|
Moodi
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:57 pm: |
| 
|
माणुस स्वतला कितीही स्वच्छतेचा पाईक समजत असला तरी निसर्गात काय होईल ते इतके विचित्र असते की ते प्रत्यक्ष बघताना देखील किळस वाटावी असा अनुभव मी आज घेतला. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. असे असतेच की जगात. पण नाही तुम्ही पण पहा म्हणजे कळेल की निसर्गावर माणुस मात करु शकतो पण ज्यावर मात करायची आहे, ते काही पुर्णपणे नष्ट झालेले नाही या जगातुन. आज National Geo. वर मी आत्ताच जो कार्यक्रम पाहिला तो आपल्या पाल्यांना( मुले, मुली) शाळेतुन होणार्या उवा वगैरेंवर माहिती देणारा आहे. मी याविषयी जास्त बोलणार नाही कारण या गोष्टीविषयी सर्वांना माहीत आहे, पण ज्या विषयी मी बोलतेय ते आहे मॅगो( उच्चार वेगळा आहे). अफ्रिकेत अन अमेरीकेत एक माशी आहे, ती गाय, मनुष्य, माकड, मांजर अन जो दिसेल त्या प्राण्याच्या त्वचेवर आपली अंडी घालुन एक रोगाचा प्रसार करते. हा रोग अमेरीकेत सिव्हील वॉरच्या वेळी आढळुन आला. मध्यंतरी एक पर्यटक कोस्टारीका इथे गेली होती. ती परत आल्यावर तिला चक्कर येणे, थकवा येणे, पायाला भयानक खाज सुटणे असा त्रास झाला. सगळ्या तपासण्या झाल्या अन शेवटी तिने व तिच्या डॉक्टरनेच माहिती शोधुन काढली या अळी विषयी जी माणसाच्या शरीरात राहू शकते, अन खुप त्रास देते. ढेकुण, डास वगैरे तर पुष्कळ कमी उपद्रवी कारण ते दिसतात पण हा किडा वरुन दिसत नाही. खरे तर हे बघायची पण इच्छा होत नाही पण सायन्स याबाबतीत काय म्हणतेय अन किती शोध लागलेत हे बघायची उत्सुकता आहेच. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आनंद आहेच पण आपल्या घरात असे काही येऊ नये म्हणुन दक्ष राहावे ही विनंती. कारण असेच किडे सार्वजनीक रोग पसरवुन मानवजातीला हानी पोहोचवतात. मा. नेमस्तक तुम्हाला यात काही विवादास्पद वाटत असेल तर हे उडवुन टाकावे ही नम्र विनंती. केवळ माहिती या दृष्टीकोनातुन मी हा बीबी उघडला आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|