Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 06, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » वैशाख » काव्यधारा » कविता » Archive through May 06, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, May 05, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुन्हा एकदा वाचून पुन्हा एकदा प्रतिसाद देतोय . खूप सुंदर कविता आहे ही.
केवळ भावनांना हात घालणारा विषय आहे म्हणून नव्हे तर
योग्य ठिकाणी आलेली योग्य वाक्ये , पंचेस आणि मांडणी. केवळ अप्रतिम. ह्या कलाकृतीला अभिवादन.


Shyamli
Friday, May 05, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय बोलायचे...
आमचे अनुभव आहेत हे...

अप्रतिम......


Jaaaswand
Friday, May 05, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया... अतिशय सुंदर कविता.... लाजवाब
एकदम डोळ्यांत......................


Devdattag
Friday, May 05, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ह्या महिन्याच्य सुरवातीपासून एवढ्या चांगल्या कविता वाचायला मिळतायत..
श्रीराम, सुधीर, निनावि, वैभव सुरेखच
सुप्रीया.. अ प्र ति म



Smi_dod
Friday, May 05, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम.. ऋतु_हिर्वा अगदी सुंदर... अगदी शब्द मुके झाले...ड़ओळ्यात पाणी च आणलेस..

Limbutimbu
Friday, May 05, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतु_हिरवा, छान जमली हे ग कविता! :-)

Rutu_hirwaa
Friday, May 05, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या चटकन प्रतिक्रिया मिळतील असे नव्हते वाटले
खूप खूप धन्यवाद..
हो..मलाही टाकताना जरा धाकधूकच वाटत होती..
न जाणो कुणाला तरी वाटायचे की आपल्यावरच लिहिलीये.
तर तसे काहीच नाहीये ग श्यामली..


Puru
Friday, May 05, 2006 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता खुपच छान आहे ऋतु हिरवा! अमेरिकेत असतो तर माझे डोळे नक्कीच पाणावले असते! मागच्या वर्षी भारतात परतलोय, दुनियादारी नव्याने समजलीय. कवितेतलं जग वेगळं, वास्तवातलं वेगळं! थोडा भरकटलोय मी हे लिहीताना. Sorry folks!

Sumati_wankhede
Friday, May 05, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतू....
तुझी कविता वाचून डोळ्यात तर पाणी आलंच...
पण काळजातही.........


Sumati_wankhede
Friday, May 05, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता मात्र....

जेव्हा नव्हतं कुणी मनात...
तेव्हा नव्हती एकांताशी जवळिक;
वा... नव्हता इंद्रधनुष्यी स्वप्नांचा मोह
मनोमनी... कुणाच्या आठवणींनी चिंबण्याचं वेड
वा... आकाशातून तुटणार्‍या तार्‍याकडे
मागणंही नव्हतं काही.

आता मात्र वाटतं...
सकाळ....
तुझ्या झुळकीने उगवावी.
दुपार.....
तुझ्या स्नेहाने ओथंबून यावी.
संध्याकाळ....
तुझ्या आठवणींनी उत्कट व्हावी.
अन रात्र.....
तुझ्या साखरमिठीत तृप्त व्हावी.


Ninavi
Friday, May 05, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुप्रिया, अप्रतिम.. अप्रतिम.. सुंदर..

Pkarandikar50
Friday, May 05, 2006 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा, किती सुन्दर लिहितोस. श्रीराम आणि ऋतु-हिरवा, मस्त कविता, मजा आला.
बापू


Dineshvs
Friday, May 05, 2006 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ॠतु हिरवा, खुप छान. आणि वेगळा विषय म्हणुन तर खासच आवडली.

Pkarandikar50
Friday, May 05, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरसा

दूर-दूर हून लोक येतात, माझ्या घरी,
लाम्बच लाम्ब रान्गा लावतात, झुम्बड उडते.
माझा आरशांचा संग्रह पहाण्यासाठी.
शेकडो, हजारो, आरसे, पहावे तिकडे आरसे.
छोटे, मोठे,गोल, चौकोनी, षटकोनी,
छान-छान सजावटी, मढवलेल्या महिरपी,
जडवलेली नक्षी, बुट्टे, पाने, फुले, वेली.
काहींच्या भोवती, चित्र-विचित्र आकृती.

काही वेळाने, पाय थकतात त्यांचे.
आपली तीच ती छबी न्याहाळून,
डोळेही शिणतात, कंटाळा येतो.
किती पहायचे? शेवटी सगळे आरसेच.

'काय मुलुखावेगळा छन्द हा, नाही?'
'पण परिश्रम किती घेतले असतील.'
'हौसेला खरंच मोल नसतं.'
'एका आरशात दिसतं, तेच दुसर्‍यांत,
काय करणारे हा इतक्या आरशांचं?'
'सरकारने ताब्यात घ्यावा हा संग्रह,
छानसे म्युझियम होईल, नाही का?'

नानाविध प्रतिक्रिया, मतं, प्रतिवाद,
माझ्या सवयीचं झालंय आता सारं.
एक जण मात्र निघाला, समोर येऊन बसला.
"दोन प्रश्न विचारू कां?" मला म्हणाला.
मी मान डोलावली, तशी म्हणाला, "का?"
मी म्हटले,"आणि दुसरा प्रश्न?"
"आणखी किती जमले की थांबणार?"
त्याचा दुसरा प्रश्न, तयारच होता.

"दुसत्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो,
मग पहिल्याचे, कदाचित नाही द्यावे लागणार.
खरं उत्तर आहे, 'मला माहीत नाही'.
मलाही वाटतं, कधी कधी,पुरे झाले आता,
थाम्बावं इथेच. नको आणखी आरसे.
पण एकच आरसा आणखी हवाय,
तो मिळेपर्यन्त, कसं थाम्बणार?"

"आणखी कसला आरसा हवाय तुला?"

"तू नीट पाहिलंस का? संग्रहातला
एक आरसा दुसर्‍यासारखा नाही.
तुला काय दिसलं, ठाऊक नाही, पण
मला प्रत्येकात दिसतं वेगळं प्रतिबिम्ब.
एक मी दुसर्‍या मी सारखा नाही.
अजून शोधतोय, शेवटचा एक आरसा,
जो दाखवेल, जुन्यातल्या एकातरी
प्रतिबिम्बाची पुनरावृत्ती.
एकदातरी, फक्त एकदाच,
एकाची दुसरी हुबेहूब आवृत्ती.
घेऊन ये, माझ्या साठी, मिळाला तुला,
कुठे जर, असला आरसा, शेवटचा."

बापू





Ninavi
Friday, May 05, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा बापू! खास!! ... ...

Shyamli
Friday, May 05, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>जुन्यातल्या एकातरी
प्रतिबिम्बाची पुनरावृत्ती. >>>

बापु वा...
खुप दिवसानी दिसलात होS



Vaibhav_joshi
Friday, May 05, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू , कौतुकाबध्दल धन्यवाद .

तुमच्या कवितेवरून खूप चर्चा झाली घरी , वाद झाले , काही प्रश्न आहेत ..

१) . कवी काय शोधतोय ?
२) . एकसारखे दोन आरसे म्हणजे काय ? एकसारखे प्रतिबिंब , मत दाखवणारी दोन माणसे का ?
३)शक्यतो माणूस एकच असा आरसा / माणूस शोधतो ना ?
४) . की कवी जुने दिवस शोधतोय ?

प्लीज कळवा ... इज्जत का सवाल आहे


Pkarandikar50
Friday, May 05, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ninavi,Shyamali,Vaibhav, thnx.
A dear friend of mine, Shirish Gopal Deshpande,who teaches in SNDT University, Mumbai and who is an accomplished poet,novelist and screen-play writer, once read one of my poems- Banda Rupaya- and started interpreting it (professor-like). I tried to stop him half-way and tried to explain the common thread running through various sur-realistic images in the poem. He did not allow me to proceed. He said,"Your job was to write a poem. You have said everything you wanted to. Now it is the job of the reader to interprete it. If you want, you can rewrite it or write another one but please don't try to impose one particular interpretation on others.Try and maintain the sanctity of the writer-reader relationship."

So, I will not try to interprete my own poem. But I can tell you, what triggered it. Manohar Sapre was in Pune for a very brief visit and he found some time for me. During the course of our conversation, he narrated his different vocations and different art-forms he came to handle in his working life spanning now over 55 years (he is 74 now). Started as a class-II officer in Finance & Accounts Service, left it soon and went from one calling to another. He worked for a while in Dainik Maarmik as a cartoonist, worked as free-lancedesigner and illustrator, got onto trade-union movement,then taught Political Science for 22 long years,got fed up and then setled down in Chandrapur.Somewhere along the line, even contested an election to LokaSabha and lost. Now he trains Adiwasi boys and girls drawing, terracotta-work, carpentary, drift-wood work, even turning pebbles in the river-sand into objects of art. He continues to be a free-lance designer and cartoonist. Very much in demand as a speaker at various training programmes, he fairly regularly wites in news-papers and journals.He remarked that as he moved from one thing to another in his serpentine career, he discovered a new image of himself at every twist and turn. And the journey is far from over.
After he left,I kept thinking of the life of this multi-faceted and multi-talented,maverick. Can anyone, including himself, say what he will try his hand at, next? That inspired me to write 'Arasaa'.
Bapu.

Jo_s
Saturday, May 06, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापू
कविता फारच छान, बोलकी आहे. शेवटच कडव सुंदरच आहे. आणि कल्पनाही अप्रतीम . . . .
या हातच्या (कंकणाला) कवितेला आरशाची गरजच नाही.

सुधीर


Bkshailendra
Saturday, May 06, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जीवनाच्या या वाटेवरती
पाउले सदा दु:ख़ाची
मात करता त्यावर
पायवाट मिळते सुख़ाची

मनामनाच्या शब्दझुल्यात
तुझे माप घ्यायचे
नन्तर मात्र तुझ्या
आठवणीनी कासाविस व्हायचे.

- शैलेन्द्र




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators