |
| 
|
परंपरा तुला देव तरी का म्हणू? आणि कुठला? इथे परंपरागत चालत आलेल्या देवांची काय कमी आहे? तरी एकदा तुला परंपरेच्या तीक्ष्ण धारेत सोडून पाहिलं, वाटलं गुरुत्वाकर्षणाने खाली कोसळशील्; पण तू मात्र कोण जाणे कुठल्या बळाने उंच दरीतून खाली सोडलेल्या फोलपटासारखा वर वरच येत राह्यलास.... मग तुला परंपरेतून मुक्त करायला गेलो तर, चिमटीतून निसटलेल्या उन्हासारखा तू कुठे कुठे जाऊन पोचलास! फायनली तुझा नाद मी सोडून दिला आणि माझ्या चार भिंतींमध्ये परत आलो; तर, दूरवर सोडून दिलेल्या एखाद्या पाळीव पिलासारखा तू ओठांवरती एक ओशाळं हास्य घेऊन पुन्हा दारात उभा! डोळे वर उचलून तुझ्याकडे पाहण्याचीही माझी पात्रता नाहीये रे... पण म्हणून तुला देव तरी का म्हणू? आणि कुठला? बसल्या जागेवरूनच एक वीट भिरकावून दिली तुझ्याकडे आणि कमरेवर हात ठेवून माझी वाट पाहत उभं राहण्याची एक नवी परंपरा घालून दिली तुला...
|
Princess
| |
| Tuesday, June 20, 2006 - 5:37 am: |
| 
|
नादमय, खुप खुप छान लिहिलेस. हे असच झाले होते.... बरोब्बर असेच.... पण मला शब्दात नाही सांगता आले. माझ्या भावनाच जणु तु मांडल्यास असे वाटतेय मला. असेच अश्रु संपुन गेले होते माझे. आणि जगाला वाटले माझे दुख विसरली मी. तु अगदी समर्पक शब्दात लिहिलेय, ती वेदना आतच राहते पोखरत... प्रिन्सेस
|
Ninavi
| |
| Tuesday, June 20, 2006 - 9:12 am: |
| 
|
वैभव, व्यसन ( कविता) सुरेख. >>> तू भेटेपर्यंत काही सुचत नाही अन जोवर काही सुचत नाही.. तोवर तू भेटतच नाहीस.. व्वा! नादमय, >> अश्रू आटून मुद्दल बाकी उरतं खरंय. छान आहे कविता. झाड, नीटशी कळली नाही, पण ही चित्रकवितेतही चालेल बघा. ' चिमटीतून निसटणारं ऊन' ही कल्पना आवडली.
|
वैभव व्यसन छानच आहे रे. झाड, खरंच कळाली नाही फ़ारशी बर्याचदा वाचून ही... पण वाचायला छान वाटतेय. मला ह्यावरून "श्री तशी सौ" नाटकात मोहन जोशी म्हणतो ती "माझ्या फ़ाटक्या खिशात हात घातल्यावर लागले हजारो सैबेरीयन पक्षी" कविता आठवली. "चिमटीतून निसटणारं ऊन" झकास आहे... एकुणच अशी वाचायला छान वाटतेय. जरा उकल करून सांगतोस का?
|
वैभव, देवदत्त , अपर्णा मस्त कविता. रसग्रहण सुद्धा अप्रतिम. मानसी माझ्या कवितेतील बदल छान, सॉरी म्हणायची गरज नाहीये
|
अभय, तुझी कविता छान आहे. गजल ह्या काव्यप्रकाराचे वर्णन प्रसादने ह्याच स्थळावर केले आहे ते वाचल्यास अधिक माहिती मिळेल. शिवाय तुषार, सारंग, वैभव ही गजल लिहिणारी मंडळी वेळोवेळी मदत करतीलच. गजलेमध्ये काफिया रदिफ आणि वृत्त पाळले जाणे आवश्यक आहे. इतर संकेतस्थळांवरही मदत मिळू शकेल. ही कविता गजलेत बदलण्याचा प्रयत्न करते आहे.
|
कविची मुलाखत = काय हो, मिळाले का तुम्हाला हवे ते? केला का न्याय तुमच्यावर, जीवनाने? *जीवन म्हणजे काय, हवे ते मिळणे? तो प्रवास खडतर, ते ठेचकाळणे, ती शोधाशोध, रोज नवी चाहूल लागणे, त्या पाठशिवणीतच, उडाले अवघे जगणे. अपराध कधी, कोणता नव्हताच केला, झाले आरोप तरी, बचावहि नव्हता केला. मीच माझ्या मला, खूप सुनावल्या शिक्षा, जीवनाकडून केंव्हा केली न्यायाची अपेक्षा? =निदानपक्षी, प्रेम तरी असेल मिळाले? आनंद,समाधान,थोडेसे वाट्याला आले? *पाहिलात का कधी कोणी कवि सुखांत? समाधाने डुम्बताना, म्हशीसारखा डबक्यांत? खातो मी गटांगळ्या खोल अंधार्या गर्तेंत, अखंड वेदनांची जालीम मदिरा प्याल्यांत. प्रीती म्हणाल तर, होय, मिळाली. त्या क्षणाचा मी, त्या क्षणाची ती, एकमेकांत उतरलो, हरखलो किती. मालकीचा नव्हताच, हव्यास स्वार्थी. चिरन्तन कधी काही, असते का जगांत? सुख, आनंद, प्रेम, ध्येय, मन:शांत? फक्त माया चिरंतन, आशा चिरंतन, बाकी सगळंच भंगूर, माझी कविताहि. =एक प्रश्न विचारू का, शेवटचा? नव-कवि तरुणांना संदेश काय तुमचा? * विचारून संपणारे प्रश्न, नसतातच विचारायचे. हुलकावणार्या उत्तरांच्या मागे, कविने धावायचे. मी कवि आहे, 'एस.एस.सी. हिंदी दो दिनोंमे' चा लेखक नाही. -बापू.
|
|
|