Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 15, 2006

Hitguj » Religion » माझे आध्यात्मिक अनुभव » Archive through September 15, 2006 « Previous Next »

Madhavm
Friday, August 18, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत, खूपच छान लिहिलेत. आणि अगदी योग्य वेळेला लिहिलेत.

Prashantnk
Friday, August 18, 2006 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

सद्ग़ुरुंनी सांगितलेले अध्यात्मशास्त्रीय सत्य--

१) प्रपंच आणि परमार्थ यांची सर्वसाधारणपणे सगळेच गल्लत करतात.प्रथम हेच पक्के पटायला हवे की,प्रपंच हा 'प्रारब्धाधीन' आहे;आपल्या कर्माप्रमाणेच चालतो.मात्र शुभप्रयत्नांनी त्यातल्या दुष्कर्मावरही मात करता येते.
परमार्थ मात्र प्रत्येकाची,अत्यंत वैयक्तिक स्वरुपाची आणि अंतर्गत बाब आहे.तो 'सद्ग़ुरुकृपा' आणि आपली 'शरणागतीपूर्वक साधना' यांवरच जोपासला जातो.
हल्ली अनेकांची समजूत असते की, 'गुरू केल्यावर', सर्व प्रापंचिक दुःखांची तेच काळजी घेतात,आयुष्य विनाकटकटीचे जाते;तीच पुर्णपणे चुकीची आहे.
सदग़ुरूंचे कार्य असते,शिष्याची अविद्या घालवून त्याला ब्रह्मस्वरुपाची प्राप्ती करवून देण्याचे;त्याला श्रीभगवंताच्या भक्त्तीत चिंब भिजवून टाकण्याचे.
जर दुःखांचा नाश खरोखरच समूळ व्हायला हवा असेल,तर आधी आसक्तीचा नाश होणे गरजेचे असते;सदग़ुरूकृपेने हेच होते.
२) 'परमार्थाने शांती लाभते' हे तर त्रिकाल सत्य आहे.पण आपल्या विचाराप्रमाणे ती शांती काही 'प्रपंचातली,व्यावहारीक' नसते.
समजा;त्यांच्या कृपेने आपली प्रत्येक अडचण दूर होऊही लागली,तरी त्यामुळे आपल्याला शांती मिळेलच हे कशावरून?परत पुढली काही अडचण संसारात आली की,ती शांती कुठल्या कुठेच पळून जाईल.प्रापंचिक अडचणी दूर झाल्यामुळे मिळणारी शांती,समाधान हे नेहमीच 'तात्पुरते' असते.कालांतराने परत अशांती,असमाधान हे ठेवलेलेच असते.जो पर्यंत आपल्या अंतःकरणात 'आसक्ती' वसते, तोपर्यंत हे असेच चालणारे असते.
३) परमार्थाला लागले,साधन सुरू झाले,की हळूहळू अंतःकरणशुध्दी होत जाते.त्यामुळे प्रापंचिक आसक्ती तुटू लागते आणि आतल्या शांतीचा अनुभव येऊ लागतो. हीच आसक्ती पूर्णपणे मिटली कि, मगच तो साधक अखंड शांतीची प्राप्ती करून घेतो,हेच सद्ग़ुरूकृपेचे अलौकिक फ़ळ असते.

म्हणून श्रध्देने,प्रेमाने झडझडून साधना-उपासना करावी आणि आपले कल्याण साधून घ्यावे.प्रपंच प्रारब्धाच्या गतीने होऊन द्यावा.मग हे प्रश्नच समूळ नष्ट होतील.


Prashantnk
Friday, August 18, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

काही प्रश्न--

१) जीव, ईश्वर व परब्रह्म यात फ़रक काय?

२) देवांची जयंती, साधूंची पुण्यतिथी व आपल्यासारख्यांचे श्राध्द; असे का करतात?


Zakki
Friday, August 18, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे वानप्रस्थाची पद्धत होती. म्हणजे, काही वर्षे आपण संसारात मग्न असतो. परमार्थासाठी कदाचित् फारसे काही करत नाही. पण जशी मुले मोठी होऊन त्यांचे स्वत:चे जीवन आपल्या मदतीशिवाय जगू लागतात, धंद्यात सुद्धा आपले अनुभव कालबाह्य ठरतात, तेंव्हा आपण सरळ वानप्रस्थाश्रम धरायचा. मुले, नातेवाईक, संसारी उद्योग ह्या सर्वांचा त्याग करून वनात जायचे म्हणजे तेथे फक्त परमार्थासाठी काय करायचे ते करायचे, संसारातील गोष्टींची काळजी करायची नाही.

आता मात्र असे वनात पळून जाणे शक्य वाटत नाही. तेंव्हा जनात राहून वनात राहिल्यासारखे करायचे. फाऽर कठीण. आसक्ति नाही तरी कमीत कमी काम करावेच लागते. जिवंत रहायचे तर पैसे पाहिजेतच. संसारात रहायचे तर भेटी गाठी, समारंभांना जाणे, इ. गोष्टींमुळे परमार्थसाधनेकडे दुर्लक्ष होतच रहाते.


Prashantnk
Monday, August 21, 2006 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ//

१) जीव, ईश्वर व परब्रह्म यात फ़रक काय?

जीव हा सोन्याच्या कणासारखा आहे,ईश्वर हा सोन्याच्या दगडा सारखा आहे व परब्रम्ह हे सोन्याच्या पर्वतासारखे आहे.यात आकारात फ़रक दिसला तरी; कसाला सर्व सारखेच. फ़क्त यात एक गोष्ट आहे की, जीवाला ईश्वर होता येत नाही,पण परब्रम्ह होता येते;परब्रम्हस्वरूपाच्या साक्षात्काराचा अनुभव घेता येतो.

२) देवांची जयंती, साधूंची पुण्यतिथी व आपल्यासारख्यांचे श्राध्द; असे का करतात?

देवांच्या कार्याची सुरुवात त्यांच्या जन्मापासुनच होते,म्हणून त्यांची 'जयंती' करतात.
साधूंच्या कार्याची सुरवात त्यांच्या मरणानंतर(समाधीनंतर) होते,म्हणून त्यांची 'पुण्यतिथी' पाळतात.
आपले कुठलेच कार्य गृहीत धरण्याजोगे नसते,म्हणून आपले श्राध्द करतात.


Prashantnk
Wednesday, August 23, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

परमार्थात योग आणि बोध दोन्ही पाहिजेत-

'योग' असण म्हणजे त्या जीवाची कर्मसाम्यदशा(योग्य वेळ)येण,
'बोध' म्हणजे 'मी म्हणजे ब्रम्हस्वरुप आहे' याचा साक्षात्कार होणे.
उदाहरणार्थ्-
१)श्रीसंत नामदेवांना 'योग'होता; पण बोध नव्हता.
त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की प्रत्यक्ष परब्रम्ह,विठोबा माऊलि त्यांच्या भजनाला येऊन नाचायची,त्यांच्याशी बोलायची.
पण त्यांना वाटायचे की श्री पांडुरंग फ़क्त पंढरपूरातच आहेत.म्हणुन तर संत मुक्ताईने त्यांना 'कच्च मडक' असे म्हटल.श्री ज्ञानदेवांनी त्यांना 'बोध' होण्याकरता श्री संत विसोबा खेचरांच्या कडे पाठवल.
ज्यावेळी नामदेव,त्यांच्याकडे गेले त्यावेळी विसोबा महादेवाच्या पिंडीवर पाय ठेऊन झोपले होते. हे पाहुन नामदेवांना प्रचंड राग आला.त्यावर विसोबांनी सांगितल की,"ठिक आहे,तुच जिथ पिंड नसेल अशा ठिकानी माझे पाय उचलुन ठेव." नामदेव जेथे-जेथे त्यांचे पाय उचलून ठेवू लागले,तेथे-तेथे पिंड दिसायला लागली आणि नामदेवांना परमेश्वराच्या सर्वसाक्षित्वाविषयी 'बोध' झाला.

२)दुसर उदाहरण, हटयोगी चांगदेवांच घेता येईल.यांना हि 'योग' होता, पण 'बोध' नव्हता.ज्ञानदेवांनी भिंत चालवल्यावर, 'बोध' झाला.म्हणुनतर चौदाशे वर्षाच्या,सर्व सिध्दीसंपन्न चांगदेवानी, अकरा वर्षाच्या चिमुरडी मुक्ताईला गुरु केल.

बोध ही आतुन,कृपेने होण्याची गोष्ट असते;ती मुद्दाम करण्याची बाबच नाही. त्यामुळे बोधाची लेन-देन होत नसते.जर तसे असते,तर सगळीकडे बोधाचे कोचिंग क्लासेस निघाले असते,'सहा महिन्यांत ब्रम्हविद्या शिका', 'दहा महिन्यांत आत्मसाक्षात्कार प्राप्त करवून घ्या'; 'एका वर्षात 'सिध्द समाधी' घ्या, अशा जाहिरातीही मग झळकू लागल्या असत्या.

तोपर्यन्त आपल्यासारखे जीव,आपल्या बायकापोरांच आपल्यामुळेच सर्वकाही आहे,ह्या भ्रामक कल्पनेत असतो.(मुंगी सारख्या जीवाकडेही ही बुध्दी असते)किती राजे-रजवाडे,रथि-महारथि आले-गेले,कुणाच नामोनिशान शिल्लक नाही, तरिहि 'बोध आणि योग' दोन्हिंचा पत्ता नाही.

आपल्याला कायम असे वाटत असते की परमार्थ हि म्हातारपणी करायची गोष्ट आहे.पण तेवढ जगण आपल्याकुठ हातात असत,आणि समजा जगलोच,तर त्यावेळी आपल्या कर्मेन्द्रियांची आणि ज्ञानेद्रियांची मिजाषखोरी रसातळाला गेलेली असते.म्हणून जे काही असते ते 'आताच';'ह्या क्षणाला' शक्य आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे 'हे सगळ करायला, आपल्याकडे वेळ नाही,' ही सबब. आपण हे विसरतोय कि हे सगळ आपण स्वतकरताच करतोय. नाहितर रोज कितीतरि गोष्टि आपण त्याच्-त्याच करत असतोय.

हे सगळ करण सोप व्हाव म्हणून,काहि वेगळ करण्याची मुळीच गरज नसते,करायला तेच लागत,आंतरीचे भाव बदलायला लागतात, ते कसे--
१) आपल रोजच समोर येणार काम, हे त्या परमेश्वरान दिलेल आहे याच कायम भान ठेवणे,पुर्ण न्याय देऊन ते पार पाडने. त्याच्या मोबद्ल्याची(पैशाची) काळजी त्याच्यावर सोपवणे.(तो कधीच चुकत नाही)
२)आपले रोजचे जाणिवपुर्वक ओढलेले मुखवटे फ़ेकुन देणे.(बायको समोर एक मुखवटा,आॅफ़िस बाॅय समोर दूसरा),जस आहे तस सामोरे जाणे.सगळ्या रुपांनी तोच व्यापलाय.
३)समारंभाला,फ़िरायला गेल्यावर,आपले चालणे म्हणजे आपण 'महादेवाला फ़ेर्‍या'मारतोय असा भाव मनी आणणे.
४)आपण आंघोळ करताना,श्री भगवंताला अभिषेक घालतोय, असा भाव बाळगणे,

एकूण काय 'अखंड त्याच्या निजसानिध्यात' रहाणे. कशाही प्रकारे. ह्याला खरच कशाचही बंधन नाही.

'जो अनन्य भावाने मला शरण आला आहे,त्याचा रोजचा व्यवहार(प्रपंच) मी स्वत सांभाळतो,' एवढ मोठ वचन भगवंतानी दिलय. ह्या भावामधेच 'त्या निराकाराला' पकडता येण शक्य आहे.

हे सगळ वाचताना कुणीही अजिबात 'दीवे घ्यायची' गरज नाही. आणि तरीही lightly घ्यायचच असेल तर, समई,निरांजन,उदबत्ती घ्या.


Prashantnk
Wednesday, August 23, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ्//

माधव,
धन्यवाद!
कर्पूर आरती मिळाली ना!

मृद्गंधा,
पत्ता कुठे आहे?

माउडी,
प.पू.श्री गोंदवलेकरमहाराजाविषयी लिहलेल आवडल.

मूडी,

माय-माऊली स्वामी समर्थ,ब्रम्हचैतन्याई गोंदवलेकरमहाराजांच्या विषयीच्या पोष्टची वाट बघतोय.

सगळे "म" वाले एकत्र?(अजून एक- महेश)


Madya
Thursday, August 24, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दिनांक २४

जसे पाणी हे शरिराचे जीवन आहे, त्याप्रमाणेच नामस्मरण हे मनाचे जीवन बनवायला हवे.

--- गोंदवलेकर महाराज


Mrdmahesh
Thursday, August 24, 2006 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
योग आणि बोध अतिशय सुंदर लिहिले आहेस.
आपण आंघोळ करताना.... भगवंताला अभिषेक... काय सुंदर कल्पना आहे. खरंच साध्या साध्या गोष्टीत सुद्धा भगवंताचे स्मरण कसे करावे. कुठल्या लेव्हल पर्यंत जाऊन करावे याचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
आसेच लिहित जा फार छान वाटते वाचताना.


Mrudgandha6
Thursday, August 24, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांतदादा,
खुप छान लिहित आहात."योग आणि बोध" निरुपण तर अप्रतिम
माझा पत्ता इथेच आहे पण जरा व्यस्त आहे.. शिल्पासरखी सध्या फ़क्त वाचनभक्ती सुरु आहे. जेव्हा "श्री" आज्ञा देतील तेव्हा लिहेनच..


Maudee
Friday, August 25, 2006 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत,
योग आणि बोध बद्दल ख़ूप छान विवेचन केल अहे.
ख़रच आपण आंघोळ करताना भगवंताला अभिषेक..... सुरेख़.
ख़र तर या आपल्या रोजच्या गोष्टीतूनच आपण कितीतरी जवळ जाऊ शकतो भगवंताच्या, नाही? फ़क्त सुचायला हवं. देहबुध्ही कमी व्हायला हवी त्यासाठी. बघूयात. ईश्वरेच्छा बलियसी.
सध्या ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न चालू आहे. काल दुसरा अध्याय म्हणजे सांख़्ययोग वाचला. पण ख़र सांगायचं तर ख़ूप confusion झाल.
असं म्हणतात की साधकाने गीतेचा अथवा ज्ञानेश्वरीचा फ़क्त ९ वा अध्याय वाचावा. त्यातच सम्पुर्ण गीतेच सार आहे. पण एकदा १ ल्या अध्यायापासून सुरुवात केल्यावर direct ९ व्यावर उडी मारू की नको ते कळत नाहीये.


Moodi
Friday, August 25, 2006 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत काही दिवसांनी लिहीनच मी. पण सध्या माझे ज्योतिष्य गुरु जे आता आपल्यात नाहीत असे स्व. श्री व्ही के फडके, पुणे यांच्या पुस्तकातील काही उतारे देत आहे. यांना प्रवासात एक थोर सत्पुरुष भेटले होते, त्यांचाच हा उपदेश.

साधकाने नेहेमी साधक रहाण्यातच आनंद मानावा. उपासनेद्वारा त्याच्या अंगी काही सिद्धी प्रकट होऊ लागतात, लोक मग त्याला ओळखु लागतात, पण याच वेळी साधकाने सावध राहिले पाहीजे, कारण देव त्याची परिक्षा घ्यायलाच बसलेला असतो. उपासनेद्वारा प्राप्त सिद्धी किंवा साक्षात्काराची कुणाजवळ वाच्यता करु नये. तरच ईश्वरी कृपा त्यांच्यावर होईल. साधनेत प्रगतीकरता वर्षानुवर्षे तप करावे लागते पण अधोगती मात्र चटकन होते.

|| श्रीराम समर्थ ||


Maudee
Monday, September 04, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे गेलास रे प्रशांत??
गणपतिसाठी गावी गेलेला दिसतो आहेस.


Prashantnk
Wednesday, September 06, 2006 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

माउडी,
गणपती बाप्पा मोरया,

तुम्ही जर श्रीज्ञानेश्वरीच पारयण करीत असाल किंवा पहिल्यांदा वाचत असाल, तर क्रमाने वाचावी.कारण हा एक महासिध्द ग्रंथ आहे आणि ह्या क्रमाने भगवंतानी सांगण्याचा एक विशिष्ट उद्देश आहे.भगवंताना जर अर्जुनावर कृपाच करायची होतीतर, काही न सांगताही करू शकले असते.पण त्यांची ही लीला आपल्याकरीता आहे,त्यापरम दयाळू भगवंतानी, अर्जुनाच निमित्त साधून कृपा आपल्यावर केली आहे.

इतरवेळी, संदर्भाकरिता वा चिंतनाकरिता असेल, तर एक ओवीही पुरेसी आहे.

खर म्हणजे,

श्रीज्ञानेश्वरमाउलींनी सर्वात पहिली लिहलेली ओवी

ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा ||१||

यामध्येच सर्वकाही सार आहे.त्याच्यापुढील ओव्या व अध्याय हे सगळ, आपल्यासारख्यांना,ह्या पहिल्या ओवीचा अर्थ समजुन सांगण्याकरिता आहेत.त्यामुळे प्रत्येक ओवीच चिंतन हेही तितकच महत्वाच.


Prashantnk
Monday, September 11, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

मूडी
तुमच म्हणन सोळा आणे खर आहे.


Gautami
Tuesday, September 12, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्त, तुम्हाला मी हितगुज वरून मेसेज टाकला होता. तो मिळाला का?

Prashantnk
Wednesday, September 13, 2006 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गौतमी,
मी आताच पाहिला,उत्तर पाठवतो.


Gautami
Wednesday, September 13, 2006 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशान्त, इथे मेसेज टाकल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे.

Prashantnk
Thursday, September 14, 2006 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

//श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ्//

प्रेम श्री भगवंतांवरच करावे:

आपले खरे हितैषी श्रीसदग़ुरूंनी सांगितल्याप्रमाणे,

प्रेम,प्रीती करावी, पण कोठे? तर जेथे वासना नाहीत तेथे. असे निष्काम,वासनारहित केवळ श्रीभगवंतच आहेत.म्हणून त्याच्यावरच प्रेम करावे.
आपला घोटाळा कायम इथेच होतो. आपले प्रेम असते व्यवहारांमध्ये;व्यवहारी लोकावर आणि प्रपंचावर.त्यामूळेच आपल्या आशांची आणि अपेक्षांची पूर्तता कधीच होत नाही.
या संसाराचे अगदी तसेच असते.वरून सगळे एकच दिसते;पण आतून भेद असतो. आपण 'मातृहृदय' असे कायम उदाहरण देतो;पण मातेच्या हृदयात देखील,आपल्या दोन मुलांबद्दल भिन्न-भिन्न माया असते.
श्रीभगवंतच,श्रीसदग़ुरूच असे असतात की त्यांचेसगळ्यावर सारखेच,निरपेक्ष प्रेम असते.म्हणूनच आपणही प्रेम त्यांच्यावरच करावे.

आपण मात्र आपल्याच पूर्वीकेलेल्या कर्मामूळे आलेल्या प्रारब्धानुसार, आलेल्या दु:खाबद्दल परमेश्वराला कायम दोष देत असतो.त्याच वेळी त्यांची आठवण येते.
ज्याला निष्काम कर्माचे सुत्र कळले आणि वळले,तो सुटतो.इतर खोल खोल गुरफ़टतच जातात. हे अगदी त्रिकालाबाधित सत्य आहे.
श्रीसंत गाडगे महाराज यांची एक गमतीशीर कथा आहे.ते म्हणायचे,"आपण घरची सगळी पलटण घेऊन,शनिवारी मारुतीला जातो.तेथे नारळ फ़ोडतो आणि त्यातला नखाएवढा खोबर्‍याचा तुकडा देवासमोर ठेवतो आणिवर त्याला विनवतो,"देवा; आमच्या गंप्या-चंप्या, पप्पू-टप्पू, चंगू-मंगू, या सगळ्यांना अगदी म्हणजे अगदी सुखात ठेव रे बाबा!"खर म्हणजे आपण त्याला सुनावतच असतो.
हा किस्सा सांगून, गाडगे महाराज विचारायचे," अगदी कुटक्याएवढ्या खोबर्‍याच्या तुकड्यावर, तुमची एवढी सगळी पलटण सुखात ठेवायला,देवाचा स्क्रु, ढिला झाला आहे की काय?"
एवढी आपल्याला ह्या सकाम कर्मांची सवय झालेली असते. आपण कधी निरपेक्षपणे काही करायचा विचारही करू शकत नाही,कृती तर बाजुलाच.
म्हणुनच प्रेम करावे,तर त्या कलीकाळावर सत्ता गाजवणार्‍या, आणि तरीही निरपेक्ष असणार्‍या श्रीभग़वंतावरच करावे.
ह्याच्या उदाहरणा दाखल मृद्गंधाने ललितमधे; "प्रेम" ह्या नावाने लिहलेले ललित अवश्य वाचावे.तीची स्वीकृती गृहीत धरुन खाली त्याची लींक देत आहे--
/hitguj/messages/75/116254.html?1158223554

Mrdmahesh
Friday, September 15, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशांत अतिशय सुंदर विवेचन!! मृद्गंधाचा लेख पण छानच. इथल्या विषयाला अनुसरूनच आहे.
सुंदर लिहित आहेस. वाचून मन अगदी शांत आणि प्रसन्न होतं :-)
तसं पहायला गेलं तर एक नाम हेच अंतिम सत्य आहे. त्याची कास धरली तर ईश्वरावरचे निरपेक्ष प्रेम आपोआपच वाढीला लागते. त्याचे दाखलेही आपल्याला वारंवार मिळतच असतात. दु:ख याचेच आहे की लोकांना इतरांच्या बाबतीत हे होताना दिसते, जाणवते पण ते स्वत: यात येत नाहीत. ते कायम खोबर्‍याचे तुकडे टाकतच फिरत बसतात. परंतु ज्याने नामाची कास धरली आहे त्याचा आत्मविश्वास, त्याची श्रद्धा अशा दाखल्यांमुळे जास्तच वाढते. तो अधिकच परमेश्वराजवळ जाऊ लागतो.
प्रशांत, तुझ्याकडून षड्रिपू किंवा तामस, राजस, सात्विक वृत्ती यावर काही अधिक लिखाण आले तर मला खूप आवडेल :-) धन्यवाद.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators