|
Mrdmahesh
| |
| Friday, December 22, 2006 - 5:13 am: |
|
|
पिल्लू, तुझा अनुभव जबरदस्तच... पण नाणे न घेण्यामागचे कारण काय होते? राजेश, स्वागत तुमचे . तुम्ही तुमचे अनुभव सांगा.. वाचायला आनंदच वाटेल
|
Pillu
| |
| Friday, December 22, 2006 - 7:40 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ महेश अरे मी एकदा असाच या गोष्टी पायी फकीरा कडुनच ४०० रुपयांना गंडलो गेलो होतो त्याने मला माझ्या हातातुनच ऊजव्या सोंडेचा गणपती काढून दिला होता तो घरी घेऊन आलो अन लगेच प्रचंड त्रास सुरु झाला. स्वामींपुढे जाऊन बसल्यावर मला तो गणपती काही वेळेतच सोडुन द्यावा लागला. अन नंतरच तो त्रास बंद झाला. म्हणुन मला ते नाणे नाकारावे लागले. एकदा माझ्यामुळे स्वामींना त्रास झाल्या नंतर तो परत देवू नये असे वाटले माझे काही चुकले का?
|
Mandarp
| |
| Friday, December 22, 2006 - 8:18 am: |
|
|
श्री स्वामी समर्थ, मित्रहो, मी उद्यापासून ३ दिवस, श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर, तुळ्जापूर, अक्कलकोट व पंढरपूर ला जाणार आहे. परत आल्यावर अनुभव लिहीनच. मन्दार
|
Pillu
| |
| Friday, December 22, 2006 - 3:27 pm: |
|
|
श्री स्वामी समर्थ बरेच दिवस ईकडे फिरकलो नाही. क्षमस्व कसे आहात सगळे आज एक जबरदस्त अनुभव सांगायचाय, खरे तर हा माझा अनुभव नाहिये पण तरीही स्वामींच्या अतर्क्य लिला सगळ्यांना समजाव्यात हाच हेतु. प्रथम हे नमुद करतो की या अनुभवाचा नायक आज आपल्या सर्वांच्या दुर्दैवाने हयात नाहित. पण त्यांच्या सुपूत्राने सांगितलेला हा अनुभव. आणि याचे नाव गाव काहिहि प्रसिद्ध करायचे नाही. या एका अटीवर सांगावा लागतोय हे दुसरे दुर्दैव. कोणी एक स्वामी भक्त दादरला पोटासाठी हमाली करायचा. रोज जी काही हमाली मिळेल त्यातील २५ टक्के तो दादरच्या मठात स्वामी चरणी अर्पण करायचा हा त्याचा नेम कित्येक वर्ष चालु होता यात कधिही खंड पडला नाही.गावी असेल तरच. असेच एक दिवस तो स्वामींना काकुळतीने म्हणाला "स्वामी आता हे सहन होत नाही वो आता माझे वय होत चालले मुले अजुन तुमच्या क्रुपेने शिकत आहेत.पण हे कुठवर थांबवा आता हे " हा परीपाठ रोज चालु झाला आणि एक दिवस या स्वामीभक्ताचे भाग्य ऊजळले. एका माणासाने त्याला एका गावात खडकाळ आसलेली जमिन दान दिली. ही जमीन १० एकर होती. या स्वामीभक्ताने आपल्या मुलांआ सोबत घेउन अतोनत कष्ट घेउन जमीन पिकण्या योग्य केली. पण मुख्या प्रश्न होता तो पाण्याचा याकरिता याने स्वत्: त्या जागेत १६० फुट विहिर खणली पण दुर्दैव ईथे ही त्याच्या मागे हात धुवुन लागले होते. पाणी काही केल्या लागेना एक दिवस विमनस्क अवस्थेत तो त्या विहिरीचा काठावर बसला असताना अचानक एक बैल ऊधळ्ला आणी सरळ सरळ याला येवुन ढुसनी मारली हा माणुस १६० फुट विहिरीत दणकन आदळला पडताना मात्र हि व्यक्ती स्वामींना म्हणात होती " स्वामी संपले सगळे आता कसली तुमची सेवा घडणार मला या शेतात भक्तीचा मळा फुलवायचा होता पण तुम्हाला हे मंजुर दिसत नाही, येतो स्वामी " पण खरा चमत्कार तर पुढे होता. काही लोकांनी त्यांना पडताना पाहिले होते, गावात आरडाओरड झाली आणी सारे गाव त्या विहिरी भोवती जमा झाले. सर्वांची खात्री होती की वाचणे शक्य नाही पण "आज्ञेविणा कळ ना नेई त्याला " ही स्वामींची वाणी ईथे तंतोतंत खरी झाली. नखा एव्ह्ढे खरचटले नाही आणि पुर्णपणे शुद्दीत राहुन स्वामींचा जय जय कार करीत ते खाली बसले होते गावातील लोकांनी खाली दोर सोडले पण यांना वर यायचेच नव्हते . " जर स्वामींनी मला वाचवले आहेच तर या मागे निश्चित काही ऊद्देश आहे. तर आता माझा पण हट्ट आहे की जो पर्यंत ईथे पाणी लागत नाही तो पर्यंत मी पण वर येणार नाही तुम्ही व्यर्थ खटपट करु नका लोकांनी बरेच समजावले पण हे येणार नाही तुम्ही जा हा हेका सोडायला तयार नव्हते बराच वेळ गेला आणि एकाएकी त्या भक्ताचे धोतर ओले लागु लागले ह्यांना वाटले अरे आपल्याला लगले असावे पण कळले नाहे रक्तस्त्राव होत असावा असे वाटून त्यांनी आप्ले धोतर तपासले पण तसे काहीच नव्हते तर जमीन ओली झाली होती म्हणुन त्यानी ईथे ओले कसे? हे पाहुन जमीन तपासण्यास सुरुवात केली थोडे ऊकरले तर जमीन बरीच ओली लागली आता मात्र त्यांना हर्षवायु होण्याची वेळ आली. कारण विहिरीला पाणी लागले होते. आणी अर्ध्या दिवसात विहिर आर्धी भरली सगळे गाव पुन्हा जमा झाले हा चमत्कार पहायला मोठया धुमधड्याकात यांची मिरवणुक गावात काढली गेली. काही दिवसांनी यांनी शेतात जरबेरा नावाची आणी ईतर फुलांची लागवड केली. हेतु हा की यातुन निघणारी भक्तिची फुले देवाच्या चरणी वाहता येईल या सद्भक्ताने आपल्या सर्व मुलांना एकत्र बोलावून सांगीतले की बाबांनो स्वामींच्या क्रुपेने मिळालेली जमीन आणि हे पाणी कधिही विकायचे नाही नाही यातील निघालेले ऊत्पन्न सर्व भावात सम प्रमाणात वाटुन घ्यायचे त्यांनी सागीतलेला हा वसा त्यांची मुले आजही नेटाने चालवत आहेत हे आजोबा आज हयात नाहीत धन्य ते स्वामी आणि धन्य ती स्वामी भक्ती बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय........
|
Pillu
| |
| Friday, December 22, 2006 - 3:35 pm: |
|
|
आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की क्रुपया या अनुभवातील कोणाचीही ओळ ख विचारु नये कारण समर्थांचीच तशी आज्ञा आहे. मला क्षमा करा मी स्वामीं समोर तसे वचन दिले आहे. फक्त ह्या बिबिवरील पॉप ला मात्र ते भेटले आहेत तिलाही कोणी विचारु नये. आशा आहे की ही विनंती सर्व जण मान्य करतील अगदी पॉप ही.
|
महेश, धन्यवाद! मुकुंद, नमस्कार! आभार!! तुमच्या मनात आलेल्या 'भावाला' साष्टांग नमस्कार. हा 'भाव' आपल्या सगळ्यांच्या अंत:करणात अखंड राहू दे, हीच श्रीस्वामीचरणी प्रार्थना!
|
दिव्या, धन्यवाद! तूम्ही श्रीदासबोध,मनाचे श्लोक आणि हरिपाठ, दोन्हिंचा अभ्यास करता हे वाचून बर वाटल! श्री समर्थ रामदास स्वामींचा उपदेश हा ‘समर्थ’ ह्या भुमिकेतून आहे! आणि श्रीञानेश्वरांचा उपदेश, ‘माउलीच्या’ भुमिकेतून आहे. दोघांच्या उपदेशात काहीच फ़रक नाही. अजुन खोलपणे सांगायच तर एक ‘वडिल’ या नात्याने सांगत आहेत, तर दुसरे ‘आईच्या’ नात्याने सांगत आहेत. दोन्हीहि गॊष्टीत ‘मूलाच भल’ च चिंतलय! सात पाच तीन दशकांचा मेळा/ एक तत्वी कळा दावी हरी// ह्याचा अर्थ- मूळ परब्रम्हस्वरुप एकच आहे, त्याच्या संकल्पानेच विश्वाची निर्मिती झाली. हे विश्व कस आहे, हे सांगणारे निरनिराळे मतप्रवाह आहेत जसे, हे विश्व, १) नैय्यायिक सात तत्वात्मक मानतात, २) स्वभाववादी पंचभूतात्मक मानतात, ३) सांख्यवादी आणि वेदांती त्रिगुणात्मक समजतात, तर; ४) मीमांसक दशेंद्रियाच्या व्यवहारात्मक ठरवितात. ह्या विभिन्न मतापैकी खर कुणाच? हे ठरवायला कष्ट पडतात. पण नामधारक भक्ताला, सर्वत्र व्यापून राहीलेला ईश्वर एकच आहे आणि त्याची प्राप्ती ‘नामस्मरणाने’ होते. त्याला वर उल्लेखिलेले ‘शब्दञानाची’ गरज नाही. अजपा जपणे उलट प्राणाचा/ तेथेही मनाचा निर्धारु असे// ह्या मधे अजपाजप ह्याची फ़ॊड जर ‘ अ ज प अ ज प’ अशी केली तर उत्तर मिळते. कोणी कॊणी, न करताही होत असलेला, मानसिक जो सोहंस्वरुप अजपाजप किंवा प्राणाची ऊर्ध्वगती थांबवून त्याला उलट क्रमाने, सुषुम्ना मार्गाने वर चढविण्याचा प्रयत्न करतात. परंतू ह्या सर्व प्रयत्नात ॐकाराचा जप सिध्द करावाच(निर्धार) लागतॊ. म्हणूनच, ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ/ रामकृष्णीपंथ क्रमियेला// ‘नामस्मरणाशिवाय’ जीवित साफ़ल्य होणार नाही(व्यर्थ जाईल), हेच परत श्रीमाउली सांगत आहेत.
|
पिल्लू, नमस्कार. अनूभव छानच आहेत!
|
माउडी आणि दिव्या, तुमच्या दॊघींचा होकार गृहीत धरून , खालील तुमच्या अनुभवातले साम्य पाहू या- माउडी-- ११व्य्या अध्यायात ज्या विश्वस्वरुपाला बघून अर्जून घाबरला होता त्याच नुसतं वर्णन वाचूनच मी इतकी घाबरलेली आहे की विचारू नकात. मी पुढच पान वाचू शकत नाहीये... आणि त्या शिवाय दुसर्या कशाचा विचार करू शकत नाहिये. दिव्या-- सोहं ध्यान करायला गेले तर तेही अवघड आहे, सोहं ध्यान करताना असा अनुभव आला की मी खुप घाबरले होते, खुपच अवघड आहे. खुप अस्वस्थता सतत जाणवते.मला प्रयत्न करुनही ध्यानातुन बाहेर पडताच येत नव्हते. वरिल दोन्हीहि अनुभवात, १)अनुभव आला कारण- परमेश्वराला जाणायची जीञासा हेच आहे, २)माउडीला 'निर्गुणाचे' सगुण, विश्वरुप दिसले, तर दिव्याला सगुणाचे 'मूळ निर्गुण' रुप काही काळ दिसले. दिव्या, प्रयत्न करूनही बाहेर न पडता येण, ( 'मी' प्रयत्न करतोय अस दिसण) ही 'सविकल्प'(मनाचे संकल्प-विकल्प करणे चालूच असते) समाधि अवस्थेची एक अंशझलक आहे. ह्यात 'मी' ची जाणीव अंत:करणात होती म्हणजे अहंकार जागा होता, पण जे दिसतय त्याचा माहीत असलेला ठसा चित्तात नव्हता. त्यामूळे बुध्दी योग्य निर्णय देवू शकली नाही. त्याची जागा भितीने घेतली, मन गोंधळले, बाहेर पडायचा अर्धवट निर्णय कमी पडला, त्यामूळे कर्मेंद्रियानी कृतीत आणावयास असहकार पुकारला.) ३)दोघींच्या मनात भितीची भावना जागृत झाली, ४)दोघींनी चालू असलेला अभ्यास, थांबवायचा निर्णय घेतला, ५)दोघींच्या पुढे, आता पुढे काय करायच? हा प्रश्न निर्माण झाला, ६)हा अनुभव आला कारण अपेक्षित तयारी अजून हवी होती, ७)त्याचकरिता दिव्याने, माउडीला, 'भक्तीयोग' वाचण्यास सांगितला, जे बरोबर होत. म्हणूनच दिव्यानेही 'नामभक्तीच्या' सहाय्याने पुढचा मार्गक्रमावा, हेच संयुक्तिक उत्तर आहे.
|
Divya
| |
| Sunday, December 24, 2006 - 5:07 pm: |
|
|
प्रशांतजी आपल्या रुपाने मला खरच गुरुच भेटले आहेत आपण जे लिहीले ते वाचल्यावर मला काय वाटले ते मी शब्दात सांगु शकत नाहि. काय झाले हे कोणीतरी जाणु शकले हेच खुप आहे. तरी गुरुशिवाय ध्यानासाठी प्रय्त्न करणे शक्य होइल असे वाटतच नाही. तेव्हा नामस्मरण आणि चिंतन हाच पर्याय उरतो, निदान सध्या तरी. या जगात वावरताना आपल्या षडरिपुंना जिंकण हे तर त्याहुनही कठीण वाटत. मलाही राग येतो, वाईट वाटते वैगरे पण तो क्षण चालु असताना लक्षात येते की आपण मनाच्या खेळात गुंततो आहोत. माणसाच्या मनातच राग द्वेष दडलेले असतात. चिंतनाने त्याचे उत्तर सापडते जस एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो का आला याचा नीट विचार केला तर मुळाशी आपलाच अहंकार नाहीतर मोह कारण असतो. बर्याचदा घटना घडुन गेल्या नंतर जाणवते की इथे आपण उगीचच त्रागा केला. हे मनाच्या आहारी जाण कमी करुन एका त्रयस्थ बुद्धीने त्या कडे बघण जे मला आत्मसात करायची जबरदस्त इच्छा आहे त्या मनाला खीळ घालण हे नामस्मरणाने शक्य आहे हे पटले तरी ते practically शक्य होत नाही. कारण या जगात वावरताना या जगाच्या नियमा प्रमाणेच वागावे लागते. तुम्ही सगळ्यांशी कितीही चांगले वागलात, खुप नीतीमुल्यांचा आदर करुन वागलात तरी समोरची व्यक्ती कशी वागेल हे तुमच्या हातात नाही. आता तर अधर्म इतका बोकाळला की रावण बरा म्हणायची वेळ आली. सज्जन माणसाला त्रास होण्याचे लिमीट जर त्याच्या सहन होण्याच्या पलिकडे गेले तर कदाचित त्याचा चांगुलपणावरचा, देवावरचा विश्वास कमी होउ शकतो कुठेतरी श्रद्धा डळमळु शकते. ज्यांची श्रद्धा आणि सहनशक्ती जास्त तेच तरु शकतात पण जे कमी पडले त्यांना वाली कोणीच नाही का? का त्यांचे प्रयत्न पाण्यातच गेले. छोट्या मुक्ताईने जेव्हा ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी समजावणीची विनंती केली तेव्हा ज्ञानेश्वरांनी शान्त होउन दार उघडले. पण सामान्य माणसाच्या जीवनात सामान्य प्रसंगही त्याला पुरुन उरतात तेव्हा काय? मला कसली कळकळ वाटते हे मी नीट सांगु शकते का नाही माहीत नाही पण अशा लोकांचा जे सज्जनपणे आयुष्य जगत आहेत त्यांचा वाटाड्या कोण? हे जे मन अस्वस्थ करणार आजुबाजुला घडते आहे त्यात त्यांना सावरणारा कोण? जर पर्मेश्वर असेल तर तो कशा प्रकारे तारणार? सामान्य माणसाच्या लेवलचे ताटीचे अभंग नाहीत का? माझ्या परीचयातील एका व्यक्तीला इतका लोकांचा त्रास झाला आहे की चांगुलपणावरचा विश्वास उडाला त्यांचा, अगदी जस जग आहे तसच वागायला पाहीजे इतपत. फ़ार वाईट वाटते असे काही बघीतले की.
|
Mrdmahesh
| |
| Monday, December 25, 2006 - 7:00 am: |
|
|
पिल्लू, अनुभव छानच... श्री स्वामींवर ज्याची श्रद्धा, विश्वास आहे त्याला त्यांच्या कडून काय मिळू शकते याचे हे एक सुंदर उदाहरण आहे... अनुभव सांगितल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद
|
Madhavm
| |
| Tuesday, December 26, 2006 - 8:42 am: |
|
|
प्रशांत, तुम्हाला मेल केली आहे. उत्तराची खूप आस आहे. तुमच्या वरच्या post मधील ओंकाराचा जप सिद्ध करावाच लागतो म्हणजे काय? याबद्दल जरा अधिक लिहा ना!
|
Rajup
| |
| Tuesday, January 02, 2007 - 2:56 am: |
|
|
प्रिय प्रशान्तजी , सर्व प्रथम सर्वाना २००७ साठि मन:पुर्वक शुभेछा " जप सिद्ध करावा लागतो म्हणजे काय? " धन्यवाद राजुपि }
|
Kalika
| |
| Tuesday, January 02, 2007 - 12:25 pm: |
|
|
आपल्या सर्वाना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
|
राजुपि, माधव, आपण तुम्हाला हवे असलेल्या गोष्टिंची चर्चा, पुढे प्रसंगानुसार करुयात, कारण त्यावेळीच त्याच महत्त्व कायम लक्षात रहाते. तो पर्यंत जे आपल्याला आवडेल ते नाम घ्यायला सुरुवात करुयात. राजुपि... आपला ज्योतिष विषयाचा अभ्यास आहे, तो अध्यात्माच्या अंगाने सांगता का?
|
दिव्या, आपण सगळे साधक आहोत, एकाच मार्गाचे पथिक आहोत. ज्यादिवशी मला इथे 'मी इतरांना उपदेश करतोय', हि यत्किंचितहि भावना मनामध्ये येईल, त्या दिवशी मी लिहन थांबवेन. 'श्रीगुरु' वेगळे असतात. त्यांच्याचरणाची धुळ होऊन रहाण मला आवडेल, नाहितर त्यांच्या दाराशी कुत्र होऊन रहाण्याच भाग्य मला मिळुदे, हिच त्यांच्या चरणाशी विनम्र प्रार्थना! तुमची हरकत नसेल तर, आपण एकमेकांना 'अरेतुरे' बोलूयात. प्रभाते मनी राम चिंतीत जावा| पुढे वैखरी राम आधी वदावा|| सदाचार हा थोर सांडु नये तो| जगी तोची तो मानवी धन्य होतो|| ह्यामधे श्रीसमर्थ रामदासांनी जे 'साधनासुत्र' सांगितलय, त्याविषयी लिहिणार का?
|
पिल्लूंनी सांगितल्यानुसार, कोणी एक स्वामी भक्त दादरला पोटासाठी हमाली करायचा. रोज जी काही हमाली मिळेल त्यातील २५ टक्के तो दादरच्या मठात स्वामी चरणी अर्पण करायचा हा त्याचा नेम कित्येक वर्ष चालु होता यात कधिही खंड पडला नाही. अस जेव्हा अखंड, विश्वासाने होत, तेव्हांच काही अधिकाराने मागता येत, नव्हें आपोआप मिळत. आपण कायम म्हणतो कि, देवावर माझी खुप श्रद्धा आहे, त्यावेळी ती अंधश्रद्धाच असते, कारण श्रद्धा मूळातच आंधळी असते, तीला अंधश्रद्धा म्हणने म्हणजे , 'पिवळा पितांबर म्हणण्यासारखेच आहे'. श्रद्धा ही चंचलच असते, सारखी बदलते. हा! 'विश्वास' वेगळा. तो कोणत्याही स्थितीत बदलत नाही. एकदा 'आपले सर्व चांगले-वाईट भोग' , हे आपल्याच पूर्वकर्माचे फ़ळ असते, ह्यावर 'विश्वास' बसायला पाहिजे. अर्थात हा श्रद्धेपासुन्-विश्वासापर्यंतचा प्रवास एकदम होत नाहि, त्यालाही 'नाम'अखंड घ्यायलाच पाहिजे. 'शेवटी नाम पण सुटते', आणि 'ध्यानच' लागते, मग 'नाम' कशाला घ्यायचे, एकदम ध्यानच लावावे' हा मूळातच चुकीचा विचार आहे. ह्याने अपेक्षित हाती काहीच लागत नाही, नुसतीच धडपड होते.(शास्त्रांनी 'श्रद्धा' ही 'शक्तीस्वरूप' आणि 'विश्वास'हा 'शिवस्वरूप' मानलाय.) 'आसुरी प्रवृत्ती' पहिल्यापासुनच आहे. अगदी प्रभू श्रीरामचंद्रांच्या युगातही, त्यांना वनवासाला पाठवणारे लोकही होते आणि श्रीभगवंत, श्रीकृष्णाच्या विरुद्ध, कौरवांच्या बाजूने उभे ठाकलेले असंख्य लोकही होतेच. फ़क्त फ़रक एवढाच आहे की आपल्या आजूबाजूला जेंव्हा ते घडत त्यावेळी ते जाणवत. अगदी नीट अवलोकन केल की लक्षात येत की, श्रीकृष्णांनी, श्रीसद्ग़ुरू रूपांनी फ़क्त दोघावरच पुर्णकृपा केली, एक श्रीउद्धव आणि दूसरे श्रीअर्जुन. ही इतर असंख्यजनांना सोडुन, फ़क्त दोघावरच कृपेचा वर्षाव होण्याची मूळ कारणे अभ्यासूंनी आवश्य पहावीत. तरच श्री भगवंत कळले अस होईल. ' सर्व चांगले-वाईट भोग, हे ज्याच्या-त्याच्या पूर्वकर्माचे फ़ळ आहे, तेव्हा आपण कशाला मध्ये जायचे', हा विचार ही चुकीचा आहे. कारण जशी-जशी साधना होत जाते, तस-तसा साधक हळवा होत जातो. कुणाला साधी ठेच लागली तरी डोळ्यात टचकन पाणी येते. एखाद्या नैसर्गिक आपत्तीत, इतराविषयी कळवळा न वाटणे, हेही श्रीभगवंत नकळल्याच लक्षण आहे.(श्रीगुरूकृपेनंतर कुत्र्याच्या मागे, तुपाच भांड घेऊन धावणारे श्रीसंत नामदेव, कृपेच्या अगोदर असा प्रसंग आला असता तर अगदी विरुद्ध वागले असते.) इथे एक गोष्ट लक्षात घेण जरूरी आहे की, श्रीभगवंत कदापीही चूकत नाहीत, म्हणूनच ते 'अकारण कृपाळू' म्हणून प्रसिद्ध आहेत. म्हणजे आपल्या भक्तावर कृपा करायला, त्यांना कारण शोधायची गरज पडत नाही. जर काही कमी असेल तर आपल्यातच आहे हे मान्य करून आणि ते दूर करन आपल्या आवाक्यात नाही हे पटून, श्रीभगवंताला अनन्यभावाने शरण जाण्यातच आपल भल आहे. आपल मन पण काय विचित्र असत नाही, श्री भगवंतानी कृपातर केली पाहिजेच, पण त्याकरता बिन पैशाच, फ़ुकटच नाम न घ्यायला मात्र १७६० उसने बहाने शोधून काढत! हे अगदी, सुरुवातीला शाळेत न जाण्यासाठी, रडून गोंधळ घालणार्या लहान, निष्पाप मूलासारख आहे, सुरूवातीला थोडी जबरदस्ती करावी लागते, पण नंतर मात्र सगळ जगच नव्याने, कात टाकलेल्या सापासारखे, पुर्ण बदलून जाते, ... एकदा का मूलाला शाळेची गोडी कळाली की, ते आपणहून शाळेत जाऊ लागत........ काय पिल्लू बरोबर ना? (आपल उत्तर अपेक्षित आहे.) बोला, //महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ// //श्रीसद्ग़ुरू स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ// (पिल्लू, मालकांच बोलावण आल होत, म्हणूनच मी अक्कलकोटला गेलो होतो. काकड आरतीच्या वेळी श्री स्वामींचा (मालकांचा) काय थाट होता म्हणून सांगू, वाटल की हाच तो क्षण,मनात आल की आता बस्स झाली धावपळ, सगळ आहे तीथच थांबाव, मालकांच्या चरणाशी! अंतर्बाह्य थरारून उठलो!! सगळ कस प्रशांत वाटतय!)
|
Mansmi18 यांनी, "धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्ग़ुरुरायाची/ झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची// ध्रु. // " वरील ओळीतील, "प्रदक्षिणा" व दुसर्या ओळीचा अर्थ विचारला होता आणि तो ह्या B.B. शी सलग्न असल्यामूळे परत येथे पोष्ट करत आहे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्ग़ुरुरायाची/ झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची// ध्रु. // पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी/ सर्वही तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी/ धन्य.//१// मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती/ नामसंकीर्तने ब्रम्हानंदे नाचती/ धन्य. //२// कोटि ब्रम्हहत्या हरती करितां दंडवत्/ लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात/ धन्य. //३// गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि/ अनुभव जे जाणती ते गुरुपदिचे अभिलाषी/ धन्य. //४// प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला/ श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला/ धन्य. //५// श्रीसद्ग़ुरुंचा अगाध महिमा वर्णन करणार्या ह्या 'प्रदक्षिणा-सोहळ्यातील' वरील ध्रुवपदात, 'सुर-वरां' म्हणजेच इंद्र-आदिदेवांनाही हा सोहळा पाहण्यासाठी लागलेली घाई ( त्वरा ) दर्शवतोय. जस माणुस जन्म हा पूर्व पाप-पुण्याच्या मिश्रणाने मिळतो, तसाच फ़क्त पूर्व पुण्य असेल तर देवलोकात स्वर्गादि उपभोग मिळतात, हे उपभोग पूर्व पुण्याचासाठा असेपर्यंतच मिळतात. त्यानंतर त्यांनाही पुनरुत्थान असते. म्हणूनच इंद्रादिदेव काही काळाने बदलले जातात. मूळ परब्रम्ह (विठ्ठल) हे न बदलणारे, अविनाशी तत्व आहे. श्रीसद्ग़ुरु म्हणजेच परब्रम्ह असतात आणि म्हणुनच 'सुरांना(देवांना)', श्रीसद्ग़ुरुच निष्काम-गुणगान ज्या ठिकांनी चाललय त्या ठिकानी जाण्याकरीता, त्यांच विमान उतरावयाची घाई झाली आहे, कारण अशा "संतसंगाच" महत्त्व त्यांना चांगलच माहीत आहे. सर्व देवांना हा श्री सद्ग़ुरुमहिमा माहीत आहे, तसाच सर्व संतानीही हे आपल्या कृतीने आणि अनूभवाने जाणले आहे. त्यामूळेच लोटांगण घालणारा 'मोक्ष' न मागता परत गुरूपदीची( श्रीगुरुचरणाचीच) अभिलाषा बाळगली आहे. श्रीसंततुकारामांनी म्हंटले आहे, हेचि दान दे गा देवा/ तुझा विसर न व्हावा//१// गुण गाईन आवडी/ हेचि माझी सर्व जोडी//२// न लगे मुक्ति धन संपदा/ संतसंग देई सदा//३// तुका म्हणे गर्भवासी/ सुखे घालावे आंम्हासी//४// हे मागणेही तेच दर्शविते आहे. ज्यावेळी मनाच्या आहारी जाऊन, काही स्व:केंद्रित कर्म माणसाच्या हातून होते त्यावेळी 'प्रपंचा' भोवतीच माणूस फ़िरत रहातो(जन्म-मरण चक्र), पण 'परमात्मा-श्रीभगवंत-श्रीसद्ग़ुरु-आत्मा' हा केंद्रभूत मानून झालेल्या, त्याच 'सहजकर्मांना' 'प्रदक्षिणा'असे म्हणतात. 'प्रपंच' म्हणजे 'बायका-पोरे' नव्हेत, तर 'प्रपंच' म्हणजे 'वासना-आसक्ती' होय.
|
//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ// श्रीसंत एकनाथांचा (यांचे श्रीसद्ग़ुरू नाथपंथीय प.पू.श्री श्री जनार्दनस्वामी आणि यांचे श्रीसद्ग़ुरु प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेय.)एक अभंग पाहू. हा समजायला खूप सोपा आहे. त्यामूळे बर्याच प्रश्नांची उत्तरे अभ्यासकाला मिळतात..... वासुदेवस्मरण पापहरणाचें मूळ / तीर्थांचे माहेर ब्रम्ह व्यापक निश्चळ / अघ नासी मुखीं स्मरतां वाचा झाली निर्मळ / त्रिविधताप शोषुनि रुपी स्वरूपीं सुमंगळ // १ // ॐ नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा // ध्रु. // जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणें / तीर्थ व्रत यम नेम न लगे दैवता धरणे / आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसीं मरणे / केशव माधव अच्य़ुत्य वदतां होय पातक हरणें // २ // शरीरशोषण प्राणनिरोधन मनोजय हठयोग / गुदपीडन कुंडलिनी कलिमलदलभंग / उर्ध्ववायूचा श्वेत तोडोनी करि वो वनभंग / ब्रम्हरंध्री मिसळे परि मुमुक्षू दंग // ३ // मनोजय वासना तोडोनी केली बिमोडी / मणिपूर नगर पाहतां दुर्गति मोडी / काम क्रोध मद मत्सर अहंकार झोडी / अखंड परमानंद सेउनी उभवी गुढी // ४ // भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गुरळा / शुद्ध नाम श्रीहरीचें नीजमुखीं लागला चाळा / हरिस्मरणाचेनी बळे अंकित केले कळिकाळां / एका जनार्दनी अखंड सुखसोहळा // ५ // हे सगळ जर खरच अनुभवायची 'तळमळ' लागली असेल तर 'अखंड हरिस्मरणाशिवाय ' दुसरा सहज उपाय नाही. म्हणूनच 'मुमुक्षूंनी ' अगोदर कृतीकरणे अतीआवश्यक आहे. मनात असलेले इतर प्रश्न हळूहळू संपतील असा 'विश्वास ' बाळगणे गरजेचे आहे, कारण काही प्रश्नांची उत्तरे साधना करतानाच येणार्याअनुभवाशिवाय नुसते सांगणे व्यर्थ असते. हेच श्रीसंत एकनाथ महाराजांना सांगायचे आहे आणि ते पण श्रीसद्ग़ुरुंचा दाखला देऊन! खर्या ज्ञानसुर्याचा प्रकाश अनुभवण्यासाठी मागे सांगितलेले 'अंत:करण पंचक'(मन,बुद्धी,चीत्त,अहंकार) पुर्ण रिकामे होणे अत्यावश्यक आहे आणि 'नामस्मरणच' ह्यावरचे 'सहज औषध' आहे हे नक्कीच. ह्याप्रवासात 'प्राणाचालय' अगोदर होतो आणि 'शक्ति' तो 'प्राण(जीव)' घेऊन, सुषुम्ना मार्गाने 'षटचक्राचे भेदन' करीत 'आज्ञाचक्रात' पोहचते, तेव्हाच ,'मनोलय' होतो. तोपर्यंत मनाचे खेळ चालूच असतात, त्यामूळेच ह्या चौखूर उधळणार्या 'मनरुपी' घोड्यास 'नामरुपी' लगाम घालावा लागतो आणि त्याकरीताच अखंड नामस्मरणाची सवय जबरदस्तीने लावण्याशिवाय गत्यंतर नसते. 'जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत', तशीच 'मनाची धाव आज्ञाचक्रा पर्यंतच असते'. ह्याच्या वर 'मन' जाऊ शकत नाही, अस शास्त्र सांगत. हे 'नामस्मरणाच महत्त्व' वेळीच लक्षात घेऊन, कृतीत आणल नाहीतर नुसत्या कोरड्या 'शब्द-ज्ञाना' शिवाय हाती काहीच लागत नाही, त्यामूळे मनातला गोंधळ अजून भेसूर होतो, वाढतच जातो, हे पण 'अध्यात्मशास्त्रीय' त्रिकालाबाधित सत्य आहे. [दिव्या,माधव,राजुपि, वरिल तीसर्या कडव्यातील शेवटच्या २ ओळींचा आणि अजपा जपणे उलट प्राणाचा/ तेथेही मनाचा निर्धारु असे//हरि.२३.३// याचा अर्थ सारखाच आहे.]
|
Divya
| |
| Monday, January 08, 2007 - 3:25 pm: |
|
|
प्रशांत तुमच्या लिखाणाने दिवसेंदिवस सत्संगाची गोडी वाढत चालली आहे. समर्थांचे मनाचे श्लोक मनाला शांत करणारे आणि वळण लावणारे आहेत. मी त्यावर लिहीण्यापेक्षा तुम्ही उकल केलीत तर जास्त छान तरी मला समजलेला अर्थ.. प्रभाते मनी राम चिंतीत जावा| पुढे वैखरी राम आधी वदावा|| सदाचार हा थोर सांडु नये तो| जगी तोची तो मानवी धन्य होतो|| माणसाला जर परमेश्वर प्राप्तीची इच्छा असेल तर त्याला प्रथम वैराग्य अंगी बाणवावे लागते, जे विषय, उपभोगातुन मन जोपर्यन्त निवृत्त होत नाही तोपर्यन्त शक्य नाही. खर भोग हे इंद्रियांमधे दडलेले नसुन ते मनामधेच दडलेले असतात. जोपर्यन्त मनातुन विषयांचे चिंतन जात नाही तोपर्यंत उपभोगाची इच्छा कमी होत नाही. आणि या मनाला वैराग्य हे फ़क्त नामस्मराणानेच येते. बुद्धीचा विवेकाचा अंमल जोपर्यन्त या मनावर आहे तोपर्यन्त माणसाला सदाचार, चांगल वागण जमु शकते, एकदा का बुद्धी मनाच्या ताब्यात गेली की ती भरकटलीच, मग त्या व्यक्तीची मनमानीच सुरु होते मग वागण्याचे ताळतंत्र राहात नाही. फ़क्त नामस्मरणानेच या मनाला लगाम घालता येतात. म्हणुन जर पहाटे लवकर उठुन नामस्मरण करायcअही मनाला सवय लावली तर या जगात कल्याण झाल्याशिवाय राहाणार नाही. सुरवातीला वैखरीत असलेला जप सातत्याने केल्यास मनातल्या मनातही होत राहातो आणि नामस्मरणाची मनाला गोडी लागते. आणी ज्याला नामस्मरणाची गोडी लागली तो मनुष्य उद्धट, उर्मट अहंकारी असुच शकत नाही. विवेकाचा अंमल दिवसभर मनावर राहील्याने अशी व्यक्ती सदाचाराची मुर्तीच होते. अशा व्यक्तीच्या मनात अपार समाधान, शांती वास करते. आणि अखंड नामस्मरणाने एकदिवस परमेश्वर प्राप्ती होते. जेंव्हा जेंव्हा या मनाच्या श्लोकांवर चिंतन करते तेव्हा त्याचा अर्थ अन्तर्मुख करुन जातो. माणस दिवसभर काय आयुष्यभर धावाधाव करतात, अगदी सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यन्त प्रपन्चातील काळज्या सतत चिंतत असतात पण दिवसातले अगदी थोडावेळ या पर्मेश्वरासाठी द्यावासा वाटत नाही. हे देवदेव आत्ता काय करायचे म्हातारपणी बघु म्हणणारे कमी नाहीत. पण त्यांच्या हे लक्षातच येत नाही कि आज एक समस्या असली की ती सुटल्यावर उद्या दुसरीच निर्माण होइल, खर तर ते न संपणारेच पण लक्षात येयी पर्यंत आयुष्य निघुन गेलेले असते मग वाटत राहाते की आपन काहीच केले नाहि आता या वयात काय करणार म्हणुन मन निराश होते. कारण एक परमेश्वर सोडुन आयुष्यात काहीच महत्वाचे नाही. आपण येतो रिकाम्या हाताने जातो ही रिकाम्या हातानेच, जाताना जोडलेली सगळी नाती, पैसा, मिळवलेल्या डिग्र्या सगळसगळ इथेच राहात आपल्या बरोबर येत ते फ़क्त देवाच घेतलेले नाम आणि ते सोडुन माणस आयुष्यभर काय काय गोळा करत बसतात. शेवटच्या क्षणी कळत पण तोपर्यन्त वेळ निघुन गेलेली असते. म्हणुन तर सगळ्याच संतानी कळवळ्याने नामस्मरणाचे महत्व सांगीतले आहे पण त्याचे महत्व हे घेतल्याशिवाय खरच कळणार नाहीच. जय कृष्णार्पणमस्तु.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|