मला वाटतं मॉडरेटर साहेब हा BB आणि अनुवादीत कविता हा BB पद्य विभागात हलवल्यास चांगला प्रतिसाद मिळेल.
|
मॉडरेटर साहेब अजूनही हा BB इथेच ठेवायचा हट्ट करणार आहात का? मी आधीच आपल्याला विनंती केली आहे की हा BB पद्य विभागात हलवावा तिथे चांगला प्रतिसाद मिळेल
|
एकटा एकटा जन्म हा चालला एकदाही भेटला ना तू मला जीवना! अजूनही जीवना तू मला. चार-चौघातूनी वेगळा मी दिसे लोक सारे चतुर अन खुळा मी दिसे मुखवट्याने बोलण्याची साधली ना कला! अजूनही साधली ना कला. -वैभव देशमुख
|
इतका वेळ अश्रूंना दाखवलेला लाल सिग्नल हिरवा होतो, तुझी गाडी सुटताना आणि मनसुद्धा फरफटत जातं तुझ्या गाडीमागे आता तू येशील तेव्हाच ते परत येईल! तू जेव्हा पोचशील ना तुझ्या शहरात तेव्हा उचलून घे जखमी मनाला ओंजळीत आणि टेकव तुझे साईचे ओठ प्रत्येक जखमेवर! मग त्या रात्री ते मिसळून जाईल तुझ्या श्वासात ऑक्सिजनसारखे... मग थोड्या दिवसांनी तुला गर्भ राहील माझ्या आठवणींचा आणि तू फॉरवर्ड करत रहाशील माझ्या डोहाळ्यांची कॅसेट तेव्हा माझं मन तुझ्या पोटात फिरत असेल लाथा मारत असेल... मग तुझे पाय वेगाने वळतील माझ्या शहराकडे तेव्हा गाडीत माझं मन कळा होऊन ढुशा मारत असेल तुझ्या ओटीपोटात! तेव्हा प्लीज लवकर येऊन माझ्या मनाचं बाळ मला परत कर! -प्रणव प्रियांका प्रकाश
|
चित्रात तुझेच रंग तुझेच अभंग माझिया ओठी; नात्यांस मारुनी टाका मारतो हाका बांधूनी गाठी. ही मनास झाली जखम लाव ना मलम तुझ्या ओठांचे; वसू दे ना सुक्या पात्रांत पुन्हा गात्रांत गाव लाटांचे. तव अंग जणू मोगरा तुटो पिंजरा उडू दे पक्षी; ओठांनी सुक्या मातीत पुन्हा अंगणात उमटू दे नक्षी. व्याकूळ तुझ्या प्रेमात तुझ्या मेघात चांदणे माझे; तू रुसली आहे जरी तुझ्या अंतरी नांदणे माझे. -प्रणव प्रियांका प्रकाश
|
सलील कुलकर्णींची, सध्या गाजत असलेली, "नामंजूर" ही कविता / गझल कुठे मिळेल का?
|
Anilbhai
| |
| Monday, October 22, 2007 - 11:49 am: |
| 
|
हि कविता संदिप खरे ह्यांची आहे. खालिल ठिकाणी पहा. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=606387#POST606387
|
Bee
| |
| Tuesday, October 23, 2007 - 2:12 am: |
| 
|
ही कव्वाली आहे गझल वा कविता नाहीये..
|