|
Svalekar
| |
| Monday, September 04, 2006 - 6:52 am: |
| 
|
दा कोड विन्चि कालच वाचले, पुस्तक छान आहे. माझ्याकडे पीडीफ़ फ़ाॅरमट मधे आहे कोणाला पाहिजे असेल तर मी मैल करीन.
|
Raina
| |
| Monday, September 04, 2006 - 7:37 am: |
| 
|
बी- सुधा मुर्तींचे- wise and otherwise " आणि" गोष्टी माणसांच्या". छान आहे. collections of anecdotes आणि जीवनमुल्यांचे सार/ बोधप्रद कथा आहेत्- Stories are 'pithy'. Reminds me of some of Tagore's stories. संस्कारक्षम वयातील मुलांना वाचण्यायोग्या पुस्तकं आहेत- आणि आपल्याला आपलीही जीवनमुल्य पडताळून पाहण्या साठी.
|
Parop
| |
| Thursday, September 07, 2006 - 9:22 am: |
| 
|
नुकतेच सुधीर फडक्यांचे 'जगाच्या पाठीवर' वाचले. पूर्वायुष्यात ते यशापयशाच्या पाठशिवणीने बेजार होऊन आत्महत्या नि ठार वेडेपणाच्या सीमेवर पोहोचले होते. नियतीच्या अजब खेळाचे असे उदाहरण! आत्मविश्वास आणि मनात आशेचा किरण असल्यास असाध्यही साध्य होते असा संदेशच ते देतात.
|
Paragb
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:12 pm: |
| 
|
Chitre Va Charitre- Vya. Madgulkar... Lahan goshtini alankarit pustak. Vachnyas chhan! Athvanitil Kavita - Khand -1 te 4 sadhranta 1999 madhil best sellar. Uttam Kavita tyat aahet. Sangrahi thevnyajoge.. 'Karyarat'paryane karnyajoge pustak. Madhyantari me yavar ek msg takla hota.. Maharashtrat va bhartat ase root level var kaam karnare bharpur lok aahet, Kaka Chvan, Dhonde Sir, Rajendrasinh (johad), Arvind Gupta etc.. tyanche baddal mahiti aslel ti jarur pasrvavi.. BTW vidyaonline 5 Sept chya nimittane baryach goshti alya aahet Nond ghene !
|
मी एक अतिशय सुंदर पुस्तक (म्हणने चुक होईल कारण हे ग्रंथासमान आहे) वाचत आहे. नाव A brief history of India लेखक Alain Danielou पुस्तक वाचतान ह्याचा मराठी अनुवाद करावा असे वाटत आहे. नंतर मी त्यातील डिटेलस लिहीलच. पण तो पर्यंत भारतिय संस्कृती ही किमान काही मिलीयन वर्षे जुनी आहे. तामीळे भाषेतील अनेक शब्द हे तुलनेने नविन धर्म असलेल्या बायबल मध्ये आहेत. रामायण व महाभारत हे pre aryan संस्कृती ला represent करतात. महाभारताचे युध्द जरी आपण कोरव - पांडव असेच समजतो तसे नसुन बहुदा आर्य ( कोरव) व अनार्य म्हणजेच द्रवीड (पांडव) असे झाले असेल. भरत हे नाव कसे पडले हे सर्वांना माहीती आहेच पण भरत हा राजा जैन घर्मीय होता. आर्य लोक हे तुलनेने अशिक्षीत व वैज्ञानीक दृष्ट्या द्रवींडापेक्षा प्रगत न्हवते. मदुरा व मथुरा ( त्या काळी कदाचीत दोन शहरांचे हे नाव असावे व दक्षिनेतील शहराचे नाव नंतर मदुरा असे झाले. द्रवीड हे युरोपात व्यवहार करत त्यामुळेच सो कॉल्ड आर्य लोक भारता कडे आले. म्हणजेच भारत तेव्हा ८ ते १०००० वर्षे BC खुप प्रगत होता. मी असे अनेक मुद्दे लिहु शकतो. नंतर बहुतेक एखादा लेख लिहील. भारतीय ईतीहासा वर मी अनेक पुस्तक वाचलीत. काही बायस काही अन बायस. हे दुसर्या प्रकारातील आहे.
|
Farend
| |
| Wednesday, September 13, 2006 - 12:28 am: |
| 
|
नुकतेच वाचलेले 'लव्हाळी' (श्री ना पेंडसे) मला फार आवडले. अशीच चाळीतील जीवनावर विनोदीहलकी फुलकी इतर पुस्तके कोणाला माहीत असल्यास कृपया सांगा. (बटाट्याची चाळ सोडून, ते बर्याच वेळा वाचले आहे )
|
आजच Stanley Wolpert चे Gandhi वाचुन संपविले. जसे अनेक गांधी पुस्तक आहेत त्या पेक्षा जास्त काही वेगळे नाही पण हा लेखक विनोबा भावें बरोबर भुदान चळवळीत काही दिवस सोबत होता हे वाचुन खरच आश्चर्य वाटले. प्रस्तावनेतच त्याने भारत आता गांधीचा देश राहीला नाही कारण ज्या देशाचा महात्मा अंहीसा शिकवतो त्या देशात अनु स्फोट घडवला जातो व तो देश अनु बॉम्ब बाळगतो अशी काहीशी टिका केली आहे.मला ते वाक्य आवडले नाही पण पुस्तक मस्त आहे. (स्वगत जो हिंसा करन्याची ताकद ठेवतो पण करत नाही तो अंहिसक ) काल बाबासाहेब पुरंदरे लिखीत राजा शिवछत्रपती हा ग्रंथ आला. ( inter lib loan ). परत एकदा वाचण सुरु केले. may be 10 - 15 वेळेस तरी झाले असेल वाचुन. दर वेळेस काही नविन मिळत ह्या पुस्तकातुन.
|
Badbadi
| |
| Thursday, September 28, 2006 - 5:20 am: |
| 
|
लक्श्मणरेषा.. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्श्मण यांचे हे अनुवादित आत्मचरित्र. अनुवाद केला आहे अशोक जैन यांनी. आपण साधारण जी चरित्रे वाचतो ती लोकं खूप कष्टातून, झगडून वर आलेली असतात आणि यशस्वी होतात. लक्श्मणांच्या बाबतीत तस.न काहिहि नाहिये. त्यांचे वडिल इंग्रजांच्या काळात एका शाळेचे मुख्यध्यापक होते.. इतरांपेक्शा जरा जास्त सुखी बालपण लक्श्मणांनी उपभोगलं. हातात कला होतीच आणि घरच्या सधन परिस्थितीमुळे चौकटीतल्या क्शेत्रातल्या नोकरीची तशी आवश्यकताहि नव्हती. चित्रकलेतच करियर करायचं असं ठरलेलं होतं. सुरुवातीच्या काळात दिल्ली मध्ये प्रयत्न केले, पण एकूणच ते शहर फारसे भावले नाही तेन्व्हा मुंबई ला आले आणि थोड्या प्रयत्नांती टाईम्स ऒफ इंडिया मध्ये काम मिळाले. त्यानंतर या माणसाने अक्शरश: इतके सुख उपभोगले कि हेवा वाटावा. वृत्तपत्र ऒफिसात स्वतंत्र केबिन असणारा हा भारतातला पहिला व्यंगचित्रकार!!! यू सेड इट ने इतकि अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली कि बास!!! अतिशय सूक्श्म निरिक्शण शक्ती, राजकिय घडामोडिंचा तटस्थ अभ्यास आणि हातातील जादुई कला याने या माणसाने ५ दशके भारतीय राजकियत्वावर मल्लीनाथी केली. हे काम इतकं मोठं कि याची दखल मगसेसे पुरस्कर्त्यांनी घेतली... हे पुस्तक वाचताना एक मात्र खटकतं...इतर अनेक व्यंगचित्रकारांचा यात उल्लेख आहे पण १-२ अभाव वगळता लक्श्मण कोणाबद्दलहि फारसं चांगले बोलत नाही. प्रत्येकात काहितरी खोट दाखवली आहे. एकूण चैनी, विलासी आयुष्य जगलेला हा माणूस... स्वत:मधल्या काहिशा वेगळ्या कलेमुळे अफाट लोकप्रियता पण अनुभवली... त्यांच्या ५ दशकाच्या मल्लीनाथी ला सलाम!!! हे पुस्तक एकदा वाचण्यासारखे नक्कि आहे....
|
Meenu
| |
| Tuesday, October 03, 2006 - 5:53 am: |
| 
|
वर कुणी लिहीलं आहे का या पुस्तकाबद्दल माहीत नाही. पण मी नुकतच बलुतं हे दया पवार यांनी लिहीलेलं पुस्तक वाचलं. अतिशय सुंदर लिहीलेलं पुस्तक आहे अगदी आवर्जुन वाचावे असे. महार म्हणुन जन्माला आलेल्या मुलाचं अतिशय जळजळीत वाटावं असं हे आत्मकथन आहे. पण एकंदरीत ज्या पद्धतीने पुस्तक लिहीलय त्यात एक तटस्थपणा किंवा त्रयस्थपणे सर्व अनुभवाकडे पाहणारा दृष्टीकोन आहे. प्रस्तावना व प्रतिक्रीयाही अतिशय वाचनीय आहेत. ज्या मानसिक स्थित्यंतरातुन लेखक प्रवास करतो ते खरोखर वाचलच पाहीजे. तसेच या समाजातील बाबासाहेबांचे स्थान व त्याचे महत्व हेही पुस्तक वाचल्यावर कळु शकते. ह्या पुस्तकाचे वाचन हा प्रत्येकासाठी एक अंतर्मुख करणारा अनुभव ठरावा. पुस्तक : बलुतं लेखक : दया पवार
|
Paragkan
| |
| Wednesday, October 04, 2006 - 4:30 pm: |
| 
|
तसेच या समाजातील बाबासाहेबांचे स्थान व त्याचे महत्व हेही पुस्तक वाचल्यावर कळु शकते.>>>>>> या बाबतीत नरेंद्र जाधवांचे 'आमचा बाप अन् आम्ही' वाचावे.
|
Maitreyee
| |
| Friday, October 06, 2006 - 10:07 pm: |
| 
|
Deception Point - By Dan Brown नुकतंच संपवलं वाचून. प्लॉट सही आहे. अमेरिकेची presidential elections , त्या सत्तेच्या खेळात काही ना काही हेतूने कमी जास्त, चांगला, वाईट प्रभाव टाकू पहाणारी छोटी बडी प्रस्थं, त्याच सुमारास नासा आणि सध्याचा president यांच्या तर्फ़े एक सनसनाटी announcemnt . अशी एक SPACE related discovery की जी पूर्ण जगाची अवकाशाकडे पहायची दृष्टीच बदलू शकेल! त्यातून मग या घटनेचे श्रेय, राजकीय फ़ायदा घेण्याची, दुसर्याला संपवण्यासाठी लागलेली चढाओढ आणि त्यातून उघडकीला आलेले एक धक्कादायक रहस्य अशी साधारण कथा आहे. Dan brown चे मी वाचलेले हे तिसरे पुस्तक. बाकी दोघांप्रमाणे हेही पकड घेणारे आहे यात शंका नाही. Da vinci code, Digital fortress, deception point या तिघात मला बरीच साम्ये वाटली. (हे अगदीच सखाराम गटणे छाप होतय का? पण मला ती साम्ये share करावी वाटली ) १.तिन्ही मधे main character, ( नेहमी हिन्दी चित्रपटात जसा हीरो असतो तसे) एखादी बुद्धिमान स्त्री. एकूण च एक किन्वा जास्त prominent, powerful स्त्री पात्रे २. दर वेळी रहस्य अथवा काय conspiracy असेल ते पण साधे सुधे नाही तर जागतिक महत्त्वाचे!दर पुस्तकात त्या रहस्याचा आधी फ़क्त नावाने उल्लेख होत रहातो आणि अरे ही भानगड आहे तरी काय बोला लवकर असे वाटत रहाते आणि मग तीन चारशे पानांनन्तर हे रहस्य introduce होते! मग त्याची उकल, सूत्रधाराचा शोध वगैरे. ३.प्रचन्ड scientific details . या deception point मधे तर जरा जास्त च वाटले मला! oceanology & astophysics चा overdose झालाय असे मला वाटले या सगळ्या विशेषांसह deception point पुरेसे उत्कंठावर्धक झाले आहे. पण अट्टल रहस्यकथा वाचकांना (जसे की मी ) रहस्या चा, गूढ सूत्रधाराचा खूप लवकर अन्दाज येतो! आणि शेवट मला तरी बराच खेचलाय असे वाटले. especially ते बोटीवर हल्ला, त्यातून submarine मधे, त्यात समुद्रात शार्क, ज्वालामुखी वगैरे too much वाटले! वाचलय का आणखी कुणी हे पुस्तक? असेल तर प्रतिक्रिया सांगा इथे!
|
Sashal
| |
| Friday, October 06, 2006 - 10:46 pm: |
| 
|
प्रत्येक लेखकाचं असं stereotyping असतं बहुतेक .. मी Arthur Hailey ची तीन चार पुस्तकं वाचली, Moneychangers, Airport, HoTel and Detective यातही वेगवेगळ्या ठिकाणी बेतलेले plots होते .. अनुक्रमे बँक, एअरपोर्ट, हॉटेल आणि पोलीसखाते .. सगळ्यांत साधारण तोच प्रकार .. एक hero सारखं व्यक्तिमत्व आणि त्याच्या professional life मध्ये घडणार्या घटना .. पण लिहीण्याच्या style मुळे उत्कंठावर्धक वाटतात वाचायला .. रॉबिन कूक यांची पण दोन पुस्तकं वाचली, Coma आणि Fatal Cure .. त्यातही stereotyping आढळलं .. मोठ्या हॉस्पिटल चा set-up आणि तिथे घडणार्या कारस्थानांची उकल एक hero सारखी धाडसी, बुध्दीमान स्त्री करते ..
|
Milindaa
| |
| Thursday, October 12, 2006 - 12:10 pm: |
| 
|
मैत्रेयी, मी वाचलंय.. आणि तुझ्या यादीत राहीलेलं त्याचं Angels and Demons पण वाचलंय details बाबत तू म्हणते आहेस तसे मलापण वाटले, किंबहुना, त्याच्या सगळ्या पुस्तकात इतक्या बारीक डीटेल्स असतात की कधी कधी 'आता आवरा' असे वाटायला लागते.. पण मला आवडतं असं लिखाण.. त्याची शैलीच आहे तशी.. मी Arthur Hailey ची Airport आणि Hotel एवढीच वाचली आहेत. ती दोन्ही मला आवडली. बाकीची वाचायला आवडतील नक्कीच
|
Asami
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:55 pm: |
| 
|
Deception point प्रचंड predictable आहे. कदाचित त्याच्या आधी Matthew Raily वाचला असेल म्हणून असेल कदाचित. सध्या talk talk वाचतो आहे. झकास आहे एकदम
|
Ishu
| |
| Thursday, October 12, 2006 - 11:19 pm: |
| 
|
ताठ कणा - Autobiography by Dr. P.S. Ramani. गोव्यातल्या एका छोट्या गावातला गरीब मुलगा हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर जगप्रसिध्द Neurosurgeon कसा बनला त्याची कथा. छान पुस्तक आहे. Very inspiring!!
|
कालच वाचलेल पुस्तक केतकर वहिनी. ले. उमा कुलकर्णि. मेहता पब्लिशिंग मालाडची एक मुलगी, जी फक्त सातवी शिकलेली आहे, लग्न होउन चिपळुणजवळच्या करंबवणे गावात येते. सासर म्हणजे गावचे खोत. खोत असुन चांगले वागतात म्हणुन गोड खोत! ह्या केतकरांच्या ९ मुली त्यावेळी घराबाहेर राहुन शिकलेल्या.. केतकर भगिनि म्हणुन प्रसिद्ध. अशा घरात इंदु येते. पण आपल्या मुलींच्या शिक्षणाबाबत आग्रही असणार्या सासरच्या मंडळींकडुन तिचि निराशा होते. या मंडळींचे वागणे पुढे आपल्यालाही खटाकते. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर बदललेले कुळकायदे,लोकांची वृत्ती यातुन तिच्या नवर्याचा खून होतो. सासरे वारल्यावर आपली जमिन टिकवण्यासाठी बाईना खटले लढवावे लागतात. बाईंच्या संघर्षाची कहाणि सुरु होते. एका स्त्रीच्या वेगळ्या संघर्षाची आत्मकथा. उमा कुलकर्णिनी ती साध्या सोप्या शैलीत, उगाच अलंकारीक भाषेत न मांडता आपलयासमोर ठेवली आहे. एकदा वाचावंच अस पुस्तक!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 01, 2006 - 11:32 pm: |
| 
|
Am I Hindu by Ed Viswanathan नाव बघुन लगेच हे पुस्तक वाचायल घ्यावे वाटले. आजकाल धर्मावरील बरिच पुस्तक वाचतोय त्यात हे एक. ज्यांना हिंदु धर्म की काय चिज आहे ह्याचा पत्या नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक बरे आहे. (म्हणजे जाडजूड ग्रंथ नाही पण अगदीच ५० पानी पण नाही). विदेशात जन्मलेल्या व वाढलेल्या मुलाला प्रश्न पडतो की तो हिंदु आहे म्हणजे काय? तो हा प्रश्न त्याचा वडिलांना विचारतो. त्याचे उत्तर म्हणजे हे पुस्तक. लेखकाने हिंदु धर्मा बद्दल माहीती दिली आहे, ३३ करोड देव का?, एकच का नाही? वेंदाचा आढावा, मनुस्मृती म्हणजे काय? पुराण, उपनिषीद वैगरे काय आहेत. एकंदरीत बरिच मोलाची माहीती मिळते. बारोमास चे लेखक कोण आहेत? आता गेल्या काही दिवसातील शेअर बाजारावर वाचलेली व आवडलेली पुस्तक देतो. ज्यांना active trading करायची आहे त्यांना ही उपयोगी आहेत. 1.One Up On Wall Street by Peter Lynch 2.Beating the Street by Peter Lynch 3.Jim Cramer's Real Money: Sane Investing in an Insane World 4 Confessions of a Street Addict 5.Come Into My Trading Room by Alexander Elder 6.The Essays of Warren Buffett : Lessons for Corporate America
|
|
|