स्वस्ति, हि कविता सुरेश भटान्ची आहे कि नाही माहित नाही पुन्हा वाटते कि तुला गुणगुणावे तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे तुझी याद आली अवेळी अशी ही जसे चान्द्ण्याने दुपारीच यावे अजून काही ओळी आहेत, आत्ता आठवत नाहीत
|
म्हणू नका आसवात माझे बुडून केव्हाच स्वप्न गेले उदास पाण्यात सोडलेले प्रस्स्न्न ते दीप्दान होते
|
Mitwa
| |
| Saturday, February 04, 2006 - 2:50 am: |
| 
|
मुग्धा, ही तुला हवी असलेली कविता माज्या एका जुन्या डायरीत सापडली: तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्त लाट तू मागिल जन्मांची आर्त साद तू मानस कुंजातील वेणूनाद तू माझ्या एकांताचा प्रकाश तू माझ्या गीतांचा बाहुपाश तू माज्या दु:खाची चांदरात तू माज्या स्वप्नांचा पारिजात तू अम्रुतभासांचा अंगराग तू विझल्या देहाचा दीपराग तू माज्या जगण्याची वाटचाल तू माज्या रक्ताचा रंग लाल तू माझ्या असण्याचा अंश अंश तू माज्या नसण्याच मधुर दंश
|
ही कविता काही बोलायाचे आहे या श्रीधर फड्के यान्च्या कसेट मधे आहे
|
Swapnil Bhau hi kavita suresh bhatanchi nahi,ti chandrashekhar sanekaranchi aahe
|
Doctor
| |
| Saturday, April 22, 2006 - 5:59 am: |
| 
|
मला भटांच्या कविता खूप आवडतात. इथे पहा http://kavyadhara.blogspot.com
|
Ajaykulk
| |
| Monday, April 24, 2006 - 8:38 am: |
| 
|
रात्र वैर्याची पहारा सक्त माज़्हा, जागणारे शब्द मी निजवू कशाला? बोलता सन्ताप मी सार्या मुन्क्यान्चा पेट्लेले ओठ मी वीज़वू कशाला? साय मी खातो मराठीच्या दुधाची मी कुणाचा उम्बरा ज़्हीजवू कशाला? मी असा कलदार कोठेही कधी ही पावल्या चवल्यास मी खिजवू कशाला?
|
मी कशाला जन्मलो? चुकलेच माझे या जगाशी भांडलो, चुकलेच माझे मान्य ही केलेस तू आरोप सारे मीच तेंव्हा लाजलो, चुकलेच माझे सांग ती तुझीच का हाक होती? मी खुळा भांबावलो, चुकलेच माझे चालताना ओळखीचे दार आले मी जरासा थांबलो, चुकलेच माझे भोवतीचे चेहरे सुतकीच होते एकटा मी हासलो, चुकलेच माझे पाहीजे पुजेस त्यांना प्रेत माझे मी जगाया लागलो, चुकलेच माझे....
|
Lajo
| |
| Friday, November 10, 2006 - 5:33 am: |
| 
|
काल रात्री सुरेश भट यांच्या कविता आणि गीतांवर आधारीत 'नक्षत्रांचे देणे' ची VCD परत बघीतली आणि मायबोलीवर येऊन कधी एकदा त्यांच्या कविता वाचते असं झाल होत. काय सुंदर आहेत भटांच्या एक एक कविता आणि गज़ला! करुण रस असो की शृंगार रस प्रत्येक ओळ अन ओळ मनाला भिडुन जाते.परत परत वाचुन आणि बघुन सुद्धा मन भरत नाही.
|
Anamikaa
| |
| Thursday, April 26, 2007 - 8:28 pm: |
| 
|
आसवांनी मी मला भिजवु कशाला?...... एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?...... लागले वणवे इथे दाही दिशांना?...... एक माझी आग मी उजवु कशाला?...... मी उन्हाचा सोबती घामेजलेला?...... चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?....... रात्र वैर्याची पहारा सक्त माझा?...... जागणारे शब्द मी निजवु कशाला?...... सुरेश भटांची एक अतिशय सुंदर गझल
|
Sunilt
| |
| Friday, April 27, 2007 - 12:49 pm: |
| 
|
वा अनामिका, छान आठवण करून दिलीस .... पुढे ..... मी असा कळदार, कोठेही कधीही........ पावल्या-चवल्यास मी खिजवू कशाला?....... . . . . साय मी खातो, मराठीच्या दुधाची....... मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला?.......
|
Aditi
| |
| Friday, May 18, 2007 - 12:58 pm: |
| 
|
नुकतेच हृदयनाथ मंगेशकरांचा 'भावसरगम' हा कार्यक्रम पाहीला. त्यात ऐकलेली हि सुरेश भटांची गजल्-- मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मी फिरेन दूरदूर तुझीया स्वप्नात चूर तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठावर हुळहुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथे ज्योतीसह थरथरेल जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील माझे आस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातुन गुणगुणेल मग सुटेल मंद मंद वासंतीक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल
|
Menikhil
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:15 am: |
| 
|
परवाच सुरेश भटान्ची २ पुस्तक आणली "सुरेश भट ह्यान्च्य निवडक कविता" आणि "रंग माझा वेगळा". अप्रतीम पुस्तकं आहेत. सन्ग्रहात नेहेमी असावी अशी!
|
Menikhil
| |
| Thursday, July 12, 2007 - 1:32 am: |
| 
|
भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले एव्हडे मी भोगिले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे अन दुजान्च्या आसवानी मज भिजावे लागले लोक भेटयास आले काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले एव्हडीच कविता अठवते अहे.....कोणी पुर्ण करु शकेल का?
|
Zelam
| |
| Thursday, July 12, 2007 - 12:10 pm: |
| 
|
Menikhil ही आहे पूर्ण कविता भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले लोक भेटायास आले काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी मी कशी होते मलाही आठवावे लागले एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
|
"मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते" ही पूर्ण गझल आहे का कुणाकडे? सुरेश भटांच्या नक्षत्रांचे देणे मधेही ह्यातली ३ कडवी गायली आहेत.
|
Shyamli
| |
| Sunday, August 19, 2007 - 4:22 am: |
| 
|
आलाप मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते! कुठेतरी मी उभाच होतो...कुठेतरी दैव नेत होते! वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही! उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना... करु तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते! असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी, कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते! जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते! बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो? धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते! मला विचारु नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी? तुझेच आलाप काल रात्री उसासणा-या हवेत होते!
|
धन्यवाद श्यामली. इतक्या पटकन दिलीस
|
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही! एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही! जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे; सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही! कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो; पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही! सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी; एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही! स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे; एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही! वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत; सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही! संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा.... लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!
|
Ajaykulk
| |
| Wednesday, April 23, 2008 - 8:28 am: |
| 
|
ऊजाडल्यावरि सख़्या निघून जा घराकडे आजूनहि उशीवरी टिपूर चान्द्णे पडे ऊगाच वेळ सारखी विचारतोस काय तू? मिठीतही पुन्हा पुन्हा शहारतोस काय तू? पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे? ऊजाडल्यावरि सख़्या निघून जा घराकडे अजून कुन्तलात ह्या तूZआ न जीव गुन्तला अजून पाकळ्यातला मरन्द ही न सम्पला अजूनहि कसे तूZए लबाड ओठ कोरडे ऊजाडल्यावरि सख़्या निघून जा घराकडे अजून थाम्ब लागली जगास ओप आन्धळी दिसेल या नभातही अजून रात्र थाम्बली तुला मला विचारून फुटेल आज ताम्बडे ऊजाडल्यावरि सख़्या निघून जा घराकडे
|