|
Maanus
| |
| Monday, April 03, 2006 - 7:16 pm: |
| 
|
काहीही विचार मनात न आणता, लगेच झोप यावी यासाठी काही उपाय आहेत का? ही झोप जास्तीत जास्त काळ कशी टिकवता येईल. कृपया टिंगल टवाळी करु नये. मी seriously विचारतोय.
|
A_sayalee
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:08 am: |
| 
|
खरं तर झोपेची आराधना करत बसु नये...कहितरि चान्गले वाचन करावे. आपोआप झोप येते अस माझा अनुभव आहे
|
Chandrika
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:24 pm: |
| 
|
Maanus He karun bagh 1. Drink hot milk before going to bed, 2. Wash your feet with hot water before you go to bed, 3. Massage your feet with mustard oil before going to bed, 4, Listen to your fav. music before going to bed, 5. Read your fav. book or religious book before going to bed.
|
Moodi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 12:32 pm: |
| 
|
सागर शक्य असले तर जेवण अन झोपेच्या वेळात निदान १ तासाचे अंतर असु दे. शक्यतो ते २ तासाचे हवे, पण नोकरीमुळे ते शक्य होत नाही काही वेळेस. चंद्रिका म्हणतेय ते बरोबर, मात्र दुधात हॉर्लिक्स घाल, फार शांत झोप मिळते त्याने. माझा उपाय सांगु? हसणार नाहीस? बघ हसलास तर एक रट्टा हाणिन पाठीत. मी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावुन जेव्हा स्तोत्र म्हणते तेव्हा डोक्यातील चिंता अन विचार खुप कमी होतात. ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करावे.
|
Maanus
| |
| Tuesday, April 04, 2006 - 2:34 pm: |
| 
|
सर्वांचे माहीतीबद्दल आभार. होते असे की सगळे काम उरकुन bed मधे गेले की एक एक विचार मनात यायला लागतात, काहीही विचार, हितगुज वर काय सुरु असेल, उद्या अमुक एक गणित लिहायचेय, त्याला कसे optimize करता येईल. वैगेरे वैगेरे... खुप काही. मग रात्रीचे १ २ कसे वाजतात कळत नाही. पुर्वी मी खुप वाचन करायचो, पण जेव्हापासुन US मधे आलोय ते सगळे बंद झाले. in fact काही नाविन शिकायची इच्छाच होत नाही. त्यामुळे वाचन बंद झालेय. पाय धुतल्याशिवाय तर मला झोप येतच नाही, नाहीतर पायतुन खुप गरम वाफा बाहेर येत असल्याचा भास होतो. वसु तु म्हणते तसे करता येईल. But I am 100% sure, I wont be able to concentrate while praying. म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल असेल दिसत नाही. मनातुन सगळे विचार काढुन टाकायला अजुन काही उपाय आहे का?
|
Moodi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 3:02 pm: |
| 
|
सागर तुला संगीतातील रागदरीत interest आहे का? हे बघ, ते जरी कळले नाही तरी काही राग असे आहेत की ते मनाला खुपच शांत करतात. दुसरे म्हणजे झोपेच्या आधी जर आंघोळ करायला जमले तर लवेंडर सोप वापर. किंवा बेड अन उशांवर वर लवेंडरचा हलकासा स्प्रे मारुन बघ. नाहीतर लवेंडरचा समावेश असलेला रुम फ्रेशनर बेडरुम मध्ये फवराउन बघ. पण हे रोज करु नकोस, आठवड्यातुन १ ते २ वेळाच ठीक जास्त नको. कारण मग त्या अती वापराने त्रास होवु शकतो. अन सुट्टीच्या दिवशी बाहेरुन शॉपिंग करुन आल्यावर दारे खिडक्या पूर्ण उघडुन हवा खेळती राहु दे. सध्या थंडी कितपत आहे ते बघ. पण दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये जे करणार आहेस ते आदल्या रात्री झोपायच्या वेळेस का ठरवतोस? त्याची आखणी आल्यावर करत जा ना. ऑफिसला घरात नको रे आणुस. अन हितगुजमध्ये काय असेल त्याचा विचार रात्रीसच का? एकतर मायबोलीवर आपण सगळे विक्षीप्त आहोत, कुणाचे काय विचार असेल अन काय टॉपिक असेल हा विचार करुच नकोस. सगळे मायबोली कैदी आहेत इथे, तू कशाला अडकतोस त्या पिंजर्यात? नाहीतर चल आपण त्या हितगुजचे व्यसन कसे सोडायचे तिथे जाऊन डिस्कस करु. 
|
एखादा मंत्र येतो का? ठरल्या वेळी झोपायचे, तेव्हा तो मंत्र म्हणत झोप कधी लागते ते कळणारही नाही आणि पहाटे ४ ला उठुन काय planing करायचे दिवसभरासाठी ते ठरवायचे, पहाटे उठणे २-३ दिवस जड जाइल पण एकदा सवय झाली ना मग रात्री ९ लाच झोप यायला लागते.फ़क्त सुरवातीला पहाटे झोपायचा मोहाच एक क्षण टळला न कि उठने सोपे होते. करुन बघ..!!!
|
माणूस तू चांगला प्रश्न उपस्थित केला आहेस... म्हणजे शांत झोप लागण्याविषयी चे सल्ले / सुचना तुला दोन्ही पार्टीज देऊ शकतात... १ ज्यांना असा काही त्रास होत असेल व त्यांनी त्याच्यावर उपाय शोधला असेल २ ज्यांना असा काही त्रास कधी झालाच नसेल.... तुझ्या माहीतीसाठी मी दुसर्या वर्गात मोडतो म्हणून त्या विषयी काही सांगू शकीन.... पण मला काही मूडी, लो.मु., सायली अन चंद्रिका सारखे scientific & spiritual मुद्दे नाही सांगता येणार.... मी तुला माझ्या अनुभवावरून काही सरधोपट " अभिनव " सल्ले देऊ शकतो.... एकतर मनातून विचार काढून टाकणे अवघड आहे.. त्यामुळे असे विचार आणायचे मनात कि ज्यांनी मन शांत होईल... उदा : तुला क्रिकेट मधे interest असेल ( असेलच ) तर त्या बद्दलची तुझी स्वप्न काय आहेत / होती/ असतील... आणि स्वप्न सत्यात उतरली तर तु कसा deal करशील त्याच्याशी वगैरे तुला फ़िरण्याची आवड असेल तर.. कुठल्या ठिकाणाला आतच्या आत्ता भेट द्यायला तुला आवडेल.. तसेच बरोबर कोण असावे असे वाटेल.... असे सर्व काही.... तुला झोपेत स्वप्न दिसतीलच पण सगळीच तुझ्या मनाजोगती नसतील.. त्यामुळे रंगीत तालीम आपल्या आवडत्या स्वप्नांची करायची.. मेन शो " वरच्या " वर सोडायचा अजून एक सांगतो.. पटले तर बघ नाहीतर ह्या सल्ल्याऐवजी दिवे घे झोप ही आपली GirlFriend आहे असं treat कर... ती तुझीच आहे.. मग मागे लागण्यात काय point आहे जास्वन्द...
|
milk आणि light music ऐकणे हे दोन चांगले उपाय आहेत. tried and tested ;-) हितगुज व्यसनमुक्ती संदर्भात मागे एकदा कुणीतरी मला दिलेला सल्ल यावर पण लागू होऊ शकेल, : लग्न करून पहा :-P
|
Storvi
| |
| Tuesday, April 04, 2006 - 7:45 pm: |
| 
|
ह. ह. तु हा ऊपाय करुन पाहिला आहेस काय? milk आणि light music हा उपाय अगदी बेष्ट. आरोही ला पण आवडतं. infact टेप संपली की तिला लगेच जाग येते आणि आई गाणं दाब ( हो हो दाबच म्हणते ती कारण गाणं लावण्यासाठी बटण दाबावं लागतं ना ) अशी फ़र्माईष होते.
|
Suyog
| |
| Wednesday, April 05, 2006 - 12:04 am: |
| 
|
सकाळी उठल्यावर शरिर दुखत जड वाटत ह्या वर उपाय काय?
|
व्यवस्थीत जेवण with lots of salad आणि भरपुर व्यायाम,.. जगाची, officechee , आपली(आदरार्थी एकवचनी) सगळ्यांची चिंता सोडुन देणे. भरपुर पाणी पिणे...
|
Bee
| |
| Wednesday, April 05, 2006 - 10:23 am: |
| 
|
सुयोग, तरुण वयात सहा तास झोप पुरेसी आहे. जर सहा तास झोपेनंतर शरीर जड वाटत असेल, दुखत असेल तर सुरवातीला लवकर झोप, लवकर उठ आणि पहाटेच्या चंचल वातावरणात फ़ेरफ़टका मारायला जा. थोडे हात पाय हलव म्हणजे अवयवांना चालणा मिळेल. मी कमीतकमी सहा सुर्यनमस्कार तरी रोज घालतो त्यामुळे शरीर लवचिक राहत. लवकर झोप येण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे कामावरुन घरी परत आल्यानंतर गार किंवा कोमट पाण्यानी आरामात स्नान करणे. डोक्यावर जलधारा पडली की डोक शांत होत. स्नान केल्यामुळे थकलेल शरीर शीण पावण्यास मदत होते, शरीर हलक होत, थकवा दूर निघून जातो आणि उल्हासित वाटत. बर्याच जणांना कामावरून परत आल्यानंतर लगेच TV आणि खाणेपिणे लागते. ती सवय खर तर मोडायला पाहिजे.
|
Moodi
| |
| Wednesday, April 05, 2006 - 11:22 am: |
| 
|
पण सगळ्यात जास्त मजा लहान मुलांचीच असते. काही विचार नाहीत, कटकट नाही, भरपूर खेळणे, मस्ती यामुळे ते लवकर दमतात अन मग त्यांना झोप पण छान लागते. लहानपणीच मस्त तेलाचा मसाज, कोमट पाण्याची आंघोळ काय मजा आहे नाही!! खरे तर शक्य असल्यास जेवण झाल्यावर रात्री जवळपास पार्क किंवा रस्त्यावर फेरफटका मारला तर छान वाटते. माझा मामा अन मामी नेहेमी रात्री जेवण झाले की बालगंधर्व पुलावर फिरायला जायचे. नदीवरचा गार वारा, चांदण्यांचा प्रकाश अहाहा!! आता वडगावला गेल्यावर ते शक्यच नाही त्यांना. बालगंधर्व पुलावर अजुनही तेवढीच वर्दळ असते रात्री. परदेशात हे तेव्हाच शक्य होवु शकते, जर जवळपास एखादा पार्क असेल तर. जास्वंद अरे आपल्याला जे जमेल ते करता येते, त्याकरता स्तोत्रे वगैरे म्हटली पाहिजेत असे काही नाही. पण रात्री कोमट दुध पिणे हा पर्याय तरी सगळ्यांना चांगला वाटु शकतो. माझ्या पुतण्याला माझे सासरे झोक्यात टाकुन मस्त अंगाईगीते ऐकवतात. एकदा ते दुपारी झोपले म्हणुन मी अन माझी जाऊ त्याला गाणी म्हणुन झोपवायला लागलो तर आम्हाला पुढे म्हणताच येईना कारण मला भयंकर हसू यायला लागले. कारण लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई असे एवढेच आम्ही दोघी आळवुन आळवुन म्हणत होतो. मग कसा बसा झोपवला मग त्याला. 
|
Bee
| |
| Wednesday, April 05, 2006 - 12:14 pm: |
| 
|
मूडी, कडकडीत थंडीत भर पहाटे उठून दप्तर घेऊन शाळेत जायला तुला आवडायचे का? मला त्या उबदार रजईतून बाहेर पडायला कधीच आवडले नाही. आई जेंव्हा उठवत असे तेंव्हा खूप कंटाळा येत असे, वाटी हिवाळ्याच्या सुट्ट्या का नाहीत. उन्ह्याळ्याच्या सुट्ट्या कशा दोन तीन महिने असायच्या तशा दिवाळीच्या सुट्ट्या यायच्या कधी नि जायच्या कधी कळतही नसे.
|
Asami
| |
| Wednesday, April 05, 2006 - 7:59 pm: |
| 
|
सहा तास ज़ोप पुरेशी आहे ह्याला काही शास्त्रीय आधार आहे का नुकताच time मधे एक article वाचले होते त्यात male adults ना ८ तास झोपेची गरज आहे असे म्हटले होते. अपुर्या ज़ोपेचा माणूस आणी drunk मनुष्या हे एकाग्रतेच्या द्रुष्टिने एकाच पातळीवर असतात.
|
सागर रोज संध्याकाळी तासभर व्यायाम करत जा...भरपूर पळत जा म्हणजे मस्त घामाघूम होतं आणि पाय थोडेसे मधूर दुखतात भरपूर चालल्यामुळे... आलास की आंघोळ कर म्हणजे थकवा जाईल पण मग तासा २ तासांनी आंघोळीचा freshness गेला की मग खूप झोप येते दिवसभर काम आणि संध्याकाळी व्यायाम झाल्यामुळे आणि bed वर जायची सुधा गरज नाही बसल्या बसल्या झोपशील आणि अगदीच रामबाण उपाय म्हणजे एक दिवस खूप उशिरा झोप २-३ ला... मग दुसर्या दिवशी बघ कसा ९ लाच झोपशील.
|
Maanus
| |
| Wednesday, April 05, 2006 - 11:02 pm: |
| 
|
रामबाण उपाय म्हणजे एक दिवस खूप उशिरा झोप २-३ ला>>>> हे नविन नाहीय मला, रोज साधारण १ किंवा २ लाच झोपतो मी. anyway कदाचीत पुढच्या आठवड्यापासुन हे चित्र बदलेल, मी ऑफीस बदलतोय. परवा लिहीतो detail मधे ह्या बद्दल. आणि हो मी headphones order केलेत मृदु संगीत ऐकायला . गेले दोन दिवस परत पाउस झाल्याने पळण्याला थोडा आराम आहे. बहुतेक ह्या weekend नंतर पाउस नाही पडायचा.
|
२-३ ला झोपतो, पण उठतो किती वाजता..... सकाळी की पहाटे... ?
|
Zelam
| |
| Thursday, April 06, 2006 - 12:21 pm: |
| 
|
माणसा हे try करून बघ आणि झोप निवांत http://www.loksatta.com/daily/20060406/viva02.htm
|
Chandrika
| |
| Thursday, April 06, 2006 - 12:26 pm: |
| 
|
Maanus, Headphone order keles? tu IPOD mhanatos ka? IPOD or headphones nako vaparus zopatana. aaple regular tape,cd or mp3 players vapar pan headphones nako.. asa maza personal exp. ahe.. Tu try kar hav tar paN headphones are not good for your ears asa kuth tari vachalyach aathavat ahe.. bakiche salla detilach...
|
काय सागर झाली का चांगली झोप? काल काही उपाय करून पाहिलास का वरच्यांपैकी?
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:18 pm: |
| 
|
आसामी तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे. झोप ही ८ तासाचीच हवी. स्त्रीयांसुद्धा हा नियम तसा लागु पडु शकतो कारण दिवसभरातील कामाची कसरत, लहान मुलांसाठी जागरणे वगैरे. शारीरीक मेहेनत करणारा माणुस( ए सागर आयडी बदल रे तुझा) अन बौद्धीक मेहेनत करणारा माणुस यात अंतर असतेच. कारण शारीरीक मेहेनत करताना बुद्धी इतकी वापरावी लागत नाही. त्यांच्या मेहेनतीला मोल कमी असले तरी मेहेनत ती मेहेनतच. पण त्यामुळे त्यांना जो व्यायाम घडतो अन शरीर लवकर थकते त्यामुळे त्यांना अगदी रस्त्याच्या कडेला, शेतात, झाडाखाली सुद्धा चटकन झोप लागु शकते. मात्र बौद्धीक मेहेनत करणारा माणुस(परत माणुस) बौद्धीक कामामुळे जास्त थकतो. मेंदु थकतो म्हणतात ना तसे. विशेषता IT अन तत्सम क्षेत्रातील लोकाना सतत नवे नवे प्रयोगाना, स्पर्धाना सामोरे जावे लागल्याने हा त्रास जास्त जाणवत असेल. दिवस भर डोके शिणवुन एकाच जागी बसुन जो अवघडलेपणा येतो, त्यामुळे कदाचीत बाकी उत्साह पण गायब होत असेल. मग व्यायाम काय अन बाकी काय, जान है जहान है. सागर एकदा तरी कामाची ठरावीक आखणी करुन मग बाकी गोष्टींना वेळ दे. .
|
Moodi
| |
| Thursday, April 06, 2006 - 1:40 pm: |
| 
|
अनियमीत अन सहा तासापेक्षा कमी झोपेमुळे आयुष्यात पुढील त्रास होवु शकतात. वजन वाढणे किंवा कमी होणे - प्रत्येकाच्या तब्येतीनुसार हे बदलते. रक्तदाब म्हणजे ब्लडप्रेशर वाढु शकते, ताणतणाव वाढवणार्या हार्मोन्सम्ध्ये पण वाढ होऊ लागते, स्मृती र्हासाचा पुढे धोका संभवतो. तेव्हा सांभाळा, उतारवयात गोळ्यांच्या आहारी जाऊ लागु नये म्हणुन योग्य अन संतुलीत आहार पण घ्यावा. पालक, बदाम, केळी अन अंडी, दुध शरीर अन मन फ्रेश ठेवतात.
|
Maanus
| |
| Thursday, April 06, 2006 - 2:01 pm: |
| 
|
मला मधे मधे एक वाईट सवय लागलीय, ऑफीसमधुन आले की १ तास्भर झोप काढायची, ती सवय काही आजुन जात नाहीय, त्यामुळे कदाचीत main झोपेला खुप उशिर होतो. तरी परवा दिवशी आल्या आल्या झोपायचे टाळले व फारच लवकर म्हणजे १० वाजताच झोपलो, पण ११ वाजता एक फोन आल्याने झोपमोड झाली आणि मग परत २ वाजले झोपायला. माझ्यामते, मी चुकीच्या वेळेस पळायला जातोय, ट्युलीप म्हणते तसे सकाळी पळायला यायला पाहीजे. म्हणजे पहाटे पहाटे उठायची सवय लागेल व सहाजीकच लवकर झोप पण येईल. बघुया, ह्या रविवार पासुन तसे करुन बघतो. लोपमुद्रा, सकाळी साधारण ७:३० ला ऊठतो मी. वसुमती, सध्या नोकरी बदलायच्या कामात थोडा व्यस्त असल्याने कामाचा आराखडा आता तरी आखता येनार नाही, साधारन एक महीन्याने नविन कामात रुळलो की जमेल बहुतेक. चंद्रीका, iPod आहे माझ्याकडे. पण चांगले headphones नव्हते. तु म्हणतेस ते खरे आहे, but its true for in-ear headphone . ते iPod बरोबर येतात ना तसले headphones खरच चांगले नसतात. मी जरा वेगळ्या प्रकारचे headphones order केलेत. झेलम मला ऑफीस मधुन लोकसत्ता वाचता येत नाही, घरी गेलो की भघतो. सर्वांचे परत एकदा आभार एवढी सगळी माहीती दिल्याबद्दल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|