|
Sarang23
| |
| Wednesday, December 21, 2005 - 7:42 am: |
| 
|
नलिनी, अशा प्रकारच्या काही इथे पण उपलब्ध आहेत, पण त्या व्याकरणाच पुर्ण ज्ञान देत नाहीत.
|
Hi Does any one knows how to use " Raswa " and Dirgha welantis ? I cant recognise between them. What are the rules for that ? and can any one suggest me the good book for detail grammar of marathi ?? I need to learn marathi grammar in details.
|
Gaulee
| |
| Wednesday, January 18, 2006 - 12:18 am: |
| 
|
marathi madhe "possessive" la kay mhantat konala mahit ahe ka? sadharan shabdacha artha suchla nahi tari vyakranat "possessive pronoun" (tuze, maze etc.) la kay mhantat? gelya ya varshanpasun dokyat keeda ahe....please konitari sanga...thanks! -g
|
Zakki
| |
| Friday, April 07, 2006 - 1:24 pm: |
| 
|
नेमस्तक, खाली भले मोठे posting केले आहे. काही अडचण असल्यास उडवून टाका जेंव्हा मी संस्कृत शिकलो, माझ्या देवतुल्य अश्या गुरुजींपाशी, तेंव्हा 'तुम्ही सगळे तर जन्माला आला नव्हताच' पण त्या वेळी कदाचित तुमची आजी तुमच्या बाबांना म्हणत असे, 'सोनुल्या, नाक दाखव कुठे आहे ते', नि असे दहा वेळा म्हंटल्यावर तुमचे बाबा कान दाखवत!' असो चेष्टा पुरे. त्यानंतर अनेऽक अनेऽऽक वर्षांनी, म्हणजे जेंव्हा तुम्ही कदाचित् अर्धी चड्डी घालून शाळेत जात होता, तोपर्यंत मी COBOL काय, 'शी' काय, Object Oriented काय, सग्गळे काही शिकून बसलो होतो. तेंव्हा माझ्या मनात विचार आला की पाणिनी चे जे व्याकरण आहे त्यात त्याने सुरुवातीला COBOL सारखी Data Division तयार केली आहे. त्यात पुढील व्याकरणाला लागणारे सर्व स्वर नि व्यंजने Data Division मधल्या 01, 05, 10 level सारखी मांडली आहेत. जर कुणाला COBOL माहित असेल, तर कदाचित् कल्पना येईल. जसे: 'ऐउण्' म्हणजे फक्त अ इ नि उ. पण 'अक्' म्हन्टले म्हणजे अ पासून रु, लु, पर्यंतचे र्हस्व स्वर, नि 'अच्' म्हणजे अगदी सगळे स्वर. इ. पुढे व्याकरणाच्या नियमांची त्याने objects बनवली. मग जसजसे नियम सांगायचे असतील तसतशी Objects वापरून 'प्रोग्राम' तयार करायचे. जसे: 'रषाभ्यां नोऽण: समानपदे' नंतर 'अट् कुप्वांग्नुम्व्ययाऽयेपि' अश्या दोन objects मधून न चा ण होण्याचे नियम सांगीतले आहेत. पुढे वृत्तिक नावाच्या रुशीने त्या व्याकरणात 'वार्त्तिके' यांची भर घातली. जसे 'रोऽरपि' म्हणजे मधे रु आला तरी. असे. आता तुमच्या मधे कुणी संस्कृतचे M.A. असतील, Ph.D. असतील तर अधिक्षेपाबद्दल क्षमस्व मे!
|
Zakki
| |
| Friday, April 07, 2006 - 2:07 pm: |
| 
|
माझ्या एक वर्ष आधी श्री. आशोक कुलकर्णि(अकलूजकर) हेहि त्याच गुरुजींकडे संस्कृत शिकले नि त्यांना पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ति मिळाली. मी असे संगणे म्हणजे एखाद्या चौसष्ठाव्या कौरवाने 'हो, भीम, अर्जून' हे माझेच गुरुबंधू' म्हणण्यासारखे आहे! तर हे श्रीयुत् अकलूजकर पुढे संस्कृतमधे Ph. D. घेऊन कॅनडा मधे British Columbia मधे प्राध्यापक असतात असे मी ऐकले आहे. त्याच्याशी या विषयाबद्दल बोलायची इच्छा आहे. पण त्याच्याशी काहीच contact नाही. माझा एक पुणेकर मित्र त्याला ओळखतो, पण गेल्या दहा वर्षात अनेकदा देतो देतो म्हणून त्याने मला त्याचा नंबर दिला नाही. त्या मित्राकडे पाहिले की कळते पुणेकरांना लोक विक्षिप्त का म्हणतात!
|
Zakki
| |
| Saturday, April 08, 2006 - 12:28 pm: |
| 
|
हा सगळा उपद्व्याप १९७७ (हो, म्हणजे तुमच्या पैकी अनेक जण जन्मण्यापूर्वी) सुरु झाला, तेंव्हा मी कंपायलर डिझाइन शिकत होतो, नि लोक जगभर चालेल अशी एखादी भाषा तयार करता येइल का अशी चर्चा करत होते. नि संस्कृतचे नाव, पाणिनी चे नाव बर्याच वेळा, बर्याच पुस्तकात उल्लेखिले होते. इतर मित्रांनी त्यात लक्ष घातले नाही, पण माझे टाळके कसे कॉम्प्युटर मधल्या डिस्क सारखे गार गार फिरत असे त्यावेळी. तेंव्हा हे असले विचार यायचे मनात. तेंव्हा Objects बद्दल काही माहित नव्हते (कुणालाच). आता मात्र सारे कसे शांत शांत. ह. ह. म्हणते त्याप्रमाणे काऽहिही नवीन नाही तुमच्या लिखाणामधे, बोलण्यामधे! खरे आहे!
|
हर्षद, सर्वसाधारनपणे शब्दाचे पहिले अक्षर जर असेल तर पहुला उकार अथवा पहिली वेलांटी देण्याचा संकेत आहे. नन्तरच्या अक्षरात येणारे उकार व वेलांटी दीर्घ असाव्यात. उदा.पिपाणी, हितगुज, मायबोली,कुत्रा,रिमझिम, मुळूमुळू, मुम्बई,सुटका ई. पण याला अपवादही पुषकळ आहेत उदा सूर्य,भूत, मूर्ख, सविस्तर मराठी व्याकरनासाठी प्रा. लीला गोविलकर यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक सध्या तरी मला आठवते आहे (हितगुजवरील झक्की नागपुरी हेही संस्कृत व मराठी व्याकरणाचे अधिकारी मानले जातात असे ऐकून आहे मुमुक्षुनी त्यांच्याशी सम्पर्क करण्यास हरकत नाही.)
|
रोबीन, मुमुक्षुनी म्हणजे ज्याना मोक्षप्राप्ती करुन घ्यायची आहे त्यानी झक्की काकाना भेटावे?? असे म्हणायचेय का तुला?? काका बघा बुवा!! :-)
|
Zakki
| |
| Wednesday, April 26, 2006 - 11:51 pm: |
| 
|
संस्कृत व मराठी व्याकरणाचे अधिकारी मानले जातात 'जातात' असे नसून "'होते' असे झक्कीला वाटत असे," (जेंव्हा तुम्ही कुणीच जन्माला आला नव्हता तेंव्हा!) हे जास्त बरोबर आहे. आता मुमुक्षु म्हणजे जर मोक्षप्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे ते, असे असेल तर झक्कींशी मुळीच संपर्क साधण्यात वेळ घालवू नका!! त्यांना बहुधा अजून पुन: चौर्यांशी लक्ष जन्म घ्यायचे आहेत!
|
Bee
| |
| Monday, May 15, 2006 - 4:22 am: |
| 
|
मी वाचण करत आहे ह्या वाक्यात वाचण बरोबर आहे की वाचन हवे आहे? मी कित्येकांचा उच्च्चार न असा ऐकला आहे. पण वाचणे असे आपण म्हणतो तेंव्हा ते वाचण असावे असे वाटते.
|
मला वाचन असे असावे असे वाटते...!!!
|
वाचनच असावे पचन पचणे रचना रचणे तसे वाचन वाचणे चालन चालणे
|
Bee
| |
| Monday, May 15, 2006 - 9:51 am: |
| 
|
धन्यवाद! पण हे असे का?
|
"णमो" हा शब्द ज्या सन्स्कृतीतुन प्रभाव पाडतो त्याच सन्स्कृतीमुळे वाचन चे वाचण झाले असावे! किन्वा.... वाचन ही एक क्रिया हे वाचणे ही एक क्रिया हे! या प्रकारे एकारान्ती होताना न चा ण होत असावा...! चु. भुल दे. घे.
|
Pha
| |
| Monday, May 15, 2006 - 10:48 am: |
| 
|
बी, व्याकरणदृष्ट्या 'वाचन' हाच शब्द योग्य आहे; 'वाचण' नव्हे. संस्कृतोद्भव क्रियापदांपासून(धातु) तयार झालेली क्रियावाचक नामे नकारान्त असतात. उदा. (मूळ धातु, त्याचा अर्थ आणि त्यापासून तयार झालेलं क्रियावाचक नाम या क्रमाने) : १. सं + कृ(संस्कार करणे, refine करणे) = संस्करण २. परि + इक्ष्(सर्व बाजूंनी अवलोकन करणे, परीक्षिणे) = परीक्षण ३. पूज्(पुजणे) = पूजन ४. स्मृ(स्मरणे) = स्मरण ५. अनु + ईष्(शोधणे) = अन्वेषण ६. भूष्(शोभणे) = भूषण ७. अर्ज्(कमावणे) = अर्जन ८. लिख्(लिहिणे) = लेखन सर्वसाधारण नियम असा की, जर मूळ धातूमध्ये अंत्याक्षर ऋ, र, क्ष, ष या व्यंजनांपैकी एक असेल तर क्रियावाचक नामात 'न' चा 'ण' होतो (उदाहरण क्र. १, २, ४, ५, ६). इतर व्यंजने असतील तर 'न'च राहतो(उदाहरण क्र. ३, ७, ८). या केसमध्ये 'वच्'(दशम गण परस्मैपद) या धातूपासून नाम तयार होताना अंत्याक्षर 'च' असल्याने 'वाचन' असंच नाम तयार होतं.
|
फ, छान विवेचन! पण मला एक सान्ग, वरील नियम किन्वा तत्सम गोष्टीन्चा अभ्यास राहूदेच वाचनही केलेले नसताना आम्ही जेव्हा बोलीभाषेत योग्य शब्दप्रयोग करतो किन्वा काय बरोबर काय चूक हे अन्दाजाने सान्गु शकतो तेव्हा कदाचित असे तर नसेल की मागिल काही जन्मात सन्स्कृतचा अभ्यास झाला असल्यामुळे तो अभ्यास व त्याचे साद पडसाद या जन्मात सूक्ष्म स्मृतीरुपाने कॅरीऑन झाले असतील? हव तर हा विषय जन्म पुनर्जन्म किन्वा मृत्यूनन्तर काय या ठिकाणी न्यावा का?
|
Jo_s
| |
| Saturday, June 24, 2006 - 10:04 am: |
| 
|
कोणी र्हस्व दीर्घ चे नियम सांगेल क? माझ नेहमी चुकतं.
|
सुधीर, तसे र्हस्व-दीर्घ नियम लक्षात ठेवायला थोडे अवघड वाटतात पण समजून घेतल्यावर सोपे वाटतात. नेहमीच्या वाचनामुळेही शब्दांचे र्हस्व दीर्घ लक्षात राहतात. (म्हणजे एखादा शब्द चुकीचा लिहिल्यावर डोळ्याला पटकन जाणवतो.) मराठीच्या पुस्तकातील हे काही महत्त्वाचे नियम लिहीत आहे. [तत्सम शब्द: संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द. उदा. गुरू, पिता, पुत्र, वृक्ष. तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा.] १. मराठीतील तत्सम इकारान्त व उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा. कवी, मती, गुरू, गती. २. शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार दीर्घ लिहावा. उदा. पाटी, विनंती. अपवाद: आणि, नि. ३. तत्सम अव्यये र्हस्वान्त लिहावीत. उदा. परंतु, यथामति, तथापि. ४. सामासिक शब्दांमध्ये विद्यार्थी, गुणी, स्वामी, प्राणी, कवी, गती यासारखे शब्द समासात पूर्वपदी आले तर ते र्हस्वान्त लिहावेत. उदा. गुणिजन, विद्यार्थिमंडळ, स्वामिनिष्ठा. ५. ईकारान्त व ऊकारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार र्हस्व लिहावेत. उदा. गरिबी, माहिती. अपवाद: नीती, प्रीती, दीप्ती इ. तसेच तत्सम शब्द- परीक्षा, पूजा, ऊर्जा इ. ६. साधारणत: मराठीतील, अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्यापूर्वीचे इकार-उकार र्हस्व असतात. उदा, भिंग, सुंठ, खुंटी, विस्तव, नि:पक्षपाती. ७. व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षक, व सुटे र्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदा. हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू. ८. सामासिक शब्दांमध्ये तत्सम शब्द र्हस्वान्त लिहावेत. उदा. अणुशक्ती, विधिनिषेध, कृतिसमिती. ९. साधित शब्दांतही हाच नियम लावावा. उदा. गतिमान, मृदुतर. १०. उपान्त्य दीर्घ ई, ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार-उकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी र्हस्व लिहावा. उदा. गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास. अपवाद: दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. उदा. शरीरास, जीवास, गीतेत. वेळ मिळाला की आणखी लिहीन.
|
Jo_s
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:56 am: |
| 
|
गजानन मना पासून धन्यवाद. आता हे लक्षात ठेवून प्रयत्न करतो लिहायचा. सुधीर
|
Pooh
| |
| Tuesday, June 27, 2006 - 9:48 am: |
| 
|
झक्की, पाणिनी बद्दल अजुन थोडी माहिती. http://www-gap.dcs.st-and.ac.uk/~history/Biographies/Panini.html
|
|
|