Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » ज्येष्ठ » ललित » तरिही » Archive through June 06, 2006 « Previous Next »

Mrinmayee
Monday, May 29, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विमान JFK ला उतरलं अन मी सुटकेचा एक श्वास सोडला. निषादनी "बाबा कधी दिसणार"? हा प्रश्ण बहुतेक २५व्यांदा विचारला. "शोन्या आता अगदी थोड्या वेळात". मी शक्य तितकं न वैतागता उत्तर दिलं. माझं पिल्लु बिचारं गेल्या दीड महिन्यापासून बाबाला भेटण्याची वाट बघत होतं.
सगळे पुढले सोपस्कार पार पाडून आणखी तासाभरानी बाबा दिसला आणि पिता-पुत्र भेटिचा सोहळा पार पडताना बायको "मला नका रे विसरु" म्हणंत सामानाची ट्रॉली उरल्या सुरल्या त्राणासगट ढकलून मागे जायला लागली.
नातेवाईकाच्या मोटारित बसून स्टोनी ब्रूकचा प्रवास सुरु झाला अन किती बोलु अन किति नको असं झालेल्या बाप्-लेकाना सोडून मी जिवाचं न्यु यॉर्क करायला आल्यासारखं खिडकितून बाहेर बघायला सुरुवात केली. मनात विचार, 'ओक्टोबर मधे हा गारठा, देवा पुढे कसं होणार'?
अनिरुध्दनं आधीच कल्पना देऊन ठेवली होती. त्याला मिळणार्‍या TAship मधे आम्हाला आणखी एका कुटुंबाबरोबर अपार्टमेंट शेअर करायला लागणार होतं. त्याला माझी पूर्ण तयारी होती. नवर्‍याचं PhD करण्याचं धाडस! माझा येवढा तर पाठिंबा हवा!
बाहेरून अपार्टमेंट कॉम्प्लेक्स बरा वाटला. रात्रीची वेळ, बरेच दिवे झगमगत होते. समोर भव्य हॉस्पिटल बिल्डिंग! चला परिसर तरी छान होता.
रात्री ९ वाजता घरात शिरलो... एका अतिशय उग्र वासानं सलामी दिली.
"शेजार्‍यांची जेवणं झाली बहुतेक". अनिरुध्दनी माहिती दिली.
होईल याचीही सवय.. विचार करत सामान ठेवलं.
छोटी living room एक पिटुकलं किचन अन बाथरूम हे सारं शेअर करायचं होत. शेजारच्या खोलितलं कुटुंम्ब चायनीज. नवरा, बायको अन ५ महिन्याचं बाळ असे आमच्या सारखे इन मिन तीन लोक. ते झोपी गेले होते.
" sorry आज उशिराचा class होता. आता पटकन खिचडी करतो".
"नको रे, जे असेल ते खाऊ."
शेवटी pizzaa खाऊन जेवणं आटोपली.
jet lag सुरु झाला असावा. आम्हाला झोप नाही. आणि अनिरुध्द थकून जांभया देत होता.
तरी भारताच्या चौकशा, त्याच्या भावाचा लग्न सोहोळा अश्या गप्पा सुरु झाल्या. मधेच निशाद चिवचिवत होता. आम्ही त्याला हळू बोलायला सांगत होतो. शेजार्‍यांची झोपमोड नको!
"कसं वाटतय अपार्टमेंट"?
"चांगलं आहे. शेजारी कसे आहेत".
"काही कल्पना नाही. बरे असावेत. मी पण busy होतो. hi Hello पलिकडे फारसं बोललो नाही".
तेव्हड्यात आमच्या bedroom च्या दारावर टकटक झाली.
दारात शेजारी उभा. " please keep your voices down ". येवढं बोलून चालता झाला.
आमचं "sorry" त्याच्या पर्यंत पोचलं असावं. ईतर बोलण्यासारखं!
मला जरा धक्का बसला. पण विचार केला, तेही थकले असतील बापडे.
आम्ही झोपायचा प्रयत्न करत होतो. नवर्‍याची कधीच ब्रम्हानंदी टाळी लागलेली.
रात्री पाणी प्यायला बाहेर आले तर शेजारी हजर किचनमधे! साधं hi तर सोडाच पण परत दम देऊन गेला 'खुडबुडिचा त्रास होतोय म्हणून'! आता हद्द झाली. पाणी पण प्यायचं नाही रात्री?
हे असेच दिवस जाणार पुढचे?
मी निमूटपणे बिछान्यावर पडले. आणि अश्रुंना वाट मोकळी केली. बाजुला अनिरुध्द घोरत होता.
थोड्याच वेळात शेजारच्या खोलीतून बाळाचं रडणं कानी पडलं.
त्यालाही बापड्याला काहीतरी होत असावं!!!!!
अपूर्ण










Shyamli
Tuesday, May 30, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग पुढच्या भागाची वाट बघतिये ना मी....

Chingutai
Tuesday, May 30, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजुषा,
सुरुवात छान झालीय... येवु द्या पुढचे

-चिंगी


Ninavi
Tuesday, May 30, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, छान सुरुवात आहे. लवकर लिही पुढे.

Mrinmayee
Tuesday, May 30, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळी उन्हं बरीच वर आल्यावर कधीतरी जाग आली. अनिरुध्द lab ला कधी गेला कळलं नाही. पोटापाण्याची सोय बघायला स्वयंपाकघरात जाणं भाग होतं. "घर छान आहे" म्हंटलं तर खरं पण मनातून कुठेतरी धास्ती वाटंत होती. येऊन उणेपुरे १५ तासही झाले असतील नसतील, तरी आता इथेकिती दिवस काढायचे ह्याच गोष्टिचं नको तितकं tension आलं.
जरा वेळानं breakfast च्या तयारीला लागले. कपाटांमधे आपलं सामान कुठलं ते समजण्यात भरपूर वेळ गेला. फ़्रीज मधे दूध, अंडी सगळंच सारखं. परत कपाळाला हात लावला. मनात विचार आला, 'जावं का शेजार्‍यांना विचारायला ह्यातलं तुमचं सामान कुठलं म्हणून'. पण परत disturb केलं म्हणून वसकले तर काय करा? म्हणतील 'नवर्‍यानं दाखवल्या नाहीत का तुमच्या सामानाच्या जागा'? कालच विचारून ठेवलं असतं तर..स्वत:च्या मूर्खपणाला बोटं मोडत असताना आल्यापासूनच्या नकारात्मक विचारांची पण चीड येत होती. मन म्हणंतही होतं, अजून काही बघितलं नाहीस आजुबाजुला, कुणी सांगावं इथे नव्या ओळखी होऊन दिवस छानही जातील...
विचारांच्या तंद्रीत असताना समोरून एक गोड "हलो" ऐकु आलं. बघितलं तर माझी शेजारीण आपलं अत्यंत गोजीरवाणं बाळ घेऊन माझ्याकडे बघून प्रसन्नपणे हसली. माझ्या प्रतिसादानंतर आपल्या तोडक्या मोडक्या english मधे तिनी लागलीच गप्पा करायला सुरुवाट केली. महत्वाचं म्हणजे अख्ख्या घराचा guided tour देऊन आपलं सामान कुठे ते दाखवून माझे त्या दिवसाचे सगळे प्रश्ण सोडवले.
ते बाळ देखिल असलं लाघवी! ओळख देख नसताना हात पुढे काढून माझ्याकडे यायचा प्रयत्न करू लागलं. मी "घेऊ का" विचारल्यावर तीनं पटकन त्याला माझ्याकडे दिलं सुध्धा.
लागलीच खोलित जाऊन एक electronic dictionary घेऊन आली english चायनीज भाषांतरासाठी.
त्यानंतर जाणवलं, ह्या सगळ्या गोंधळात तर नावंही विचारली नाहीत एकमेकींची! तिनं आपं नाव सांगितलं "वेन" अन बाळाचं नाव 'विलियम'. पण त्याचं चायनीज नाव "तोतो" म्हणजे "वाटाणा'!
येवढ्यात निशादही बाहेर आला अन हा चिमुकला वाटाणा आता नवा मित्र बघून आणखी खूश झाला.
आमचा सगळ्यांचा breakfast देखिल बरोबर झाला. तेव्हाच अनिरुध्दचा फोन आला काय चाललय विचारायला.
"निशाद, तोतो शी खेळतोय. अन मी अन वेन गप्पा मारतोय"! मी अगदी मनापासून खूश होत माहिती पुरवली.
बोलताना खिडकीबाहेर लक्ष गेल.. स्वच्छ उन्हं पडली होती, बाहेर फेरफटका मारायला खुणावणारी!!!!


Chinnu
Tuesday, May 30, 2006 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु तु अगदी ओघवतं लिहीत आहेस. परदेशात भारतीयांना काय काय सोसावे लागते, ते ज्याचे त्याने सांगावे! तरी परीस्थीतिशी दोन हात करतांना वाटलेली खंत फार सुरेख मांडत आहेस. अजुन येवु द्या!

Mrinmayee
Tuesday, May 30, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मन्:पूर्वक धन्यवाद श्यामली, चिंगुताई, निनावी अन चिन्नू!
लिहिल्यावर जाणवलं, कोण वाचेल हे आपलं रडगाणं? परदेशात येणारे सगळेच बिचारे ह्या ना त्या कारणानं बर्‍याच कठिण गोष्टिंना तोंड देतात. मग आपण काय नव्यानं सांगा?
बरेच लोक इथे शिकायला येतात. एकटे आले तर कधी कधी एकटेपण खातं. आमच्यासारखे कुटुंबाला घेऊन येणार्‍यांचे प्रश्ण थोडे आणखी वेगळे. अत्यंत मर्यादित पैसा, dependent visa वाल्यांचं काम न करता येणं, भारताला वर्षातून काय पण ३-३ वर्षात न जायला मिळणं अन बरंच काही...
या पुढे ललितात काय लिहू? मी वर्षभर voluntary काम केलं. माझ्या प्रोफेसर नी माझं work permit केलं. अनिरुध्दनी अतीशय छान GPA सगट रीसर्च पूर्ण केला. निशाद day care आणि शाळेत रमला,.
आम्ही ते apartment पुढे एका भारतीय आणि नंतर आणिक एका चायनीज family बरोबर share केलं. सगळी कुटुंब फार छान होती.
काही काळ मी resident associte सारखं building coordinator म्हणून काम केलं. त्यामुळे आम्ही लहान का होइना पण single family apt मधे आलो.
खूप अनुभव घेतले. बरे वाईट दोन्हिही... काहि वेळा आपल्याच लोकांनी दुखवलं. तर काही परदेशी लोक खूप जिव्हाळ्याचे झाले.
building coordinator असताना मात्र खूप मजेदार अनुभव घेतले. लिहिन कधितरी त्याबद्दल.
पण वरच्या लिखाणात फक्त हेच सांगायचं होतं..तुम्ही कुठल्या व्यक्तिच्या सानीध्यात येता ह्यावर बरच काही अवलंबून असतं.
'वेन'सारखे आणखी काही लोक भेटले अन त्यांनी आमचं stony brook मधलं आयुष्य खूप समृध्द केलं.
'तरिही' हे नाव द्यायचं कारण म्हणजे कष्ट तर होते, पण 'तरिही' अनेक अनुभवांनी समृध्द झालेलं आयुष्य निव्वळ 'बरं गेलं' असं म्हणवत नाही. खूप छान होते ते ' stony brook चे दिवस.


Mita
Wednesday, May 31, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayee , छान लिहिलं आहेस. तरिही जरा लवकर आवरतं घेतलंस असं वाटल.
keep writing .तुझी शैली चांगली आहे लिहिण्याची. आणि अनुभवही वेगळे आणि inspiring आहेत.


Psg
Wednesday, May 31, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, छान लिहत होतीस गं. इतक्या पटकन का संपवलस? अजून डीटेल मधे लिहायचस ना. आता तुझे building co-ordinator चे अनुभव लिही विस्तृतपणे!

Moodi
Wednesday, May 31, 2006 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी छान लिहीलस, अन आपल्या लोकांमध्ये हे अनुभव नाही सांगायचे तर कुणाला?
परदेशातच आपण आपले लोक शोधत असतो पण बर्‍याचदा त्यांच्याकडुनच अपेक्षाभंग होतो हे पण खरे आहे.

अन तुझ्या अहोंचे अभिनंदन यश मिळवल्याबद्दल.

पुढचे पण लिही वेळ झाला की.


Princess
Wednesday, May 31, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहिलेस मृण्मयी वाचुन असे वाटले की सगळे काही डोळ्यासमोर घडतय.

Chingutai
Wednesday, May 31, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजुषा,
रडगाण नाही ग..मुळीच नाही!
सासरी, ते ही परदेशी....घराबाहेर पडल्यावरच खरी ओळख होते आपल्या माणसांची आणि मुख्यत्: स्वत:ची! माहेरी आई-बाबांच उबदार छत्र असत, त्यामुळे खर्‍या जगाशी तसा सामना होतच नाही.

आज, जुने दिवस आठवताना कसं वाटत! त्यातच सारं काही आलं.

तुझे हार्दिक अभिनंदन!!!!

-चिंगी


Ninavi
Wednesday, May 31, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रडगाणं काय त्यात? बरेवाईट अनुभव सगळ्यांनाच येतात हे खरं आहे, आपण त्यातून काय मिळवतो ते महत्वाचं ना? मग तो तात्पुरता आनंद असेल किंवा कायमचा धडा. असंही होतं बरेचदा की त्या त्या वेळी अगदी ग्रासून टाकणारे प्रॉब्लेम्स नंतर चक्क विसरायला होतात,आणि कधीतरी आठवले तर त्यांचीही गंमतच वातते. ते म्हणतात ना, experience is not what happens to you, it's what you do with what happens to you.'

आता तू हे सगळं इतक्या छान स्पिरिटमधे लिहू शकलीस हे महत्वाचं. आणि कथनशैली छान सहज आणि अनौपचारिक आहे तुझी. Keep it up .


Dineshvs
Wednesday, May 31, 2006 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी, मला पण सगळ्यांसारखे हे मधेच आवरते घेतले असे वाटले. काहितरी लिहायचे राहुन गेलेय खास.

Seema_
Wednesday, May 31, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहिल्यावर जाणवलं, कोण वाचेल हे आपलं रडगाणं?>>>

छे मला तरी हे रडगाण वगैरे मुळीच वाटल नाही. उलट निगेटिव्ह परिस्थितीत सुद्धा जुळवुन घेवुन "ठिक होईल सगळं" असा आशावाद दिसला .
आणि वाईट अनुभव येवुनही मनात तु कुठच कडवट्पणा आणुन दिला नाहीस याच कौतुकही वाटल .
छानच लिहिलय . अजुन लिही वेळ मिळाला कि .


Lopamudraa
Friday, June 02, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्रुन्मयी अजुन लिहि ग... तुझं गाणं ...
खुप आवडल... अजुन वाचायला नक्किच आवडेल...
वेळ मिळाला की मिहि माझं रडगाणं लिहिन...


Shyamli
Saturday, June 03, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणमयी......
सगळे म्हणतायत तसे अजुन सविस्तर येउ दे...


Mrinmayee
Sunday, June 04, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक आभार!
दिनेशदा, तुम्ही म्हणताय तसं काहीतरी (च) नाही तर बरंच काही लिहिण्यासारखं राहून गेलय हे खरं. सगळ्यांनाच हे अपूर्ण वाटतंय...मलाही.
पण इतके अनुभव आहेत की काय काय लिहू हा प्रश्ण पडलाय. तरीही उद्यापासून परत थोडं आणखी लिहिन म्हणते.
परत एकदा, तुमच्या प्रोत्साहनाबद्दल " Thanks a lot "!
by the way , ४ दिवस कनडातही mail check करायच्या आधी आधाशासारखं मायबोली वाचून काढलं, रोज! काय ओढ लागते बघा मायबोलिकरांच्या लिखाणाची!:-)


Mrinmayee
Monday, June 05, 2006 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

building co-ordinator असताना घेतलेले अनुभव लिहावे म्हणते!
आमच्या चेपिन कॉम्प्लेक्स मधे १२ इमारती होत्या. A to L मी कोऑर्डिनेटर होते H ची. आलेल्या students ला check in करणे, घरांचे health & safty inspections , भांडणे सोडवणे हे प्रकार तर करावे लागायचेच. पण शिवाय, आमच्या duties लागायच्या office work आणि emergencies आवरण्यासाठी! सगळ्यात कंटाळवाणा प्रकार म्हणजे कडाक्याच्या थंडित रात्री बेरात्री घराबाहेर lockout झालेल्यांना त्यांची दारं उघडून द्या.
ही सगळी कामं हळुहळू अंगवळणी पडू लागली. काही लोक फार कटकटे तर काही सतत रडणारे, तर काही महा वात्रट!
एकदा रात्री २ वाजता कानठळ्या बसणार्‍या धाण्-धाण आवाजानं जाग आली. नवरोबा अजुन lab मधेच होता. तेव्हा मला उठून बघणं भाग होतं. तसंही building मधे काही झालं की तिथे हजर व्हावंच लागे. हा आवाज तर अगदी घराबाहेरच!
वैतागुन उठले. बाहेर जाऊन बघते तर आमच्या लोखंडी जिन्याच्या पायरीवर एक देशी शेजारी नारळ फोडत होता. बाजुला ४ आणखी देशवासी डोंबार्‍याचा खेळ बघायला आल्यासारखे बघत उभे! माझ्या डोक्यात तिडिक उठली. काही भान तर ठेवावं वेळेचं! (हा आपला मराठमोळ्यांचा group ). तसा त्यांचा फारसा त्रास नसायचा.
"तुम्हाला आत्ताचिच वेळ मिळाली कारे नारळ फोडायला?"
"का बरं कोणी complaint केली का तुमच्याकडे?" हा वर प्रश्ण!
"मी स्वत: करतेय ना'!
"आम्ही सगळे आत्ताच आलो घरी. जेवण बनवतोय"
"हो चिकन करी'! इती दुसरे मराठी बंधु!
"हो, आणि याच्या आईच्या रेसिपीत वाटलेला नारळ घालायला सांगितलय'"
आता हसावं की रडावं ते कळेना!
तेव्हड्यात आणखी काही शेजारी आले. पोलिसांना बोलवतो च्या धमक्या द्यायला. मी दिसल्यावर आणखी तकरारी सुरू.
"मी बघतेय. तुम्ही झोपा." मी म्हंटलं.
"एका आणखी घावात फुटेल बघा".
नारळ फोडणारे बंधू.
"लवकर कर बे. भूक लागलीय".
आता काय म्हणावं या कोडगेपणाला!
शेवटी मी सांगितलं, "माझा नवरा अजून घरी यायचाय. माझं पोर जर आवाजानं उठलं तर खरंच तुम्हा सगळ्यांना babysit करायला लावेन त्याला."
"पण आमचं चिकन कसं होइल नारळाशिवाय"?
अखेरीस मला आठवलं माझ्या फ्रीजमधे बरीच नारळाची चटणी होती. ती त्यांच्या हवाली करून नारळ फोड प्रकरणावर पडदा पाडला. तेव्हड्यात univ police येऊन चौकशी करून गेले.
जराच वेळात अनिरुध्द घरी आला.
"शेजारी मस्त काहीतरी बनवताहेत.बढिया वास येतोय."
"चिकन करी झाली असावी बहुतेक. तू चाखून ये हवं तर"! मी कूस बदलून झोपी गेले. 'देवा, उद्याच्या यांच्या रेसिपीत नारळ नसावा'!


Mrdmahesh
Tuesday, June 06, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटले चांगला खोवलेला नारळ मिळत असेल तिथे.. पण या अनुभवारून असे वाटते की तिथे बरंच काही आपल्यासारखं किंवा त्याहूनही वाईट मिळत असावे..
मला वाटले US मध्ये गेल्यावर कुंथणं सोडून बाकी सगळ्या गोष्टी " automatic " होत असतील...
बाकी आपण मराठी कुठेही जाऊ अन् महाराष्ट्रात असल्यागतच वागू..
छन लिहिलंय... आणखी येऊदेत.. विशेषत: आपल्या मराठी लोकांची कर्तृत्वे...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators