|
Pillu
| |
| Saturday, March 03, 2007 - 1:13 pm: |
|
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आज ईथे स्वामींची एक अप्रकाशीत पण बरीचशी माहिती असलेली लीला सांगतो स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते.ते त्यांच्यापरीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमद्सद्गुरु श्री बाळाप्पा महाराज या बद्द्लचा हा प्रसंग आहे. यांनी स्वामीसेवेची निट व्यवस्था ठेवली होती. किंबहुना असे म्हणु की स्वामींची सेवा कशी करावी याचाच परिपाठ यांनी सर्वांना घालुन दिला जो आजही कार्यरत आहे. रोज सकाळी भुपाळीने सुरवात करुन स्नान वगैरे जी सेवा असायची यात बाळाप्पा,भुजंगा,चोळाप्पाचे जावाई श्रीपाद स्वामी, सुंदराबाई, हे व ईतर जण असावयाचे.प्रत्येकाकडे कामे ठारलेली असायची यात ढवळा ढवळ चालायची नाही. कुणाचीही हिमंत नसायची ढवळा ढवळ करायला. रोज आरती व्हायचीच मग स्वामी कोठेही असोत यात खंड पडला नाही. आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवैद्द आसेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत हेतु हा की सर्वांना स्वामींचे दर्शान मिळावे. हा प्रसाद वाटत असतांना बाळाप्पा नेहेमी प्रसादा करीता हात पुढे करीत पण स्वामींनी कधिही बाळाप्पाला प्रसाद दिला नाही. बाळाप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवास स्थानी येत अन आज ही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत. अशी बरीच वर्षे गेली रोज बाळाप्पा हात पुढे करीत अन स्वामी काहिही देत नसत. एक दिवस मात्र बाळाप्पानीं ठरवले की काहिही हिवो आज प्रसाद घेतल्या शिवाय परत फिरायचेच नाही आरती झाली अन दर्शन व प्रसाद घेण्या करीता नेहेमी प्रमाने भक्त गण स्वामींच्या भोवती गोलाकार ऊभे राहिले. स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले. बाळाप्पानी काय केले असावे? एक भक्ताच्या दोन पाया मधुन हात घातला अन प्रसादाची वत पाहु लागले हेतु हा की मी स्वामींना दिसुच नये . ( वास्तवीक स्वामीच या स्रुष्टीचे चालक पालक आहेत मग कुठलिही गोष्ट त्यांच्या पासुन लपणे शक्यच नाही पण लिलाच करायच्या म्हटल्या नंतर त्यांना कोण अडवणार नाही का ?) असो स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळाप्पांच्या हाता पर्यंत आले अन फक्त एक क्षण भरच ऽऽ स्वामी थांबले अन दुसर्याक्षणी बाळाप्पांच्या हतात भली मोठी खारीक प्रसाद म्हणुन पडली. बस्स एका क्षणात बाळाप्पांनी ती खारीक घट्ट पकडली तेथून धुम ठोकली न जाणो स्वामी पहातील अन मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढुन घेतील. बाळाप्पा आपल्या घरी आले, दरवाजा आतुन बंद केला, ह्रुदयाशी प्रसाद म्हणुन मिळालेली खारिक घट्ट धरली, अन डोळे बन्द करुन हमसुन हमसुन अतिशय आनंदाने ते रडू लागले." स्वामी का हो ईतुका वेळ लावलात या गरिबाला प्रसाद देण्यास. मज पामराकडुन असा काय अपराध घडला की मला येव्हढी वाट पाहावी लागली. हा हा मज पामराचे आज भाग्य ऊजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला ," असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे किती तरी वेळ तो प्रसाद न खाता रडत राहीले त्यांची भाव समाधी लागली होती अन एव्हढ्यात दर्वाजा जोर जोरात वाजु लागला. "बाळाप्पा दार ऊघडा" . "बाळाप्पा दार ऊघडा" . स्वामींनी तुम्हांला असेल तसे बोलावले आहे. झाले, बाळाप्पांनी ओळखले की स्वामींनी का बोलावले ते. त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. मान खाली घालुन बाळाप्पा स्वामीं पुढे हाताची मुठ धरुन ऊभे राहिले. " हरामखोर हमसे नजर चुराके परसाद लेके जाताय तु बडा जिंद है. ना तु मुझे छोडेगा, ना मै तुझे ला ओ परसाद ला, " बाळाप्पांनी ति खारीक स्वामींना देऊन टाकली. स्वामींनी ती खारीक घेतली अन बाळाप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले " अरे तु या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधिच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालुन बस हाच तुला प्रसाद. या नंतर बाळाप्पांनी कधिही प्रसादाचा हट्ट केला नाही. ओळखलात का तो कुठला प्रसाद नाहीना स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी. जी कोणालाही मिळाली नाही. धन्य ते स्वामीगुरु अन धन्य ते शिष्य बाळाप्पा
|
Mansmi18
| |
| Friday, April 27, 2007 - 9:22 pm: |
|
|
नमस्कार गुरुपादुकाष्टकात शेवटचे कडवे असे आहे जो साधुचा अन्कित जीव झाला त्याचा असे भार निरन्जनाला नारायणाचा भ्रम दूर केला, विसरु कसा मी गुरुपादुकाला यात "नारायणाचा भ्रम दूर केला" याचा अर्थ मला कळला नाही. नारायण म्हणजे लेखक का? धन्यवाद.
|
Prafull
| |
| Saturday, April 28, 2007 - 5:57 am: |
|
|
मला गुरुपादुकाष्टकाबद्दल माहीत नाही पण ओळ वाचून असे वाटते की गुरुने मला खरा नारायण दाखवून नारायणाबद्दलचा असलेला माझा भ्रम दूर केला. असा अर्थ असावा.
|
Mankya
| |
| Thursday, May 03, 2007 - 8:40 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ ! Mansmi18... त्याचा अर्थ असा आहे कि ' नारायण हा भूलोकात विष्णूचा अवतार आहे, पण जेंव्हा दत्तगुरुंनी येथे अवतार घेतला त्या वेळेस जो भ्रम स्वतःच्या शक्तिचा नारायणाला झाला होता; तो त्या दत्तगुरुंच्या अवतारामूळे दूर झाला. असा आहे तो गुरूमहिमा. ह्याचा उल्लेख तूला श्री गुरुचरीत्रातही सापडेल. खरतर प्रचंड शक्ति आहे श्री गुरुचरीत्रात ! श्री गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ ! माणिक !
|
Mansmi18
| |
| Thursday, May 03, 2007 - 10:35 am: |
|
|
माणिक, धन्यवाद. ||श्री सद्गुरुनाथ महाराज की जय्||
|
Pillu
| |
| Thursday, May 03, 2007 - 10:42 am: |
|
|
पण मग त्याचा असे भार निरंजनाला म्हणजे काय
|
Mankya
| |
| Friday, May 04, 2007 - 7:01 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ ! याच कसं आहे Pillu, आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ पहावा लागेल म्हणजे बघ हं, ' साधू ' ज्याला कोणताही मोह नाही; थोडक्यात जो षडरीपूंपलीकडे गेला आहे तो तसंच निरंजन म्हणजे निराकार. अंकित या शब्दाचा अर्थ माहीतच असेल. तर अश्या जीवांचा भार कोण वहातो तर तो निरंजन वहातो म्हणजेच ईश्वर, परमेश्वरच तारून नेतो ना सगळ्या परीस्थितीतून ! तूच कर्ता अन तूच करविता ..! श्री गुरूदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ ! माणिक !
|
Pillu
| |
| Friday, May 04, 2007 - 8:10 am: |
|
|
वा माणिक छानच ख्ररे हा संपुर्ण श्लोकच फार विचार करायला लावणारा आहे. सर्वांनी लिहित रहा म्हणजे उत्तमोत्तम मेजवानी मिळेल.
|
Mansmi18
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:08 pm: |
|
|
नमस्कार ||श्री सद्गुरुनाथ महाराज कि जय्|| मला कोणी घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ सान्गु शकेल का?(तसा अर्थ साधारण कळतो पण मला पुर्ण समजवुन घ्यायचा आहे.) धन्यवाद.
|
नमस्कार मनोज, अर्थासाठी मायबोलीवरचीच खालील लिंक पहा,( Vinitphadnis यांच्या oct 15, 2003 पासून पुढच्या पोस्ट) | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते |
|
अनसुया नंदन प्रगटले या भूमीवरती पावन करुनी घ्या आम्हाला दत्तराजमाउली दत्तराजमाउली अमुची योगीराजमाउली भवसागरी ह्या तारुन नेई योगीराजमाउली दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो घोरकष्टोध्दरण स्तोत्र म्हणताना, जितके वेळा म्हणायचे असेल तितके वेळ पहिले पाच श्लोक म्हणून शेवटच्या वेळी सहावाही म्हणावा. पूर्ण शुध्द भावाने, कुठल्याही संकटात, मनाच्या अस्वस्थ अवस्थेत, कुठेही, कुठल्याही वेळी, कुणीही, मनातल्यामनात देखिल पठण केल्याने सद्गुरुअ मनाला स्थिरता देतात, गरज पडल्यास कुठल्याही स्वरुपात मदत धाडतात. इतरही वेळी जमेल तेव्हा जरुर पठण करावे. स्तोत्र न जमल्यास, जाता येता "अनसुयो त्रि संभुतो दत्तात्रेयो दिगंबर्: | स्मर्त्रुगामि स्वभक्तानाम उध्दर्ता भवसंकटात ||" (चुकीच्या टाईपीन्ग बद्दल क्षमा असावी) हा जप करावा. ह्रदयी सतत श्रीगुरुस्मरण असणे महत्वाचे.
|
Dear All You all are really nice . Thanks for such nice things to read Nagesh
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 17, 2007 - 1:30 pm: |
|
|
नमस्कार, परवा "या सुखानो या" मालिकेत दाखवले कि ते बाबामहाराज त्या कुटुम्बियांकडे "पुरण पोळी, बेसन लाडु आणि घेवड्याची भाजि" मागतात. १. या गोष्टी दत्तगुरुंच्या आवडत्या आहेत का? २. या गोष्टी आवडण्यामागे काही "आध्यात्मिक कारण आहे का? धन्यवाद.
|
Ashwini_k
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:07 am: |
|
|
हरि ओम, श्री दत्तगुरून्चे आवडते फ़ूल सोनचाफ़ा. आवडत्या पदार्थान्मध्ये पुरणपोळी, बेसन लाडू, फ़रसाण हे श्री स्वामी समर्थान्ना आवडते आहे म्हणजे श्री दत्तगुरून्नाच आवडते नाही का? घेवड्याच्या भाजीचा उल्लेख श्री गुरूचरित्राच्या १८व्या अध्यायात आहे तो संदर्भ असू शकतो. बाकी अध्यात्मिक कारण माहित नाही. मलाही उत्सुकता आहे जाणून घ्यायची. हरि ओम.
|
Mandarp
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:16 am: |
|
|
मित्रहो, अश्या लोकांपासून सावध रहा. स्वामींचे नाव वापरुन कसे फसवतात हे लोक ते पहा. http://www.esakal.com/esakal/07192007/Pune72937D8C85.htm
|
हरि ओम, ती बाई लोकांपासून पळेल, पण जे विश्व व्यापूनही उरले आहेत अशा सद्गुरुंपासून कशी व कुठे पळेल? ईश्वर कोपला तर फ़क्त सद्गुरूच वाचवू शकतात पण सद्गुरूच कोपल्यावर कोण वाचवणार? त्यातूनही, पाप्यातल्या पाप्यालाही सद्गुरू त्याच्या आयुष्यात आले तर उद्धरू शकतात, जर त्या माणसाला खराखुरा पश्चात्ताप झाला आणि त्याने सद्गुरूआज्ञापालन केले तर! उदाहरणार्थ वाल्याचे वाल्मिकी झाले आणि रामजन्माआधिच जगाला रामायण दिले. खरंच सद्गुरू पतीतपावन असतात. हरि ओम.
|
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था जय जय गुरु अवतारा पदी ठेवी माथा ध्रु न्रुसिंह सरस्वती अवतार संपविले कर्दळी वनात जाऊनी तपाचरण केले नवरुपा धारण करुनी प्रगट पुन्हा झाले नाना नामे घेऊनी देशभ्रमण केले १ योगसिध्दी प्रभावे लिला तू करीसी धर्म संरक्षुनी जनासी उध्दरसी वाटे ब्रम्ह प्रकटले या भूमीवरती दर्शन होता मिळते चिरसुख मनःशांती २ आर्त भावीक साधक तुजसी शरण येता मार्गदर्शन करुनी होसी त्या त्राता सर्वा भूती ईश्वर बघण्या शिकवीला अनन्यभक्ता रक्षिसी आश्वासन देता ३ परब्रम्ह गुरुदेवा क्रुपा करी आता शरण तुजसी आलो तारी अनाथा भुक्ती-मुक्ती सद्गती देई भगवंता गुरुराया अवधूता अवतारी दत्ता ४
|
Pillu
| |
| Tuesday, August 07, 2007 - 1:07 pm: |
|
|
अश्विनी धन्यवाद खुप छान आरती आहे. याची चाल कशी आहे. अन याचा रचीयता कोण आहे हे सम्जेल तर खुप बरे होइल. तसेच तुज कडे आणि काही साहित्य आहे का स्वामींचे प्लिज असेल तर दे ना
|
Pillu
| |
| Thursday, August 16, 2007 - 5:39 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुण्यातील सर्व स्वामी भक्तांना विनम्र विनंती रविवार दिनांक १९ ८२००७ रोजी मांजरी येथिल मठात श्रावण मासानिमीत्त श्री स्वामींचरणी सव्वा लाख तुळ्सीदल वाहण्याचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. ज्या कुणा स्वामीभक्तांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल त्यानी ९८२२६१४९५० या मोबाईल वर संपर्क करावा. वेळ आहे सकाळी ८.३० ते दुपारी १२.३०
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 16, 2007 - 6:07 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ हरि ओम पिल्लू, सर्वप्रथम उशिरा रिस्पॉन्ड केल्याबद्दल क्षमा मागते. त्या आरतीची चाल कशी सांगणार? पण मृदंग, टाळ, चिपळ्यांच्या तालात फ़ार छान वाटते. नुसती वाद्याशिवाय भक्तिभावाने म्हटली तरी स्पंदने जाणवतात. माझ्याकडे स्वामीचरित्र सारामृत, स्त्रोत्र आहे. तारकमंत्र, मानसपूजा, नामावळी असलेले पुस्तकही आहे. ते बहूतेक सगळ्यांकडेच असते. बाकी जमेल तेव्हा ठाण्यातील मठ, दादरचा मठ येथे जाणे. हरि ओम.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|